'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
=======================================================================
=======================================================================
आधी ठरल्याप्रमाणे रविवारचा दिवस फक्त सिंधुदुर्ग किल्ला आणि देवबाग-तारकर्ली करावयाचे ठरले होते. पण कांदळगावापासुन जवळच आंगणेवाडी, बिळवस येथील जलमंदिर, मालवणातील जयगणेश मंदिर आणि खुद्द कांदळगावात असलेले श्री रामेश्वराचे मंदिर अशी ठिकाणे करून मग सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचे ठरले (या ठिकाणांचे प्रचि देवबाग-तारकर्लीच्या भागानंतर प्रदर्शित करेन. ).
सिंधुदुर्ग किल्ला:
मालवण शहरापासुन अगदी जवळच वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आत्मा आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी मालवण बंदरापासुन पुढे नावेतून जावे लागते. हा किल्ला ४ किमी एव्हढ्या अंतरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या भिंती ३५ ते ४० फूट उंच आहेत. किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या महाद्वाराजवळ येऊन थांबते.दर्यावर्दी, इंग्रज व पोर्तुगीज यांच्याशी यशस्वीपणे मुकाबला करावयाचा असेल तर आपली सत्ता समुद्रावर असणे आवश्यक आहे, हे जाणून शिवरायांनी सागरी किल्ला बांधण्याचा निश्चय केला. कुरटे गावचे बेट पाहून "चौर्यांशी बंदरी ऐसी जागा नाही" असे उद्गार त्यांनी काढले होते. किल्ल्याचे महाद्वार पूर्वेस आहे. किल्ल्याचा तट दोन्ही अंगाने आत वळतो. या दोन तटांच्यामधील भागातून वळणे घेत आत गेले कि समोर महादरवाजा दिसतो. प्रवेशद्वारी एक मारूतीची प्रतिमा आहे.तटाच्या आत आले की मुख्य रस्त्यावर राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी विकिपिडीयावर अधिक माहिती येथे वाचा.
(सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्यार्या नावेत ४० माणसे भरल्याशिवाय नेत नाही. एकतर तुमचा ग्रुप तेव्हढा मोठा असावा लागतो किंवा मग नाव पूर्ण भरेपर्यंत वाट बघावी लागते. जर तुम्हाला खाजगी बोट करून जायचे असेल तर माणशी ३५० द्यावे लागता, तेही जर ग्रुप ८-९जणांचा असेल तरच. अशी तिकिट ३८रूपये आहे. किल्ला बघावयास फक्त एकच तास देतात. एका तासाच्या आत किल्ला बघुन नावेत परतीच्या प्रवासासाठी एका तासाच्या आत या अशी ताकीदच नावेतुन उतरताना देतात. :रागः एका तासात संपूर्ण किल्ला बघणे/अनुभवने शक्य नाही त्यामुळे इतक्या कमी वेळेत जेव्हढा पाहुन घेता आला तितका किल्ला पाहुन घेतला.)
मालवण पाण्यामध्ये किल्ला, पाहुनी मनामध्ये भरला
प्रचि ०१
(कुठलाही फोटोशॉप इफेक्ट नाही (बॉर्डर आणि वॉटरमार्क सोडुन). लेन्सच्या पुढे गॉगल धरून, गॉगलचा फिल्टर असा उपयोग करून हा फोटो काढलाय. )
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २७ (अ)
सागरतळातील जीवसृष्टी जवळुन पाहण्याची संधी सिंधुदुर्गजवळ स्नॉर्केलिंग आणी स्कुबा डायव्हिंग द्वारे मिळते. कोकणसफरीत एकदा तरी याचा अवश्य अनुभव घ्यावा.
