जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा.
महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात.
कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते. पुराव्यादाखल अलेक्सा.कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पहा.
मनोगता वर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्या प्रमाणासारखेच आहे. मायबोली वर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे.मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरे चे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच.
मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?
(हा लेख याच सदरात असावा का याबद्दल साशंक आहे; पण चर्चा व्हावी अशी इच्छा आहे.)
हे नेमकं कसं मोजतात?
हे नेमकं कसं मोजतात? डुप्लिकेट आयड्या, एकाच व्यक्तीनं काढलेल्या स्त्री आणि पुरुष आयड्या.. या सगळ्या ब्रह्मघोटाळ्यातून इतके पुरुषसदस्य - इतक्या स्त्रीसदस्य हे कसं शोधतात?
>>>मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?
बाकी वेबसाइटींबद्दल माहिती नाही. पण मायबोली नक्कीच नाही. (एकतर सायटीच्या नावातच माय आहे! बहुदा असं काही दिसलं, जाणवलं की तिथल्यातिथे हाणणार्या किंवा सपशेल दुर्लक्ष करून असे बाफ ओस पाडणार्या स्त्री आयड्यांची आणि त्यांना अनुमोदन देणार्या स्त्री/पुरुष आयड्यांची संख्या भरभक्कम आहे.
मराठी इंटरनेट साइटची
मराठी इंटरनेट साइटची मनोवृत्ती अमूक असे म्हणता येणार नाही. त्यावर लिहिणार्या लोकांविषयी काही संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढता येऊ शकेल.
माझ्या अनुभवात असे आले आहे की तात्रिक, राजकीय, क्रीडाविषयक अश्या (पूर्वी पुरुषप्रधान) चर्चांत हल्ली स्त्रियांचा जवळपास सारखाच सहभाग दिसून येतो. पण स्वयंपाक, सुशोभन, संगोपन, प्रसाधन अश्या (स्त्रीप्रधान) चर्चांत पुरुषांचे प्रमाण कमी दिसते.
अलेक्सावर जालवापरकर्त्यांची
अलेक्सावर जालवापरकर्त्यांची माहिती कशी गोळा करतात याबद्दल काही माहिती इथे मिळाली. थोडक्यात आपण इंटरनेटवर वावरताना अनेक साईट्सना भेटी देतो. त्यातून ही माहिती अलेक्सा गोळा करतं. त्यावर कितपत विश्वास ठेवावा हे सुद्धा ते स्वतःच लिहीतात.
मराठी इंटरनेट साइट्स
मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का >>
चुकीचा प्रश्न वाटतो. जर मराठी स्त्रीया इंटरनेटवर आल्यानाहीत तर असलेल्या मराठी साईट पुरूषप्रधान मनोवृत्तीच्या कश्या ठरतील? फार तर तुम्ही असलेल्या स्त्रियांकरता तुम्हाला अमुक अमुक साईट पुरुषप्रधान वाटते का? असा प्रश्न मराठी साईटवर विचारून मतदान घेऊन निकष लावता येईल. स्त्रिया येत नसतील तर त्या त्या साईट पुरूषप्रधान म्हणता येणार नाहीत. अपवाद मिसळपावचा कारण तिथ बोलणारी भाषा फारशी सभ्य नसल्यामुळे कदाचित काही स्त्रिया तिथे येत नसाव्यात. ;०
आणि इंटरनेटवर स्त्रिया किंवा पुरूष आलेच पाहिजेत असे आहे का?
आधी संख्या मोजूनच मग चित्रे
आधी संख्या मोजूनच मग चित्रे काढली ना? मग सरळ संख्याच का लिहीत नाही? उगाच झेंडे कशाला?
मिसळपाव, उपक्रम, मिमरथी (हे बहुधा 'मी मराठी' असावे). येथे सदस्यसंख्या मायबोलीहून अधिक आहे असे वाटते. निदान १०००, ११००, १२०० असे ढोबळ आकडे लिहीले तरी कळेल. (कारण तुम्ही, नक्की ,ज्याला मराठीत तुम्ही एक्झॅक्ट म्हणता, असा आकडा दिलात की मी लगेच एक स्त्री आय डी घेऊन तुमचा आकडा चुकवीन, की लग्गेच वाद)
आणि ते डाव्या बाजूला तीन झेंडे कसले?
स्त्रियांची संख्या कमी असली म्हणून काय झाले, खूप पुरुष नि थोडाश्याच स्त्रिया जरी एकत्र आल्या तर पुरुषांना तोंड उघडायची तरी संधि मिळते का? कलकलाट, आरडा ओरडा, चीत्कार कुणाचे येत असतात बघा. पुरुष बिचारे न बोलता गप्प बघत बसतात!! आणि हे मराठीच स्त्रिया नव्हे, तर कोणत्याहि भाषा बोलणार्या, कोणत्याहि धर्माच्या, जातीच्या, देशाच्या स्त्रियांबद्दल खरे आहे!
म्हणूनच तर बिचारे पुरुष असा इंटरनेटचा आधार घेतात, मन मोकळे करायला, आपली बाजू मांडायला! आता तिथेहि बायका जास्त आल्या, तर आम्ही करायचे तरी काय?
राग मानु नका पण हा विषय काही
राग मानु नका पण हा विषय काही चघळण्यासारखा वाटत नाही. कारण ते अनुमान(स्त्रीया की पुरुष ज्यास्त आहेत साईटीवर) काढायचा काही खात्रीदायक वाटत नाही.
यावरुन मी तरी असा अनुमान
यावरुन मी तरी असा अनुमान काढलं कि "एकुणच स्त्रीया पुरुषांपेक्षा कामसु आणि बिझी असतात." त्यामुळ वरील साईट्स वर येण्यास त्यांना वेळच मिळत नसेल.
मायबोली, मी मराठी वगैरे साईट्सच्या स्टॅटिस्टिक्स वरुन मराठी स्त्रीयांविषयी अनुमान काढणं योग्य ठरणार नाही. सहसा मी पाहिलय या साईट्स वर येणारी लोक साहित्य वाचण्याच्या ओढीने आणि आपल्या भाषेत संवाद साधण्याची भुक भागविण्यासाठी येतात. तशी गरज नसेल आणि अन्य भाषेतील ब्लॉग्ज किंवा साईट्स तुमची वैचारीक भुक भागवू शकत असतील तर इथे येण्याची गरज नाही.
त्यामुळं मुळातच जो सँपल म्हणून डाटा घेतलाय तो चुकीचा वाटतो.
केदार म्हणतात चुकीचा प्रश्न
केदार म्हणतात चुकीचा प्रश्न वाटतो. जर मराठी स्त्रीया इंटरनेटवर आल्यानाहीत तर असलेल्या मराठी साईट पुरूषप्रधान मनोवृत्तीच्या कश्या ठरतील?
