सकाळचे नऊ वाजले होते. पक्या, टोनी ,खपल्या एका मागून एक आले आणि जग्गू भाई च्या रूम समोर चकरा मारू लागले. त्यांच्या चेह-यावर चिंतेचे भाव उमटले होते... तेवढ्यात जोरात दारावरची बेल वाजली आणि रामू नोकर पळत आला.. दरवाजा उघडून आत गेला त्या पाठोपाठ दरवाजा बंद झाला.. काही वेळाने तो बाहेर आला तसे तिघे हि उतावीळ होवून आत जाण्याचा प्रयत्न करू लागले...
" पांच मिनट रुकना पडेगा..भाई अभी बाथरूम गया है.."
" आरे पण भाई को बोला क्या आपुन रस्ता देखरेला है.. "
" बोला तो था. ..पण मुह में बराश था..ओ क्या बोले मेरेकू कूच समझा नही.."
"साला ये भी घोन्चू है..."
" क्या बोला...आपुन..."
" तुझ्या मायला ....आंख किसको दिखाता है..."
" देखो पक्या भाई, आपुन को गाली नही देनेका..."
"तेरी मा का...क्या बोला तू...क्या करेगा...क्या करेगा...?" असे म्हणून पक्याने रामूच्या पेच्कडत एक लात हाणली...तो विव्हळला ..या खेरीज तो दुसरे काय करणार होता...आखिर भाई चा नोकर होता.
" ये ये पक्या मायला येडा हो गया क्या..इसको बेचारे को कायकू मारता है.."
" साचीमे आपुन आज येडा हो गया है...एकदम येडा...देख तो इस्की ढुंगण मे दात निकाल गया है...पयले आपुन से बहुत डरता था..आज कल मजाक उडता है..भाई ना...साला कैसे मेरे कु इसके सामने डाटा था...आज आपुन ..."
"अबे चूप कर...एकदम चूप...कूच नही बोलणे का...आपुन भाई से बात करणे को आयेला है ना...बस..."
तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि नेहमी प्रमाणे रामू पळत आला..दर उघडून आत गेला आणि दरवाजा बंद झाला...दोन मिनिटात रामूने दार उघडले आणि त्या तिघाना हि उद्देशून म्हणाला, "आजा ओ...भाई बुला रहे है..." तसे तिघे हि आत घुसले आणि नेहमी प्रमाणे दरवाजा बंद झाला.
भाई आपल्या खुर्चीवर बसले होते..समोर पक्या, टोनी ,खपल्या उभे होते..
"बैठो..."भाई म्हणाला
"भाई आपुन यहा बैठने को नही आयेला है....तुम येडा हो गया क्या.?.कलब क्यो बंद करवाया..?... देखो भाई आपुन फिफ्टी फिफ्टी का मलिक है..तुम ऐसे बंद नही कर सकता..क्यो टोनी.."
" बराबर भाई...इससे तो आपुन रस्ते पर आयेगा...जो लोग सलाम करते थे.हंसी उडायंगे..."
"तुम्हारा ये..रामू ...ये भी देखाना कैसे जबान लड़ता है.."
" पक्या, आरे... मै डरता नहीं हूँ.. अत्यंत शांत स्वरात भाई म्हणाला. " अभी कुछ दिन तक किसी बिल में छुप जाओ...बिलकुल भायेर नै निकलनेका.. ये नया पुलिसवाला आया है...हालत ठीक होने पर मई तुमको खबर करूंगा... मेरे पर भरोसा है ना..." भाई बोला
"भाई, आपने बाप से भी ज्यादा भरोसा है..तभी तो छुप बैठेला है..."पक्क्या बोला.
पोलिस की नजर हमारी हर मुव्हमेंट पर है.. जब तक मई न कहू..कोई गड़बड़ी मत करना...”
भाईशी हात मिळवून
पक्या, टोनी ,खपल्या चालते झाले.
भाई नेहमी प्रमाणे बार मधून बाहेर पडला. भाई गाडीत बसणार तोच अचानक पोलिसांनी घेरले. भाई तर पहिल्यांदा घाबरला पण समोर नेहमीचा कोतवाल खाकरे त्याला सेल्युट करत होता. हे पाहून त्याचा विश्वास वाढला आणि तू म्हणाला, " ‘क्यों कोतवाल साहब, हमारी हैसियत तुम्हें नहीं मालूम? हमें गिरफ्तार करोगे, इतनी हिम्मत बढ़ गई है तुम्हारी?’ कोतवाल म्हणाला, “ भाई तूम्हारा कोई गैर समाज झालाय...मोठे साहेब म्हणतात कि तुमच्या जीवाला धोका आहे. म्हणून तुम्हाला झेड सुरक्षा दिली गेली पाहिजे...भाई, आम्ही तर तुमच्या सेवेसाठी आहोत. "
" बहोत अच्छा...साला तुम पोलीसवाला सोबत रहेगा..तो आपुन चोरी कैसे करेगा.. क्लब कैसे चलाएगा..?
" भाई, आम्ही आपलं काम करू, तुम्ही तुमचे काम करा..”
" मतलब ? " भाई ने तोंडात जमा झालेला गुट्ख्याचा चावा बाहर टाकत विचारले
" भाई, मतलब एकदम साफ़.. " भाई, आता सुरक्षितपणे तुम्ही तुमचे काम करायचे..आम्ही आमची ड्युटी करणार..."
इतक्यात भाई च्या मोबाईल ची रिंग वाजली...भाई ने मोबाईल उचलला आणि बोलू लागला.. " हाँ पक्क्या, बोल..नै रे येडा होगया क्या...देख अपने सब छोकरे लोगोंको वापस बुला..और आज से काम शुरू कर ...आपुन है ना..टेंशन नै लेने का... बाकी सब मै देखेगा.. आपुन अभी ज़िंदा है समझा....और ओ क्या बोला था? ...हाँ कल ग्यारा बजे दो चार इस्कूल के बच्चे लेके आझाद चोक में लेके आ..नै रे आन्दोलन को सपोट करने का है...सब मास्टर को चाय पानी के लिए को सौ-सौ रुपये दे देना..और बच्चोको केडबरी खिला देना..ओ बाद में देखेंगे..हाँ हाँ...साब दिल्ली में है....ओ क्या है ना लोकपाल... अब तक पता नहीं कोनसे बिल डाल के रखा था...चल इस चक्कर में मत पड़.. अभी चुनाव में बहुत टाइम है...चल रखता हूँ..."
तेवढ्यात एका गल्लीतून शंभर एक माणसांचा जत्था येताना दिसला... हा मोर्चा होता त्यांच्या हातात तिरंगी झेंडे आणि मोठ मोठे पोस्टर्स होते...त्यावर " महात्मा गाँधी अमर रहे", " भ्रष्टाचार नष्ट करा" "लोकपाल बिल पास झालेच पाहिजे" असे लिहिले होते. त्यानी डोक्यावर गाँधी टोप्या घातल्या होत्या...त्यावर "मी अन्ना हजारे" असे लिहिले होते. खाकरे ने भाई च्या हातात हात दिला...सर्व पुलिसवाले मोर्चा सांभाळन्या साठी निघाले. कारण आता त्यांची ड्यूटी चेंज झाली होती. भाई ने हसत हसत गाडी चालु केली आणि आपल्या रस्त्याने निघाले
साहेबराव इंगोले
औरंगाबाद
९०४९७६०५८२
वाचल्यानंतर सांगतो
वाचल्यानंतर सांगतो