बागकाम (अमेरिका) सीझन २०१२

Submitted by सीमा on 19 March, 2012 - 10:58

यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्‍या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची माहिती अंजलीने इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/18243

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल अन परवा मस्त हवा होती एकदम . बरंच बागकाम झालं
वांगी, भेंडी , मटार, पापडी, मुळा, लाल माठ, मायाळू, अंबाडी , चार्ड, अरुगुला अन दोन प्रकारचे टॉमेटो एवढ्या बिया लावल्यात . अजून थोडे पॉटिंग ट्रे आणून दोडके, मिरच्या, काकडी अन बीटरूट लावायचेत.

झोन ६ ( ब)

वांगी, मुळा, लाल माठ, मायाळू, अंबाडी याच्या बिया हव्या असल्यास संपर्कातून पत्ता कळवा .

आत्ताच एका कलीगने डेझी, लायलॅक, रोझ ऑफ शॅरन , सायबेरियन आयरिसेसचे कंद आणून दिलेत.

बागकाम कधीच केलं नसेल आणि सुरवात करायची इच्छा असेल तर साधारण किती वेळ यार्डवर्क करावं लागेल? फार मह्त्वाकांक्षी प्लॅन नाही फक्त मिरच्या, कोथिंबीर, पुदीना, कढीपत्ता लावायचा तर?

झोन: ८ अ किंवा ७ ब. (बॉर्डर वर आहोत.)

Optimized-yellowrose.jpg

आमच्याकडे हा पिवळा गुलाब असा फुललाय. नाव :yellow Banksia Rose असावा.
काटे नाहीत. climber आहे. स्प्रिंगच्या सुरुवातीला फुलतो. साधारण दोन एक महिने रहातो असाच.

भारतीय बीया मागविण्यासाठी ही साईट चांगली वाटली.
http://www.seedsofindia.com/

बागकामासाठी माहिती या साईटवर चांगली आहे.
http://forums.gardenweb.com/forums/

पुण्यात फुले मार्केटच्या शेजारी एक बीयांचे दुकान आहे. तिथे बीया चांगल्या मिळतात. इकडे आपल्या जबाबदारीवर आणाव्यात.

गेल्या वीकमध्ये स्पिनॅच , चार्ड ,मेथी , कोथिंबीर लावली आहे. आतापर्यंत पाहिलय कि साधारण ६५ ते ८० च्या दरम्यान तापमान असेल तर लगेच उगवून येतात.

पुदीना वीड सारखा वाढतो. त्याला काही लक्ष द्यावं लागत नाही.
कढीपत्त्याबद्दल अंजलीने सविस्तर लिहिले आहे .
मिरच्या उगवणे अगदी सोपे आहे - पाणी घालावे लागेल नियमित तेवढेच.

कोथिंबीरीसाठी घरातले धणे पेरले तर काम होईल. पण अमेरिकेत मिळतो तशी पसरट पाने , उंच काड्या येत नाहीत. बारीक पाने, ४-६ इंच उंच काड्या अशी कोथिंबीर येते. पण उगवणे अगदी सोपे आहे धणे जरासे भरडायचे टावेलमधे घालून अन पेरायचे .

लसूण लावणे अगदी सोपे आहे. लसणाच्या कुड्या सोलून किंवा न सोलता निमुळती बाजू वर येईल अशा पेरायच्या. लहान कुंडीत पेरल्या तरी चालतील. दोन आठवड्यात पात वर यायला लागेल. वरची पात काढून चटणी करायची किंवा फोडणीत लसणाऐवजी घालायची. पेरलेली कुडी न काढता तशीच ठेवली तर ४-६ महिन्यात जमिनीत लसणाचा गड्डा तयार होईल.

असामी, बेगोनिया मी पण काल आणलेत. आमच्याकडे तर ते Texas staple म्हणुनच ओळखले जातात. Happy
यावेळी मी कंटेनर गार्डनिंग मॅगेझिन वाचून इतकी इंप्रेस झाली आहे त्यामुळं बरेच डिझाईनर कंटेनर करायच डोक्यात आहे. Happy

आमचा झोन ४ आहे. मी आत्तापर्यंत कधी एवढे खूप गार्डनिंग केलं नाहीये. इतक्या आधीपासून तर कधीच केलं नाहीये. समर मध्ये थोडं फार लावते. पण यावर्षी जरा वेळ आहे यासाठी तर करायचा विचार आहे.
भाज्या लावल्या किंवा इतर काहीही तर सध्या आतमध्येच ठेवाव्या लागतील का?