जर साईट्स पुरूषप्रधान नसल्यासही स्त्रियांची संख्या कमी असेल तर स्त्री-पुरूषच बहुसंख्य प्रमाणात पुरूषप्रधान संस्कृतीचे गुलाम असावेत असा संशय येतो. याचं कारण सीमा यांचं वाक्य वाटतं, "एकुणच स्त्रीया पुरुषांपेक्षा कामसु आणि बिझी असतात." हे मला अधिकच घातक वाटतं. समाज पुरूषप्रधान नसेल आणि संस्थळंच (म्हणजे त्यांचे चालक, मालक इ) पुरूषप्रधान असतील तर निदान थोड्याच लोकांचं मतपरिवर्तन करून बदल घडण्याची शक्यता वाढेल. नसल्यास बराच डोंगर चढायचा बाकी आहे.
झक्की, हा डेटा गोळा करताना नेमकी कोणती सदस्यसंख्या विचारात घेतली हे अलेक्सा दाखवत नाही. माझ्या माहितीत मायबोली हे इतर चार संस्थळांपेक्षा आकाराने मोठं संस्थळ आहे (अशा प्रकारच्या अधिक साईट्स असल्यास मला कल्पना नाही). त्याखालोखाल मिपा, मीम, उपक्रम आणि ऐअ असे क्रमांक लावता येतील.
त्या बार-ग्राफची लांबी सदस्यसंख्या दर्शवत नाही (असं माझं मत आहे.) पुरूष आणि स्त्रियांच्या प्रमाणाचा अंदाज त्या ग्राफवरून घेता येतो एवढंच. त्यातही मायबोलीवर स्त्री आयडी बर्यापैकी दिसतात त्यामुळे मला विशेषतः माबोचा डेटा मजेशीर वाटला. मिपा, उपक्रम आणि मीमवरचा प्रचंड मेल-बायस दिसतो (हे माझं गट फीलींग, डेटा गोळा केलेला नाही.) त्यातही ग्राफ काढले की डेटा चटकन समजतो असा सर्वमान्य समज, निरीक्षणं आणि शास्त्रीय अनुमानं आहेत. One picture speaks thousand words.
सीमा आणि झंपी, मी केलेल्या Sample selection बद्दलः
इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापरकरणार्यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.)
विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते.
विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृती अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्यांची मतं महत्त्वाची वाटतात. अर्थात तुम्हाला या विषयाचं महत्त्व वाटायलाच हवं हे आवश्यक नाही.
मृदुलाच्या प्रतिसादामधे मला जी शंका होती तीच पुन्हा खरी आहे का काय असं वाटतंय. पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे आता स्त्रियांनाही रस निर्माण झालेला आहे. आपल्या घराबाहेरही जग आहे त्याची जाणीव स्त्रियांना झाली आहे, होते आहे; ही गोष्ट मला पॉझिटीव्ह वाटते. पण घर, मुलं यात आपलीही समान जबाबदारी आहे याबद्दल पुरूषांमधे कितपत जागृती आहे याबाबत शंका आहे.
३_४_अदिती. मी पहिल्या पोस्ट
३_४_अदिती.
मी पहिल्या पोस्ट मध्ये जे लिहिले ते माझे म्हणणे नीट मांडले नाही.
चर्चा करताना ज्या डेटाचा आधार घ्यावा लागतो तो डेटा खात्रीलायक असा नक्कीच वाटत नाही वरच्या नोन/अननोन कारणांसाठी. म्हणून तसे म्हटले.
उत्तराबद्दल धन्यवाद!
ऐसीअक्षरेवर Nile याने
ऐसीअक्षरेवर Nile याने मांडलेलं डेटासंदर्भातलं मत मलातरी पटलं. आग्रह नाही.
अनेक वेबसाईट्स स्टॅटीस्टीकल मॉडेल्स वापरुन तुम्ही स्त्री आहात का पुरुष हे शोधतात. (गुगल प्रोफाईलवर मी माझे 'लिंग' दिले नव्हते. पण आता गुगल स्वतःच मला पुरुष असे दाखवतो) अलेक्साने अर्थातच मराठी संस्थळावरून तुम्ही पुरुष आहात का स्त्री हे ओळखलेले नाही. तुमच्या इतर इंटरनेट वापरावरून (इतर सर्च क्लायंट्सकडून?) ही माहीती मिळलेली आहे.
अलेक्साच्या डेटामधे खूप डिस्क्रीपन्सी असेल असं मलातरी वाटत नाही.
समाज पुरूषप्रधान नसेल आणि
समाज पुरूषप्रधान नसेल आणि संस्थळंच (म्हणजे त्यांचे चालक, मालक इ) पुरूषप्रधान असतील तर निदान थोड्याच लोकांचं मतपरिवर्तन करून बदल घडण्याची शक्यता वाढेल. >>
अदिती, मायबोलीबाबतच बोलायचे ठरले तर इतर ठिकाणी जसे मालक मध्ये लुडबुडतात तसे इथे कधीही झालेले गेले दशकभर पाहिले नाही. मायबोली मराठी साईटस मध्ये अनेक दृष्टीने वेगळी आहे. चालकांचे व्यक्तीगत मत काहीही असले तरी ते इथे लादले जात नाही. त्यामुळे हा निकष प्रस्तुत धाग्याकरिता व प्रस्तुत विषयाकरता मायबोलीबाबत लावू नये असे वाटते. उलटपक्षी इथे संयुक्ता नावाचा फक्त महिलांकरता ग्रूप आहे हे मराठी साईटींच्यात तुलनेत वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
तुम्ही प्रश्न लिहिला आहे की "मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर प्रमाण कमी का?" तर परत एकदा प्रश्न अन डेटा चुकीचा आहे. कारण डेटा तपासताना तुम्ही फक्त दोन चार मराठी साईट्सचा डेटा पाहतास्त्रियण "मराठी स्त्री" हे पाठीमागे लावले तर अर्थ बदलून तो खूप व्यापक होतो. असेही असू शकेल मराठी स्त्री अनेक इंग्रजी साइटस वर पडिक असू शकते पण ती ह्या डेटात येणार नाही कारण डेटा फक्त मराठी साईटचा आहे. मग प्रश्नही मराठी साईटवर मराठी स्त्रियांचे प्रमाण कमी आहे का? असा होऊ शकतो. उत्तर तेच : कदाचित पूर्ण महाराष्ट्रभर ह्या मराठी संस्थळांचा प्रचार झाला नसावा त्यामुळे असे काहीसे आहे हेच माहित नसावे, वा कदाचित मराठी स्त्रियांना तेच ते ते मराठीपण नको असेल वा सुशिक्षित स्त्रियांना मराठी साईटवर वावरायचे नसेल, इंग्रजी मधून माहिती हवी असेल वा कदाचित इथे असणारा समुह हा त्यांच्या ( जे कोणी इथे आले नाहीत) टाईपचा नसावा, कारणे एक ना दोन.
