क्रोशे - टेबल रनर

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 9 February, 2012 - 02:52

आधी हे असे चौकोन करुन घेतले.

DSC00414.JPG

मग ते जोडायला सुरवात केली.
DSC00421.JPGDSC00438.JPGDSC00441.JPGDSC00442.JPGDSC00443.JPG

गुलमोहर: 

अतिशय मोहक दिसतय वरच दोन्ही आणि जयूताईचे टेबल रनर पण खूपच आकर्षक आहे. आवडलच Happy आईला आता क्रोशापण करत जा म्हणून सांगते. Happy ती एकदम एक्सपर्ट आहे शिवणकाम, विणकाम, भरतकाम इ.इ. मधे. Happy

पण आपण पाककृती लिहितो, तसा एक वेगळाच धागा करुया का? म्हणजे नंतरही वाचून स्फुर्ती घेता येईल

मस्त आयडिया..

शक्य असेल तर टाकेही लिहित जा इथे म्हणजे ज्यांना करायचेय त्यांनाही स्फुर्ती घेता येईल. Happy

जयश्री, माझी पद्धत वेगळी आहे.मी कधी ट्रेबल ने तर कधी डबल क्रोचेट ने जोडते.पण तु दिलेली लिंक पाहिली छान आहे आता तसे करीन..

सुलेखा...... मी युट्युब वर बघितलं .........३-४ प्रकार आहेत जोडायचे. पण मला हाच आवडतो Happy एकसंध वाटतो.

जयश्रीताई खूप छान.. लेक लहान असल्याने सद्ध्या हे असलं काही करणं स्वप्न बनून राहिले आहे. कपाटात पडून असलेल्या क्रोशाच्या सुया खुणावत आहेत.. लोकरही आहे.. पण.... !! Sad
गेल्या चार पाच दिवसापासून हात शिवशिवत होते आणि आज इथे ही पोस्ट बघितली.. पोट भरल्यासारखं वाटलं.. गरोदर असताना TP म्हणून ग्रॅनीज स्क्वेअर्स बनवून दुपट्यासम काही बनवलं होतं.. लोकरीनेच जोडल्याने तेवढं सुबक दिसत नव्हतं.. पण बेळगावी थंडीत उपयोगी पडलं.. जोडायची अशी सुंदर पद्धत बघितल्यावर आता स्वस्थ बसवत नाहीये.. :).. सुंदर लिंक दिलीस. भीती एवढीच आहे की अचानक हातात लोकर आणि सुया बघून कोणाला भलत्या शंका येऊ नयेत. Blush Proud
टॅटिंग ची डॉयली पण सुंदर झाली आहे.. आई खूप करायची. मी शाळेत असताना एकदा शिकायचा प्रयत्न केला होता पण तेव्हा जमलं नाही.. माझी प्रगती आईला दोरा भरून देण्यापर्यंतच मर्यादित राहिली.. आता आई भेटेल तेव्हा पहिल्यांदा हा प्रकार शिकायचा असं ठरवलं आहे..

Happy हो जाओ शुरु सोनचाफा .....!!
मी पण खूप दिवसांनी वळले इकडे........ते ही मैत्रिणीला करतांना बघून. फार कंटेजियस आहे ना हे सगळं.... !
लोकांना घेऊ देत की गोड शंका...... त्यांचं तसंच गोड निरसन कर म्हणजे झालं Happy

Pages