'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
=======================================================================
=======================================================================
सिंधुदुर्ग किल्ल्यावरची भटकंती आणि चैतन्यमय झाल्यावर आम्ही तारकर्ली समुद्रकिनारी पोहचलो. मालवण शहरापासून अवघ्या ६-७ किमी अंतरावरील तारकर्ली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या अतिशय प्रगत असे ठिकाण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणाचा संपूर्णतः कायापालट केलेला आहे. तारकर्ली येथे एमटीडीसी तर्फे तंबू निवास आणि हाऊसबोटची व्यवस्था केली आहे. अतिशय सुंदर असे हे कोकणातील अजुन एक गाव.
तेथे थोडावेळ थांबुन देवबागकडे निघालो. "देवबाग" - देवांची बाग. नावाप्रमाणेच सुंदर असे हे गाव. या गावच्या एका बजूला अथांग अरबी समुद्र तर दुसर्या बाजूला कर्ली नदीचे पात्र. तीनही बाजुने पाण्याने वेढलेले असुनही नैसर्गिक आपत्तीपासुन वाचत आलेले हे "देवबाग". कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाचे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. एका बाजुला कर्ली नदीचे निळेशार शांत पाणी तर दुसर्या बाजूला सफेद फेसांचा उसळलेल्या लाटांचा समुद्र. दोन्हीचा संगम खरंच पाहण्यासारखा होता. यावेळी मीही माझा कॅमेरा बंद करून त्या क्षणांचा आनंद घेऊ लागलो. बर्याच वेळा फोटो काढण्याच्या नादात त्या क्षणांचा अनुभव घ्यायचा राहून जातो.
आम्हाला सागराची गाज ऐकत देवबागचा सूर्यास्त पहायचा होता. हाताशी दोन तास होते. तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी देवबागजवळच असलेल्या त्सुनामी आयलंडवर वॉटरस्पोर्टची मजा लुटली. सिंधुदुर्गात गेल्यानंतर तारकर्ली-देवबागला भेट न देताच आलात तर तुमची कोकण सफर अपूर्णच राहिली.
तारकर्ली
प्रचि ०१
प्रचि ०२
तारकर्ली MTDC
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९देवबाग
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२देवबाग बॅकवॉटर
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५त्सुनामी बेट
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२देवबाग किनार्यावरून दिसणारे भोगवे बीच (मगरीचे तोंड
)
प्रचि २३
प्रचि २४सांज आली दूरातुन, क्षितीजाच्या गंधातुन
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
(क्रमशः)
छान. मी तारकर्लीला कधी गेलोच
छान. मी तारकर्लीला कधी गेलोच नाही. त्यावेळी अशा सोयी पण नव्हत्या.
आणि बीच हा शब्द पण वापरात नव्हता. राणीची वेळ, चिवल्याची वेळ.. असे शब्द वापरात होते. वेळेवर जाऊ, याला वेगळाच अर्थ होता.
मालवणला, अगदी किनार्याजवळच्या खडपात देखील, खुप कालवं मिळायची.
छान! मी दोन वर्शापुर्वी
छान!
मी दोन वर्शापुर्वी गेलेलो तारकर्लीला! मस्त आहे!
वॉव प्रची २० मधली बनाना राईड
वॉव प्रची २० मधली बनाना राईड कसली गोड आहे. मगर मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदा तु व दिनेशदा यांचे मिळुन फोटोंचे प्रदर्शन भरवा रे.
अवांतर - परवाच्या ठाण्याच्या त्या प्रदर्शनात एक (जरा गावची टाईप वाटणारी) बाई तिच्याबरोबरच्या माणसाला म्हणत होती. बघा सरवानच्या चेहेर्यावर कसे हसु आहे. समदे कसे छान झाडे बघत आहे. आनंद आनंद म्हणतात तो याहुन वेगळ असतो व्हय? किती खरे होते ते.
तसाच आनंद सगळ्यांना मिळेल. तुम्ही भरवाच प्रदर्शन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आलेत फोटो. किनारा आणि
मस्त आलेत फोटो. किनारा आणि सूर्यास्त सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तारकर्लीच्या वॉटर स्पोर्ट्स बद्दल बरंच ऐकून आहे. त्याबद्दल थोडं विस्ताराने लिही ना.. चांगल्या सोयी आहेत का खरंच? बनाना बोट राईड, पॅरासेलिंग वगैरे काय काय आहे? तसंच एमटीडीसीची सोय चांगली आहे का? झोपड्या दिसत तरी एकदम मस्त आहेत
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भन्नाट फोटु आहेत रे - ते
भन्नाट फोटु आहेत रे - ते मगरीचे तोंड एकदम सही-
अवांतर - परवाच्या ठाण्याच्या त्या प्रदर्शनात एक (जरा गावची टाईप वाटणारी) बाई तिच्याबरोबरच्या माणसाला म्हणत होती. बघा सरवानच्या चेहेर्यावर कसे हसु आहे. समदे कसे छान झाडे बघत आहे. आनंद आनंद म्हणतात तो याहुन वेगळ असतो व्हय? किती खरे होते ते.>>>> क्या बात है मोनालिप...