स्नॉर्केलिंग करताना पर्यटक
प्रचि २८
किल्ला बघुन झाल्यावर साळगावकरांच्या श्री जयगणेश मंदिरात जाऊन आलो. यानंतर सुरू झाली ती आमची खाद्यभ्रमंती. बर्याच जणांनी आवर्जुन उल्लेख केलेल्या "चैतन्य हॉटेल" मध्ये पापलेट, सुरमई, वडे सागोती, कोलंबी फ्राय, कोळंबी लोणचं अशा विविध पदार्थावर ताव मारून आम्हीही अगदी "चैतन्यमय" झालो.
चैतन्यमय प्रचि
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
यानंतर खरेदीसाठी मालवण बाजारात फेरफटका मारला. रविवार असल्याने बहुतेक सगळी दुकाने बंद होती (मालवणात खरेदी करावयाची असेल तर रविवार टाळुन करा. बहुतेक दुकाने रविवारी बंद असतात.). थोडीफार खरेदी करून आम्ही आमचा मोर्चा "देवबाग-तारकर्ली"कडे वळवला.
(क्रमशः)
Tula darveli vegala pratisad
Tula darveli vegala pratisad kay dyayacha ata. sundar pics
छानच प्र.चि.! दुर्गाच्या
छानच प्र.चि.!
दुर्गाच्या तटांची बर्यापैकी डागडुजी झालेली असावी असं प्र.चिं.पाहून तरी वाटतंय !
'चैतन्य'च्या ताटांची शान मात्र तशीच आहे, चवही अर्थात तशीच असेलच !!!
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
रम्य!!
रम्य!!:स्मित:
आकाशाची मस्त निळाई
आकाशाची मस्त निळाई
मस्त दुर्ग नि मस्त किनारा !
मस्त दुर्ग नि मस्त किनारा ! या सिंधुदुर्गाचा हेलिकॉप्टर मधून पण एक फोटो घ्यायला हवा होतास
लहानपणी प्रत्येक मे महिन्यात
लहानपणी प्रत्येक मे महिन्यात एक फेरी व्हायची या किल्ल्यात.
किल्ल्यातच आमचे काही नातलग, कायमस्वरुपी रहात असत. त्यावेळी एक तासाची वगैरे अट
असल्याचे आठवत नाही.
सुकतीच्या वेळी, जाणकार माणूस बरोबर असेल तर पायी किल्ल्यात जाता येते, असे वडील सांगत.
आई पण पायी गेल्याच्या आठवणी सांगते, मी मात्र नाही गेलो कधी.
तू राजकोटात गेला नाहीस ? माझ्या शेवटच्या भेटीत तिथे खुप प्रमाणात मासळी सुकवत ठेवल्याने
भयानक दुर्गंधी सुटलेली आढळली. तरीपण तिथला समुद्रकिनारा, धोकादायक असला तरी सुंदर आहे.
त्याकाळी पडके असलेले एक चर्च, आता नव्याने बांधलेले, गुगल अर्थ वर दिसतेय.
फोटो छानच आहेत. (आता ते परत परत काय लिहायचे ?)
मस्त फोटो! किनारा तर किती
मस्त फोटो! किनारा तर किती सुरेख आलाय फोटोत!
मी म्हणतोय तो हा भाग.
मी म्हणतोय तो हा भाग. ब्रम्हदेशाच्या राजाची का राणीची समाधी पण इथेच आहे.
राजकोटातून जाणे आता दुर्गंधीमूळे शक्य नसले तर मेढ्यातून एक पाणंद इथे जाते.
तिथेच चांभारणीची वेळ (किनारा) असा एक भाग आहे.
मस्त प्रचि मित्रा...
मस्त प्रचि मित्रा...
अरे...जबरदस्त फोटो..समुद्राचे
अरे...जबरदस्त फोटो..समुद्राचे नेहमीसारखेच सुरेख!
ते पापलेट काय यम्म्म्म्म्मी दिसतंय
मस्त मस्त मस्त.... आवडेश..
मस्त मस्त मस्त.... आवडेश..
मस्त सुरु आहे लेखमाला. पहिला
मस्त सुरु आहे लेखमाला.
