मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा.
खालील अभिप्राय बोलका आहे.
...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा....
....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. --- कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन
प्रकरण 1. कडेगावची भानामती आणि आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुवाबाजी
कराडच्या पुर्वेस 20 किमीवर असलेल्या कडेगाव या गावी भानामतीचा विलक्षण प्रकार सुरू झाल्याची बातमी 15 मार्च 1988 च्या दै. पुढारीत प्रसिद्ध झाली.गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या डोळ्यातून खडे आपोआप निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते. यासंबंधी खरी परिस्थिती समजाऊन घेण्यासाठी मी ( अद्वयानंद गळतगे) 18 एप्रिलला गेलो. संबंधितांच्या मुलाखतीवर आधारित पुढील माहिती मला आढळून आली....
या प्रकरणातील काही शीर्षके
सुरवात कोठे झाली?
मुलींवर दमबाजी
गावकऱ्यांचा आलेला खुलासा - वस्तुस्थिती नेमकी काय?
<दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासनli>
गावकऱ्यांचा मुख्य प्रश्न
विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन
समितीची पोकळ कारणे
अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?
कडेगावचा प्रकार भानामतीचाच
गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?
संपुर्ण प्रकरण इथे वाचा.
अंधश्रद्धा आणि बुवाबाजी
अंधश्रद्धा आणि बुवाबाजी याविरूद्ध कायदा बनवण्याबाबत अंनिस आग्रही असताना एका पक्षाच्या स्टेजवरून वेळोवेळी आमचा मार खाल्लेला लक्षात आहे ना ? अशी केलेली प्रेमळ वास्तपुस्त अनेकांच्या लक्षात असेलच. कडेगावमध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी दमबाजी केली कि नाही हे समजायला मार्ग नाही पण इतर अनेक प्रकरणांपासून दूर रहा म्हणून अंनिसच्या कार्यकर्त्यांना जसा संबंधितांचा मार खावा लागलेला आहे त्या पार्श्वभूमीवर दाभोळकरांमधे स्वतःच एकट्याने गावात घुसून दमबाजी करायचं धार्ष्ट्य आलं याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं. डॉ. दाभोळकरांनी दिलेल्या आश्वासनासंदर्भात... त्या मुलींना अंनिस विरोधकांकडून दमदाटी झाली होती आणि दाभोळकरांनाही असं कुठेतरी वाचनात आलं होतं. त्यांना गुंडांकरवी गावबंदी झाली होती ना ? मग आश्वासन कसं काय पूर्ण करायचं ? ज्ञानतपस्वी असं अर्धवट ज्ञान का वाटताहेत ? काय आहे, या मुली शहरात गेल्या असत्या, तिथे प्रसिद्ध व्यक्तिंच्यापुढे पंधरा दिवस, महिना , दोन महिना अशा कालावधीत जर डोळ्यातून खडे निघालेच नसते तर ? मग नको का दमदाटी करायला ? आणि चोराच्या उलट्या बोंबा कोण ठोकतं हे साधारणपणे माहीतच असतं कि आपल्याला.
म्हणूनच १९८८ साली जेव्हा भानामती जोरात होती, दुकानं जोरात होती तेव्हा दाभोळकर दमदाटी करतात हे जरा अतीच होतंय. ही भानामती पण फारच चावट असते. शिक्षणाचा प्रसार झाला कि ती ते गावच सोडते. बघा ना, पुण्यात कधी अशी घटना ऐकिवात नाही, खुद्द ज्ञानतपस्वींच्या घरात असा प्रकार कधी झाल्याचं त्यांचंही म्हणणं नाही, इतकंच काय आता प्रत्यक्ष त्या कडेगावातही भानामती राहत नसावी. श्रद्धा असली तरीही अडाणी माणसालाच ही भानामती प्रसन्न होते. शिक्षणाबद्दल तिला अत्यंत तिरस्कार आहे. शिक्षण सर्वांना लागू करणं हा मूर्खपणाचा निर्णय आहे. त्यामुळेच आमचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा असलेले भानामती, लिंबू मारणे, अंगात येणे, झपाटने, बुवाबाजी असे प्रकार लुप्त होत आहेत. ही सांस्कृतिक हानी कशी भरून काढायची ?
