आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.
चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!
आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-
१. आम्ही इथे काही काल्पनिक प्रसंग संक्षिप्तपणे दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडेल तो प्रसंग निवडून तुमच्या बोलीभाषेत खुलवायचा आहे.
२. प्रसंग खुलवताना त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेत वापरले जाणारे विशिष्ट शब्द खुल्या दिलाने वापरण्यात यावेत. त्या त्या गावाच्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन त्या संवादांतून व्हायला हवे.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त प्रसंगावर, एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये लिहील्यास हरकत नाही.
४. प्रसंग लिहीताना प्रसंगाचा क्रमांक, तुमच्या गावाचे आणि बोलीभाषेचे खास नाव असल्यास लिहायला विसरु नका.
* * * * * * * * * * * * * * * * *
प्रसंग १.
आज तुमच्या घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूवरांकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे. हे सगळे उत्साही मंगल वातावरण तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून आमच्यापुढे साकार करायचे आहे.
प्रसंग २.
कामानिमित्ताने/ शिक्षणानिमित्ताने/ लग्नानंतर तुम्ही दुसर्या देशी/गावी गेलात. खूप वर्ष उलटली. तुम्ही तुमच्या व्यापात रमून गेलात. अवचित तुम्हाला तुमची जुनी मैत्रिण वा जुना मित्र भेटतो. मग शाळेतील, कॉलेजातील, कॉलनीतील गप्पांना रंग चढतो.जुन्या मैत्रीच्या पुनर्भेटीचा हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतील वळणात लिहा.
प्रसंग ३.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. तुमचा मोबाईल खाली पडतो आणि तो कुणीतरी उचलून त्याचाच मोबाईल आहे असे सांगतो. तुमचे नि त्याचे तिथे भांडण जुंपते. गोष्ट अगदी हमरीतुमरीवर येते. हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून लिहा.
करायची सुरुवात?
मंजुतै... कसचं कसचं! त्या
मंजुतै... कसचं कसचं!
त्या अहिराणी ठसक्याला शोभेलसं व्हायला पाहिजे पण!
भरतजी... मराठी, हिन्दी आणि गुजराथी मिळुन अहिराणी भाषा बनली आहे. लीसन- घेउन.
हे घ्या मराठी भाषांतर!
नवरीची आत्या : ए पोरींनो! आटपा! नवरी तयार झाली का?? आणि ती रत्नी? तिला जास्त टाईम लागतो नट्टापट्टा करायला. काम ना धाम ..नुस्ता नखराच बघा नटमोगरीचा!
मोठी जाऊ(नवरीच्या आईला): काय गं विजु? नवरदेवला ओवाळायचं ताट घेतलं का?? त्याच्यात तुपाचा दिवा लावायला विसरु नकोस बरं का! आणि आगपेटी आठवणीने ठेव नाही तर विसरशील... आणि मग तिथे बोंब होईल. तुला माहीत आहे ना 'म्हातार्याचा' (सासर्याचा) स्वभाव! आणि जावयाला ओवाळतांना डोक्यावरुन व्यवस्थित पदर घे.
नवरीची आई: हो ओ बाई! मला माहीत आहे ना, हे काय पहिलं लग्न आहे का आपल्या घरातलं...
एक करवली (मुसमुसत): आई गं मी आता काय करु? माझी नथ सापडत नाहीये! काल देव आणायला गेलो होतो तेव्हा होती नाकात....
दुसरी करवली: बाई गं! तुझ्या साडीत तर नाही ना अडकली? काल तु ती जरीची साडी नेसली होतीस...त्याच्यात आहे का शोध बरं आधी.
नवरीची मावशी: आई गं! तुझ्या नाकात तर बघितली होती मी तु बेळमाथनी पुजत होतीस तेव्हा. कोणा मेल्याच्या हातात पडली असेल तर कल्याणच आहे.
पहिली करवली: हो ना गं ! आता दिवाळीलाच तर घेतली होती. यांना कळलं तर माझी काही धडगत नाही.
नवरीची आई: हो गं बाई ! जावईबापुंना कळलं तर बस्स मग झालं. इतका तमाशा करतील ना ते लग्नातच.नाहीतर बघ तु इथुनच हिला घेउन जातील परत्.आणखी तिला आयुष्यभर डोस देतील तिच्या सासरकडची लोकं," भावाच्या लग्नाला गेली आणि नथीचा आहेर चोराला करुन आली". तुला सांगते, या शुभीचा नवरा अगदी आग्यावेताळ आहे....एक वेळ विस्तव हातावर धरला जाईल पण त्यांचा स्वभाव ना...बाप रे बाप!
