वाघ्या मी मुरळी देवाची ग तू

Submitted by पाषाणभेद on 26 February, 2012 - 18:44

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू

सर्वप्रथम '२७ फेब्रुवरी अर्थात मराठी भाषा दिवसाच्या' सर्व मराठी भाषीकांना हार्दीक शुभेच्छा!

यळकोट यळकोट जय मल्हार...
यळकोट यळकोट जय मल्हार...

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जागवू ||धृ||

देव खंडोबा मार्तंड मल्हारी
मणी मल्ल दैत्य संहारी
चढलो नवलाख पायरी
देव आहे जेजुरी गडावरी
जवळ बसली म्हाळसा सुंदरी
नवस देवाचा आता पुरा ग करू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||१||

तळी उचलून करू चौक भरणी
परसन्न करू देवाची करणी
माथा झुकवूनी त्याच्या चरणी
बेल भंडार उधळू गगनी
तेजानं दिवटी बुधली ग पेटवू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||२||

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जागवू ||धृ||

- वाघ्या पाषाणभेद

गुलमोहर: 

पाषाणभेदजी: अतिशय छान. कुलदैवताचा आशिर्वाद मिळाला, धन्य झालो.
मराठी दिन शुभेच्छा आपल्यालाही.

येळकोट येळकोट जय मल्हार....
पाभेजी श्री.खंडोबारायाच गुणगाणं भावल मनाला.