यावेळी मी कंटेनर गार्डनिंग मॅगेझिन वाचून इतकी इंप्रेस झाली आहे त्यामुळं बरेच डिझाईनर कंटेनर करायच डोक्यात आहे >> हे बेगोनोया नि डेलिया प्रेम आमच्या गळ्याशी आलेय. Hardiness मूळे container मधे लावावे लागतात नि मग गराज नि बेसमेंट winter मधे कुंड्यांनी भरतेय नि माझी पउचल्ह्या जड कुंड्यांची चढ उचल करून भरतेय Wink

ह्या वेळी cone flowers ची रांग बनवायचा विचार आहे, बघू जमते का ....

Cone flower Happy असामी , एकदम सेम चॉइस हा. मी मागच्या वर्षी बीया पेरल्या. आमच्याकडे सशांचा उपद्रव फार. कोवळी रोपे सगळी खावून टाकली. काल मग मी सरळ मध्यम पॉट आणलाय कोन फ्लॉवर आणि fox glove चा. Happy

Mexican Sage आणली आहे. कंटेनर गार्डनिंगसाठी.
petunia दगा देतात मला. यावर्षी आणले नाहीत मग.

यावेळी ग्लायडेलियाचे कंद लावतोय. आणि डेलीयाचे पण. बघु काय होतय.

पुदिना सोपा आहे लावायला. मिरच्या , टेक्सासमध्ये तर अगदी सोप्या आहेत. तयार रोप Homedepot ,lowes मध्ये मिळतात. सुरुवातीचे , वाफे तयार करण्याचे काम कुणाकडुन करुन घेतले तर बागकामाला जास्त वेळ लागत नाही. आवड पाहिजे खरं.

petunia माझ्याकडे आणि शेजारणीकडे दरवर्षी असतात. ह्या झाडाला पाणी घातलं की दहा मिनिटात पानं-फुलं एकदम चकाकीत दिसतात (असं मला वाटतं).

शोनू, सीड्स ऑफ इंडिया वर क्रेडिट कार्डाने खरेदी केली का ?

सीमा, दुसरा पर्याय नसल्याने मी कंटेनर्स मध्येच लावते फुलझाडं आणि भाज्या पण. पुदिन्याला 'आवरा' म्हणायची वेळ येते इतका फोफावतो कुंडीत सुद्धा. बाकी भाज्या इतक्या नीट वाढत नाहीत Sad

सीड्स ऑफ इंडिया वर क्रेडिट कार्डाने खरेदी केली का ? हो, पण तू काही ऑर्डर करायच्या आधी मला विचार, माझ्याकडे नसतील बिया तर(च) तिथनं मागव .

पेटुनियाची रोपं आणतो दरवर्षी. उन्हाळाभर रंगाला मरण नाही ! इम्पेशंस पण तसेच.
आम्ही जास्वंदाची आत बाहेर ने आण करतो दरवर्षी. पण फक्त चार (?) कुंड्या आहेत त्यामुळे नवरा फारशी कुरकुर करत नाही.

सीमा, पिवळा गुलाब कसला सुंदर बहरलाय!

कृपया आपल्या बागांचे फोटो टाकत रहा. कदाचित मलाही उत्साह येईल बागकामाचा!

शोनू, धन्यवाद Happy मी बघून सांगते. माझ्याकडे पण गेल्या वेळच्या आहेत काही. ह्या साइटवरुन पहिल्यांदाच काही घेणार आहे.

मला अंबाडी आणि लाल माठ चालेल. Happy

मी अजून काही सुरुवात केली नाही. हवा अशीच राहिली तर घरात आणलेल्या कुंड्या बाहेर ठेवायला लागेन, आहेत ती री-पॉट करेन. मग बाकी बघेन.

लेकाने भारतवारीत जाईल त्यांच्याकडून कसल्याकसल्या बिया आणल्या आहेत. पारिजातक, अबोली आणि बाकी अक्षरशः वाट्टेल ते! ते सगळं पेरून बघणार आहे.

त्याने बटाटाही गंमत म्हणून पेरलेला बराच उंच वाढला आहे घरात. तो उपटून बघायला हवा आहे. अळू लावेनच.

लेकाने भारतवारीत जाईल त्यांच्याकडून कसल्याकसल्या बिया आणल्या आहेत >> आणि मग कस्टमला काही नाही कटकट झाली?

Herbs: माझा कढीपत्ता थन्डीत गेला. Mint, Basil एकदम मस्त. पातीचहा थोडा सुकलाय, त्याला परत हिरवागार कसा करता येइल? मेथीची bi-weekly शेती चालते उन्हाळा सुरु होइपर्यन्त.
<<<पण उगवणे अगदी सोपे आहे धणे जरासे भरडायचे टावेलमधे घालून अन पेरायचे>>>मेधाताई कशानी भरडायचे? माझे गेल्यावर्षी आले नाहीत.

