दोन योगेशनी इथे मस्त विश्वदर्शन घडवलेच आहे, माझाही खारीचा वाटा.
ऑकलंडमधल्या शेवटच्या दिवशी मी म्यूझियममधे होतो, ते आधी लिहिलेच आहे.
त्या म्यूझियमच्या टेकडीच्या पायथ्याशी, विंटरगार्डन नावाची वास्तू आहे. बसमधल्या
ऑटो गाईडने, उद्यानांची आवड असणार्यांनी तिथे अवश्य जावे असे सूचवले होते. (मला तो इशारा पुरेसा होता.)
तर लांबून काचेची इमारत आतमधे काय असेल याचा पत्ता लागू देत नव्हती. आणि
जवळ गेल्यावर मात्र, मला अलिबाबाची गुहा सापडल्यासारखेच झाले.
काचेचे अर्धगोलाकार छत असलेली एक इमारत, मधे मोकळी जागा, आणि मागे पुन्हा
तसलीच एक इमारत, एवढा पसारा.
आत अक्षरशः हजारोंनी फुले फुललेली होती. आत तर होतीच आणि बाहेरही होती.
इथे प्रवेश विनामूल्य आहे. (हे एक नवलच.) फक्त लग्नाचे वगैरे फोटो काढायचे
असतील, तर पैसे घेतात. आत गुलाबांची २/४ च झाडे होती (तिथून जवळच १०८
प्रकारचे गुलाब असलेले एक उद्यान आहे.)
न्यू झीलंडमधे वाढू शकतील तशी सर्व झाडे तर होतीच पण तिथे नैसर्गिक रित्या
वाढू शकणार नाहीत अशी कोको, केळी वगैरे पण झाडे होती. झाडांच्या नैसर्गिक
गरजा लक्षात घेऊन, गरज असेल तेवढा प्रकाश आणि उष्णता देण्याची व्यवस्था
केली होती. (गरज असेल तिथे चक्क वीजेचे दिवे लावले होते.)
म्हणाल तो रंग नव्हे तर त्या रंगाची म्हणाल ती छटा तिथे उपलब्ध होती. फुलात
कमी दिसणारे काहि रंग उदा, निळा, किरमीजी पण तिथे होते.
या फुलांकडे लांबून बघू कि जवळ जाऊन बघू, असे मला झाले होते. (दोन्ही
प्रकारचे फोटो देतोय.) फक्त एकच अडचण होती, ती म्हणजे एखाद्या फुलाचा
स्वतंत्रपणे फोटो काढणे जरा कठीण होते, कारण तिथे फुलांची बरीच गर्दी होती.
मला वाटतं, रोजच असे ते गार्डन फुलते ठेवण्यात तिथल्या कर्मचार्यांचा नक्कीच
सहभाग होता. त्या कर्मचार्यांचा अनुभव मुद्दाम सांगण्यासारखा. तिथे
कमळाच्या तलावाजवळ जास्त किटक (डास वगैरे )होते. मी हाताने ते वारत
होता, तर तिथला एक कर्मचारी त्यांना हाताने आपल्याजवळ ओढल्यासारखे करत
होता. मला एकदम हसू आले, मी त्याला विचारले असे का करतोस, किटक
घालवत का नाहीत ?
तर तो म्हणाला, पॉलिनेशन कसे होणार ? त्यासाठी तर ते हवेतच. शिवाय इथे काही
किटकभक्षी वनस्पति पण आहेत, त्यांना नको का अन्न ?
महाभारतात वर्णन असलेले, सहस्त्र पाकळ्यांचे, रक्तवर्णी कमळ पण तिथे होते.
त्याचा कळाच आपल्या तांब्याच्या गडू एवढा होता. फक्त मला ते उमललेले
पाहता आले नाही..
या इमारतीच्या बाहेरच्या बाजूने देखील भरपूर फुले होती. माझी तर तंद्रीच लागली
होती तिथे. शेवटच्या बसची वेळ झाली, तशी धावत पळत म्यूझियमची टेकडी चढलो.
या फोटोतले किती तूम्हाला दाखवू असे झालेय. जागेच्या अभावामूळे सगळेच इथे
टाकत नाही, असे ठरवले तरी ते भरपूर आहेत. म्हणुन चार भागात देतोय.
(पहिल्या दोन भागात, ग्रुप फोटोज आहेत तर तिसर्या आणि चौथ्या भागात
क्लोज अप्स असतील. )
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३)
२४)
२५)
बाकिचे भाग ३ /४ दिवसांच्या अंतराने टाकतोच.
