नश्वर नसणारी.....

Submitted by yachwishay on 12 March, 2012 - 08:28


जुएव वरून सारखा पाहत होता. दारावर थाप पडल्यास आणि त्याची झोप डोळ्यात उतरल्यास काही एक क्षण गेले असतील.

कानाची गरम पाळी किंचितशी संवेदली, तेव्हा त्याला जाणवलं कि वाट बघावी ती कुठवर... टेरेसलाच बसून, आपणच काही कराव..

ठप .. ठप..

हम्म.., आला असावा तोच..

तिरकी मान आणि हात वर ओढून आळोखा देतच तो ओरडला..."काम्मीन बेब.."

खेर्वून नसता वेंधळाच आहे...अस काहीस मनात बडबडत.. उतरला..

खर्रकन... हात बाजूला होत, समोर बघत त्याने डोळे मिचमिचे केलेत.

तेच अश्या पद्धतीने दारावर थाप मारणारा कोण ? याचा उलगडा त्याला झाला..

झपकन तोंड त्याच्या पायाशी नेत वुइन्ग.. वुइन्ग.. आवाज करत मर्फी कुटुंबियांची कुत्री त्याला सामोरी गेली...

या अनपेक्षित प्रकारावर भांबावून जुएव तसाच ओरडला.."व्हेर यु इन ब्रीझ्द मर्फी बिच?.."

शेपटी भराभर हलवत विव्हळणारी ती, असली तिची अवस्था तो पहिलांद्याच बघत होता..

काही तरी भयानक घडल्याची सरसर जाणीव त्याच्या मनाला स्पर्शून गेली..

त्याची नजर तिच्या भेदरलेल्या डोळ्यात साठली..

इतक्यात क्षण होतो न होतो.. तोच ती पाठमोरी होऊन बर्फ भरल्या अंगणात पळू लागली.. त्याला अर्थार्थी समजावत..

झपाझप पाय खुपत जाणारी, तो बघत थबकलाच..

एक थंडीची जाण न राहता तोही तिच्यामागे धावला..

खेर्वूनची प्रिय लाडकी, मला नेहमी टाळणारी.. आज मला काय सांगायचा प्रयत्न करतेय हे त्याला कळेनास झालंय..त्याच्या मनात

खेर्वूनच्या कारला छिन्न भिन्न अवस्थेत पाहताच तोही भेदरला..

आणि ..तो पुढे बघायच्या आधीच खाली कोसळला..

एक जोरात भुंकण्याच्या पलीकडे तिथे केवळ शांतता होती..काय माहित कुठवर..कधीस्तोवर....


दर रात्री आठवणारा प्रसंग झिडकारून जुएव तयार होऊ लागला. निवडलेली कपडे अर्ध्यात अंगावर सरावली होती, ती पूर्ण निस्तरून थंडीचा अंदाज घेऊ लागला. टेंटची बांधाबांध संपली. भारत यात्रेस येण्यास खेर्वून पुढाकार का घेत असे, हे त्याला इथे येऊनही उलगडले नाही. तीन वर्षभर कुमार समजावत होता; आताही तसाच डोळ्यासमोर उभा आहे..सुवास भरून खोल पोहचावा शरीरात, तसा भास त्याला त्याच्या समजावणुकीत जाणवायचा..

"हॉव उल बी मेंतेंद इन दिस कॉल्ड?".. कुमारने त्याला पुकारल, नकळत आपण त्या थंड गार प्रसंगाची जाणीव करून दिली, असे वाटत तो जुएवला निरखू लागला.

गंध जवळून जातोय अस वाटत जुएव त्याला हुंकारला. कधीचा तयार असलेला कुमार जुएवसोबत निघाला.

"होप वी'ल सी सन रेज इनसीदेंतली! "

किर्र.. किर्र.. रात्र सरतेय आणि पावले वेगाने वर सरकतायेत..