असो . वैज्ञानिक अंधश्रद्धेच्या बाबतीत बुवाबाजी करणारे काही आणि ज्ञानतपस्वी यांची भाषा किती सेम आहे ना ? वाचा या लिंकवर
http://www.mahans.co.in/index.php?option=com_content&view=article&id=44:...
Kiranayake, वरच्या पोस्टीतला
Kiranayake, वरच्या पोस्टीतला दूसरा परिच्छेद लै भारी.
मित्रा, तुमच्या सविस्तर
मित्रा,
तुमच्या सविस्तर प्रतिसादाने छान वाटले.
(आपण वर म्हणता ..."म्हणूनच १९८८ साली जेव्हा भानामती जोरात होती, दुकानं जोरात होती तेव्हा दाभोळकर दमदाटी करतात हे जरा अतीच होतंय. ही भानामती पण फारच चावट असते. शिक्षणाचा प्रसार झाला कि ती ते गावच सोडते. बघा ना, पुण्यात कधी अशी घटना ऐकिवात नाही, खुद्द ज्ञानतपस्वींच्या घरात असा प्रकार कधी झाल्याचं त्यांचंही म्हणणं नाही, इतकंच काय आता प्रत्यक्ष त्या कडेगावातही भानामती राहत नसावी. श्रद्धा असली तरीही अडाणी माणसालाच ही भानामती प्रसन्न होते. शिक्षणाबद्दल तिला अत्यंत तिरस्कार आहे. शिक्षण सर्वांना लागू करणं हा मूर्खपणाचा निर्णय आहे. त्यामुळेच आमचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा असलेले भानामती, लिंबू मारणे, अंगात येणे, झपाटने, बुवाबाजी असे प्रकार लुप्त होत आहेत. ही सांस्कृतिक हानी कशी भरून काढायची ?"...)
वरील परिच्छेदात पुण्यात अशी भानामतीची घटना झाल्याचे ऐकिवात नाही असे आपण म्हणता त्या बाबत वेगळा धागा काढून लेखन करायला हवे. असो तोवर इतकेच.
प्रा. गळतगे यांनी प्रकरण ७ मधे बुध्दिवाद्यांशी आमचे भांडण नाही बुद्धिवादाशी आहे असे म्हटले आहे.
अंनिस बाबतचा लेख वाचला त्यातील विचारातील मुद्धे अयोग्य आहेत असे नाही. पण गळतगे जे म्हणतात वा लिहितात ते तेथे प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा करून लिहितात.
आपण म्हणता की कडेगावात अंनिस विरोधकांकडून दमदाटी झाली होती असे कुठेतरी आपल्या वाचनात वाचनात आले. ते ही आपण विचारात घ्यावे.
पेटंट घेतले नसतील तर इष्टाईल
पेटंट घेतले नसतील तर इष्टाईल कॉपी मारीन म्हणतो>>> कायतरी काय, पेटंट, संशोधन ही बुद्धीवाद्यांची थोतांडे आहेत
वरील परिच्छेदात पुण्यात अशी भानामतीची घटना झाल्याचे ऐकिवात नाही असे आपण म्हणता त्या बाबत वेगळा धागा काढून लेखन करायला हवे. असो तोवर इतकेच.>>> असा धागा कोणी काढायचा? हे कसले उत्तर?
वेगळा धागा वगैरे नको. इथेच
वेगळा धागा वगैरे नको. इथेच काय ते लिहा. जे काय मनोरंजन व्हायचे आहे ते इथेच होऊ देत.
२०११-१२ मधे कुठे कुठे भानामतीचे प्रकार दिसलेत ते पण लिहा. आणि प्लीज.. स्वतःच्या मुद्द्यामधे लिहा. कुणाचेतरी लिखाण पेस्ट करून देऊ नका.
धन्यवाद.
२०११-१२ मधे कुठे कुठे
२०११-१२ मधे कुठे कुठे भानामतीचे प्रकार दिसलेत ते पण लिहा.>>>
१] इथे मायबोलीवरच माझा एकच लेख एकदम तीनदा प्रकाशित झाला.