इतक्यात सासुरवाशीण कस्तुरा गावावरुन येउन पोचते. आल्याआल्याच आईच्या गळ्यात पडते.
"आई गं . मी अण्णांना आधीच सांगितलं होतं की माझ्या नणंदेकडे पण निमंत्रण पत्रिका पाठवा. पण अजुनही त्यांना पोचलेल्या नाहीयेत. आणि त्यावरुन माझी सासु किती बोलली मला माहीतीये? " हिच्या आईवडीलांनाच काही वळण नाही तर हिला काय असणार. आणि तरीही हिचा बाप किती नाक वर करुन बोलतो..असं आणि तसं'! तु आत्ताच्या आत्ता शरदला गाडी घेउन पाठव आणि माझ्या नणंदेला आणायला सांग.. मला काही माहित नाही. ...
नवरीची आई: का गं कस्तुरा? मला एक सांग...तुझ्या नणंदेच्या दीराच्या लग्नात आम्हाला होती का पत्रिका? आणि मग आता कसे बोलतात तुझ्या सासरकडचे लोक? हे बघ...आता तुला खमकं बनायलाच पाहिजे...४ वर्ष झालीत लग्नाला.
नवरीचे वडील आटपा आटपा... तिथे नवरदेव आला पारावर आणि तुम्ही इथे काय गप्पा मारत बसल्यात?हा बबन कुठे तरफडला? वर्हाडाच्या स्वागतासाठी मी फुलहार सांगितले होते कोपर्यावरल्या फुलवाल्याकडे. आणायला गेलं का कुणी? तो सत्या, आज्या तर काही कामाचेच नाहीयेत.
आणि ते बँडवाले, गुरवचा वाजावाले आले का? त्यांना म्हणा व्यवस्थीत होउ द्या... नवरदेवकडचं वर्हाड पोचतय लगेच. हा 'सुख्या (नवरीचा भाऊ) आता केव्हा जाईएल पारवर घोडा घेउन? त्याच्याबरोबर कोण कोण जातय? शेवंता, ध्रुपदा, कली तुमच्या मुलांना पाठवा बरं त्याच्याबरोबर.
बबन्या: हे काय येतोच आहे हारतुरे घेउन! घ्या गं मुलींनो...गजरे घाला केसात!
नवरीचा काका(नवरीच्या वडीलांना): दादा, मानकर्यांची लिस्ट असेल ना? तर हे नारळ आणलेत्...मोजुन घ्या बरं. पंगती ताटाला लावायचेत ना.
नवरीची आज्जी : तेलनपापड्या घेतल्यात का? आणि सांजोर्या? त्या प्रमिलाला विचारा बरं! गिरजे... नवरदेवासाठी पारावर द्यायच्या दुधशेवया घे बरं ताटात!
नवरीची आई: हो सासुबाई ( सासुबाईला आत्या म्हणतात)! घेतलं बरं का मी सगळं सामान!
नवरीचा काका: चला चला..गाडीत बसुन घ्या!
बी, साजिरा, मी _आर्या मस्त!
बी, साजिरा, मी _आर्या मस्त! धमाल रंगवलेत प्रसंग.
नंदिनी लिही ना बेळगावी पण. फार छान वाटतं ते पण. असूदेत की कानडी शब्द नंतर त्याचं भाषांतर करून टाक
दोन वेगवेगळ्या बोलीभाषांतून कोणीतरी दोघांनी भांडा बरे मोबाईलसाठी >>+१
मालवणी , कोल्हापुरी , मराठवाडी येऊ द्या
संयोजक कसला मस्त उपक्रम आहे
संयोजक कसला मस्त उपक्रम आहे हा.
बी फार मज्जा आली वाचताना . भाषा किती गोड आहे.
साजीरा,आर्या मस्तच. साजीरा भाषांतर वाचायची गरज पडली नाही.
मी बी लिवतो कीनी बघा आत्ता.
भरत,आथाईनच वापस जाई इले लिसन
भरत,आथाईनच वापस जाई इले लिसन << ह्याचा अर्थ इथुनच परत जा इला घेवुन
बी,साजिरा, आर्या काय धमाल
बी,साजिरा, आर्या
काय धमाल आणलीत. मस्त मस्त शब्द! उपक्रमाचा एकदम दणकेबाज कार्यक्रम झाला तुमच्यामुळे! 
अजून येऊ द्या की लोकहो, सदाशिव पेठी पुणेरी, बम्बईया मराठी, सोलापुरी...
