क्रोशे - टेबल रनर

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 9 February, 2012 - 02:52

आधी हे असे चौकोन करुन घेतले.

DSC00414.JPG

मग ते जोडायला सुरवात केली.
DSC00421.JPGDSC00438.JPGDSC00441.JPGDSC00442.JPGDSC00443.JPG

गुलमोहर: 

मस्त आहेत. जोडले कसे ते सविस्तर लिहिणार का? मी चौकोन बनवलेत पण जोडताना सुईने जोडले तर मागुन जाड लाईन येते जी मला आवडत नाही. नेटवर शोधले पण सगळीकडे असले चौकोन सुईनेच जोडायचे दाखवलेय.

फारच छान. सोप्प पण आहे. मस्त आयडीया. आजच लोकर आणते. नक्की करुन झब्बु टाकणार!!

क्रोशाचे विणकाम माझा एके काळचा आवडीचा छंद. मी इतके विणले होते लहान लहान स्वेटर!! पण माझ्या मुलीने एकपण आंगाला लावुन घेतला नाही. एक नंबरची उकडकांदा आहे ती. तेंव्हा पासुन विणणं सुटलं होतं. आता जोमाने करणार.

मस्त आहेत. जोडले कसे ते सविस्तर लिहिणार का? >>>>
साधना, दिसताना तरी ते सुईनेच जोडल्या सारखे दिसते आहे.

मागे मी पण एक एक महत्वाकांक्षी शाल केली होती. त्यात मला सुईने जोडायचा खुप कंटाळा आला होता. म्हणुन मी जाड रंगीत (मॅचींग) दोर्‍याने जोडले होते. पण ह्यात असे आहे की ते मजबुत रहात नाही. लोकरीच्या धाग्याने शिवुन बघा. मागे माझ्या आजी ने प्रयोग केला होता. जाड दाभणाने लोकरीच्या धाग्याने शिवायचं. पण तिने तो प्रयोग एका छोट्या झबल्यावर केला होता. हे प्रकरण जरा लांब आहे. ट्राय करा.

अरे वा वा.हे तर खुपच मस्त भर्पुर लांबलचक रनर तयार झाले आहे..
साधना ,दोन चौकोन स्लिप स्टिच/मुके खांब म्हणजे २ चा एक करुन जोडता येतील्..म्हणजे दोन्ही चौकोन जुळवुन घ्यायचे.लोकर ,क्रोशियाचा हुक या दोन्ही चौकोनाच्या कडेच्या समोरासमोरच्या स्टिच मधुन अडकवुन बाहेर काढावा व पुन्हा पुढच्या स्टीच मधुन क्रोशिया अडकवुन लोकरीचा वेढा देवुन क्रोशिआ आपल्याकडे ओढावा..आता क्रोशिआवर २ टाके झाले त्याचा २ चा एक करावा ..पुढच्या स्टिच मधुन पुन्हा लोकर ओढली कि २ टाके होतील्..पुन्हा २ चा एक्..असे करावे.

सही

खुप सुंदर झाला आहे. मी आधी क्रोशाचे काही रुमाल वगैरे केले आहेत. आता सगळ बंद, वेळच नाही मिळत. पण हे पाहून आता करावेसे वाटतात.

धन्यवाद लोक्स Happy

हो ......... अगदी सोप्पं आहे. चौकोनी तुकडे करायाला जितका वेळ लागेल तितकाच....... बाकी जोडण एकदम पटापट होतं .

ही लिंक बघ......... म्हणजे कळेल कसं जोडायचं ते.

http://www.youtube.com/watch?v=5nXu1WEybew&feature=results_video&playnex...

सुलेखा, तुझी पद्धत वेगळी दिसतेय.

जागू........ तो शुरु हो जाओ Happy

मोहन की मीरा......... तुझ्या झब्बुची वाट बघतेय हं Happy

कुणाचं तरी बघितलं की स्फुरण चढतं...... हे मात्र अगदी खरं Happy

जयश्रीतै ____/\____
हे असं करणारे सगळे ग्रेट लोक्स असतात. मला मात्र यातलं काहीही येत नाही.:अरेरे:
फारच सुंदर झालंय, रंगसंगती आणि सुबकपणा खासच!! खूप खूप आवडलं.

