१ कप कणिक (गव्हाचे पीठ),
१ कप रवा (बारीक / मधम),
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल किंवा साधं तेल
चवीला मीठ,
कोमट पाणी
पास्ता हा हल्ली बर्याच घरात आठवडा पंधरा दिवसातुन होणारा पदार्थ. आमच्या घरीही लेक आणि मी पास्ता फॅन्स. अत्तापर्यंत मी नेहमी फ्रेश पास्ता विकत आणत होते पण परवा म्हंटल घरी करुन पहावा.... आणि जमला की हो कणिक, रवा हे आपल्या घरचेच चांगल्या प्रतीचे घटकपदार्थ वापरल्यामुळे पौष्टिक आणि गॅरंटीड!
करुन बघा... सोपा आहे
कृती:
१. कणिक + रवा + मीठ एका बोल मधे घ्या. मधे खळगा करुन त्यात ऑऑ/तेल घाला. हाताने जरा एकत्र करुन घ्या आणि सर्व एकत्र गोळा होईतो थोडे थोडे कोमट पाणी घाला.
२. ओट्यावर थोडे पीठ/मैदा भुरभुरुन त्यावर हा गोळा ठेवा आणि हलक्या हाताने मळा - फार घट्ट नको किंवा अगदी सैल ही नको.
३. साधारण ७-१० मिनीटे मळुन घ्या. तयार गोळा हाताला स्मुथ लागला पाहिजे.
४. हा गोळा क्लिंग रॅप्/प्लॅस्टिक रॅप मधे गुंडाळुन कमीत कमी २० मिनीटे बाजुला ठेऊन द्या. थोडावेळ जास्त राहिला तरी हरकत नाही.
प्रकार १:
५. आता या गोळ्याचे २ भाग करा. एक भाग परत रॅप मधे गुंडाळुन ठेवा. गोळा आणि परत थोड्या पीठावर हलका मळुन घ्या आणि लाटायला घ्या.
६. पोळी लाटताना लाटणे थोडे दाबुन लाटा. आणि प्रत्येकी ३ वेळा लाटल्यानम्तर पोळी अर्धी फिरवा.
७. मधुन मधुन लागेल तसे थोडे पीठ भुरभुरवा म्हणजे पोळी ओट्याला चिकटणार नाही. अश्याप्रकारे लाटत लाटत पातळ पोळी लाटुन घ्या.
८. या पोळीला १/३ भागात दुमडुन परत एकदा मधे दुमडा. प्रत्येक वेळेस दुमडताना थोडे पीठ भुरभुरवा. अशी गुंडाळी बनवुन घ्या.
९. या गुंडाळीला आता पीठ लावलेल्या सुरीने किंवा कातण्याने कापुन घ्या. अश्याच प्रकारे दुसर्या गोळ्याची पोळी लाटुन घ्या आणि तुकडे करा.
१०. पास्ताच्या पट्या अलगद उलगडुन पीठ पसरलेल्या ट्रेमधे ठेवा.
११. पातेल्यात भरपूर गरम पाणी त्यात थोडे मीठ घालुन उकळायला ठेवा. कापलेल्या पट्ट्या त्यात हलकेच सोडा.
१२. पास्ता शिजला की हलक्या हाताने पाण्यातुन काढुन निथळुन घ्या. आणि आपल्या आवडत्या सॉस बरोबर खा
हा लेकीसाठी केलेला 'चीझी पास्ता'.
प्रकार २:
जास्त वेळ नसेल तेव्हा पुढिल प्रकारे पास्ता करता येइल.
- रॅप मधुन काढलेल्या गोळ्याची साधारण पराठ्या इतकी किंवा किंचीत थोडी अजुन जाड पोळी लाटुन घ्या
- या पोळीचे धारधार सुरीने/ कातण्याने अरुंद पट्ट्या कापुन घ्या.
- आणि वरच्या स्टेप्स ९ ते १२ प्रमाणे पास्ता शिजवुन घ्या.
