गेल्या सहा महिन्यांपासून मी माझे डोक्याचे केस थोडे मोठे राखलेले आहेत. एकदम पोनी घालण्याइतके ते मोठे नाहीत पण शर्टच्या कॉलरच्या खाली गेलेले आहेत. ते तसेच अजून कंटाळा येईपर्यंत ठेवण्याची इच्छा आहे.
मी माझ्या डोक्याच्या केसांना अगदी दररोज तेल लावत नाही. आठवड्यातून दोनदा लावतो. एखादे दिवशी किंवा ते केस धुतल्यानंतर कोरडे दिसतात.
आता माझा प्रश्न:
असे कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा?
जेल वैगेरे वापरून केस ओले दिसतात पण ते कडक होतात. केस मऊ, उडते ठेवून ओले दिसण्यासाठी काही क्रिम आहे काय? असल्यास ते क्रिम कोणत्या ब्रांडचे आहे?
केस कर्तन करणार्या माझ्या कारागीराने मला 'Livon' नावाचे क्रिम घेण्यास सांगितले. ते क्रिम नसून एक लिक्वीड होते. त्याचा उपयोग केस धुतल्यानंतर गुंता न होता विंचरण्यासाठी होतो. थोडावेळ केस ओले दिसतात पण नंतर कोरडे होतातच.
जाणकार माता भगीनींनी केस ओले दिसण्याचा उपाय सांगितल्यास माझ्या व्यक्तिमत्वात चांगला बदल दिसण्याची शक्यता आहे.
उपाययोजकांना आधीच धन्यवाद.
रोज रात्री कोमट तेलाने
रोज रात्री कोमट तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करा. सकाळी केस माइल्ड शँपूने स्वच्छ धुवा. कंडीशनर वापरा. खूप उत्साह असेल तर आठवड्यातून एकदा दह्यामध्ये कालवून केसांना पॅक लावा.
आठवड्यातून एकदा केसांना तेल लावल्यावर टॉवेल गरम पाण्यात पिळून घ्या तो केसांना १५ ते २० मिनीटे गुंडाळून ठेवा. डाएट सुधारा.
आता एवढ लिहीलच आहे तर हे उपाय नक्की करा.
ब्रिलक्रिमचे 'वेट लूक' जेल
ब्रिलक्रिमचे 'वेट लूक' जेल मिळते. ते लावल्यावर केस मऊ आणि ओले दिसतात.
@मंजूडी 'जेल' असेल पण ते केस
@मंजूडी
'जेल' असेल पण ते केस कडक करतात हा अनुभव आहे. जेल किंवा कोणतेही क्रिम असणारे पण केस कडक न करणारे काहीतरी पाहीजे.
स्वाती ताईने सांगितलेले उपाय हे जास्त अवधीसाठी ठिक आहेत व ते वरचेवर करतच जाईन पण केसांना अकराव्या तासाला - एखाद्या समारंभाला जाण्यासाठी म्हणा - ओले भासण्यासाठी काय करावे?
आंतरजालावर तपासले असता त्याने पोमेड वैगेरे सांगितले आहे. ते अंतरराष्ट्रीय उत्पादने आहेत. मला भारतातले काही उत्पादने सांगितलेतर बरे होईल.
Bryletyne नावाचे पांढरे क्रिम मी मागे हौस म्हणून वापरले होते. त्याचा नक्की कोणता परिणाम होतो त्याबाबत मी अनभिज्ञ आहे.
आणि हो, केस ओले म्हणजे तेल लावल्यासारखा चिपचिपा परिणाम अपेक्षीत नाही.
एक हेअर क्रीम मिळते काळ्या
एक हेअर क्रीम मिळते
काळ्या रंगाची एक ट्यूब असते लहानशी
केस ओलेही राहतात, सिल्कीही दिसतात आणि आपल्यालाही मस्त वाटते
हे अगदी सिरियसली सांगतोय
नांव मात्र मी ६ मार्चच्या (भारतातील) दुपारी सांगू शकेन असा अंदाज
पुओकेवा शुभेच्छा
(पुढील ओल्या केसांच्या वाढीस)
-'बेफिकीर'!
क्रीम कोणतेहि वापर्ले तरि
क्रीम कोणतेहि वापर्ले तरि त्याच फायदा दुकानदाराला होतोच आपल्याला झाला नाहि तरि
ह्या गोश्टी लहानपणापसून करायच्या असतात.
पॅराशूटचे आफ्टरशॉवर क्रीम
पॅराशूटचे आफ्टरशॉवर क्रीम वापरा, माझे केस अजुनही ओले आणि शाबुत आहेत.
आधी छोटी ट्यूब घेऊन पहा निळ्या रंगाची.
इथे मराठी लिहिन्या साठि काय
इथे मराठी लिहिन्या साठि काय ,कोणता फोन्ट वापरावा ? (english =) software to be loaded on my laptop?
कोरडे दिसणारे केस केवळ ओले
कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा? >>>>>> एक छोटा पाण्याने भरलेला पंप जवळ ठेवावा.......कोरडे झाल्याबरोबर केसांवर पाण्याचा मारा करावा......केस ओली होतात सुध्दा आनि दिसतात सुध्दा
उदय पण मुळात ओले दिसायला
उदय
पण मुळात ओले दिसायला हवेतच कशाला? दिसूदेत की कोरडे, काय फरक पडतो.
जेल लावणे हा उपाय आहेच. पण रोज रात्री खोबरेल तेल व्यवस्थित भरपुर लावत राहिले तरी नन्तर केस कोरडे रहाणे टळते.
शिकेकाईने धुतले तर चान्गले.
जाऊद्यात, याबाबतीत मी काय जास्त उपाय सान्गु शकत नाही. आमच्याकडे विमानतळ आहे!
>>आमच्याकडे विमानतळ आहे
>>आमच्याकडे विमानतळ आहे !
तुम्ही आमच्या घरी येऊन रहा किंवा मी तुमच्या घरी येऊन रहातो. कायेकी मला बरेच वेळा विमानाने फिरावे लागते. विमानतळावर जाण्यायेण्याचा व्याप तरी वाचेल.