वर्णन करायला शब्द अपुरे
वर्णन करायला शब्द अपुरे आहेत....
वा दिनेशदा सुंदर प्रचि , आजचा
वा दिनेशदा सुंदर प्रचि , आजचा दिवस सार्थकी लागला
मस्तच दिनेशदा...
मस्तच दिनेशदा...
मस्त!!!
मस्त!!!
हा काय खारीचा वाटाय का? अख्खा
हा काय खारीचा वाटाय का? अख्खा सेतू बांधलाय
माणसाचे रंग इतके मनमोहक असते तर सगळेच तुमच्यासारखे दिसायला लागले असते
(अवांतर - उदरनिर्वाहासाठी आपण काय करता?)
-'बेफिकीर'!
दोन चार दिवसात बाकिचे
दोन चार दिवसात बाकिचे टाकतोच.
बेफि, क्या बात है, माणसाचे रंग !!
उदर निर्वाहासाठी, मी सी.ए. गिरी करतो !!
पण ते तेवढयापुरतेच, बाकिचा सर्व वेळ.. असे उद्योग करतो.
(No subject)
मस्त दिनेशदा, अवर्णनिय फोटो.
मस्त दिनेशदा, अवर्णनिय फोटो. आणखी फोटोंचि वाट बघत आहे.
mastach.. 3,6,7,9 "Fuschiaa"
mastach.. 3,6,7,9 "Fuschiaa" che bhaau bahin ka ??
तिथले कर्मचारी काय नशिबवान
तिथले कर्मचारी काय नशिबवान आहेत!!!!!! मला आवडेल अशा ठिकाणी नोकरी करायला नी दिवसभर इतक्या सुंदर झाडांची काळजी घ्यायला.
मस्त
मस्त
सुपर्ब!!! हा काय खारीचा
सुपर्ब!!!
हा काय खारीचा वाटाय का? अख्खा सेतू बांधलाय>>>>>>+१
मस्तच
मस्तच
साधना +१ सुंदर फुलं..पाहातच
साधना +१
सुंदर फुलं..पाहातच राहावीशी वाटततायेत..
दिनेश ,फ्लाईट चुकती ना या दिवशीची असती तर???
वा, कसली खच्चुन भरलेत फुलं.
वा, कसली खच्चुन भरलेत फुलं. नजरेचं पारणंच फिटतय. शेवटच्या फोटोतली नक्षी आवडली. शेवटून दुसर्या फोटोत दिसणारं ते आवारही किती सुंदर दिसतय.
मला तो सहस्र पाकळ्यांच्या कमळाचा फोटो बघायची भारी उत्सुकता लागलेय. कधी टाकणार?
मस्तच!!
मस्तच!!
कित्ती सुंदर!!! दिनेशदा
कित्ती सुंदर!!!
दिनेशदा पुढचे फोटो लवकर टाका...
अप्रतिम. शब्दच नाहीत.
अप्रतिम. शब्दच नाहीत.
साधना, मला रिटायर झाल्यावर
साधना, मला रिटायर झाल्यावर तरी हे काम करायचेय ! भारतात सुद्धा अशी बाग निर्माण करता येईल.
वर्षू, खरेच मला भान रहात नाही, अशा वेळी.
यो, हो तोच प्रकार. पण तिथली फुले जरा मोठी होती.
मामी, आज दुसरा भाग पण टाकलाय. (त्यात कमळाचे पान आहे !!)
केवळ अप्रतीम! उदरनिर्वाहासाठी
केवळ अप्रतीम!
उदरनिर्वाहासाठी सीए गिरी करणंही सोप्पं नाहीये. ते करून तुम्ही हे उद्योग करता! धन्यच आहात!
२० नं. खुप आवडला
२० नं. खुप आवडला
दिनेशदा, मस्त फोटो! पण एकदा
दिनेशदा, मस्त फोटो! पण एकदा बघून समाधान होत नाही !
अप्रतिम......होळीच्या दिवशी
अप्रतिम......होळीच्या दिवशी रंगाची अशी उधळण पाहायला मिळाली...वाह...
मस्त फोटो आहेत. सूंदर रंगांची
मस्त फोटो आहेत. सूंदर रंगांची उधळण, व्वा
धंन्यवाद
१० नं. च्या फोटोत किटक भक्षी वनस्पती आहेका ?
नसेलतर किटक भक्षी वनस्पतीचा क्लोजप टाकणार का?
शाळेतल्या पुस्तकाशिवाय कुठे पाहिली नाहिये.
सुधीर
जो, तिसर्या भागात तिचा क्लोज
जो, तिसर्या भागात तिचा क्लोज अप आहे.