एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नात आमची माणसं जास्त म्हणून आम्ही जास्त खर्च करणार असं नवर्‍यामुलाकडची मंडळी म्हणतात? ऐकावं ते नवलच.

चांगलय की अशा प्रकारचे दाखवलेले. Wink
बाकी नाट्यमय दकियानुसी थयथयाट काय कमी आहेत इतर सिरीयलींमध्ये?

परवाच्या भागात पाहिलं का? सारे घरे बदल डालेंगे...उशीके अभ्रे......
-------
भांडणाचे कारण हेच असेल असा अंदाज होता.

रादर मला तरी असं वाटतंय की दाखवा अजून हे असं, निदान प्रबोधन तरी होईल. तेच तेच मुलीच्या वडिलांच्या पिळवणूकीचं चित्रण किती दाखवायचं?. किमान पक्षी एखाद्या वरपित्या/ मातेला जरी हे बघून बदलता आलं तर बरच आहे की.

परवाच्या भागात पाहिलं का? सारे घरे बदल डालेंगे...उशीके अभ्रे....>> ते ठिक होतं हो. सगळ्या अभ्र्यांचा आणि चादरींचा माझ्यासारखा एक लोड करत असतील. तेव्हा सगळे एकत्रच बदलणार ना? Wink

हो ग रैना..पण किती ते गुर्‍हाळ?? Happy

अरे पण शेवटी काय झाले? काल माझी सुरवात मिसली,. शेवट पाहिला तेव्हा साड्यानिवड चाललेली...

माझ्या मते हे कथानक मुंबईतलेच आहे...
मागे जेव्हा राधा घनश्याम एकमेकांना साखरपुड्या बद्दल सांगत असतात ना...
अ... एकमेकांना राग येईल म्हणून जरा बिचकतच...
हा त्या एपिसोड ला ते दोघं समोर समोर असताना मागून 'बेस्ट' जाताना दिसली..
शिवाय मुंबई सोडून सगळी कडे टम टम (नक्की नाही माहित.. माझ्या पुण्याच्या मैत्रिणी हेच बोलतात )
किवा तत्सम ६ जन बसतील अशीच गाडी असते..
Happy

साधना, घनाने राधाच्या वडिलांची अन राधाने घनाच्या वडिलांची समजून घालायची ठरवली. दोघे दुसर्‍याच्या घरी गेले. वडिल लोकांशी विषय काढला, तर दोघांनीही, छे छे म्हणत ६१ /७३ आकड्यांचा पाढा वाचून असं काही नाही, लग्न अजिबात मोडलेलं नाही हे सांगितलं Happy अन शेवटी होना करता करता ६०-४० वर तोडगा निघाला. त्यातही १०% विनय आपटे कडे उधार आहेतच हो Happy
पण मला कळलं नाही कालचा भाग एक तास का होता? साड्यांच्या एखाद्या दुकानाने स्पॉन्सर केला होता की काय अशी मला जरा शंका आली. पण दुकानाचे नाव आले नाही . मग शंका आली की बहुदा कोणत्यातरी चहावाल्याने स्पॉन्सर केला सेल. पण त्याचेही नाव नाही. मी जरा बुचकळ्यातच पडले Uhoh मग लक्षात आले. पुढच्या वेळेत जी सिरियल दाखवायची तीची "रिळ" आली नसावीत अन ह्याची "रिळं" असतील उपलब्ध Wink
रैना, दिपाली खर तुमचं, पण मग जरा धीट पणानं दाखवायचं ना, हे फारच फुळकवणी झालं ना ? बहुदा राधाने पाणि जास्त घातलं असावं Wink

पण मला कळलं नाही कालचा भाग एक तास का होता

८ वाजताच्या मालिकेचा अकाली मृत्यू घडवुन आणला (टिआरपी खुपच घसरले होते बहुतेक) आणि नविन मालिका सोमवारपासुन सुरू. मग ८-८.३० काय उद्योग? तर पुढची मालिका दाखवा १ तासाची (तसाही तिचा टिआरपी वाढलाय सध्या Happy )

अवल धन्स गं. मला काय तोडगा काढला त्याची उत्सुकता होती Happy

परवा बागेतल्या सिनमध्ये लग्न आधीच दोनदा मोडणारी राधा जेव्हा घना ठिक आहे लग्न मोडुया म्हणतो तेव्हा लगेच मला कुठे मोडायचेय लग्न म्हणते. Happy

