कोमट पाणी : १/४ कप
कोमट दूध : १ कप
तेल : १/३ कप
ब्राऊन साखर / साधी साखर / मध - १/४ कप (हे मी जी रेसिपी नेटवरून घेतली होती त्यातलं प्रमाण दिलं आहे. पहिल्यांदा बन्स बनवले त्यावेळी याच प्रमाणानं मी पाव कप मध वापरला. पण खरंतर या प्रमाणानं बन्स गोड लागतात. त्यामुळे दुसर्या वेळी करताना एक चमचा साखर वापरली. ते आपल्याला झेपतात.)
यीस्ट - २ टेबलस्पून (ब्लुबर्डचं ड्राय यीस्ट मिळतं. हे छोट्या छोट्या दाण्यांच्या स्वरूपात (granules) असतं.)
मीठ - १ टेबलस्पून
अंड - १
कणिक - साडेतीन कप
इथे लिहिलेल्या पदार्थांच्या प्रमाणात जो कपाचा उल्लेख आहे तो आपल्या चहाचा कप नाही. हे कपाचे प्रमाण म्हणजे जे मेझरिंग कप्स असतात त्यांचं आहे. नेहमी घरी केक वगैरे करणार्यांकडे असा प्लॅस्टिक अथवा काचेचा मग असतो, त्यावर अर्धा कप, एक कप अशा खुणा असतात. साधारणपणे असा एक कप म्हणजे आपला चहाचा दीड कप (मध्यम आकाराचा) होतो. हे मी माझ्या घरातल्या चहाच्या कपाच्या प्रमाणाने सांगितले आहे. थोडेफार प्रमाण बदलले तरी ब्रेडवर तसा फारसा परिणाम दिसणार नाही.
या प्रमाणात घेऊन खूपच बन्स बनतात. म्हणून साधारण ३ लोकांकरता हवे असतील तर अर्ध्याच प्रमाणात बनवावे.
कोमट पाणी, कोमट दूध, यीस्ट, तेल, साखर (किंवा मध) एका भांड्यात व्यवस्थित एकत्र करा आणि झाकून १५ मिनिटे तसंच राहू द्या.
अंड फोडून हलकेच फेटून घ्या.
पंधरा मिनिटांनी त्या मिश्रणाच्या भांड्यात अंडं, मीठ आणि कणिक घाला आणि चांगलं एकत्र करा. पुन्हा १५ मिनिटांकरता झाकून ठेवा.
एकीकडे आवन ३७५ डिग्री फॅरनहाईट (म्हणजे साधारण १९० डिग्री सेल्सियस) ला गरम करून घ्या.
पंधरा मिनिटांनी भिजवलेली कणिक नीट मळून घ्या. आता त्या कणकेला जाळी सुटलेली जाणवेल. या कणकेचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करून आवनमध्ये १० मिनिटांकरता (किंवा बाहेरून सोनेरी-तांबूस रंग येईपर्यंत) भाजा.
नुसते गोळे करण्यापेक्षा बर्याच कलाकुसरीही करता येतात. पहिल्यांदा बन्स केले त्यावेळी आम्ही बरेच आकार केले होते. करण्याच्या आणि खाण्याच्या त्या उत्साहात फोटो काढायचे मात्र राहून गेले. पण काही आकार :
स्माईली बनवणे - चपटा गोळा करून त्यावर दोन छोटे गोल डोळ्याच्या जागी आणि एक सुरळी करून हसरं तोंड बनवता येईल.
वेणी - तीन सुरळ्या करून तिपेडी वेणी वळून दोन्ही बाजूची टोकं व्यवस्थित एकत्र करून ठेवा.
असेच चकली, लगोरी, ब्रेडस्टिक्स असे असंख्य प्रकार करता येतिल.
हा ब्रेड गरमागरम एकदम सही लागतो. पण उरलात तर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. एखाद-दोन दिवस चालेल.
हवं असल्यास कणिक भिजवताना त्यात पार्सली, ओरेगानो, बेसिल असे हर्ब्ज घालत येतील. दालचिनी पावडरही घालून करता येईल.
