माझे भरतकाम..

Submitted by सुलेखा on 27 February, 2012 - 12:04

मी दोन कुडत्यांवर एकसारखे डिझाईन घेवुन भरतकाम केले.कोयरी चे डिझाईन आहे.पैकी एका मूगी / हिरव्या कुडत्यावर दोन मुख्य रंग गुलाबी व पिवळा वापरला.रेशीम २ पदरी घेतले.डिझाईन कसुती ने म्हणजे धाव-दोर्‍या च्या टाक्याने भरले..दुसरा कुडत्याचे कापड पिवळा[गोल्डन]-हिरवा अशा फिरत्या रंगाचे आहे.त्यावर पिवळे[गोल्डन] चौकोनही आहेत.यावर पिवळ्या रेशमाच्या ३ पदरी दोर्‍यानी तेच कोयरीचे डिझाईन घेतले आहे.डिझाईन छापण्यासाठी स्टेन्सिल वर काळ्या मार्कर पेन ने डिझाईन काढले आणि पिवळ्या व पांढर्‍या कार्बन ने ट्रेस केले.
वारली कुडते :--
दुसरे कुडते वेगवेगळी वारली डिझाईन्स वापरुन केले आहे. मागील भागात एकच वारली रांगोळी /चौक चे डिझाईन घेतले आहे.तसेच बाहीवर उभ्या आडव्या रेषा व त्यात एक पान असे धावदोर्‍याने भरले आहे..
१]hirave kudate-2.JPG
२]kudate-40 takke.JPG
१]पुढील भागः-- Warali--1 front.JPG
२]मागील भाग :--warali--3 back.JPG]
३]बाही :--warali bahi.JPG

गुलमोहर: 

होय्.एकाच टाक्याने ,कसुती टाका/धावदोर्‍याने भरले आहे.मात्र मधे थोडासा सॅटीन स्टिच घेतला आहे.दोन्ही कुडत्यांमधे दोर्‍यांची रंगसंगती वेगळी घेतली आह.दोरा एकात २ पदरी व दुसर्‍यात ३ पदरी वापरला आहे.

मोठ्या फोटोत खूप सुरेख दिसत आहे. रिंग मधे असे वाट्ते आहे कि मूळ कापडाचा रंग व त्यावर आणि रेषांचा पॅटर्न त्यामुळे चित्र उठून येत नाही आहे. प्लेन लाईट कलर जसे हल्का पिवळा/ ऑरेंज किंवा पांढरा शुभ्र ह्या पार्श्वभूमी वर आणिक उठून दिसेल.

अर्थात तुमचे हस्त व कला कौशल्य खरेच खूप सुरेख आहे. ह्या वर लाइट ओढणी घेणार का?

मला पहिल्या फोटोत अगदी छापल्यासारखी डिझाईन वाटली.. इतकं एकसारखं आणि नेटकं आलंय
सुंदरच Happy

मस्त

अश्विनीमामी,
हिरवे कुडते पाउण बाह्यांचे आहे त्याच्या बाह्यांवर आणि मागच्या गळ्याखाली एक एक डिझाईन घेतले आहे.हे कुडते शिवुन झाल्यावर इस्त्री केली आहे.त्यामुळे जास्त छान दिसत आहे.रिंग मधील डिझाईन ही पूर्ण कापडावर [३ पदरी काम केले आहे त्यामुळे] खुपच उठुन दिसत आहे.या दोन्हीवर लहेरिया ओढणी पांढर्‍या बेस वर आहे .ती घेणार आहे. हिरवा कुडता वहिनीसाठी केला आहे.
आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.