जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा.
महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात.
कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते. पुराव्यादाखल अलेक्सा.कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पहा.
मनोगता वर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्या प्रमाणासारखेच आहे. मायबोली वर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे.मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरे चे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच.
मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?
(हा लेख याच सदरात असावा का याबद्दल साशंक आहे; पण चर्चा व्हावी अशी इच्छा आहे.)
>> त्यातही अमुक एका नवीन
>> त्यातही अमुक एका नवीन संस्थळाची जाहिरातही केली जातेयकी काय असेही वाटते! <<
लोकांनी लिहीलेल्या गोष्टी स्वतःच्या नावावर खपवता येत नाहीत. संदर्भ देण्याची व्यावसायिक डीसॉर्डर इथेही लागली आहे. माझ्यातल्या या दोषांमुळे तुम्हाला झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व. टीव्हीवरच्या जाहिराती फारतर म्यूट करू शकता; इंटरनेटवर क्लिक करण्याचीही सक्ती नसते.
मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर
मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर प्रमाण कमी का? >>> काहीतरीच काय आता इथेच दिलेले प्रतिसाद बघा ना , ११ स्त्रिया आणि ८ पुरुष .
लेखाचं शीर्षक आणि लेखातला
लेखाचं शीर्षक आणि लेखातला मजकूर यांचा परस्परसंबंध नाही.
आणि,
<आणि यूट्यूबवर फारएण्डने सुचवलेल्या थर्डक्लास हिंदी फिल्स धुंडाळत फिरणं>
या वाक्याचा निषेध. या चित्रपटांइतके मनोरंजक चित्रपट दुसरे नसतील.
हा धागा वाचनमात्र
हा धागा वाचनमात्र करतोय.
सुरुवातीला चर्चा चांगली चालू होती. नंतर मात्र मुद्दामहून शक्य असेल तिथे मायबोलीबाहेरील काही विशिष्ट संकेतस्थळांचे दुवे देऊन तिथे जाऊन पहावे अशी अपेक्षा सुरु दिसते आहे. असे सगळे दुवे प्रतिसादातून काढले आहेत आणि परत काढले जातील. ही चर्चा "चर्चा" म्हणून न करता दुसर्या संकेतस्थळांची जाहिरात करण्यासाठी केली आहे असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
सुज्ञांना जास्त सांगायला लागू नये.
Pages