'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"

Submitted by जिप्सी on 7 March, 2012 - 00:14

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"

=======================================================================
=======================================================================
सिंधुदुर्ग किल्ल्यावरची भटकंती आणि चैतन्यमय झाल्यावर आम्ही तारकर्ली समुद्रकिनारी पोहचलो. मालवण शहरापासून अवघ्या ६-७ किमी अंतरावरील तारकर्ली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या अतिशय प्रगत असे ठिकाण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणाचा संपूर्णतः कायापालट केलेला आहे. तारकर्ली येथे एमटीडीसी तर्फे तंबू निवास आणि हाऊसबोटची व्यवस्था केली आहे. अतिशय सुंदर असे हे कोकणातील अजुन एक गाव. Happy
तेथे थोडावेळ थांबुन देवबागकडे निघालो. "देवबाग" - देवांची बाग. नावाप्रमाणेच सुंदर असे हे गाव. या गावच्या एका बजूला अथांग अरबी समुद्र तर दुसर्‍या बाजूला कर्ली नदीचे पात्र. तीनही बाजुने पाण्याने वेढलेले असुनही नैसर्गिक आपत्तीपासुन वाचत आलेले हे "देवबाग". कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाचे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. एका बाजुला कर्ली नदीचे निळेशार शांत पाणी तर दुसर्‍या बाजूला सफेद फेसांचा उसळलेल्या लाटांचा समुद्र. दोन्हीचा संगम खरंच पाहण्यासारखा होता. यावेळी मीही माझा कॅमेरा बंद करून त्या क्षणांचा आनंद घेऊ लागलो. बर्‍याच वेळा फोटो काढण्याच्या नादात त्या क्षणांचा अनुभव घ्यायचा राहून जातो.
आम्हाला सागराची गाज ऐकत देवबागचा सूर्यास्त पहायचा होता. हाताशी दोन तास होते. तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी देवबागजवळच असलेल्या त्सुनामी आयलंडवर वॉटरस्पोर्टची मजा लुटली. सिंधुदुर्गात गेल्यानंतर तारकर्ली-देवबागला भेट न देताच आलात तर तुमची कोकण सफर अपूर्णच राहिली. Happy

तारकर्ली
प्रचि ०१

प्रचि ०२

तारकर्ली MTDC
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
देवबाग
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
देवबाग बॅकवॉटर
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
त्सुनामी बेट
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
देवबाग किनार्‍यावरून दिसणारे भोगवे बीच (मगरीचे तोंड Happy )
प्रचि २३

प्रचि २४
सांज आली दूरातुन, क्षितीजाच्या गंधातुन
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

(क्रमशः)

गुलमोहर: 

<<<आंवरतो स्वतःला; डोळ्यातले थेंब इतक्या अप्रतिम प्र.चिं.वर नको सांडायला !>>>>
भाऊंनो, अगदि माझ्या मनातली व्यथा नेमेकेपणाने व्यक्त केलीत. धन्स!
जिप्सी, काय पतिसाद द्यायचा ? शब्द संपले !!!!!!!!!!!!!!!!!

ग्रेट जिप्सि ग्रेट!!
अप्रतिम टिपलं आहेस सगळं!
सध्या कोजागिरीला हा सगळा भाग फुल्ल्ल्ल असतो असं ऐकलंय!! वैशिष्ट्य असं की, पौर्णिमेला देवबागच्या एका बाजूस कर्लीची शांत खाडी व दुसरीकडे घोघावणारा दर्या.. फक्त अनुभवाक होया.. शब्दांत सांगुक येणा नाय.

Pages