व्यापक अर्थाने पाहिले तर मग डेटा महाराष्ट्रील स्त्रियांचे अन पुरूषांचे पूर्ण (कुठल्याही भाषेत) नेटवरचा वावर काढणारे सॉफ्टवेअर मिळाले तरच त्याला बराच अर्थ प्राप्त होईल असे वाटते.
तुम्ही तसा डेटा मिळवलात तर नक्कीच काही ठोस विचार तरी करता येईल (अर्थात काहिच बदलता येणार नाही) .
पण अॅक्टिव स्त्रिया व पुरूष कोण हे इथे वावरल्यावर (कोणत्याही साईटवर) दिसून येते त्यात तरी अॅक्टीव युजर्स मध्ये फारसा फरक मला जाणवला नाही.
केदार, मालकांच्या
केदार, मालकांच्या हस्तक्षेपाचंच म्हणाल तर उपक्रमाचे मालक, मी जालावर गेली तीन-साडेतीन वर्ष आहे त्या काळात अगदी क्वचित दिसले आहेत. मिसळपावचे आताचे मालक संस्थळावर महिन्यातून फारतर एखादा दिसतात. मीमराठी आणि ऐसीअक्षरेचे मालक संस्थळांवर प्रचंड प्रमाणात कार्यरत आहेत आणि चांगले लेखन करणार्या लेखकांना उत्तेजन देतात; अगदी विरोधी मतं मांडणार्यांनाही! याला लुडबूड म्हणाल का? माझ्या मते नाही. पण तो मुख्य मुद्दा नव्हता. (किंबहुना बहुतांश संस्थळांचे मालक आपापल्या परीने स्त्री-द्वेष्टे नाहीत असाच माझा तर्क आहे. या संस्थळांच्या मालकांमधे एक स्त्री आहे.)
डेटा फक्त मराठी संस्थळांबाबत आहे. आणि माझ्या मते हे sample ज्याला संख्याशास्त्रात complete sample म्हणतात त्या प्रकारचं आहे. ज्याप्रमाणे टीव्ही शोजचे टीआरपी काढण्यासाठी, एक्झिट पोल्ससाठी ज्याप्रकारे डेटा जमवतात त्याप्रकारचा सांपल-डेटा जमवलेला आहे.
पूर्ण महाराष्ट्रभर प्रचार होण्याची गरज नाही. कारण १. मी संपूर्ण/कंप्लीट सांपल पहाते आहे. २. मला एलिट (याची व्याख्या वरच्या एका प्रतिसादात केलेली आहे) लोकांबद्दलच काही विधान करायचं आहे. ३. जिथे इंटरनेट पोहोचलेलं आहे तिथे स्त्री आणि पुरूष असे दोन्ही घटक आहेत आणि समान प्रमाणात म्हणता येतील अशा प्रमाणात आहेत.
मला उद्देशच समजलेला नाही या
मला उद्देशच समजलेला नाही या चर्चेचा.
जेवढं समजलंय ते बघता चर्चा 'बळचकर' वाटतेय.
सीमाचा मुद्दा आवडला. तो विनोद आहे हे धागाकर्तीला लक्षात येऊ नये हे फारच आश्चर्य.
प्रतिक्रियांमधे मायबोली व्हर्सेस इतर साइटस असा सूर सुरू झालेला दिसतोय.
मिसळपाव बद्दलच्या केदार याच्या म्हणण्याला १००% अनुमोदन.
त्या nile यांच्या विधानाबाबत म्हणायचे
मुळात एखाद्याने आपण स्त्री आहोत का पुरूष हे जाहिर केले नाही तरी प्रत्येक आयडी नेटवर काय काय वापरतो हे बघून अलेक्सा ठरवते तुम्ही स्त्री आहात का पुरूष असे असेल तर स्त्री आणि पुरूष ठरवण्यासाठी काय क्रायटेरिया वापरलेत हे समजून घेणे गरजेचे होईल. स्वैपाकाची उपकरणे, रेसिपी साइटस, फॅशनच्या साइटस, माता-बालक संदर्भातील साइटस, क्राफ्ट ब्लॉग्ज/ साइटस अश्या गोष्टी बघणारा आयडी हा स्त्री आयडी व गाड्या, गॅजेटस, अर्थव्यवहार, राजकारण, पोर्न अश्या साइटसना भेट देणारा आयडी हा पुरूष आयडी असे काहीतरी स्टिरिओटाइप्स केल्याशिवाय हे गणित मांडता येणे अशक्य आहे. आणि म्हणूनच ते तितकेच फसवेही आहे. लिंग जाहीर न करताही ज्यांना स्त्री वा पुरूष लेबल लावले गेले आहे त्यातले किती बरोबर किती चूक याची टक्केवारी काढणे हे ही महत्वाचे ठरेल.
तस्मात वरची टक्केवारी मला तरी फसवी वाटते. आणि क्षणभरासाठी ती खरी मानली तरी 'बर मग?' हा प्रश्न उरतोच.
नीधप
नीधप +१
******************************
हा असला प्रश्न कधी डोक्यात आला नव्हता. खरंच काय उपयोग आहे या चर्चेचा? स्त्रियांची संख्या जास्त, कमी, बरोबर यामुळे काय फरक पडतो? क्धीकधी अतिरेकी-स्त्रीवाद मला ओढूनताणून आणलेला वाटतो. म्हणजे समजा, लष्करात स्रिया नाहीत म्हणून ओरडाओरडी करायची. मग जर उद्या फक्त स्त्रियांचं सैन्य निर्माण केलं तर बघा स्त्रीलाच सगळीकडे राबायला लागतं आणि हे पुरूष नुसते बसलेत म्हणूनही आरोळी ठोकायची.
फारच इच्छा असेल तर फक्त स्त्री-सदस्यांकरता एक साईट काढता येईल.
नीरजा: >> मला उद्देशच समजलेला
नीरजा:
>> मला उद्देशच समजलेला नाही या चर्चेचा. <<
My bad, पुन्हा एक प्रयत्न करते.
डेटात अजिबात एरर नाही असा दावा नाही. पण जी एरर असेल ती संख्यांचा आकार पहाता नगण्य स्वरूपाची असावी. सामान्यतः अशा प्रकारच्या पॉसॉन स्टॅटीस्टीक्समधे संख्येचे वर्गमूळ (उदा: दहा हजार लोकांचा सर्व्हे असल्यास १००) एवढी एरर क्षम्य मानली जाते, किंवा एरर मानली जात नाही.
सर्व संस्थळे मिळून दोन हजार लोक साईट्सवर नियमितपणे (समजा, आठवड्यातून निदान एकदा) व्यक्त होतात असं मानल्यास ४५ व्यक्तींबद्दल (इथे डुप्लिकेट आयडींची गल्लत होणे कठीण आहे) अंदाज चुकल्यास ती चूक मानली जाणार नाही.