हा ब्रेड : ही जाळी किती छान
हा ब्रेड :
ही जाळी किती छान पडली आहे पहा :
हा सुपाबरोबर खाल्ला की जेवण झालं. न्योकी सूप :
भारीच. कधी येऊ खायला?
भारीच.
कधी येऊ खायला?
मामी संडे का उद्योग??? झक्कास
मामी संडे का उद्योग??? झक्कास यम्म दिस्तायेत गं..
सूप?? व्हाईट सॉस मधे केलंस??
नी, अगं आता तरी येशील असं
नी, अगं आता तरी येशील असं वाटतंय.
वर्षुताई, हे सूप http://www.maayboli.com/node/33253 इथल्या चिकन न्योकी सुपाचं व्हेज व्हर्जन आहे. कालचा उद्योग आहे.
है क्का आता.. ठरलेला प्लॅन
है क्का आता.. ठरलेला प्लॅन कोण कॅन्सल करतं? आँ?
मामी ऐवजी मामिला कोण
मामी ऐवजी मामिला कोण गेल्तं???? हे एक ऑफिशियल कारण.
हां थांकु आत्तच वाचली
हां थांकु आत्तच वाचली रेसिपी.. समव्हॉट पातळ व्हाईट सॉस..
मी जायफळ,वेलची अजिबात वापरणार नाही या सुपात..
हो!! नाहीतर बासुंदी,रसमलाईचा भ्रम व्ह्यायचा नवरोबाला
वर्षुतै, मी जायफळ वापरलं. अगं
वर्षुतै, मी जायफळ वापरलं. अगं फारच मस्त वाटतं. जास्त घातलंस तर जेवून झाल्यावर तासाभर झोपेची निश्चिंतीही होईल.
या रेसिपीमधे तुम्ही Prooving
या रेसिपीमधे तुम्ही Prooving अजिबात केलेले नाहीत, ब्रेड बेकरी सारखा हलका होतो का?
आहा, सूप आणि बन्स दोन्ही काय
आहा, सूप आणि बन्स दोन्ही काय मस्त, फ्रेश दिसत आहेत. बन्सचा रंगही एकदम परफेक्ट. नक्की करुन बघणार
सोप्पे वाटताहेत. करून बघणार
सोप्पे वाटताहेत. करून बघणार नक्की.
@ deepac73 proving म्हणायचंय
@ deepac73
proving म्हणायचंय का तुम्हाला? कणिक घातल्यावर १५ मिनिटं झाकून ठेवतोय ना? तेवढं बस होतं. मस्त खुसखुशीत होतात बन्स.
मामी, आज लगेच करुन बघितले.
मामी, आज लगेच करुन बघितले. गरमागरम, खुसखुशीत घरगुती ब्रेड खायला काय मजा आलीय ! खूप खूप धन्यवाद रेसिपीबद्दल. फक्त फारच आयत्या वेळी ठरवल्यामुळे कॅन्ड सूप केले आणि सॅलड ठेवले. त्यामुळे त्याचा फोटो टाकत नाही, फक्त बन्सचाच टाकते
बन्सचे गोळे करुन द्यायचे काम मुलाने केले ( योग्य साईझची कणिक त्याच्या हातात दिल्यावर ) त्यामुळे त्याला फारच भारी वाटतेय
वा, सुंदरच झालेत ब्रेड. एकदा
वा, सुंदरच झालेत ब्रेड. एकदा बेसिक कृति जमली, कि बरेच
प्रकार करता येतात.
मामी, सोपी सुटसुटीत कृती.
मामी, सोपी सुटसुटीत कृती. करुन बघेन नक्की.
अगो, ग्लेझिंगसाठी काय केले ? मस्त दिसताएत बन्स.
मस्त रेसिपी आणि फोटो. अगोचे
मस्त रेसिपी आणि फोटो. अगोचे पावही (मराठी पाव) भारीच दिसतायत. नक्की करुन बघणार.(त्यावर मस्त चमक कशाने आलीये?
मस्त रेसिपी. मामे. पाववाली
मस्त रेसिपी.