>>अन त्या गोधळीले का ते फेदोळ
>>अन त्या गोधळीले का ते फेदोळ लाऊन ठूलेत मेंदीचे..
बी, काय झकास लिहिलं आहेस! मजा आली.
साजिर्या, आर्या, फाऽरच मस्त! (मराठीचाच पुन्हा मराठीत अनुवाद केल्यामुळे कळायला सोपं गेलं.)
भारीच लिहीलय बी, साजिरा आणि
भारीच लिहीलय बी, साजिरा आणि आर्या!
अहिराणी आणि वर्हाडी या दोन्ही भाषा लहानपणी कानावर पडल्या आहेत. शेजारी वर्हाडी होते आणि एक मैत्रीण खानदेशी. त्याच्याकडे पाहुणे आले की ते याच भाषांमध्येच बोलायचे.
संयोजक, खरं म्हणजे वरती लिहीलेले बोली भाषेतले प्रसंग त्या त्या लेखकांना रेकॉर्ड करुन पाठवायला सांगायचे होते. अजुन मजा आली असती!
एकही बोली भाषा येत नाही फक्त शहरी भाषा येते याचं वाईट वाटतयं!
कोल्हापुरकर, सोलापुरकर, नांदेडकर आहात कुठे?
मस्त!!मजा आली वाचायला!!
मस्त!!मजा आली वाचायला!!
भारी उपक्रम आणि दमदार
भारी उपक्रम आणि दमदार एंट्र्या!!!!
बी, साजिरा, आर्या ... जियो! फार मज्जा येतेय वाचताना. बी ची वर्हाडी भाषा म्हणजे 'वर्हाड निघालं लंडनला' मधली ना? ही एकदम सोपी वाटली. त्यामानाने साजिर्याची अहिराणी कळायला (किंचितच हं) कठीण आणि आर्याची अहिराणी तर अर्धी गुजराथीच वाटत होती. म्हणजे अहिराणी भाषाही गावाप्रमाणे बदलते का?
या उपक्रमाच्या कल्पनेला सलाम!
बी, भारीच आहे.
बी, भारीच आहे.
साजिरा, आर्याही मस्त. गोड
साजिरा, आर्याही मस्त. गोड आहेत सगळ्याच भाषा.
बी काय जबरदस्त लिहिलयसं ,
बी काय जबरदस्त लिहिलयसं , नेहमी का लिहित नाहीस ?
साजिरा , आर्या मस्त लिहिलतं ,लहानपणी नाशकात अहिराणी ऐकली आहे पण फारशी समजत नाही ,मराठीमुळे समजायला सोपं गेलं .
सीमा कोल्हापुरी ठसका येऊ देत . सोलापुरी कोण लिहितयं ... मल्ली , आगाऊ... अजुन कोणी ?
वा! वा! साजिरा, आर्या, धमाल.
वा! वा! साजिरा, आर्या, धमाल.

निर्या काढणारी सुनंदा
मी भाषांतरं आपल्याला नीट कळलंय ना हे जाणून घेण्यासाठी वाचली फक्त.
दोन्ही अहिराणीच, पण तरी फरक आहे दोन्ही भाषांमधे. आर्याची अहिराणी गुजराथीच्या जवळ जाते आहे, तीच (दक्षिणी, अग्नेयी धाटणीची) गुजराथी जी आम्ही १४ वर्षं ऐकत होतो.
या दोन्ही अहिराणीतला फरकही भौगोलिकच असणार प्रामुख्याने. आर्या, साजिरा, तुमची गावं/प्रदेश कुठले ते ही लिहा इथे.
सीमा, लवकर टाक तुझी पोस्ट.
मोबाईल-भांडण टाका ना कुणीतरी. जागू?
ललिता, टाकेन नंतर मोबाईल वाद.
ललिता, टाकेन नंतर मोबाईल वाद.
वा: ! मस्तच मेजवानी आहे इथं.
वा: ! मस्तच मेजवानी आहे इथं. हिंदीमिश्रित नागपुरी पण येऊं देत ; असेलच ना कुणीतरी नागपुरी पुट्ट्या/पुट्टी माबोवर !
मस्त उपक्रम!! साजिरा, आर्या,
मस्त उपक्रम!!
साजिरा, आर्या, बी: खूप छान.
मी नगरी, शिक्षण पुण्यातले तर सासर नाशिकचे, गावाकडे बरेच अहिराणी बोलतात काही कळत नाही. इथे वाचून तरी कळली पण बोलताना एवढी फास्ट बोलतात की कळ्तच नाही. माहेरी आणि सासरी माझ्या पुणेरी मराठीची फारच टिंगल होते.
