उपायुक्त देती आदेश अभियन्त्याला
जागा पाहुनि द्यावा अहवाल त्याना
पहावे बांधकाम असे वा नसे
मंज़ूरी अन अन्दाजपत्रकाप्रमाणे
बोलविती अभियंता सहायकाना त्याच्या
दाखवुनि आदेश उपायुक्तांचे
देई निर्देश दाखविण्याचे जागा
अन मंज़ूरी आणि अन्दाजपत्रक
ठरली वेळ पाहण्याची जागा
दूजा दिनी वाजता अकरा
फ़ोन येई जनसेवकाचा रात्री
करी विनन्ति अभियन्त्याला
द्यावा उपायुक्ताना अहवाल होकारार्थी
सांगावे जर असे अहवाल नकारार्थी
दाखविती जागा सहायक अभियन्त्याचे
नसे घेतली मंज़ूरी योग्य विभागाची
नसे केले काम अन्दाजपत्रकाप्रमाणे
फोटो बान्धकामाचे घेई अभियंता
उपायुक्त करिती फ़ोन अभियन्त्याला
बोलावे त्यान्च्याशी अहवाल देण्यापुर्वी
भेटूनी उपायुक्ताना
अभियंता दाखवुनि फोटो
कथिती अहवाल सारा
देती आदेश उपायुक्त
दयावा इशारा कनिष्ठाना अन
घ्यावी कार्योक्तर मंज़ूरी सत्वरी
सूचना देती अभियंता सहायकाना
करावी पूर्ती उपायुक्तान्च्या आदेशान्ची
पुन्हा उपायुक्त बोलाविती अभियन्त्याला
सांगती मदत करण्या त्या जनसेवकाला
अन अहवाल लिहूनी द्यावा चांगला
'अहवाल देईन खरा'
अभियंता बोले उपायुक्ताना
ऐकुनि बोल अभियन्त्याचे
दिले निर्देश उपायुक्तानी
'अहवाल घेईन अभियन्त्याकडुन दुज्या.
पाठवावी फ़ाइल त्याच्याकड़े'
घेतला अहवाल उपायुक्तानी
जसा हवा होता तसा त्यानी
हे काय आहे? कथा की
हे काय आहे?
कथा की कविता..?
कथेतून कविता?
कविता मधून कथा..?
कवितेमधुन कथा
कवितेमधुन कथा
ग्रेट ग्रेट !! उपायुक्तांचे
ग्रेट ग्रेट !!
उपायुक्तांचे आदेश यात जे काव्य आहे ते आपण समोर आणलंत. या प्रतिभेला दाद दिलीच पाहीजे. कवितेमधून कथा आणि कथेतून कविता हा एक नवा फ्युजन प्रकार आपण हाताळला ही देखील एक वेगळी प्रतिभा आहे. कथा मुक्तछंद, वृत्त आणि मुक्तत या फॉर्ममधे लिहीलीत ही आणखी एक प्रतिभा !
आपलं नाव प्रतिभा भांडारे तर नाही ना ?
देवकाका... चाल लावा
देवकाका... चाल लावा