'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"

Submitted by जिप्सी on 4 March, 2012 - 09:56

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा

=======================================================================
=======================================================================
आधी ठरल्याप्रमाणे रविवारचा दिवस फक्त सिंधुदुर्ग किल्ला आणि देवबाग-तारकर्ली करावयाचे ठरले होते. पण कांदळगावापासुन जवळच आंगणेवाडी, बिळवस येथील जलमंदिर, मालवणातील जयगणेश मंदिर आणि खुद्द कांदळगावात असलेले श्री रामेश्वराचे मंदिर अशी ठिकाणे करून मग सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचे ठरले (या ठिकाणांचे प्रचि देवबाग-तारकर्लीच्या भागानंतर प्रदर्शित करेन. Happy ).

सिंधुदुर्ग किल्ला:
मालवण शहरापासुन अगदी जवळच वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आत्मा आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी मालवण बंदरापासुन पुढे नावेतून जावे लागते. हा किल्ला ४ किमी एव्हढ्या अंतरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या भिंती ३५ ते ४० फूट उंच आहेत. किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या महाद्वाराजवळ येऊन थांबते.दर्यावर्दी, इंग्रज व पोर्तुगीज यांच्याशी यशस्वीपणे मुकाबला करावयाचा असेल तर आपली सत्ता समुद्रावर असणे आवश्यक आहे, हे जाणून शिवरायांनी सागरी किल्ला बांधण्याचा निश्चय केला. कुरटे गावचे बेट पाहून "चौर्‍यांशी बंदरी ऐसी जागा नाही" असे उद्गार त्यांनी काढले होते. किल्ल्याचे महाद्वार पूर्वेस आहे. किल्ल्याचा तट दोन्ही अंगाने आत वळतो. या दोन तटांच्यामधील भागातून वळणे घेत आत गेले कि समोर महादरवाजा दिसतो. प्रवेशद्वारी एक मारूतीची प्रतिमा आहे.तटाच्या आत आले की मुख्य रस्त्यावर राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी विकिपिडीयावर अधिक माहिती येथे वाचा.

(सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्यार्‍या नावेत ४० माणसे भरल्याशिवाय नेत नाही. एकतर तुमचा ग्रुप तेव्हढा मोठा असावा लागतो किंवा मग नाव पूर्ण भरेपर्यंत वाट बघावी लागते. Sad जर तुम्हाला खाजगी बोट करून जायचे असेल तर माणशी ३५० द्यावे लागता, तेही जर ग्रुप ८-९जणांचा असेल तरच. अशी तिकिट ३८रूपये आहे. किल्ला बघावयास फक्त एकच तास देतात. एका तासाच्या आत किल्ला बघुन नावेत परतीच्या प्रवासासाठी एका तासाच्या आत या अशी ताकीदच नावेतुन उतरताना देतात. :रागः एका तासात संपूर्ण किल्ला बघणे/अनुभवने शक्य नाही त्यामुळे इतक्या कमी वेळेत जेव्हढा पाहुन घेता आला तितका किल्ला पाहुन घेतला.)

मालवण पाण्यामध्ये किल्ला, पाहुनी मनामध्ये भरला
प्रचि ०१

(कुठलाही फोटोशॉप इफेक्ट नाही (बॉर्डर आणि वॉटरमार्क सोडुन). लेन्सच्या पुढे गॉगल धरून, गॉगलचा फिल्टर असा उपयोग करून हा फोटो काढलाय. Happy )

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २७ (अ)

सागरतळातील जीवसृष्टी जवळुन पाहण्याची संधी सिंधुदुर्गजवळ स्नॉर्केलिंग आणी स्कुबा डायव्हिंग द्वारे मिळते. कोकणसफरीत एकदा तरी याचा अवश्य अनुभव घ्यावा. Happy
स्नॉर्केलिंग करताना पर्यटक
प्रचि २८

किल्ला बघुन झाल्यावर साळगावकरांच्या श्री जयगणेश मंदिरात जाऊन आलो. यानंतर सुरू झाली ती आमची खाद्यभ्रमंती. Happy बर्‍याच जणांनी आवर्जुन उल्लेख केलेल्या "चैतन्य हॉटेल" मध्ये पापलेट, सुरमई, वडे सागोती, कोलंबी फ्राय, कोळंबी लोणचं अशा विविध पदार्थावर ताव मारून आम्हीही अगदी "चैतन्यमय" झालो. Proud

चैतन्यमय प्रचि Wink
प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

यानंतर खरेदीसाठी मालवण बाजारात फेरफटका मारला. रविवार असल्याने बहुतेक सगळी दुकाने बंद होती (मालवणात खरेदी करावयाची असेल तर रविवार टाळुन करा. बहुतेक दुकाने रविवारी बंद असतात.). थोडीफार खरेदी करून आम्ही आमचा मोर्चा "देवबाग-तारकर्ली"कडे वळवला.

(क्रमशः)

गुलमोहर: 

जिप्सी मस्तच फोटो.
माणूस बरोबर असेल तर पायी किल्ल्यात जाता येते, असे वडील सांगत>>
शिवाजी माहाराजांच्या मंदिराच्या समोरच घर माझ्या आत्याच आहे. ते सगळे मालवणला रहातात पण गणपतीला किल्ल्यावर, आताच माहीत नाही पण जवळ जवळ १० - १५ वर्षांपुर्वी किल्ल्यावर जायला पावसात बोट नसायची. आत्याच एक घर मालवण किनार पट्टीवरच आहे. ओहोटी आली की आम्ही तिथुन चालत चालत वेळेवरुन (वाळुची लांब पट्टी जी समुद्र्किनारा पद्मगडाला जोडते) पद्मगडावर जायचो. किल्ल्यावरचे काही लोक दगडांवार उड्या मारुन मध्येच पोहुन जायचेत. तोपर्यंत आमच्यासाठी काका किल्यावर एका विशिष्ठ पद्धतीने साद द्यायचेत. मग किल्ल्यावरुन त्यांची छोटिशी बोट यायची. त्यात पाय वगैरे आखडुन नावीक धरुन चार लोक बसायचेत. वर पाउस आणी खाली खवळलेला समुद्र अशा परिस्थीतीत आम्ही (म्हणजे मीच) जिव मुठीत घेउन कसेबसे किल्ल्यावर पोचायचोत. कित्येक वेळा समुद्र खवळलेला असल्याने विसर्जन झाल तरीतिथेच रहाव लागायच समुद्राची प्रर्थना करत.
गणपतीत मात्र एकदम धमाल असायची. मोजुन १०-१२ घर आहेत किल्ल्यावर. बहुतेकजण मुंबईला. खुप लोक यायचीत. मग सगळ्यांकडे सगळे आरतीला जायचेत. सगळे मंदिरात मीळुन गऔरी जागरण करायचेत.
खुप खुप आठवणी आहेत. जिप्सी धन्यावाद फोटो शेअर केल्याबद्दल.
ह आणखी एक गोष्ट चैतन्य च चैतन्यमय जेवण जेवायला आता मालवणला जायची गरज नाही. सुरेखामावशीने (चैतन्यची मालकीण हो) दादर शिवसेना भवन समोर आउटलेट ओपन केल आहे. तिकडेपण जाउन आस्वाद घेउ शकता. (पण त्या चवीसाठी मालवणचा मासा आणि पाणी पण लागत ना Uhoh

वाह, सुंदर. सिंधुदुर्ग दर्शनावर कालमर्यादा आहे आत्ता हे ऐकून वाइट वाटले. बाकी पापलेट सुरेखच. Happy

रीमा, हो पावसाळ्यात किल्ल्यावर जायला बोट नसायची. पण काही जिगरबाज लोक
(त्यात बायकाही असत) एकट्याने होडी वल्ल्व्हत किल्ल्यात जात.
किल्यात बाकी सगळ्या सोयी असल्या तरी स्मशान नव्हते. तसेच तिथली थोडीफार
शेती असायची ती कुदळीने करत. राजांच्या भूमीवर नांगर चालवायचा नाही, असा
संकेत आहे.
(राजवाड्यात भाकरी करायची नाही, असाही संकेत आहे.)

जिप्स्या पहिला प्रयोग भन्नाट आहे.

आता ते दोन फांद्या असलेले नारळाचे झाड नाहिये का किल्ल्यावर? म्हणजे मी पण ते वीज पडून गेल्यावरच बघितले होते. आता कदाचीत पडून गेले असावे.

तसेच तिथली थोडीफार
शेती असायची ती कुदळीने करत.>
सर्‍हास मुळ्याची शेती करतात.

त्या उड्या मारुन जायच्या प्रकारात खुप लोकांनी जिव पण गमवला आहे. अगदी नेहमी येणार्‍या जाणार्‍यांनी पण. खरतर तेवढ्या भागातला समुद्र खडकाळ आहे.

बाकी किल्ल्यातही खुप भटकायचो आम्ही. मध्ये मध्ये तटबंदी तुटलेली आहे. पण कमाल आहे मोठ्ठे मोठ्ठे दगड वापरुन कसा बांधला आहे ना किल्ला. तिथे रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

जिप्स्या - अरे अतिथी बांबू मध्ये गेलेला का...इथे पण बांगडा, पापलेट, सुरमई अप्रतिम मिळते. आणि घसघशीत...च्यायला सुरमई प्लेट संपवताना नाकी नऊ आले...

<< जिप्स्या - अरे अतिथी बांबू मध्ये गेलेला का...>> मालवणमधल्या बर्‍याच हॉटेलांत/ खाणावळींत मी जेवलों आहे. त्याना अजिबात कमी न लेखतां, माझं खरं मत सांगू ? कुठल्याही मालवण्याच्या घरीं किंवा, शक्य नसेल तर, हल्ली देवबागसारख्या ठीकाणी बर्‍याच रहाण्या-जेवणाच्या घरगुती सोई झाल्या आहेत तिथं ,त्या वातावरणात साधंसुधं माशांचं जेवण जेवणं याची लज्जतच वेगळी !!

त्या वातावरणात साधंसुधं माशांचं जेवण जेवणं याची लज्जतच वेगळी !!>>>>>>भाऊकाकांना १०० मोदक Happy निवतीला याचा प्रत्यय आला. Happy

<< भाऊकाकांना १०० मोदक >> निदान "मोदकां" तरी म्हणायचं [ मोदकं = छोटे, चकचकीत, स्वच्छ व चविष्ट मासे ] Wink

जिप्सी, आता सगळे भाग वाचून काढले. (रात्रीचे १२.३० वाजलेत.) कारण कोकणावरील लेखमाला अर्धवट सोडताच येत नाही ना !
गेल्या वर्षीच्या सर्व आठवणी एकदम जाग्या झाल्या.
अप्रतिम!

Pages