विनोदी मालिकेत मुलाकडची माणसं आमची माणसं जास्त म्हणून आम्ही खर्च जास्त करणार वगैरे म्हणतात असं दाखवल्याने कितपत समाजप्रबोधन होईल ह्याची मला शंका वाटते. 'कायतरी दाखवतात झालं' असं म्हणून लोक हसून सोडून द्यायचीच शक्यता जास्त. त्यासाठी विनोदाचा (आणि थोडा फार्सिकल) बाज सोडून हे डिस्कशन थोडं गंभीरपणाने यायला हवं होतं. कदाचित घनाच्या आईवडिलांच्या तोंडी हेही उल्लेख यायला हवे होते की सर्वसामान्य मुलाचे आईवडिल वागतात तसं आम्ही वागणार नाही कारण ते आम्हाला पटत नाही. मध्ये एकदा घनाची आई ७ च्या सिरियलमध्ये, 'दिल्या घरी' मध्ये, गेस्ट म्हणून दाखवली होती. तेव्हा ती त्या कांताला (वृंदाची सासू) ठणकावून सांगते की मी माझ्या मुलाला त्याच्या पसंतीचीच बायको करणार, माझी निवड त्याच्यावर लादणार नाही. समाजप्रबोधन करायचं हा हेतू असेल तर ते असं स्पष्टपणे यायला हवं. पण पूर्ण मालिका विनोदीच करणार ह्या हट्टापायी ही संधी हुकलीच.

मला तर कालचा एपिसोड आवडला..साडी खरेदीचा आनि घना आनि त्याच्या काकाच्या साडी खरेदीवरच्या कमेंट चा...जे काही ते दोघ बोललेत ६०% खर आहे Happy

कालचा सुगरण काकू आणि राधामधला संवाद जाम आवडला. विशेषतः काकूचं मीठ-साखरेचं उदाहरण आणि राधाने दिलेलं खोडरबराचं उदाहरण. असली समजूतदार माणसं असतील तर कोणीही मुलगी हसतहसत ह्या संयुक्त कुटुंबात जाईल. पण ह्या सोन्याच्या वीटा लंकेत आहेत. Proud बाकी चहाचं प्रकरण पहाता चिमणरावांच्या मैनेची मैत्रिण आठवली.

घनाची आई राधाच्या बाबांबरोबर बोलायला कायम ज्यादा उत्साही असते असं मलाच वाटतं का? Uhoh राधाची आत्या मात्र उगाचच 'हमारे इन्दोरमे इससे ज्यादा अच्छी साडिया मिलती है' वगैरे मराठी अ‍ॅक्सेन्ट मधलं हिंदी बोलत काड्या टाकत होती. 'मग तिथनंच आणा ना' हे जगातल्या कुठल्याही कलियुगकालीन (म्हणजे सीता, अहिल्या वगैरे अतिसहनशील बाया आऊट!) स्त्रीच्या जिभेच्या टोकावर येईल ते वाक्य तिथली एकही बाई बोलत नाही हे केवळ ही सिरियल विनोदी आहे म्हणूनच.

रच्याकने, आत्याबाई स्वतःची साडी इंदोरहून घेऊन आल्या होत्या का काय? मस्त होती. हे वाक्य राजवाडे-मांडलेकर द्वयीने वाचल्यास पुलंच्या नानू सरंजामेसारखा त्यांचा चेहेरा व्हायचा. Proud

मटार बहुतेक ह्या सिरियलमधून गायब होऊन 'आभास हा' मध्ये गेलेत. काल आर्या टोपलीभर मटार सोलत होती.

मटार बहुतेक ह्या सिरियलमधून गायब होऊन 'आभास हा' मध्ये गेलेत. काल आर्या टोपलीभर मटार सोलत होती.>>>:हाहा: एकच नंबर

मटार बहुतेक ह्या सिरियलमधून गायब होऊन 'आभास हा' मध्ये गेलेत. >>मटार हे आजचे आघाडीचे कलाकार असल्यामुळे त्यांना एकाच वेळी अनेक मालिकांत कामे करावी लागतात. 'हिरवे' दिसण्याची भूमिका ते अतिशय सुंदर करतात.

मटार हे आजचे आघाडीचे कलाकार असल्यामुळे त्यांना एकाच वेळी अनेक मालिकांत कामे करावी लागतात. 'हिरवे' दिसण्याची भूमिका ते अतिशय सुंदर करतात.