२००० पैकी १०० व्यक्तींसंदर्भात अंदाज चुकला तरीही सदर एरर पहाता confidence level ९५% पेक्षाही जास्त असेल (माझे back of the envelope गणित. अधिक तपशीलात गणित इथे करता येईल.) ९५% confidence हा संख्याशास्त्रात बराच वरचा समजला जातो. इमेल आणि गूगल (अथवा इतर सर्च इंजिन्सचा) माझ्या आसपास होणारा वापर पहाता २००० लोकांमधे १०० ची एररही खूप जास्त वाटते (हे माझे gut feeling. हफिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाईम्स, गार्डीयन, बीबीसी, फेसबुक, लोकसत्ता, प्रहारची कोलाज पुरवणी, पुरूषांची मक्तेदारी असणार्या माझ्या अभ्यासाच्या क्षेत्रातले विविध शोधनिबंध, मराठी इंटरनेट, आणि यूट्यूबवर फारएण्डने सुचवलेल्या थर्डक्लास हिंदी फिल्स धुंडाळत फिरणं, अॅमेझॉनवर पुस्तकं, चारचाकीसाठी अॅक्सेसरीज वगैरे विकत घेऊन, थोडक्यात टिपिकल पुरूषांच्या असण्यार्या सायटी पाहूनही मी स्त्री असण्याबद्दल गूगलला बरं समजलं.)
तरीही हा डेटा सपशेल चुकीचा मानयचा म्हटला तरी पटत नाही. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर मेल बायस दिसतो. गेल्या काही महिन्यांतली अॅक्टीव्हीटी पाहूनही हे शोधता येईल. ही तिन्ही संस्थळं मिळून या पाच संस्थळांपैकी अर्ध्याधिक अॅक्टीव्हीटी निश्चितच दिसेल.
>> तस्मात वरची टक्केवारी मला तरी फसवी वाटते. आणि क्षणभरासाठी ती खरी मानली तरी 'बर मग?' हा प्रश्न उरतोच.<<
"बरं मग" हा प्रश्न मला फार धोकादायक वाटतो, विशेषतः सुशिक्षित लोकांकडून येतो तेव्हा. मुक्तसुनीत यांचा याच विषयावरचा प्रतिसाद आणि त्या प्रतिसादात उल्लेख असणारा ज्ञानदा देशपांडे यांचा लेख या संदर्भात बोलके आहेत.
धनंजय यांच्या इतर एका चर्चेतला हा भाग मला इथे दाखवावासा वाटतो.
याबाबत मार्टिन नीमलर याचे वचन स्मरणीय* आहे :
First they came for the communists,
and I didn't speak out because I wasn't a communist.
Then they came for the trade unionists,
and I didn't speak out because I wasn't a trade unionist.
Then they came for the Jews,
and I didn't speak out because I wasn't a Jew.
Then they came for me
and there was no one left to speak out for me.
(मार्टिन नीमलर ल्यूथरन पंथातला धर्मगुरू होता. हिटलरच्या १९३३ निवडणूक "विजया"चा सुरुवातीला पुरस्कार करून थोड्याच वर्षांत त्याने नात्झी धोरणांचा उघड विरोध केला. त्यामुळे "I didn't speak out" हे शब्द त्याला वैयक्तिकरीत्या लागू नाहीत. पण त्याच्या पंथाच्या बर्याचशा - जवळजवळ सगळ्या - लोकांना हा कबुलीजबाब लागू आहे.)
>> सीमाचा मुद्दा आवडला. तो विनोद आहे हे धागाकर्तीला लक्षात येऊ नये हे फारच आश्चर्य.<<
फेसव्हॅल्यूवर जाणे ही कोणा एकीची मक्तेदारी नाही, नाही का?
या एका चांगल्या अशा विषयाचा
या एका चांगल्या अशा विषयाचा मुख्य हेतू [जरी शीर्षकावरून] एका विशिष्ट कारणासाठीच घेण्याचा लेखिकेचा उद्देश जरी असला तरी तो मांडताना अदिती यानी सुरुवातीलाच समानतेचा मुद्दा आणला आहे तो स्वागतार्ह आहे. त्या लिहितात "तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही." ~ इथे अनेकवचनी संबोधनाचे प्रयोजन कशासाठी आहे हे जरी उमगत नसले तरी वाक्यातील भावनेशी सहमत व्हायला पुरुष गटाला कसलीही अडचण नाही, कारण ती या क्षणीदेखील वस्तुस्थिती आहे. भारतासारख्या आजही या संदर्भातील पुराणकाळातील वांग्याला चिकटून बसलेल्या मनोवृत्तीचा मागोवा घेण्याची गरज नाही इतकी ती खोलवर रुजलेली आहे. मुलीने 'पीएच.डी.' जरी मिळविली तरी नेमकी तिच्या बुद्धिमत्तेची झेप कुठपर्यंत पोहोचली आहे याबद्दल तिच्या आईवडिलांना खरे तर अभिमान आणि आनंद वाटला पाहिजे, पण भोवताली मी असेही पालक पाहिले आहेत की अगदी अभिनंदनाच्या दिवशीच 'हिने पीएच.डी. मिळविली, आता हिच्या लग्नाचे काय ?" असा प्रसाद प्रॉड्क्शन धर्तीच्या चित्रपटातील टिपिकल कौटुंबिक रडीचा संवाद त्यांच्या मनी रुजू लागतो. म्हणजे जिथे पालकांनाच आपल्या मुलीच्या 'अती शिकलेल्या' टॅगची भीती चिंता वाटते तिथे अन्यांची काय कथा !
ज्या देशाच्या शिक्षणपद्धतीवर आपली शैक्षणिक वाटचाल अधोरेखीत आहे त्या खुद्द इंग्लंडमध्येही स्त्री-पुरुष समानतेविषयी काही वेगळी स्थिती नव्हती. इंग्लंडमध्ये मेरी वुल्स्टन क्रॅफ्टसारखी स्त्रीस्वातंत्र्यवादिनी आणि जॉन स्टुअर्ट मिल सारख्या सामाजिक असमानतेविरुद्ध लिहिणार्यांनी वेळोवेळी स्त्री-जीवनविषयक प्रश्नावर सडेतोड विचार प्रकट केले म्हणून तिथल्या स्त्री वर्गात 'समानता हक्का'विषयी काहीतरी जागृती निर्माण झाली होती. निसर्गानेच चूल व मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र ठरविले आहे, त्याना पुरुषापेक्षा बुद्धी व कल्पनाशक्ती कमी आहे, त्यामुळे अज्ञान आणि गुलामगिरीची साखळी ही जन्मजातच त्यांच्या गळ्यात आहे, इत्यादी तथाकथित सिद्धांतांची क्रॅफ्ट आणि मिल यानी रेवडी उडविली होती. तसे इथे भारतात झाल्याचा दाखला नाही.
त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील स्त्री-पुरुष विषमतेतील प्रमाण [जे अदितीने 'इंटरनेट सहभाग' संदर्भात चार्टद्वारे दाखविले आहेच] असेच राहण्याचे कारण मुख्यत: पुरुष वर्चस्वाचे आणि ते स्त्रीयांनीही मानले असल्याचे लक्षण आहे.