२] परवाच कुठल्यातरी धाग्यावर भांडणं चालली होती, ती पहायला गेलो तोप्रेंत त्या प्रतिक्रिया गायब होउन भांडणारेच गळ्यातगळा घालून बसले होते.
(वरची दोन्ही उदाहरणे खरी व गंभीर आहेत हे स्माईली नसल्यामुळे आपल्या लक्षात आलेच असेल)
आगावा
आगावा
आगाउ खरे तर याच धाग्यावर
आगाउ
खरे तर याच धाग्यावर भानामती झाली आहे. कोणीतरी मकरंद नावाचा माणुस गायबच झाला आहे. डोळ्यातुन खडे वगैरे येणे फारच छोटी गोष्ट आहे. त्या माणसाच्या हातातुन (म्हणजे लेखणीतुन) शिव्या आल्या त्याहि गायब झाल्या आहेत.
माझा तर बुवा विश्वास बसला भानामतीवर. एकाच लेखाचा हा केवढा प्रभाव !
मित्रा मुळात डोळ्यातून खडे
मित्रा
मुळात डोळ्यातून खडे येणे, अंगावरचे कपडे फाटणे, घरावर दगड पडणे, घरातील वस्तूंना आग लागणे बिब्याच्या फुल्या, हे तथाकथित भानामती चे प्रकार आजूबाजूला कुणी नसतानाच होतात.
म्हणूनच तर त्याला भानामती असे नाव दिले गेले आहे. कोण करते याचा शोध घेऊन ही कळत नाही आणि असे प्रकार इतर कोणी नसतानाच घडतात.
"अमूक एक प्रकार तुम्ही करून दाखवा किंवा तो भानामती आहे हे मान्य करा" हा बालहट्ट कशासाठी?
प्रा. गळतग्यांनी याचा हट्ट केलेला नाही. गावकऱ्यांनी केला. कारण त्यांना तसे वाटले की जर इतक्या लहान मुली ते करून जर आम्हाला मुर्ख बनवत असतील तर आमच्या समाधानासाठी ते त्या कसे करतात असे विचारण्यात काही गैर नाही. पण असे करून दाखवा म्हणून विनंती वा हट्ट करून ही तो अंनिसच्या लोकांनी का करून दाखवला नाही. हा प्रश्न आपल्यासारख्या त्यांना सहानुभूती दर्शवणाऱ्यांनी त्यांना विचारायला हवा. कारण ते अशा अनेक भानामतीच्या केसेस यशस्वीपणे हाताळल्याचा दावा करत असतील तर त्यांच्या लेखी हा हातचा मळ आहे. पण तो त्यांनी करून दाखवायला नकार दिला म्हणजे त्यांना ही ते खडे
डोळ्यात घालणे व काढणे - जमणारे नसावे. असो.
त्यांना नाही जमले तर नाही. निदान मित्रांनो आपण घरच्याघरी आरश्यासमोर त्याचा सराव करून प्रयोग करून घरातल्या लोकांना भानामती कसे करतात याचे प्रात्याक्षिक म्हणून दाखवून टाळी मिळवावी. ही विनंती.
प्रा. गळतगे यांनी प्रकरण ७
प्रा. गळतगे यांनी प्रकरण ७ मधे बुध्दिवाद्यांशी आमचे भांडण नाही बुद्धिवादाशी आहे असे म्हटले आहे.>>>
पण मग भांडण कोणाशी करणार ? हवेतल्या हवेत ?
कोण करते याचा शोध घेऊन ही कळत
कोण करते याचा शोध घेऊन ही कळत नाही आणि असे प्रकार इतर कोणी नसतानाच घडतात. >>>>
मग असे प्रकार घडतात हे कशावरुन ? साधी गोष्ट आहे ओकसाहेब , मी उद्या म्हणेण की माझ्या डोळ्यातुन खडे येतात . आता ह्यावर पुरावा काय ? मी काहिहि म्हणेण.
आणी समजा घडले (उदा दगड पडणे ), तर ते माणुस करुन पळुन जाणार नाहि का ?
दुसरी गोष्ट, खडेच का ? हिरे , माणके , पाचु का नाहित ?
किंवा कपडे फाटतातच का ? नवीन कपडे शिवुन का मिळत नाहित ?