अतिशय सुरेख. रंगसंगतीही मस्त निवडलीय अगदी Happy
मला विणकामातला एक टाकाही घालता येत नाही त्यामुळे हे कसं काय जमतं बुवा असं वाटतं अशी कलाकुसर पाहिली की.

अश्या रीतीने ग्रॅनी स्केअर अफगाण पॅटर्न बनवता येते. ह्याच्यात वेग वेगळे रंगाचे असे चौकोन करून मग डबल नाहितर सिंगल टाका घालून जोडायचे.
चौकोनाला ग्रॅनी स्केअर म्हणतात.

एके काळचा सुट्टीतील उद्योग होता हा माझा. खूप सोप्पं आहे तसे.

सुंदर!! खुप छान दिसतय रनर Happy रंगसंगती पण आवडली.

अमा म्हणतायत तश्या मॅट्स पण कर आणि कोस्टर्स पण Happy

मला इतर भरतकाम, फॅब्रिक पेंटिंग करायला आवडतं पण वीणकाम आणि त्यातुन क्रोशे कधीच आवडलं नाही. माझी आई खुप काय काय मस्त मस्त बनवायची.... खुप सार्‍या शाली आणि आम्हा बहिणींसाठी आणि सगळ्या नातवंडांसाठी क्रोशाच्या केप्स/स्वेटर्स/कॅप्स खुप बनवले होते आईने...

जयवी लिंकबद्दल धन्यवाद. मला अशाच काहीश्या प्रकारे जोडकाम कसे करायचे ते पाहिजे होते.

सुलेखा, मी याआधी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीसारखेच पण जरासे वेगळे असे जोडुन पाहिले होते. म्हणजे दोन चौकोन जुळवुन त्यांच्या स्टिचमधुन एकत्र एक स्टिच घालायचा. पुढच्या बाजुने छान एकसंध दिसतात पण मागच्या बाजुला ठळक वेणी येते. म्हणुन मला दुसरी पद्धत पाहिजे होती जिथे सांधा दिसणार नाही.

तहे दिल से शुक्रिया Happy

खरंच हे अतिशय सोप्पं आहे. भराभर वाढतं. माझी आई उत्कॄष्ठ करायची क्रोशे आणि वीणकाम. तिला बघून बघून आम्ही दोघी बहिणी सुद्धा करायला लागलो.

अश्विनीमामी..... हो..... लोकर जितकी आहे ती संपेपर्यंत मॅचिंग जे जे करता येईल ते ते करणार आहे Happy

लाजो, अगं एकेक आवड असते. मला खरं तर भरतकाम, वीणकाम, क्रोशे, टॅटींग, फॅब्रिक पेण्टींग, बाटिक हे सगळं करायला मनापासून आवडतं. अधून मधून सुरु असतं सगळंच पण मला कपडे शिवणं ह्या प्रकाराकडे कधीच वळावंसं वाटलं नाही. म्हणजे ते करणार्‍या लोकांबद्दल नितांत आदर वाटतो पण करणं मात्र नकोच वाटतं Happy

साधना, मला पण जोडणं अशाच पद्धतीने आवडतं. माझी आई असंच जोडायची. दोन्ही बाजूंनी ते सुबक दिसतं.

श्यामली, अगं ह्यात महानपण वगैरे काही नाहीये गं !!

0-sw-1.JPG0-sw-2.JPG

जयश्रीताई, हा घ्या माझा झब्बू! हे जाकीट आणि पोंचो चौकोन जोडून तयार केले आहे.

नणंदेकडे बातमी आहे. भाचा किंवा भाची लवकरच येऊ घातली आहे. पण बाळाचे कपडे आधी करून ठेवू नयेत म्हणतात. म्हणून बटणे लावणे, गोंडे जोडणे बाकी ठेवले आहे. झब्बू द्यायचा मोह अनावर झाल्याने आधीच प्रची टाकत आहे!

अप्रतिम अनया Happy अतिशय गोड रंग आणि खूप सफाईदार झालंय !!
एक काम कर ना......... हे इतकं सुंदर डिझाइन इथे टाकण्यापेक्षा नवा धागा काढून पोस्ट कर. म्हणजे तुला जास्त चांगली दाद मिळेल.

आभार! अजून बाळंतविडा करते आहे. सगळ झाल की एकदम टाकते. पण आपण पाककृती लिहितो, तसा एक वेगळाच धागा करुया का? म्हणजे नंतरही वाचून स्फुर्ती घेता येईल!

Pages