माझा जालीय दुनियेशी गेल्या वर्षभरातील परिचय आहे आणि त्या आधारे 'सहभागातील जाणविण्याइतपतचा फरक' मी वेळोवेळी नोंदविला आहे. फक्त 'मायबोली' वर (मला) असे आढळले की अन्य संस्थळांच्या तुलनेत इथे स्त्रियांच्या सहभागाचे प्रमाण लक्षणीय आहे. इतकेच नव्हे तर येथील स्त्री सदस्या हिरीरीने विविध विषयात भाग घेतात - धाग्यांच्या तसेच प्रतिसादाच्या रुपातही - मला वाटते 'मायबोली' च्या स्थापनेलाही बरीच वर्षे झाली असल्याने सुरुवातीच्या काळापासून जे स्त्री सदस्य आहेत त्यांच्यात आता जो आपलेपणाचा कौटुंबिक भाव निर्माण झाला आहे त्याची परिणिती इथल्या सातत्याच्या सहभागात झाली आहे, जी स्वागतार्ह मानली पाहिजे. 'गटग' सारखे उपक्रम राबविणे, त्याद्वारे आणखीन् नवनवीन महिला सदस्यांची ओळख करून घेणे, धागा प्रतिसादव्यतिरिक्तही फोन आणि ई-मेल द्वारे कायम संपर्कात राहणे, मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीविषयी, आरोग्याविषयी व्य.नि. वि.पू. तून सातत्याने चौकशी करणे आदी भावनिक नात्यामुळेही त्यांचा इथला (मायबोलीवरील) सहभाग कायमचा राहिल्याचे दिसते.
'उपक्रम' आणि 'मीमराठी' वर मात्र स्त्री सदस्यांचे प्रमाण ज्याला 'अत्यल्प' म्हटले जाईल असे आहे. त्याला कारण म्हणजे 'उपक्रम हॅज एस्टॅब्लिश्ड इटसेल्फ अॅज टू अॅकेडेमिक टु रीस्पॉन्ड ऑन डेली बेसिस', जिथे पुरुष सदस्यच अनियमितपणे येतात जातात तिथे ज्या काही स्त्री सदस्या आहेत त्यांची काय कथा ! अर्थात उपक्रमचे जे रुपडे आहे ते तिथल्या व्यवस्थापनाचाच निर्णयाचा भाग असल्याने त्याबद्दल अन्यांना तक्रार करायला जागा नाही, अधिकारही पोचत नाही. मात्र 'मीमराठी' हे तसे केन्द्रीभूत नसल्याने तिथे नवनवीन सुचनांना/कल्पनांना व्यवस्थापकांकडून चांगल्या प्रकारे अॅकॉमोडेट करून घेतले जात असल्याने तेथील उलाढाल अव्याहतपणे चालू असते [जरी मायबोलीच्या तुलनेने तिथेही स्त्री सदस्य संख्या कमी दिसत असली तरी]. विषयांचीही विविधता असल्याचे आढळत असल्याने येथून पुढील काळात मीमराठीवरही स्त्री सदस्यांची संख्या चढत्या भाजणीची दिसेल याची मला वैयक्तिक खात्री वाटते.
"ऐसी अक्षरे" बाबत अदिती म्हणते त्याप्रमाणे ते संस्थळ अजून बाल्यावस्थेत असल्याने "ऐसी...."ची या संदर्भातील "मिळकत" आजच पुढे आणावी असे वाटत नाही. संस्थळाच्या स्थापनेला किमान एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतरच या प्रकारच्या अभ्यासाला जागा द्यावी. तरीही आज या क्षणी तिथे जितके पुरुष सदस्य आहेत त्यांच्या तुलनेने स्त्रीयांचा जितका आकडा असणे अपेक्षित आहे, तो पुरेसा आहे असे ढोबळमानाने म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
राहताराहिला स्त्री सदस्यांचा संस्थळावरील प्रत्यक्ष सहभागाचा प्रश्न. इथेही 'मायबोली' वरील स्त्री सदस्या अन्य संस्थळांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसेल. उपक्रमवर 'प्रियाली', मीमराठीवर 'आतिवास', ऐसी अक्षरेवर अर्थातच 'अदिती' अशी हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या स्त्रीयांची नावे 'धाग्यां'च्या रुपात दिसतात. "केवळ प्रतिसादात स्वारस्य" अशा घटकापुरतीच या तीन संस्थळावरील काही स्त्री सदस्यांची उपस्थिती कार्यरत असल्याचे जाणवते. पण मायबोलीच्या तुलनेत तो आकडा थिटा आहे हे मान्य व्हावे.
असो. आजच्या अति वेगवान आणि वैज्ञानिक युगात स्त्रीजीवनविषयक समस्यांबाबत लोकमत निर्माण करणे वा ते जागृत करण्यास मराठीतील संस्थळे मोलाची कामगिरी करू शकतील असे वाटत असल्याने स्त्री सदस्यांचा (ज्या सर्वार्थाने सुशिक्षित आहेत) सहभाग केवळ पाककृती, वधूशृंगार, बालसंगोपन, भटकंती इतक्या विषयापुरताच मर्यादित न राहता समाजाच्या विविध अंगांना स्पर्श करणार्या विषयातही त्यांचा सहभाग होत राहिल्यास त्यामुळे अन्य स्त्रीयांनाही वेगवेगळ्या संस्थळांच्या सदस्यत्वाची तहान लागेल.
अशोक पाटील
अन्य संस्थळांच्या तुलनेत इथे
अन्य संस्थळांच्या तुलनेत इथे स्त्रियांच्या सहभागाचे प्रमाण लक्षणीय आहे. इतकेच नव्हे तर येथील स्त्री सदस्या हिरीरीने विविध विषयात भाग घेतात - धाग्यांच्या तसेच प्रतिसादाच्या रुपातही - मला वाटते 'मायबोली' च्या स्थापनेलाही बरीच वर्षे झाली असल्याने सुरुवातीच्या काळापासून जे स्त्री सदस्य आहेत त्यांच्यात आता जो आपलेपणाचा कौटुंबिक भाव निर्माण झाला आहे त्याची परिणिती इथल्या सातत्याच्या सहभागात झाली आहे, जी स्वागतार्ह मानली पाहिजे. 'गटग' सारखे उपक्रम राबविणे, त्याद्वारे आणखीन् नवनवीन महिला सदस्यांची ओळख करून घेणे, धागा प्रतिसादव्यतिरिक्तही फोन आणि ई-मेल द्वारे कायम संपर्कात राहणे, मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीविषयी, आरोग्याविषयी व्य.नि. वि.पू. तून सातत्याने चौकशी करणे आदी भावनिक नात्यामुळेही त्यांचा इथला (मायबोलीवरील) सहभाग कायमचा राहिल्याचे दिसते.>>>>>
तुमच्या प्रतिसादावर हासलेलो नाही, गैरसमज नसावा
मी हुशार नाही त्यामुळे मला
मी हुशार नाही त्यामुळे मला सोप्या भाषेत चर्चेचा उद्देश सांगा कुणीतरी.