किंवा घरावर दगड का पडतात ? सोन्याच्या विटा का पडत नाहित ? जाउ दे, आंबे, सफरचंद का पडत नाहित ?
ज्या गोष्टी दुर्मिळ आहेत त्या कशा येत नाहित ? ज्या गोष्टी सहज सापडतात , फुकट मिळतात त्याच कशा येतात ?
काय राव ओकसाहेब , तुम्हि येवढे विंगकमांडर जरा logically विचार करा की राव! काय पण वाद घालता राव!
दगड मारणे, अंगावरचे कपडे फाटणे, घरावर दगड पडणे, घरातील वस्तूंना आग लागणे हे करुन दाखवायला अनिस कशाला पाहिजे ? भारतात ह्या गोष्टी रोजच घडत असतात राजकिय पक्षांच्या 'कार्यकर्त्यांकडुन' !
मित्रा, "काय राव ओकसाहेब ,
मित्रा,
"काय राव ओकसाहेब , तुम्हि येवढे विंगकमांडर जरा logically विचार करा की राव! काय पण वाद घालता राव!"
माझ्या रँकचा काही संबंध नाही बाबा. इतके लॉजिकल असते तर कर्नाटक सरकारला त्यावर शोध घ्यायला व अहवाल सादर करायची गरज नव्हती. पण तो अहवाल सरकारला विधानसभेत प्रस्तूत करावा लागला कारण अनेक लोक त्या प्रकारांनी त्रस्त झाले होते.
मित्रा, जोवर तुझ्यावर पाळी येत नाही तोवर ठीक आहे. ज्यांना त्या व्यथा भोगायला लागतात त्यांचे अश्रू सांगतात की अघटित घडते आहे. मी ते करत नाही पण आळ मात्र माझ्यावर येतोय.
प्रा. गळतग्यांच्या पुस्तकातील भानामतीच्या केसेस मधील लोकांची फरकट व संसार उद्धस्त झालेले वाचून आपल्याला वाईट वाटल्या शिवाय राहणार नाही. असो.
दुरून डोंगर साजरे म्हणतात तसा प्रकार आहे.
एका अंनिसच्या कार्यकर्त्याला तो त्रास झाल्याची कथा वाचताना अंनिसत काम करणारे त्याला वाळीत टाकून दूर गेले. आदी प्रकरणे रंजक आहेत.
कडेगावची घटना घडली १९८८ साली.
कडेगावची घटना घडली १९८८ साली. जिप सदस्य म्हणजे कुणीतरी संत महात्म्य असल्यासारखं त्यांच्या मताला महत्व दिलं गेलंय. अंनिसच्या अनेक मोहिमांमधे त्यांना विरोध करणा-या संघटनांचे सदस्य त्यांच्या कार्यात विघ्न आणण्यासाठी त्या त्या गावात जाऊन सक्रिय होत असत. यातली एक संघटना पुढे एक राजकिय ताकद म्हणून उदयाला आलेली आहे. त्या त्या गावात लोकांची माथी भडकावून, प्रसंगी गावक-यांना दमदाटी करून अंनिसच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे. त्या वेळी लोक कमी शिकलेले असल्याने त्यांना पाठिंबा मिळत असे. ज्ञात गळतगी यांनी जे कांगावेखोर दावे केलेले आहेत तसेच कांगावे लोकांना भडकावण्यासाठी केले जात.
शिक्षणाने काय झालं ? पाच सहा वर्षांपूर्वी कोल्हापूरजवळ दोन सुशिक्षित तरुणीं एका महाराजकडे आपल्या इच्छा सांगण्यासाठी गेल्या. त्याच्याबद्दल ऐकून असल्याने श्रद्धेपोटी त्या गेल्या होत्या. पण बाबाने त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करायला सुरूवात केली. याआधीही महिलांशी त्याचं वर्णन आक्षेपार्ह होतं. पण अशिक्षित महिला भीतीपोटी गप्प बसत. या दोघींनी मात्र त्या बाबाला धडा शिकवायचा असा निर्धार करून पोलीसांना बोलावलं, अंनिसच्या कार्यकर्त्यांना बोलावलं. अंनिसचे कार्यकर्ते या प्रकरणात आल्याबरोबर त्यांना विरोध करायचा या एककलमी कार्यक्रमाने पछाडलेले विरोधक गावात बाबांविरूद्ध षडयंत्र, धार्मिक श्रद्धांवर हल्ला, कुभांड असा प्रचार करू लागले. पण तोपर्यंत बाबाचे प्रताप माहीत झालेले असल्याने गावातल्या लोकांना फक्त व्हिसल ब्लोअरचीच गरज होती. सर्वांनी मिळून त्या बाबाला यथेच्छ चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यापूर्वी प्रकरणाला धार्मिक रंग आल्याने पोलिसांनीही सबुरीची भूमिका स्विकारली होती.