मामे. पाववाली झालीस
अगो, कसले मस्त दिस्तायत.
अगो, कसले मस्त दिस्तायत. ग्लेझिंग कशी केलीस? क्रस्ट फारच मस्त दिसतंय.
तोषा ....
मामी, मस्त रेस्पी! विदौट अंडे
मामी, मस्त रेस्पी! विदौट अंडे कस्काय करायचं?
बन्स बाहेर काढल्यावर किंचित
बन्स बाहेर काढल्यावर किंचित बटर लावलंय फक्त. बाकी वेगळं काही नाही
ग्लेझिंगसाठी बेक करायच्या आधी
ग्लेझिंगसाठी बेक करायच्या आधी अंडही लावतात
मामी, तुझ्या घरच्या गटगच्या
मामी, तुझ्या घरच्या गटगच्या वेळेस (जेव्हा कधी होईल तेव्हा :फिदी:) हा पदार्थ मला खायचाच आहे.
काय सही दिसताहेत पाव.. एकदम
काय सही दिसताहेत पाव.. एकदम मस्त!
(माझं कशाला ते नाव उगाचच.)
अगोचे पाव पण भारी दिसताहेत.
दोघींनाही शाबासकी
हे सहिच आहे. मैदा असल्याने
हे सहिच आहे. मैदा असल्याने घरी पाव खायला बंदी !
पण हे पाव मस्त..
मामी, मस्त रेस्पी! विदौट अंडे
मामी, मस्त रेस्पी! विदौट अंडे कस्काय करायचं? >>> मलाही सांगणे. १/२ चमचा बे.पा. किंवा खा.सो. घालु का?
मामी, करताना एकदा हळुच उघडुन
मामी, करताना एकदा हळुच उघडुन बघितला मावे, तर असला खमंग वास सुटला. गरम असताना यम्मी होते. हलके आणि टेस्टी होते.
थोडे जास्तच झाले, म्हणुन ठेवुन दिले तर गार झाल्यावर एकदम कड्डक. आता नाही खावेसे वाटत. मावेमधे थोडा कमी वेळ ठेवायला हवे होते का?
व्वॉव मामी, मस्त दिसतायत हे
व्वॉव मामी, मस्त दिसतायत हे पाव !
नक्की करुन बघणार
मनीमाऊ, कडक म्हणजे आपल्याकडे 'बटर' मिळतात तसे कडक झालेत का? तर चहात बुडवुन खाउन टाक किंवा चुरा करुन ब्रेड क्रम्ब्ज म्हणुन वापर
पाव अवन मध्ये ठेवताना थोडे
पाव अवन मध्ये ठेवताना थोडे दूध लावले तरी छान ग्लेझ येते. नाहीतर एग बाथ लावायचे. अंडे पाणी टाकून फेटून बन्स वर ब्रशने लावायचे मग अवन मध्ये ठेवायचे.
नाहीतर बाहेर आल्या आल्या बटर लावायचे.
वरून क्रस्टी हवे असतील मध्येच बर्फाचे खडे टाकायचे अवन मध्ये हळूच उघडून( एक २० मिनीटाने) मस्त कडक पाव तयार होतो.. आत मध्ये लुसलुशीत व वरून कडक. मी बर्याचदा असे बन्स करते.
मनीमाऊ, कडक म्हणजे आपल्याकडे
मनीमाऊ, कडक म्हणजे आपल्याकडे 'बटर' मिळतात तसे कडक झालेत का? >>> हो गं हो लाजो. अगदी तसेच. पण मला आवडत नाहीएत ते गार झाल्यावर. घरातला कुत्रा गेल्या महिन्यातच 'गेला', नाही तर तो खुष झाला असता माझ्यावर. त्याला फार आवडायचे कडक 'बटर' & 'टोस्टस'.
कस्ले भारी दिसतायेत हे
कस्ले भारी दिसतायेत हे बन्स... करायलापण सोपे वाट्टायेत!.......चला येत्या वीकेंड चा उद्योग अखेरीस सापडला ते सूपचं कॉम्बो बेसंच!
Pages