मराठी सुशिक्षितांमधेही इंटरनेटचा वापर करणार्या स्त्रिया कमी आहेत असे ही आकडेवारी दर्शवते एवढेच मला समजले. याची कारणे अनेक असू शकतात पण हे चिंता करण्याचे किंवा चर्चा करण्याचे प्रकरण आहे हे मला तरी वाटत नाही.
या आकडेवारीचा ज्ञानदाच्या लेखाशी कसा काय संबंध? ती ठराविक स्टान्स घेण्या न घेण्याबद्दल म्हणतेय. ज्ञानदाच्या लेखाशी या मुद्द्याचे घेणेदेणे दिसत नाही.
मराठी साइटस या अगदी आयुष्याचे अविभाज्य अंग बनले असले तरी शेवटी त्या साइटसवर असण्याचा मूळ उद्देश हा विरंगुळा आणि नॉस्टॉल्जिया हाच असतो. आणि काही काळाने व्यसन. हे लक्षात घेता स्त्रियांची संख्या कमी असण्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे?
बर तू इंटरनेट हे सर्व प्रकारच्या महिलांपर्यंत पोचले पाहिजे ज्याचा सबलीकरणासाठी त्या वापर करून घेऊ शकतात असेही काही म्हणत नाहीयेस लेखात. एलित मानल्या गेलेल्या वर्गामधल्या मराठी बाया मराठी पुरूषांपेक्षा कमी वेळ/ कमी संख्येने मराठी साइटस वर असतात हा एवढाच चिंतेचा विषय मानतीयेस.
'बर मग?' करण्यावाचून माझ्याकडे पर्याय नाहीये.
>>> थोडक्यात टिपिकल पुरूषांच्या असण्यार्या सायटी पाहूनही मी स्त्री असण्याबद्दल गूगलला बरं समजलं. <<<
कुठल्या ना कुठल्या आडाख्यांना धरूनच हे समजलं असणार. कदाचित अजून काही वेगळे जेण्डर स्टिरिओटाइप्स असतील. मराठीत क्रियापद स्त्रीलिंगी वा पुल्लिंगी चालते हे ही असेल. पण हे आडाखे कितपत व्हॅलिड आहेत हे कसे कळणार? कसे मान्य करणार?
नुसते संख्याशास्त्रातले नियम लिहिले म्हणजे मान्य व्हायला पाहिजे का सगळं?
मला जेवढं समोर दिसतंय तेवढ्यावर मी प्रतिक्रिया दिलीये. एन्व्हलपच्या आतलं बघायची गरज नाही इथे.
नीधप +१. बळेच चर्चा. जाल
नीधप +१. बळेच चर्चा. जाल बर्यापैकी लिंगनिरपेक्ष आहे. मायबोली एक सुविचार तळे होऊ शकते ह्या सुप्रसिद्ध वाक्याची उगीचच आठवण आली.
माझा संख्याशास्त्राचा अभ्यास
माझा संख्याशास्त्राचा अभ्यास नाही. पण एक्झिट पोल आणि इतर मार्केटिंग सर्व्हे भरपूर करवून घेतलेत. त्यामुळे माझ्या मते तरी, इंटरनेटवर मराठी स्त्रियांच प्रमाण कमी किती आहे हे जाणून घ्यायचं असल्यास-
१. सर्वात आधी मराठी लोक (यात स्त्री पुरूष दोन्ही आले) किती आहेत?
२. त्याम्धे स्त्री आणि पुरूष यांचे गुणोत्तर किती आहे?
३. या लोकामधे इंटरनेट कनेक्शन कितीजणाकडे आहे? (पुन्हा यामधे घरातले/कार्यालयातले/सायबर कॅफे असे विभाग पडतील.)
४. आता यामधे किती स्त्रिया आणि पुरूष आहेत?
५. यापैकी किती स्त्रियाकडे स्वतःचे ईमेल अकाऊंट आहे? फेसबूक ऑर्कुट अथवा ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर (यात वर उल्लेखलेल्या मराठी साईट्स येतीलच) किती स्त्रिया आहेत? स्वतःचा ब्लॉग किती स्त्रिया चालवतात? त्याव्यतिरिक्त इंटरनेटचा उपयोग करणार्या किती स्त्रिया आहेत?
६. वरील आकडेवारीची अर्थातच तुलना मराठी पुरूषाच्या आकडेवारीशी करून मगच निष्कर्ष काढता येतील. स्त्री-पुरूष तुलनेसोबतच दुसर्या एखाद्या कम्युनिटीसोबत (तमिळ्/पंजाबी/कानडी) अशी तुलना करून वेगळे निष्कर्ष काढता येतील.
वरचा सँपल डेटा हा माझ्या मते तरी "मराठी भाषिक साईटवर असणार्या स्त्री व पुरूष आयडीज" असा वाटत आहे. यामधे रोमात राहून वाचणारे लोकदेखील सँपलमधे येत नाहीत. फक्त मराठी भाषिक साईट्स विचारात घेतल्याने कामासाठी इंटरनेट वापरणार्या, ईमेल्स वापरणार्या व इतर सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करणार्ञा स्त्रियांचा (आणि पुरूषांचा) विचार केलेला दिसत नाहीये. हा डेटा साईझ प्रचंड मोठा असल्याने साहजिकच सध्या सामोरे आलेल्या निष्कर्षाना किती सत्य मानायचं हा प्रश्न मनात उभा राहतोच.
ब्राऊझर बनवताना ते
ब्राऊझर बनवताना ते पुरूषप्रधान बनवत असावेत बहुधा.. त्यात सुधारणा झाली कि सगळं काही ठीक होईल.
किंबहुना बहुतांश संस्थळांचे
किंबहुना बहुतांश संस्थळांचे मालक आपापल्या परीने स्त्री-द्वेष्टे नाहीत असाच माझा तर्क आहे. या संस्थळांच्या मालकांमधे एक स्त्री आहे.>>>> अदितीतै
नीरजा म्हणतातः >> मूळ उद्देश
नीरजा म्हणतातः
>> मूळ उद्देश हा विरंगुळा आणि नॉस्टॉल्जिया हाच असतो. आणि काही काळाने व्यसन. हे लक्षात घेता स्त्रियांची संख्या कमी असण्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे? <<
मग आपली गृहीतकंच वेगळी आहेत. टिळकांच्या काळात वर्तमानपत्रं होती, तेंडूलकरांनी नाटकांचं माध्यम वापरलं, मी आंतरजालाकडून अशा प्रकारच्या अपेक्षा करते, अगदी आज नाही तर नजीकच्या भविष्यात. इंटरनेट ही फक्त दोन घटकांची करमणूक हे अरब-अपरायझींगनंतरही म्हणणं मला प्रचंड धाडसाचं वाटतं. (आणि असं धाडस असेल तर इंटरनेटसारख्या लोकशाहीकरण होत असलेल्या, झालेल्या माध्यमाच्या शक्तीचा अंदाज वापरकर्त्यांना नाही.)