पहिला फोटो पाहुनच प्रतिसादात टंकायचा प्रश्न मनात उमटला होताच पण लेगच तिथेच उत्तर लिहिलस.
मस्त आला आहे इफेक्ट.
<< सुकतीच्या वेळी, जाणकार
<< सुकतीच्या वेळी, जाणकार माणूस बरोबर असेल तर पायी किल्ल्यात जाता येते, असे वडील सांगत.>> मी पण हे ऐकलं होतं म्हणून हल्ली किल्ल्यात जाताना होडीवाल्याला विचारलं; किल्ल्याजवळ सुकतीच्यावेळीही चालत जातां येणार नाही एवढं पाणी हल्लीं असतंच, ही त्याने दिलेली माहिती. [पण चालत येऊन किल्ल्याच्या जवळच खडकावर बसलेलीं तरुण जोडपीं तिथं होतीच !! ]
<< या सिंधुदुर्गाचा हेलिकॉप्टर मधून पण एक फोटो घ्यायला हवा होतास >> हो, मग बोटवाल्याचा एक तासाचा निर्बंधही जाणवला नसता ! [ उद्धव ठाकरेंच्या दुर्गांच्या 'एरियल' फोटो प्रदर्शनात असा फार सुंदर फोटो होता सिंधुदुर्गाचा ! ]
हो भाऊ, मालवणची किनारपट्टीही
हो भाऊ, मालवणची किनारपट्टीही मला आता आटल्यासारखी वाटतेय. हा सगळा
भाग माझ्या चांगल्याच परिचयाचा होता.
(सिंधुदुर्ग किल्ल्यात
(सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्यार्या नावेत ४० माणसे भरल्याशिवाय नेत नाही. एकतर तुमचा ग्रुप तेव्हढा मोठा असावा लागतो किंवा मग नाव पूर्ण भरेपर्यंत वाट बघावी लागते. जर तुम्हाला खाजगी बोट करून जायचे असेल तर माणशी ३५० द्यावे लागता, तेही जर ग्रुप ८-९जणांचा असेल तरच. अशी तिकिट ३८रूपये आहे. किल्ला बघावयास फक्त एकच तास देतात. एका तासाच्या आत किल्ला बघुन नावेत परतीच्या प्रवासासाठी एका तासाच्या आत या अशी ताकीदच नावेतुन उतरताना देतात. :रागः एका तासात संपूर्ण किल्ला बघणे/अनुभवने शक्य नाही त्यामुळे इतक्या कमी वेळेत जेव्हढा पाहुन घेता आला तितका किल्ला पाहुन घेतला.)
>>>> जिप्सीमित्रा - अरे मी तुला सांगीतले होते की स्नोर्केलिंग व मालवण किल्ला अशी बोट ठरवून घे, म्हणजे १ तासाचे लिमीट वाढवता येइल. मालवण किल्ल्यावर सरकारी बोटीने वन्-वे जायचे. तेथे २ तास घालवायचे मग दुसरी खाजगी बोट स्नोर्केलिंगसाठी न्यायला येते. स्नोर्केलिंगच्या पैशात बोटीचेही पैसे घेतात. असो. सर्व प्रचि उत्तम. मी नोस्टॅल्जीक झालोय.
<< मी नोस्टॅल्जीक झालोय.>>
<< मी नोस्टॅल्जीक झालोय.>> वरच्या बर्याच प्रतिसादांत, माझा धरून, हें तर ओथंबलेलंच दिसतंय!
फोटो नेहमीप्रमाणे.........
फोटो नेहमीप्रमाणे.........
छानच !!!