>>> Rofl

मटार हे आजचे आघाडीचे कलाकार असल्यामुळे त्यांना एकाच वेळी अनेक मालिकांत कामे करावी लागतात>>>स्वस्त झालेत का मटार..प्रत्येक सिरीयल मधे दाखवत असतात Happy

मला असं वाटतं की झी मराठीचे लोक स्वस्तात अनेक किलो मटार घेत असतील आणि ७ ते ९ च्या सगळ्या सिरियलमध्ये फिरवून त्यातल्या स्त्री पात्रांकडून फुकटात सोलून घेत असतील.

दिग्दर्शकः कट कट, अहो असे सोलतात का मटार?
नटी: आमच्या घरी असेच सोलतात.
दिग्दर्शकः पण इथे मालिकात असे नाही सोलायचे, वास्तव वाटलं पाहिजे. एक एक शेंग घ्यावी, मग निरखून पहावी. मग हळुवार हाताने सोलावी. साल इथे टाकावं, दाणे तिथे टाकावेत. जमलं तर सोबत संवाद म्हणावेत.
नटी: अहो, पण मटार सोलायच्या नादात संवाद विसरले तर किती रिटेक होतील.
दिग्दर्शकः होऊ देत ना. अजून चांगले २ किलो मटार आहेत आपल्याकडे सोलायला. काळजी नको. हं, सोला पाहू आता. लाईट्स, कॅमेरा, मटार.....आपलं अ‍ॅक्शन.......

असली समजूतदार माणसं असतील तर कोणीही मुलगी हसतहसत ह्या संयुक्त कुटुंबात जाईल. पण ह्या सोन्याच्या वीटा लंकेत आहेत>> Lol

स्वप्ना तुझ्या सगळ्याच पोस्ट्स Lol

आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार राधा-घनश्यामच्या लग्नात न्याहारीस मटारपोहे, जेवणात मटार उसळ, मटारभात, मटार पॅटिस, मटर पनीर इ. पदार्थांचा समावेश कन्फर्म्ड असून डेझर्टला मटार आईसक्रीम, मटारजामुन की मटारखंड ठेवावं यावर चर्चा चालू आहे.

बिल्वा Happy

आज घनाची आई त्याच्या वडिलांना सांगते की घनाच्या आत्याचं नाव सुध्दा पत्रिकेवर घालायला हवं - पध्दत नसली तरी. यावर घनाचे वडिल म्हणतात की पध्दत नसेल तर आपण सुरु करू. ये हुई ना बात! घना आणि आत्याचा संवाद सुध्दा अप्रतिम!

राधाच्या वडिलांचा आणि आत्याचा, राधाला जेवण करता येत नसल्याबद्दलचा आणि मग राधाचा वडिलांसोबतचा प्रसंगही छान होते. प्रबोधनही करताहेत मंडळी.

दिग्दर्शकः पण इथे मालिकात असे नाही सोलायचे, वास्तव वाटलं पाहिजे. एक एक शेंग घ्यावी, मग निरखून पहावी. मग हळुवार हाताने सोलावी. साल इथे टाकावं, दाणे तिथे टाकावेत. जमलं तर सोबत संवाद म्हणावेत.

दृश्यात हिरोही असेल तर त्याला दोन्-चार दाणे खायला द्यावेत. आपणही एखादा तोंडात टाकावा. १० मिनिटे अशीच जातील. उरलेली २० मिनिटे जाहिराती. झाला एपिसोड तैयार...
Happy

स्वप्ना, देवाचार Biggrin
काही गोष्टी खटकत असल्या तरी मधून मधून काही प्रसंग फार छान घेताहेत.
जसे : स्वप्ना >>>आज घनाची आई त्याच्या वडिलांना सांगते की घनाच्या आत्याचं नाव सुध्दा पत्रिकेवर घालायला हवं - पध्दत नसली तरी. यावर घनाचे वडिल म्हणतात की पध्दत नसेल तर आपण सुरु करू. ये हुई ना बात! घना आणि आत्याचा संवाद सुध्दा अप्रतिम! <<<
भरत >>>राधाच्या वडिलांचा आणि आत्याचा, राधाला जेवण करता येत नसल्याबद्दलचा आणि मग राधाचा वडिलांसोबतचा प्रसंगही छान होते. <<<
घना आणि आत्याचा कालचा संवाद .
राधा अन पपांचा संवाद .
काही काही वेळा वाटतं की आजच्या जरा जास्तच 'बोल्ड', जास्तच' तर्ककर्कश्य' जगात जगताना जुन्या काळच्या हळव्या, साध्याभोळ्या जीवनातली गंमत आपण हरवून बसलोय का ? :नॉस्टाल्जिक बाहुली: Happy

Pages