Veggies: भेन्डी, कारली, टॉमाटो, दुधी, वान्गी, मिर्च्या starter pots मधे आहेत. यातल काय किती येईल देव जाणे. माझा आळू थन्दीत गेला. परत येतो का? शेवगाच्या शेन्गान्ना फुला आली आहेत पण तो कुन्डीत आहे. जमिनीत टाकल्यावर GOK.

Fruits: Persimmon जमिनीत transplant करताना गेला. Figs, Pomogranate आणि Mandarin जगतायत पण तेवढच, अजुन लहान आहेत. गेल्या आठड्यात सिताफळ आणि चिकुच्या बिया कुन्डीत पेरल्यात, बघू काय होतय.

Flowers: Azaleas full bloom मधे आहेत सध्या. Happy फोटो टाकीन रात्री. Magnolia आधुन - मधुन डवकावतो. गेल्या समर मधे गोकर्ण भरपूर आला होता. बाकी जास्वन्द, आनन्त आणि मोगरा कुन्दीत.

Zone: 9A

प्राजक्त मी पण लावला होता २ वर्षांपुर्वी. भराभरा वाढतो. पण माझा नंतर पाणी न घातले गेल्याने वाळला Sad तुमच्याकडे रोपं उतरली तर मला एक द्या. बदल्यात कण्हेर देइन (नको असला तरी) Happy

>>>माझा आळू थन्दीत गेला. परत येतो का?
हो, येतो. हिवाळ्यात कंदं डॉर्मंट होतात. भरपूर पाणी घाला, उगवेल.

अरे हो मी पण कडवे वाल आणते, पण बीया आणाव्या कधी डोक्यातच नाही आलं, ह्यालाच म्हणतात ग्रीन थंब चा अभाव!

जाड टावेलवर मूठभर धणे ठेवायचे, वरतून परत टावेलचा एक थर ठेवायचा अन लाटण्याने लाटल्यासारखं करायचं . किंवा टावेलनेच जोर लावून चुरडले तरी चालेल. एका धण्याची दोन दळं व्हायला हवीत.

मला गोकर्ण, अबोली यांच्या बिया चालतील :हावरट बाहुली:

सिंडीने दिलेल्या शंकासुराच्या बिया मस्त रुजल्या होत्या, तीन वर्षे नीट आत बाहेर केल्यावर एका वर्षी शेजार्‍याच्या मांजरींनी त्याची अन विस्टेरियाची वाट लावली Angry

पेटुनिया सशांचे आवडते खाद्य. Sad गाजर आणि ते लावल कि कधीच टिकत नाहीत.

BS ,अळु येतो परत. माझा येतो. सावली पाहिजे. नाहीतर कंद , मिळतोच इंग्रो मध्ये. धने , लाटण्याने भरडायचे.
९ अ झोन म्हणजे फक्त स्प्रिंगमध्येच येईल. कारण आमच्याकदे ८०-८५ वर तापमान गेल कि येत नाही कोथिंबीर.
पातीचहा , येतो. काही न करता येतो. Happy

सिंडी , वांगी आणि बेल पेपर्स मी पण पॉट मध्येच लावते. १०० च्यावर सलग तापमान गेल कि फुल गळतात. म्हणुन मग part shade मध्ये ठेवते.

मेधा, मायाळुला दुसरं काही नाव आहे का? अजिब्बात लक्षात येत नाही आहे कशी दिसते भाजी ते.

दोडक्याच्या बीया हव्या असतील तर कळवा. पाठविते.

अबोली रुजली तर मला रोप चालेल Happy भारतात पाईप लावून पाणी घातलं असेल झाडाला तर अबोलीच्या बिया चटचट आवाज करत उडून गेलेल्या असतात.

पोही / पोईचा वेल खूप फोफावतो. त्याला मांडव किंवा काड्यांच्या चटईचा आधार द्यावा.

त्या मुळबुळीतपणापायी त्याची (फक्त) भजी(च) उत्तम लागतात. (लोक तरी डाळभाजी करतात!)

झोन ९बी आणि पामर ड्रॉट इंडेक्स -३.१० आहे. कृपया कुठली झाडं लावावी ते सुचवा. इथल्या नर्सरीतले लोक मदत करतात, पण सगळी महाग, हाय मेंटेनन्स झाडं गळ्यात मारतात.

ओली किंवा सुकी कोलंबी घालून ( मुगा मोळोचा मसाला ) करतात ती एकदम भारी लागते. शिवराक लोकांनी ओले काजूगर घालून करायला हरकत नाही.

Pages