हा 'बेसिल चेरी टोमेटो कॅप्सिकम पास्ता'. यात वापरलेले बेसिल, चेरी टोमेटोज आणि कॅप्सिकम घरच्या बागेतले त्यामुळे हा पास्ता अगदी फ्रेश फ्रॉम फार्म पास्ता आहे
आवडीप्रमाणे यावर पार्मजान चीझ वगैरे घालुन खावे
- इथे लिहीलय ते वाचुन खुप खटपट लागेल असं वाटतं पण करायला लागलं की पटापट होतो हा पास्ता... स्पेशली 'प्रकार २' अगदीच पटकन होतो.
- माझ्याकडे पास्ता प्रेस नाही... म्हणुन मी लाटुन केला आहे. ज्या पुस्तकातुन रेसिपी घेतली त्यात पास्ता प्रेस वापरले आहे.
- मधे जेव्हा २०-२५ मिनीटे गोळा गुंडाळुन ठेवायचा असतो तेव्हा पास्ता सॉस बनवुन ठेवता येतो... पास्ता शिजला की लकेच सॉस मधे आणि लगेच प्लेट मधे आणि लगेच पोटात
आपण कुठे असता? पार्सलची सोय
आपण कुठे असता?
पार्सलची सोय आहे काय?
लाजो, काय प्रचंड उरक आहे!
लाजो, काय प्रचंड उरक आहे! मनापासून कौतुक!
फोटो पण फार सुंदर!
छान माहिती... थोड्याफार
छान माहिती... थोड्याफार अशाच प्रकारे माझी मावशी पाण्यातल्या वड्या करायची, छानच लागायच्या.
लाजो. सही दिसतोय तो चेरी
लाजो. सही दिसतोय तो चेरी टोमॅटो आणि कॅप्सिकम घातलेला पास्ता
छान पास्ता. याचे एक हातमशीन
छान पास्ता.
याचे एक हातमशीन मिळते. लाटणे आणि मग पट्ट्या कापणे त्यात होते. ते मशीन खुप जड असते, त्यामुळे माझ्या मस्कतच्या घरी राहिले. ते मशीन धुवायचे नसते म्हणे.
यात हातानेच आणखी काही आकार देता येतात.
परत एकदा सगळ्यांचे आभार
परत एकदा सगळ्यांचे आभार
दिनेशदा, मी पहिल्यांदाच पास्ता घरी केला त्यामुळे पास्ता प्रेस काही तेव्हढ्यासाठी आणले नाही पण आता घ्यावे की काय असा विचार चाल्लाय
पास्ता मेकर/प्रेस - हाताने फिरवायचा -
पास्ता मेकर/प्रेस - किचनएड अटॅचमेंट -
आधी ते ऑ ऑ म्हणजे आपण
आधी ते ऑ ऑ म्हणजे आपण कबुतराला दाणे घालताना जसं म्हणतो ना तसं वाटलं.
पास्ता घरच्या घरी म्हणजे लईच भारी .
एक दिवस वेळ काढून तुझे ते
एक दिवस वेळ काढून तुझे ते नोकी आणि हा पास्त असं दोन्ही करणार नक्की.
तुला दंडवत आहे बये.
आपला चकली-शेवेचा सोर्या असतो त्यातनं नाही का होणार? जाड शेवेची चकती वापरून.
भारीच आहे की पास्ता आनी हे
भारीच आहे की पास्ता आनी हे उपकरण पण
लाजो, मस्त!!
लाजो, मस्त!!
मस्त, नक्की करुन बघणार. धन्य
मस्त, नक्की करुन बघणार.
धन्य आहात सा बाई !
धन्य आहेस तू लाजो.. तुला
धन्य आहेस तू लाजो.. तुला अनेक धन्यवाद. रेडिमेड पाकिट लेकीला वार.न्वार द्यायला आवडत नाही - मैद्या आसेल म्हणून. आता हे करून पहाणार.