प्रसंग २. रुत्या , लेका तु?
प्रसंग २.
रुत्या , लेका तु? आनि कवा आलाईस हिकडं. मर्दाच्या, कळीवला बी न्हाहीस. फोनबीन मार्शील का न्हायी?
मी हिकडं 'मास्नी', काकी कड सोडाया आल्तो रे. तु काय शिर्क्यांच्या घरला काय? . इसरा कि च्यामारी आता ते प्रकर्ण. तवां शेपुट घात्लासा. रिस्पॉन्स मागायच झाल न्हायी. मं आता काय उपेगं. का "ताईसाब" म्हणाया आल्तासा?
.
आनि ?तुमची अमरिका काय म्हणत्या? च्यायला त्या ओबामाच्या. लई भारी माणूस रे . ते ओस्माना लई टँव टॅव करीत होत बेंण. काव किच्च आणलं व्ह्तं सगळ्यास्नी . पकिडला किर त्याला . ओबामा 'हरखुन टुम्म' झाल्ता भाशन द्येताना. प्ल्यान लई फसक्लास केल्ता रं त्यांन. मानुस कुटच्या कुटं पोच्ला बगं.
बरं. आज काय करायलाईस? चल कि पेठतं. चंद्या तेनं येणारेत. शर्याला बी उचलुया . . तिथनं तर्राट पन्हाळ्याला . ऐंशीन सुटायचं. येवस्तशीर रातच्याला परत. उद्या जमल्स्तर श्यामच्या वड्याकडं जाउया म्हणं.
कुब्या? बॅटरी म्हणं कि. ते तिकटीपाशी असतया. पोवारांच्या राजलक्ष्मीला वळिखतोस काय? आपल्या सगळ्यास्नी सोडुन पयला नंबर मारला पठठ्यानं . पर्वा गेल्तो साकरपुड्याला.
तिथं ते माल्याबी भेटलं व्हतं. मला बगुन तोंड लपवाल्लयं.. रडकं तोंड करुन नंतर बोललं माझ्याशी. न्हाईतरी दुसरं काय करतया ते ,खरं . न्हेमी तेचं .
बरं ते र्हाउंदे आता. पेठतं आपल्या सम्राट बोर्डापाशी भेट कि. निग झटाकदिशी. उगीच उश्शीर करु नगां हिकडं तिकडं पोरीस्नी बगतं.
प्रसंग मोबाईल. पात्र - आजी,
प्रसंग मोबाईल. पात्र - आजी, तिचा नातू, बसमधील प्रवाशी:
शहर: अकोला.
लहेजा: वर्हाडी.
नातू: बरं आजी मी निंगतो.. माह्य कालेज हाये.. तू हा मोबिल जवय ठू...
आजी: मायबाई.. मले रे नाही दाबता येत त्याचे बटनं.. !
नातू: अव आजी मी तूले फोन लावीन.. तू उचलजो फक्त.
आजी: बर.. चाल्लास मंग.. ? फटफटीवर बरुबर जाजो.. लय जोरात नको चालूस..
नातू: ह्हो..
बसमधे आजी: अव माय.. माया मोबिल.. पाय वं बाई.. माह्या नातवाचा मोबिल व्हता ना तो. बात न्या बात लांबोला कोनतरी.. कंडक्टर.. गाडी थांबवानाहो भाऊ..
प्रवाशीनः अव आजी लुगड्यात ठूला अशीन त्वा घोळात पाय ना बरुबर आंधी.
आजी: अव माय घोळातच तं पाह्यला पन नाही हाये. म्हनल चंचीतून सुपारीच खांड फोळाव पन मोबिलच नाही.
प्रवाशी: वो आजे.. शिटीच्या मांगे पाय ना.. तथीसा पळला-बिळला असन्..
आजी: पाय आता.. मले नाही उठता येत.. हा मानूस गाडी तन थांबवत नाही. वो कंडक्टर.. !
प्रवाशीन-०२: हालो.. मी लती बोलते.. जेवला का तू ?
आजी: मायबाई.. हाच्चं तं व्हय मा वाला मोबाईल.. पाय ह्ये बाई कशी हाय!!!! माह्याचं मोबाईल चोरुन.. अन् माह्याच देखत फोन करते! .... कंडक्टर कानात भेड्यां गेल्या का तुम्च्या!! गाडी काऊन नाही थांबू राह्यले! ऑ?
