केबल कफ कॅप

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 12 March, 2012 - 10:52

चार दिवसांपूर्वी नेटवर सर्फिंग करता करता क्रोशे कामाचा एक सुरेख ब्लॉग दिसला. तो बघतांना एक केबल कफ कॅप दिसली. मनापासून आवडली. ३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली. तिथे एकाच रंगात होती. पण उरलेले रंग वापरुन मल्टीकलर कॅप बनवली.

ही त्या ब्लॉगची लिंक.
http://crochet-mania.blogspot.com/2012/03/crochet-cable-cuff-cap.html

DSC00512_0.JPGDSC00514_0.JPGDSC00527_0.JPG

गुलमोहर: 

खूपच सुंदर झालीये ही कॅप! खरंच तुमच्या हातात कला आहे. आणि रंगसंगती पण खूप छान जमलीये. तुम्ही केलेल्या इतरही वस्तू बघायची उत्सुकता लागून राहिली आहे.

फारच सुरेख. तुमच्या लेकीचा हेवा वाटला. अशी कॅप सहजासहजी नाही मिळणार बाजारात. हे उरलेल्या लोकरीतून केलंय असं म्हटलं तरी तुमचा रंगसंगतीचा सेन्स अगदी युनिक आहे Happy

विनार्च, मनिमाऊ, शांकली, अंशा, अगो, दिनेश, आर्च, अबोली, आशुतोष, विद्याक, शशांक, चिमुरी, अनुराग, मयुरी.......खूप खूप धन्यवाद Happy