दाट अंधारात केवळ कुमारला धुंडाळत वेग गाठण्यात जुएव कमी पडत होता, भारताची दुरकिर्ती असावी निशाचरांबद्दल... अस काहीस मनात बडबडत..

भारताच्या अतोच्च थंडमय परिसराला जुएव सहज जुळून गेला..

पावलांच्या आवाजाची पाठराखण करताना त्याचा शिखराकडे जाण्याचा निश्चय अधिक दृढ होत होता. कुमारला असलेली कणकण त्याला ठाऊक नव्हती. थंडी भरल्या मोसमाची उच्चता भारतातल्या जीवांची अधिक हानी करते हेही त्याला माहित नव्हत..

सुगंधाची झुळूक वारंवार येत होती.. गडद शांतता, प्रफुल्लीत वातावरण...तसा जुएव सुखावला..

खरच भारताचा पत्ता आतापर्यंत आपल्याला का माहित नव्हता.. असा विचार करत..

बर्फ झरझरू लागला आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही..दोन वर्षापूर्वी हरवलेली गोष्ट सृष्टी उलगडवत होती..

"हम्म..स्नो फॉल..!!!!"

"...."

"हेय.. एर उ ऑलराईट..?" त्याला कुमारचा हात गरम अति उष्ण जाणवला ..

मागे वळत श्वास घेण्यासाठी दमछाक होणारा कुमार जुएवच्या अंगावर लपेटला..नाही जणू कोसळलाच..

अंधारात खांद्यावर रित झालेलं त्याच कलेवर न जाणो किती वेळ जुएव निरखत होता..

एका मृत कस्तुरी-मृगाच्या सुगंधात..


रात्रीत स्वप्न पडल्यामुळे जुएव हबकून जागा झाला..

ठरवून ठरवून खेर्वून आणि कुमार यांची मरणाची विदारक अवस्था झोपल्यावर का नजरेसमोर येते याचा विचार करत तो उठला..

कुठल्याश्या दिव्याखाली रस्ता संपत नाही तोपर्यंत निरर्थक फिरत, विचार करत बसला..

"माझ्या सदोदित सोबत बहरणारा वोकॅलिस्त खेर्वून हा एक समग्र अनुभव विश्वच ..तसच..

प्रगल्भ इंडिअन पोएट कुमार माझ्या मनाच्या कितीसा दूर..नाहीच तो!....यांचा मानवी मृत्यूत अंत मला नेहमी का खळवळवतो...

---अनुभवांचा डबकेपणा आणि डबक्यांनी अंथरलेले अनुभव या गुंत्यात मनाचा व्यापकपणा, कल्पनेच्या भरारी यांना अर्थ कुठे असणार..

...असही शरीर ही गोष्ट खूपच डबके सिद्ध ..अशी निरंतर,

शरीर जपावं..गोंजारावं..पोसावं...स्वार्थी व्हावं...व्यापक-कल्पनातीत मनाची लालसा त्याच मार्फत पूर्ण करावी...

पण जरा एखाद्या वेगळ्या व्यक्तीत ..वाढलेल्या शरीरात ..व्यापक झालेले त्या व्यक्तीचे मन ..त्याच शरीरातून अनुभवायचं...

---अस तर निव्वळ अशक्य...

.....

जगण्यातली साचलेली विचित्र अवस्था सदैव अस्वस्थ करायची, मग ती अश्यारितीने उफाळून वर येणारच..."

या समेवर येत तो दूर विहित शहराचा परिश्रांत नजारा नजरेत साठवत परतला......................

..

गुलमोहर: 

त्या जुएव नावाच्या व्यक्तिला दोन भयानक स्वप्न पडतात, अस काहिस आहे.. पण नंतर काय?? का पडतात स्वप्न?
कोण हे सगळे..? काय संबंध एक्मेकांशी? काहिच लिंक नाहिये.

माफ करा पण अजिबात नाहि समजली.