सुंदर जिप्सि मी माझ्या
सुंदर जिप्सि मी माझ्या मैत्रिंणीबरोबर गेले तेव्हा अशी काही टाईमलिमिट न्हवती आंम्ही मस्तपैकी सकाळी गेलो होतो नि ४-५ च्या सुमारास परत आलो होतो. एका होडीतुन आम्ही ५ जणीच होतो आता बरेच पर्यटक वाढल्याने हे वेळेचे बंधन असेल. किल्ल्याच्या जवळ येईपर्यत तेथील प्रवेशद्वार समजत नाहि. अजुन एक आकर्षण म्हणजे एका माडाच्या अर्ध्या भागातुन त्याच माडाला दुसरा माडाचा भाग होता नि दोघेहि समसमान उंच वाढले होते. मालवणच्या किनार्यावर संध्याकाळी फार छान वाटते. सुर्यास्त तर अजुन छान वाटतो.
आहाहा मस्त( आणी इतर सर्व
आहाहा मस्त( आणी इतर सर्व तारीफेकाबिल विशेषणे इमॅजिन करून घे ) फोटोज..
तो गॉगल लेन्स समोर धरून काढलेला तर अप्रतिम दिसतोय..
जिप्स्या मासे खाताना थोडा घास
जिप्स्या मासे खाताना थोडा घास बाजूला टाकलास ना ?
फ्रेश वाटल एकदम फोटो पाहून.
'गॉगल' इफेक्ट मस्त आलाय
'गॉगल' इफेक्ट मस्त आलाय
'त्या' नारळाच्या झाडाचा फोटो नाही काढलास मित्रा ? (किल्ल्यात एक इंग्रजी 'वाय' आकाराचे झाड आहे. एका नारळाच्या झाडाच्या मध्यातून अजून एक नारळाचे झाड बांडगूळासारखे उगवलंय आणि दोन्ही झाडांना व्यवस्थित भरपूर नारळ लागतात)
झकास फोटो. (खरच, आता प्रत्येक
झकास फोटो. (खरच, आता प्रत्येक वेळी प्रतिसाद काय द्यायचा हा प्रश्नच आहे. )
अजुन एक आकर्षण म्हणजे एका माडाच्या अर्ध्या भागातुन त्याच माडाला दुसरा माडाचा भाग होता नि दोघेहि समसमान उंच वाढले होते>>>>मी पाहिला होता तो माड. माझ्याकडे फोटोही असेल.
वीज पडून जळला, तोच ना तो माड?
आता तो माड नाहिये तिथे.
आता तो माड नाहिये तिथे.
मस्त रे. गॉगल इफेक्ट लै भारी
मस्त रे.
गॉगल इफेक्ट लै भारी
मस्त प्रचि
मस्त प्रचि
गॉगल इफेक्ट लै भारी <<
गॉगल इफेक्ट लै भारी << +++१
जिप्या सिंधुदुर्ग च्या समोर पद्मदुर्ग किल्ला आहे तर किनार्यावर राजकोट आणि जवळच सर्जेकोट हे किल्ले आहेत.
चैतन्य मधील जेवण तर एक नंबरच
माणूस बरोबर असेल तर पायी किल्ल्यात जाता येते, असे वडील सांगत.<<<<
मालवणची किनारपट्टीही मला आता आटल्यासारखी वाटतेय. हा सगळा<<
दिनेशजी , तिथल्या कोळी लोकांना या बद्द्ल आम्ही विचारणा केली होती तेव्हा त्यांनी सांगितले की सुनामीच्या वेळॅस तिथला वाळूचा भराव वाहून गेला
पद्मदुर्ग आणि सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरुन घेतलेला...
सर्जेकोट - तटबंदी
स_सा, मस्त फोटो.
स_सा, मस्त फोटो.
मस्त फोटो. (अजून काय
मस्त फोटो. (अजून काय लिहिणार?)
ओह, मग बरोबर. राजकोट वर तसे
ओह, मग बरोबर.
राजकोट वर तसे काही बघायला नाही (महापुरुषाची घुमटी आणि डोलकाठी आहे फक्त) पण तिथे गोडे पाणी नाही.
किल्यासमोरचा समुद्र उथळ होता आणि राजकोटामूळे लाटाही अडायच्या.
Pages