प्रवाशीन-लता: अहाहा! काय झाल ह्या बाईले बोलाले? मले चोर म्हन्ते! काव बुडे कदी पाह्यल त्वा मले तुया मोबाईल चोरताना? ऑ?
आजी: अहाहा.. तू काय दातओठ खात माह्यावर! ऑ? मा वाला मोबाईल मले का दिसत नाई.. फुटकी झाली की मी? चाल आन माया मोबाईल!!!
प्रवाशी-४था: आवो आजी कशावरुन हा तुयाच मोबाईल.. एकाच कंपन्याचे मोबाईल सार्खेच दिसत्यात. तू निरखून पाय अन मंग बोल.
आजी: आन व मायमावले .. हा माह्या नातवाचा फोन हाय. .... वो कंड्क्टर? काय मानसं हाईत की जनावर हायेत ह्ये ड्रायव्हर वाले. मले ना उठता येत ना चालता येतं.. नाई तं ह्या बाईच्या हातचा मोबाईल म्या हिसकला अस्ता.
प्रवाशीन-लता: वो आजे.. सरळ बोल! .. तो पाह्य तुया लुगड्यातूनच फोन वाज्तो हाय.. पाय जरा.. तुया फोन तुह्याच जवळे हाये की नाई.
आजी: अव मायबाई.. हो वो माय.. पाय हा फोन म्या कवाक्षी चंचीत ठुला मले माईत पन नाय पळलं! मले वाटत होत माही चुन्याची डबी असन अंदर.
प्रवाशी-०५: जाउद्या बाई बुडा मानूस हाय .. व्होते अस कधीकधी.
आजी: अनं पाय ... मी माही चुन्याची डबी घरीच ईसरली. वो बुडे बॉ जरा चुना द्या बरं!
प्रवाशीन-०६: आजी .. फोन तं घे आंदी..
आजी : काय रे बाबू.. झाल का तुया वाल कालेज? बर आईक.. माही चुन्याची डबी म्या घरी इसरली. तिले पिठाच्या पिप्यात झाकून ठुजो. नाईतर आपल्या शेजारची परभी लांबवीन मी नसली घरी म्हन्जे.
सगळे प्रवाशी हसतात..
पार्लेकरांनिशी सगळे मायबोलिकरही 'मनमोकळे' हसतात
सही चालू आहे.
सीमा आणि बी मस्त एकदम!
सीमा आणि बी
मस्त एकदम!
सीमे, तोड्लंस बग! बी, परत
सीमे, तोड्लंस बग!
बी, परत एकदा- फार आवडलं! 'बुडा' एकदम मस्त! अस्सल गावाचा शब्द!
कंडक्टर कानात भेड्यां गेल्या
कंडक्टर कानात भेड्यां गेल्या का तुम्च्या!
चुन्याची डबी
>>>>
सीमा, अजून थोडे मोठे संवाद
सीमा, अजून थोडे मोठे संवाद टाक ना.
खूप धमाल येतेय वाचून.
खूप धमाल येतेय वाचून.
सगळे संवाद सहीच..ह्यातली एकही
सगळे संवाद सहीच..ह्यातली एकही भाषा येत नाही..पण वाचायला इतकी मजा येतीये!

निर्या काढी दिशी
अन त्या गोधळीले का ते फेदोळ लाऊन ठूलेत मेंदीचे..
धम्माल नुसती
मस्तच...
मस्तच...
सीमा मस्त.. रिस्पॉन्स मागायच
सीमा मस्त..
रिस्पॉन्स मागायच झाल न्हायी.
फोनबीन मार्शील का न्हायी?
ऐंशीन सुटायचं.>>> ऑथेंटिक कोल्हापुरी..
बी ची गाडी फास्टात चाल्लीया..
आज काय करायलाईस? >> चंद्या
आज काय करायलाईस? >>
चंद्या तेनं येणारेत. >>
सोडाया आल्तो रे >>
ऐंशीन सुटायचं >>
व्वा सीमा, नादखुळा... खटक्याव
व्वा सीमा, नादखुळा...
खटक्याव बॉट, जाग्याव पल्टी
पुढच्या वर्षी हा उपक्रम
पुढच्या वर्षी हा उपक्रम रेकॉर्डिंगचा ठेवा. मज्जा येइल.
मालवणी मधे कुणीच का लिहत नाही? शैलजा, नीलू, भ्रमा किधर हय?
बी, मस्त लिहिले आहेस. काहीकाही शब्द समज्त नाहीत पण संदर्भाने अर्थ लागतो. सीमा. अजून लिही की.
Pages