नी, चकलीसाठी किचन प्रेस वापरत असशील तर त्यात पट्ट्या पडणारी एक चकती आहे. मीही तीच वापरून पहायची ठरवली आहे पीठ भुरभुरवलेल्या ताटात ह्या पट्ट्या टाकाव्यात .
श्री नी, वर्षा, स्मिता,
श्री
नी, वर्षा, स्मिता, मंजुडी, अ_मी धन्स
चकलीचा सोर्या चालेल की नाही माहित नाही कारण पास्त्याचा मळलेला गोळा चकलीच्या मळलेल्या गोळ्यापेक्षा थोडा घट्ट बनेल..... पण ट्राय करायला नक्कीच हरकत नाही... जमलं तर मला पण सांगा....
खरतर 'प्रकार २' प्रमाणे केल्या पट्ट्या तर खुप पटापट होतिल आणि परत तो सोर्या, चकत्या धुण्याचे कामही वाचेल
अ मी, मी चकल्या बिकल्या एवढं
अ मी, मी चकल्या बिकल्या एवढं काही करत नाही गं घरी. त्यामुळेच >>>पास्त्याचा मळलेला गोळा चकलीच्या मळलेल्या गोळ्यापेक्षा थोडा घट्ट बनेल<<< हे जे लाजो म्हणतेय ते माझ्या डोक्यात सुद्धा आले नाही.
वरती ती चित्रं दिलीयेत ना त्यातलं दुसरं पाहून ते सोर्यासारखंच वाटलं. आईचा लाकडी सोर्या आणि पितळेच्या चकत्या आहेत पडलेल्या घरात. ते आठवलं म्हणून विचारलं गं
http://www.shutterstock.com/p
http://www.shutterstock.com/pic-60158995/stock-photo-murukku-hand-press.... हे बघ असा आहे माझ्या आईचा सोर्या. जुना आहे खूप.
नी, माझा पण असाच आहे...एकदम
नी, माझा पण असाच आहे...एकदम अँटीक व्हॅल्युवाला...सासुबैंच्या आईंचा.... पण मी पास्ता नाही ट्राय केला त्यात...
लाजो भारीच्चेस तु. किती काय
लाजो भारीच्चेस तु. किती काय काय प्रकार घरी करतेस पास्ता काय, न्योकी काय.. _/\_
सोरा वापरला तर खुप जोर लावावा
सोरा वापरला तर खुप जोर लावावा लागेल आणि पास्ता तेवढा स्मूथ दिसणार नाही.
कुणाला गव्हले, नखोते, मालत्या, बोटवे आठवताहेत का ? हे आपले पास्ताचेच प्रकार असायचे. (पुर्वी शुभकार्यात या पाच खिरी कराव्या लागत.) हे सगळे प्रकार हातानेच करतात.
मूळ पास्ता कृतीत पाण्याच्या जागी अंडे आणि ऑ.ऑ. वापरतात.
एखादी दोन मीमी आकाराची चौकोनी सळी मिळाली, तर त्याने छोटे तूकडे लाटून, शेलचा आकार देता येतो. एखादी २ सेमी आकाराची गोल चकती, हाताच्या अंगठ्यावर ठेवून बाकीच्या बोटाने कडा वर
गुंडाळत नेल्या तर टोपी सारखा आहार येतो.
>>>कुणाला गव्हले, नखोते,
>>>कुणाला गव्हले, नखोते, मालत्या, बोटवे आठवताहेत का ?<<< दिनेशदा, हो आठवतात की
पास्त्याचा 'रिसोनी/रायसोनी' (Risoni) नावाचा प्रकार मिळतो तो मोठ्या तांदळाच्या दाण्यासारखा असतो. सूप मधे वगैरे घालुन खाता येतो. मीही प्रयत्न करुन बघितलं पन फार वेळ लागतो.... हा बघा फोटु...