अगदी विरंगुळ्यापुरतंही इंटरनेट असेल तर त्यातही जेंडर बायस का दिसतो असा प्रश्न निदान मला भेडसावतो. मराठी इंटरनेट म्हणजे 'व्हिक्टोरिया'ज सिक्रेट'चं दुकान नव्हे जिथे पुरूषांचीच गर्दी जास्त दिसेल.
>> इंटरनेट हे सर्व प्रकारच्या महिलांपर्यंत पोचले पाहिजे ज्याचा सबलीकरणासाठी त्या वापर करून घेऊ शकतात असेही काही म्हणत नाहीयेस लेखात. एलित मानल्या गेलेल्या वर्गामधल्या मराठी बाया मराठी पुरूषांपेक्षा कमी वेळ/ कमी संख्येने मराठी साइटस वर असतात हा एवढाच चिंतेचा विषय मानतीयेस. <<
कारण माझ्या मते अजून एलिट वर्गातल्या बायकाही पुरत्या सशक्त दिसत नाहीत. (डेटा खरा आहे हे मानून; कारण स्टॅटीस्टीकली हा डेटा चुकीचा कसा असेल किंवा "माझ्या बाबतीत गूगल चुकलं" असं म्हणणारेही कोणी दिसलेले नाहीत. किंचित चुकीचे बायस घेऊनही अल्गोरिदम योग्य असल्यास मॉडेल्स बरीचशी योग्य असतात हे मी शिकले आहे. गूगलला कसे गंडवावे, ते खूप नोझी असतात आणि आपल्याबद्दल चिक्कार माहिती त्यांच्याकडे आधीच आहे म्हणून, याबद्दल अनेक ठिकाणी चर्चा रंगतात. पण तो इथला विषय नाही. अलेक्साच्या स्टॅट्सबद्दल पुन्हा नाईल यानेच दिली आहे.) सबलीकरण करण्याची गरज एलिट समाजातल्या स्त्रियांनाही, कमी प्रमाणात असेल कदाचित, पण आहे. अजूनही त्या पुरूषप्रधान व्यवस्थेच्या गुलामीतून पूर्ण बाहेर आल्यासारख्या दिसत नाहीत. नीधप आणि अदिती ही एलिट गटातली सांपलं असली तरी पूर्णपणे रिप्रेझेंट करणारी नाहीत असं मला वाटतं. मी विचार करते आहे त्या स्त्रिया प्रिव्हीलेज्ड गटातल्या असल्या तरीही इथे काहीतरी चुकत आहे.
आणि आधीच्या एका प्रतिसादातच लिहील्याप्रमाणे एलिटांचं अनुकरण करण्याची पद्धत जुनी आहे आणि अजूनही जपली जाणारी आहे. एलिटांचा रंग गोरा म्हणून फेअर अँड लव्हली खपवणार. एलिटांच्या घरांतल्या बायका एकेकाळी सती जायच्या, विकेशा केल्या जायच्या तर ती प्रथा इतर समाजात गेली. सामान्य लोकांकडून एलिटांकडे गोष्टी वाह्यल्याचं उदाहरण मला माहित नाही. (पण माझं वाचन या बाबतीत तोकडं आहे हे मान्य.)
तरीही "बरं मग" म्हणता येईलः करेनात का भारत सरकार समलैंगिकांवर अन्याय, मी समलैंगिक नाही मला काय त्याचं? होईना का खैरलांजी, मी दलित नाही, मला काय त्याचं?
नंदिनी म्हणतातः
>> इंटरनेटवर मराठी स्त्रियांच प्रमाण कमी किती आहे हे जाणून घ्यायचं असल्यास- <<
नाही, मला सध्या त्यात रस नाही. मराठी इंटरनेटवर संस्थळांवर स्त्रिया कमी का असा मला पडलेला प्रश्न मी पुरेशा स्पष्टपणे शीर्षकातच दिलेला आहे. (आणि मला असा प्रश्न का पडलेला आहे ते मी सुरूवातीच्या एका प्रतिसादात स्पष्ट केलेलं आहे.) आधीची मॅच संपेपर्यंत गोलपोस्ट बदलण्यासाठी मला वेळ नाही.
काही मायबोली वापरकर्त्यांच्या मते ज्या मिपावरची भाषा स्त्रियांना अश्लाघ्य वाटणारी आहे तिथे इथल्यापेक्षा अधिक चर्चा, प्रतिसाद दिसतात. सगळंच वाचण्यासारखं आहे किंवा टाकाऊ आहे असंही नाही. काही स्त्री प्रतिसादकांनीही काही मायबोली वापरकर्त्यांप्रमाणे मिपाबद्दल तक्रार केलेली आहे.इथे ती चर्चा दिसेल.
आदिती, माझ्या क्षेत्रातल्या
आदिती, माझ्या क्षेत्रातल्या अनेक स्त्रिया आहेत ज्या इंटरनेट थोडाफार कुणाशी संपर्क ठेवण्यापुरते वापरतात. एरवी वापरत नाहीत. त्यांना मायबोली, मनोगत, मिसळपाव इत्यादी साइटस माहितही नाहीत. म्हणजे त्यांना जगात काय चाललंय हे माहित नसतं, त्यांचा जगाशी संपर्क नसतो असे नाही. पण त्या मराठी साइटस वापरत नाहीत. माझ्याच काय अनेक क्षेत्रातल्या अश्या स्त्रिया माहितीयेत. त्यातल्या अश्याही अनेक जणी आहेत की त्या जे काम करतायत ते जगाच्या कानाकोपर्यातल्या घडामोडी आपल्या खुर्चीत बसून स्क्रीनवर वाचून समजून घेण्यापेक्षाही जगाच्या उपयोगाचे आहे.
आता यांच्यापर्यंत इंटरनेट पोचले नाही. अरेरे बिचार्या. कशी स्त्री मागेच राह्यली असे काही वाटत असेल तर तुम्हाला वाटो बापडे.
>>> टिळकांच्या काळात वर्तमानपत्रं होती, तेंडूलकरांनी नाटकांचं माध्यम वापरलं, मी आंतरजालाकडून अशा प्रकारच्या अपेक्षा करते,<<<
तू एकदा ठरव की तुला एकूण आंतरजाल म्हणायचंय की केवळ मराठी साइटस आणि ब्लॉग्ज.
टिळकांना किंवा तेंडुलकरांना मायबोली/ मनोगत/ मिसळपाव इत्यादी व्यसन लागलं असतं तर ते त्यांचं कार्य किती करू शकले असते याबद्दल मला शंकाच आहे.
प्रत्येक प्रकारच्या कामामधे सतत इंटरनेटचा वापर करणे वा अॅक्सेस असणे हे अनिवार्य नसते. त्यांनी स्वतः मागे पडू नये म्हणून मराठी साइटसना जोडून घ्यायला हवे स्वतःला?