तारकर्लीच्या वॉटर स्पोर्ट्स
तारकर्लीच्या वॉटर स्पोर्ट्स बद्दल बरंच ऐकून आहे. त्याबद्दल थोडं विस्ताराने लिही ना..>>>>>>तारकर्लीहुन साधारण ५-६ किमी अंतरावर देवबागजवळ त्सुनामी आयलंडवर वॉटर स्पोर्ट्स आहेत. यात बनाना राईड्स, स्पीड बोट, कयाकिंग आणि अजुन बर्याच राईड्स आहेत. पॅरासेलिंग नव्हते. प्रत्येक राईड्सची किंमत १०० रूपये माणशी. फक्त कयाकिंगची रूपये ५० माणशी. तारकर्लीहुन त्सुनामी आयलंडवर जाण्यासाठी बोट उपलब्ध आहेत पण ते सगळ्यांचे मिळुन १२०० रूपये घेतात आणि तेच जर तुम्ही देवबाग वरून आलात तर ४०० रूपये (फक्त त्सुनामी बेटावर नेण्याआणण्याकरीता, वॉटरस्पोर्ट्सचा खर्च वेगळा).
तसंच एमटीडीसीची सोय चांगली आहे का? झोपड्या दिसत तरी एकदम मस्त आहेत>>>>तारकर्ली एमटीडीसी बद्दल खुप जणांकडुन चांगला फिडबॅक ऐकला आहे. राहण्याची व्यवस्था उत्तम आहे. हाऊसबोट हे एमटीडीसीचे खास आकर्षण आहे. कोकणी जेवणाकरीता तारकर्ली-देवबाग परीसरात चांगली हॉटेल्स उपलब्ध आहेत. एमटीडीसी व्यतिरीक्तही या परीसरात बरेच हॉटेल्स्/रिसॉर्ट आहेत (अभिरूची, बाबला बीच हाऊस, भवानी बीच रिसॉर्ट, अपूर्वा बीच रिसॉर्ट, पूर्वज रिसॉर्ट (देवबाग), मनाली रिसॉर्ट असे अनेक पर्याय उपलब्ध आहे.)
या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्लान करायला काहिच हरकत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तारकर्लीच्या समुद्राकडील
तारकर्लीच्या समुद्राकडील भागाइतकाच आंतला खाडीलगतचा भागही सुंदर आहे; एकीकडे अथांग ,अफाट समुद्र दर्शनाने एकाच वेळीं अचंबित,उल्हसित व्हावं व दुसर्या बाजूला मिलनाच्या ओढीने समुद्राकडे झेंपावणार्या नदीतून दुतर्फा तिला निरोप देणार्या माडांच्या हिरव्या सळसळळीशीं मनाची लय जुळवत हवेतल्या पिसासारखं झुलावं !
असो. आंवरतो स्वतःला; डोळ्यातले थेंब इतक्या अप्रतिम प्र.चिं.वर नको सांडायला !
मनापासून धन्यवाद, जिप्सीजी. देव भलां करो तुमचां !
तारकर्लीच्या समुद्राकडील
तारकर्लीच्या समुद्राकडील भागाइतकाच आंतला खाडीलगतचा भागही सुंदर आहे; एकीकडे अथांग ,अफाट समुद्र दर्शनाने एकाच वेळीं अचंबित,उल्हसित व्हावं व दुसर्या बाजूला मिलनाच्या ओढीने समुद्राकडे झेंपावणार्या नदीतून दुतर्फा तिला निरोप देणार्या माडांच्या हिरव्या सळसळळीशीं मनाची लय जुळवत हवेतल्या पिसासारखं झुलावं >>>>>>भाऊकाका __/\__![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
बघा सरवानच्या चेहेर्यावर कसे
बघा सरवानच्या चेहेर्यावर कसे हसु आहे. समदे कसे छान झाडे बघत आहे. आनंद आनंद म्हणतात तो याहुन वेगळ असतो व्हय? किती खरे होते ते.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>> जिप्स्या तु रामनरेश सरवानचेपण फोटो काढलेस का?