>>मूळ पास्ता कृतीत पाण्याच्या जागी अंडे आणि ऑ.ऑ. वापरतात<< कणकेच्या ऐवजी मैदा वापरतात किंवा काही पास्ता फक्त रव्याचा बनवतात. अंड घातले की पास्त्याला एक पिवळसर झाक येते.
मी जी न्यॉकी ची पाकृ टाकली आहे तो ही एक प्रकारचा पास्ताच आहे.
इथे नेहमी अंड्याशिवाय आणि होल व्हीट/कणिक वापरुन पाकृ करता येइल का अशी विचारणा होते त्यामुळे मी यावेळेस मुद्दामहुन अंडे आणि मैदा न वापरता पास्ता पाकृ दिली आहे
माझा पुढचा पास्ता प्रयोग अर्थातच अंडे वापरुन असणार आहे
हायला, तू भयंकर हुशार आहेस
हायला, तू भयंकर हुशार आहेस लाजो.
लाजो... मी आज हा पास्ता केला.
लाजो... मी आज हा पास्ता केला. मस्त झाला होता. मी हा पास्ता आणी या प्रकारे http://www.misalpav.com/node/16800 लेमन गार्लिक श्रिंप सॉस केला होता. Thanks
लाजो, मानलं .. ) , महान आहेस.
लाजो, मानलं .. :)) , महान आहेस. मस्त आहे कृती.
बाब्या सुनिधी धन्स अनघा,
बाब्या
सुनिधी
धन्स अनघा, पास्ता करुन बगितल्याबद्दल
चकलीच्या सो-याने करायला भयानक
चकलीच्या सो-याने करायला भयानक ताकदीचा गडी लागेल...
आजचा माझा ब्रेकफास्ट -
आजचा माझा ब्रेकफास्ट - ऐशु.
लाजो, आजच केला पास्ता. मस्त
लाजो, आजच केला पास्ता. मस्त आहे. बराच लवकर झाला.
फक्त नुडल्स तुटल्या. मी जास्त शिजवल्या असतील का? किती मिनीट्स शिजवावे?
सॉस साठी तू प्रतिसादात दिलेली ऑऑ घालुन केलेली रेसिपी वापरली. ती पण मस्त लागतेय.
mazya 10th madhalya bhachine
mazya 10th madhalya bhachine ata suttimadhe kahi recipe shikav mhanun sangitale ..
me tila ha pasta sangitala ... (phonevar karan ti nashik la ani me mumbai)
karun pahila ani bhachi mazyavar kup khush zali ani ata weekend menu suchav, tu khupach sopa and chan menu sangate mhanun ata navin recipe tuch sangat ja mhanun mage lagali ahe...
Thank you MAAYBOLI..
मस्त आणि सविस्तर लिहिलीय
मस्त आणि सविस्तर लिहिलीय क्रुती. ग्रेट. तरीही प्लीज नं ८ ची क्रुती अजून विस्तारून सांग ना. लिहिण्यापेक्षा त्याचे २-३ फोटो टाकलेस तर फार बरं होईल. ८अ, ८ब, ८क असे
पास्ता ह्या प्रकाराला नाक
पास्ता ह्या प्रकाराला नाक मुरडायची सवय होती पण ह्या घरगुती पाककृतीमुळे बनविण्याची उत्सुकता लागून राहिली आहे>>>>>>>>>>>> +१ (विदिपांना पूर्ण अनुमोदन)
करून बघायला पाहिजे.
शीर्षक एक्दम छान!! आणि अधिक टीपा मधला -- पास्ता शिजला की लकेच सॉस मधे आणि लगेच प्लेट मधे आणि लगेच पोटात >>>>>>>>> हे पण खूप आवडलं...:स्मित:
अरे व्वा! एक वर्षानंतर पास्ता
अरे व्वा! एक वर्षानंतर पास्ता परत ताजा
सावली, अनुराधा धन्स
शकुन, पुढच्यावेळेस केला की फोटो काढेन. पण फोटो ८ आणि ९ बघितलेस तर तुला घडी घालयची कशी त्याचा अंदाज येइल
Pages