>>> अगदी आज नाही तर नजीकच्या भविष्यात. इंटरनेट ही फक्त दोन घटकांची करमणूक हे अरब-अपरायझींगनंतरही म्हणणं मला प्रचंड धाडसाचं वाटतं. (आणि असं धाडस असेल तर इंटरनेटसारख्या लोकशाहीकरण होत असलेल्या, झालेल्या माध्यमाच्या शक्तीचा अंदाज वापरकर्त्यांना नाही.) <<<
नाही अंदाज. पण लोकशाही स्वरूप म्हणताना प्रत्येक साइट ही कोणाच्या तरी वैयक्तिक वा कंपनीच्या मालकीची आहे तेव्हा लोकशाही स्वरूपाला भरपूर मर्यादा आहेत हे ओघाने आलंच.
मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर
मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर प्रमाण कमी का? हे या धाग्याचं शीर्षक आहे ना? मग
म्माझ्या प्रतिसादातील
इंटरनेटवर मराठी स्त्रियांच प्रमाण कमी किती आहे हे जाणून घ्यायचं असल्यास- <<
नाही, मला सध्या त्यात रस नाही. मराठी इंटरनेटवर संस्थळांवर स्त्रिया कमी का असा मला पडलेला प्रश्न मी पुरेशा स्पष्टपणे शीर्षकातच दिलेला आहे. हे काय आहे?
मराठी इंटरनेट हा नक्की काय प्रकार आहे? मलाच काही समजेनासं झालय. धागाकर्तीला बहुतेक चार पाच मराठी साईट्सबद्दलच चर्चा करायची आहे का? कारण, सतत उदाहरणाम्धे मिपा, उपक्रम हीच नावे दिसत आहेत. धाग्याचे शीर्षक मराठी स्त्रिया इंटरनेटवर कमी का? असे आहे. मराठी संकेतस्थळावर स्त्रिया कमी का असे नाही, हे मी इथे सर्वात आधी नमूद करू इच्छिते.
इंटरनेट ही संकल्पना त्याहून जास्त मोठी आहे हे धागाकर्ती मानायलाच तयार नाही आहेत. सोशल मीडीया, सोशल नेटवर्किंग साईट्स यापलिकडे जाऊनदेखील इंटरनेटचे उपयोग आहेत, ज्यांचा या तथाकथित सँपल डेटामधे समावेशदेखील केलेला नाही. चुकीचा डेटा घेऊन चुकीचे निष्कर्ष काढल्यावर ते चूक आहे हे मानणेदेखील नाही. निवडणुकीच्या काळात ही कला उपयोगी पडते. प्रसारमाध्यमातील सर्वेक्षण (हो, इंटरनेट हेदेखील एक प्रसारमाध्यमच आहे) अशा पद्धतीने केले जात नाही. ते कसे केले जावेत याचे साधारण निकष वर मी दिलेले आहेत.
इंटरनेट वापर या संकल्पनेपासूनच वरच्या सर्वेक्षणामधे लोचा आहे.
धागाकर्तीला बहुतेक चार पाच
धागाकर्तीला बहुतेक चार पाच मराठी साईट्सबद्दलच चर्चा करायची आहे का? <<<
अगदीच अनुमोदन.
माझ्या नात्यातील उच्चशिक्षित
माझ्या नात्यातील उच्चशिक्षित स्त्रीपुरुष कुणीच मराठी इंटरनेट साईटवर नसतात. त्यांच्या कामाचे स्वरुप पहाता नोकरी/धंद्याच्याच्या वेळात इंटरनेट्वर भटकायला एकतर त्यांना वेळ नाही आणि दुसरे म्हणजे इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्याने काहींना मराठी भाषेतल्या साईटबद्दल फारशी आत्मियताही नाही. जी काही मराठी बद्दल आत्मियता असलेली मंडळी आहेत ती परदेशात रहात नसल्याने त्यांची गरज आसपासच्या परीसरात भागते. मोठ्या शहरात रहात असल्याने धकाधकीच्या जीवनात मोकळा वेळ कुटुंबिय, छंद जोपासणे यात जातो. यात वाईट काय मला कळले नाही. याचा अर्थ ते कनेक्टेड नाहित असा नाही. पण त्यांचा नेटवरचा टाईम हा मराठी साईटसाठी नाही.
>>टिळकांना किंवा तेंडुलकरांना
>>टिळकांना किंवा तेंडुलकरांना मायबोली/ मनोगत/ मिसळपाव इत्यादी व्यसन लागलं असतं तर ते त्यांचं कार्य किती करू शकले असते याबद्दल मला शंकाच आहे. >> :-p
धागाकर्तीला बहुतेक चार पाच
धागाकर्तीला बहुतेक चार पाच मराठी साईट्सबद्दलच चर्चा करायची आहे का? <<<
अगदीच अनुमोदन.>>> त्यातही अमुक एका नवीन संस्थळाची जाहिरातही केली जातेयकी काय असेही वाटते!!
आधीच इंग्लिश शब्दांबद्दल
आधीच इंग्लिश शब्दांबद्दल क्षमा मागते. तांत्रिक बाबतीत माझा मराठी शब्दकोष फारच लहान आहे.
>> धागाकर्तीला बहुतेक चार पाच मराठी साईट्सबद्दलच चर्चा करायची आहे का? <<
हुश्श! फायनली.
यात फक्त एक भर, चार-पाच मराठी संस्थळं, जिथे इंटरॅक्टीव्ह, फोरम-प्रकारची रचना आहे.
एलिट गटाचं हे मला बंदीस्त आणि रिप्रेझेंटेटीव्ह सांपल वाटतं. त्यामुळे या गटात काय जे दीड-दोन हजार लोकं असतील त्यांची माहिती पहावीशी वाटली. इथे येणारे एलिट गटाचं संपूर्ण रिप्रेझेंटेशन करत का नाहीत हे मला समजलेलं नाही.
>>तू एकदा ठरव की तुला एकूण आंतरजाल म्हणायचंय की केवळ मराठी साइटस आणि ब्लॉग्ज.<<
या दोन्हींमधे इतर प्रकारच्या मराठी इंटरनेटपेक्षा अधिक लोकशाही आहे, त्यातही साईट्सवर जास्त, म्हणून ही पाच आहेत तशी ऑनलाईन फोरम्स.
इंटरनेट वापरणारेच काय ते एलीट्स आणि इतर नाहीतच असा माझा दावा नाही. मराठी समाजातले आताचे उच्चभ्रू, एलीट्स पहाता, परदेशात असणारे, जाणारे, मुंबई-पुण्यासारख्या 'कनेक्टेड' शहरात रहाणारे आहेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून मराठी आंजावर लिखाण करणारे निवडले. जे लोक यात लिखाण करत नाहीत, साईट्स वाचतही नाहीत त्यांना अंडरप्रिव्हीलेज्ड म्हणण्याचा हेतू नाही, तसा विचारही नाही आणि सांख्यिकी असे सुचवतही नाही.
Pages