वा भाऊ !
वा भाऊ !
प्रचि २६ एकदम जबराट आहे
प्रचि २६ एकदम जबराट आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि २६ एकदम जबराट आहे >>>>
प्रचि २६ एकदम जबराट आहे
>>>> मित + १
सगळे प्रचि बेस्ट........ २५
सगळे प्रचि बेस्ट........ २५ ते २८ तर..... फार्र्र्र्रच सह्ह्ही......
महाराष्ट्रात इतके भारी किनारे
महाराष्ट्रात इतके भारी किनारे आहेत......
(लोक गोवा,केरळला का धावतात.)
धन्यवाद जिप्सी.
धन्यवाद जिप्सी.
बघा सरवानच्या चेहेर्यावर कसे
बघा सरवानच्या चेहेर्यावर कसे हसु आहे. समदे कसे छान झाडे बघत आहे. आनंद आनंद म्हणतात तो याहुन वेगळ असतो व्हय? किती खरे होते ते. >>>+१ मोनली अगदी, ईथे जिप्सी आपल्याला तोच आनंद देत आहे, हे सर्व प्रचि पहाताना जीवनातले दोन क्षण तरी सर्व ताणतणाव आपण विसरतो,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच प्रचि जिप्स्या आणि धन्यवाद.
मस्त रे!!! प्रचि १३ खुप खुप
मस्त रे!!!
प्रचि १३ खुप खुप आवडेश.
मी समुद्र प्रथम पाहीला तो
मी समुद्र प्रथम पाहीला तो तारकर्ली बीचवरूनच..
छान आहेत सर्वच प्रचि..........
झकास फोटो!! तारकर्लीच्या
झकास फोटो!!
तारकर्लीच्या माहितीबद्दल धन्यवाद जिप्सी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
शेवट गोड झाला तर >>मी समुद्र
शेवट गोड झाला तर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>मी समुद्र प्रथम पाहीला तो तारकर्ली बीचवरूनच..<< मी पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>देव भलां करो तुमचां>>
>>देव भलां करो तुमचां>> अगदी!!
जिप्स्या तारकर्ली आमच्याघराकडून ईतके जवळ असून कधी ईतके डिटेलवार निसर्गसौंदर्य पाहिले नव्हते. मुळात काही ठिकाणं तर तिथे जाऊन आजतागायत कधीही पाहिली नाहीत. खरच धन्यवाद तुला. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख सेरीज चालु आहे ही
सुरेख सेरीज चालु आहे ही योगेश्......आणि फार फार जिव्ह्याळ्याची.
काहीकाही फोटो खूप आवडले....खासकरून सुर्यास्तांचे आणि कोंकणी ताटांचे!
जिय्यो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< जिप्स्या तारकर्ली
<< जिप्स्या तारकर्ली आमच्याघराकडून ईतके जवळ असून कधी ईतके डिटेलवार निसर्गसौंदर्य पाहिले नव्हते. >> नीलू, यावर एक चपखल मालवणीच म्हण आठवली - " जवळची व्हकाल खुरडी" ! [ अर्थ- लहानपणापासून नेहमीच्या पहाण्यातलीच एखादी मुलगी असेल ,तर सुरेख असूनही नवरीमुलगी म्हणून ती नाही नजरेत भरत ! ]
रच्याकने,<< मी समुद्र प्रथम पाहीला तो तारकर्ली बीचवरूनच.. >> खरंच काय मनावर 'इम्पॅक्ट' होत असेल प्रथमच अथांग समुद्र प्रत्यक्ष पाहिल्यावर ! अनेक फोटोत, सिनेमांत पाहिलेलीं बर्फाच्छादित गगनचुंबी शिखरं काश्मिरला मीं प्रथमच प्रत्यक्ष पाहिलीं तेंव्हां अवाकच झालो होतों; तशीच कांहीशी अनुभूति असावी ही देखील.
हें अवांतर म्हणजे केवळ वरच्या अप्रतिम प्र.चिं.ना दृष्ट लागूं नये म्हणून लावलेली तीट !
>>जवळची व्हकाल खुरडी>>>
>>जवळची व्हकाल खुरडी>>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
व्वा जिप्स्या...
व्वा जिप्स्या...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अॅज युजवल जिप्सी ! मस्त
अॅज युजवल जिप्सी ! मस्त फोटोज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages