एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>राधाच्या वडिलांचा आणि आत्याचा, राधाला जेवण करता येत नसल्याबद्दलचा आणि मग राधाचा वडिलांसोबतचा प्रसंगही छान होते.

अनुमोदन भरत. मला राधा आणि तिच्या वडिलांचे प्रसंग जेव्हढे पाहिलेत तेव्हढे जवळजवळ सगळेच आवडलेत. नेहमी आई-मुलांचं नातं दाखवलं जातं. आई नसलेल्या ह्या कुटुंबात वडिल आणि मुलगी ह्यांच्यात छान नातं दाखवलंय.

कालचा पा.पु. वाल्या भैय्याचा प्रसंग जाम धमाल. मी प्रोमोज बघुनच उत्सफुर्त पणे हसले. राधा भैय्याच्या हातावर हॅन्ड सॅनिटायझर घालते, भैय्या म्हणतो, साब ये क्या है? घना म्हणतो, हात धोनेकी दवा. राधा म्हणते, अब पोछ डालो, तर तो त्याच्या कळक्कट फडक्याला हात पुसुन टाकतो. साधाच प्रसंग, पण मला जरा अतिच हसु आले.

कालचा एक तासाचा भाग फारच छान होता. राधाचे वडील काय बेस्ट आहेत आणि संवाद फार सुरेख होते कालचे. घनाची आत्या ज्या प्रकारे राधाच्या स्वभावाचं विश्लेषण करते, राधाचे वडील आणि आत्या ह्यांच्यामधील आणि नंतर राधा कणिक मळतानाचा, पत्रिकेवर आत्याचं नाव घालण्याबाबतचा, पाणीपुरी प्रसंग सगळेच अतिशय वास्तववादी. स्वप्नीलच काम फार सहज वाटतंय ह्या मालिकेत. राधा, घना दोघेही आवडले Happy

ह्या मालिकेतली माणसं खरी वाटतात. संवादही उगाच शब्दबंबाळ नाहीत किंवा ढणाणा बॅकग्राऊन्ड म्युझिक नाही. एक तास पहायलासुध्दा काहीही वाटत नाही. राजवाडे, आता तुमच्या शिरस्त्याप्रमाणे ह्याचा शेवटी विचका करू नका प्लीज.

स्वप्ना_राज --> + १
आपल्या घरी खरेच घडणारे प्रसन्ग छान आणि हलक्या-फुलक्या पद्धतीने दाखवलेत.. Happy

भरत Happy

कालचा भाग खुप आवडला. विनय आपटेकडे बघुन अजुन काही वर्षात माझेही असेच होणार म्हणत त्याच्या दु:खात सहभागी असल्यासारखे वाटले. कुहूने मात्र नेहमीसारखे डोके फिरवले.

कुहूने मात्र नेहमीसारखे डोके फिरवले.>>>का ग्????मला तर ती आवडते,,,लाऊड करते माहित आहे तरीही
ती जेव्हा म्हण्ते मला कधी कोण वहीनी म्ह्णेन तेव्हा राधाच्या चेहर्यावरचे भाव एक नंबर Happy

ते तर आहे गं.. सध्या तिचा प्रयत्न चाललाय की कसेही करुन गाडी तिच्या लग्नाच्या वळणावर आणायची.. नंतर राधा म्हणते की 'हे आताच झाले की आधीपासुन आहे?' तर कुहू म्हणते की अगदी बालपणापासुनच आहे.. '

आजी आणि घनाची आई राधाला प्रवास कसा झाला ते विचारतात, नीट झाला म्हटल्यावर त्यांचा अपेक्षाभंग आणि गाडी बंद पडल्याचे कळल्यावर हसतात, हा विनोदाचा प्रयत्न केविलवाणा वाटला.

एवढ्या मोठ्या काळे कुटुंबाचा चरितार्थ कसा चालतो? खिचडीतल्या पारिख परिवारासारखा त्यांना अचानक धनलाभ झाला होता का? दोन्ही काका काही करत नाहीत. घनाचे वडील निवृत्त. घना ऑफिसला कधी जातो?
सुप्रिया काकूं मराठीतल्या तरला दलाल असतील का?

हे आताच झाले की आधीपासुन आहे?' तर कुहू म्हणते की अगदी बालपणापासुनच आहे..>>>तो ही भारी डाय्लोग होता..मी लहानप्णापासुन आहे अशीच Lol राधाला वाट्ल असेल काय Lol

इला भाटेचं टिपीकल वाक्य प्रत्येक एपिसोड मधे असतंच "....... अगंबाई मी कोण बोलतेय ते सांगायचेच राहिलं, मी देवकी बोलतेय, घनाची आई"
अगदीच वेंधळेपणा ! Proud

मुग्धानंद - १०००० मोदक. पा. पु. प्रसंगाला मी पण जाम हसले. Happy
स्वप्ना - मनातलं बोललीस. आपल्या घरी हे घडतंय इतकी जवळची कहाणी वाटते. Happy
भरत - इतका विचार नका हो करु. घना कमावतोय ना - घरी कायम असला तरी. Wink आणि बाकीचे पण कायम कुठे घरी असतात. कधी कधी गायब असतात ना. सो तेव्हा ते कामावर गेले आहेत आणि तिथून पैसे कमावून मटार घेऊन येतात असं समजून घ्यायचं. Happy

आजच्या एपिसोड मधला राधा चा कुडता पाहिलात का?
'गुन्तता....' मध्ये असाच कुडता म्रुणाल नी घातला होता.
तोच तर नसेल? Happy
एकाच प्रोडक्शन हाउस च्या मालिका आहेत का दोन्ही?
- सुरुचि

कुहू डोक्यात जात असली तरी मला हल्ली आवडायला लागली आहे.ती जेव्हा "आता ना मी पोळ्या, पोळ्या नको पुरणाच्याच पोळ्या करते.कुठंय पुरण?" म्ह्णून स्वयंपाक घरातली कपाटे धुंडाळायला लागते, तो प्रसंग भारी होता.

होहो कुहु डोक्यात जाते. Happy

कालच्या भागात सुकन्याकाकु संवाद म्हणताना आपटेंच्या डोक्यापाशी, अगदी जवळ उदबत्ती घेऊन होत्या. तो प्रसंग संपेपर्यंत माझा जीव खालीवर होत होता की आता चटका बसणार Lol

एक काका कायम मोबाइलवर काय बोलत असतात? त्यांना मोबाईलचे एवढे वेड का आहे?? >>>>>>>>>>ते बेटींग (?) करत असतात ना तेपण बायकोला न कळून देता.

स्वप्निल जरा रोमँटिक वगैरे व्हायला लागलाय की काय?
आय विल मिस यु राधा.... Proud
... मग तू माझ्या बेडरूम मधे ये" धस्स्च झालं ऐकून Happy पण काहीतरी वेगळंच निघालं. Proud

राधाला तो कुर्ता मस्त दिसत होता नेहमीच्या मिस मॅच कॉम्बि पेक्षा ....

मस्त आहेत पण एकेक फॅमिली मेंबर

>>>मस्त आहेत पण एकेक फॅमिली में>>>अगदी नग आहेत सगळे. Happy
घनाचे बाबा - काय पण पोर्ट्रेट काढून घ्यायचंय त्यांना. वाघ, ऐटदार मिशा-बिशा. Rofl
कालच्या एपिसोड्मधे सुप्रिया काकूचं पण काम आवडलं मला. घना-राधा टायमिंग तर मस्तच आहे. Happy

<<आजच्या एपिसोड मधला राधा चा कुडता पाहिलात का?
'गुन्तता....' मध्ये असाच कुडता म्रुणाल नी घातला होता.
तोच तर नसेल? >>.... तरीच....मला वाटत होत, हा कुर्ता पाहिलाय कुठेतरी!! Happy

"आता ना मी पोळ्या, पोळ्या नको पुरणाच्याच पोळ्या करते.कुठंय पुरण?" म्ह्णून स्वयंपाक घरातली कपाटे धुंडाळायला लागते>>> Rofl
हा भाग रविवारी नक्कीच बघेन मी.

<<आता ना मी पोळ्या, पोळ्या नको पुरणाच्याच पोळ्या करते.कुठंय पुरण?" >>

हा प्रसंग बराच आधी येऊन गेलाय. या आठवड्यातला नाही.

कालचा 'वर्ग चुकलेला विद्यार्थी' प्रकार छान होता.

"आता ना मी पोळ्या, पोळ्या नको पुरणाच्याच पोळ्या करते.कुठंय पुरण?" म्ह्णून स्वयंपाक घरातली कपाटे धुंडाळायला लागते>>>
हा भाग रविवारी नक्कीच बघेन मी.>>>>>>>>>>><< मस्त होता तो भाग. मलापण आवडते कुहू. नाव पण तिला शोभेल असं Happy
कालचा आणि परवाचा भाग मला जाम आवडला.

तो पुरणपोळ्यावाला सिन खरेच झकास होता. त्याआधी, कुहू आत्याकडे जाऊन मला लोक मोठी समज्त नाही म्हणुन रडायला लागते तेव्हा आत्या तिला 'अगं मोठ्यासारखं वाग म्हणजे लोक समजतील मोठी' हा सल्ला देते. सल्ला लगेच मनावर घेऊन ती सैपाकघरात घुसते/

सध्या झीवर उंच झोका आणि लग्नाची गोष्ट दोन्ही मालिका छान आहेत.
BTW
'उंच माझा झोका' वर नवीन धागा चालू झालाय का? रमाबाई रानड्यांच्या जीवनावर आधारित मालिका आहे.

Pages