हेच प्रकरण १९८८ साली घडलं असतं तर गाव गप्पच राहीलं असतं. अशी उदाहरणे आहेत. पुराव्यानिशी अटक होऊनही काही दिवसातच असे बाबा तुरूंगातून सुटून दुस-या गावी जाऊन आपली प्रॅक्टिस सुरू करायचे. प्रा. शाम मानव यांनी दाभोळकरांपेक्षा त्या वेळी जास्त मार खाल्लेला आहे. बुवावाजी विरूद्ध त्यांनी खूपच काम केलेलं आहे. जरी गुंडांच्या मारहाणीने त्या वेळी सामान्य लोक गप्प राहीले तरीही त्यांच्या कामाची पावती म्हणून आज ब-यापैकी जागृती आलेली आहे. अजूनही बुवाबाजी घडते, पण हल्लीचे बुवा अनैतिक प्रकार करू शकत नाहीत. दिलासा देणं आणि आश्वासनं देणं याला कुणाचा फारसा विरोध नाही, मग दैवी शक्तीचा क्लेम का करीनात. पण त्या आडून आदेश दिले गेले, महिलांशी गैरवर्त्न सुरू झालं आणि ते ही धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली तर ज्ञानतपस्वी आवाज उठवणार का ?
याउलट जे चांगलं काम करताहेत त्यांना बदनाम करण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावणा-या या ज्ञानतपस्वींच्या ज्ञानाचा भारतरत्न देऊन गौरव करायला हवा.
ज्ञानतपस्वींनी कडेगावच्या
ज्ञानतपस्वींनी कडेगावच्या भानामती प्रकरणी तिथल्याच गावक-याने केलेला हा खुलासा. याला उत्तर कोण देणार ज्ञानतपस्वी कि ओकसर ?
http://www.misalpav.com/node/20452
या लेखातल्या प्रश्नांची ज्ञात गळतगी अथवा ओकसर यांनी लवकरात लवकर उत्तरे देणे गरजेचे आहे. हे शक्य नसल्यास गैरसमज पसरविणारे आणि सर्वसामान्यांच्या अंधश्रद्धेस कोणतेही कष्ट न घेता खतपाणी घालणारे लिखाण प्रसृत करणा-या या लेखमालेबद्दल ज्ञात गळतगी यांचेतर्फे ओकसर यांनी वाचकांची बिनशर्त माफी मागावी.
अवांतर : हे प्रा. गळतगी कोण आहेत, त्यांना ज्ञानतपस्वी ही पदवी कुणी आणि कशाबद्दल दिली, ही पदवी मिळण्याचे निकष काय आहेत आणि देणा-यांचे ज्ञानक्षेत्रातील योगदान काय आहे हे जाणून घेण्याची विशेष उत्सुकता आहे. शक्य असल्यास माहिती देण्यात यावी.
या लेखाची एक लिंक दैनिक
या लेखाची एक लिंक दैनिक पुढारीस पाठवून त्यांचा खुलासा मागवावा काय ?
<<<<म्हणूनच तर त्याला भानामती
<<<<म्हणूनच तर त्याला भानामती असे नाव दिले गेले आहे. कोण करते याचा शोध घेऊन ही कळत नाही आणि असे प्रकार इतर कोणी नसतानाच घडतात. >>>
अब आया उंट पहाड के नीचे
किरण्यके तुमच्या सग़ळ्या पोस्ट्स आवडल्या. तुम्ही दिलेल्या लिंकवर दाभोळकरांच्या पुस्तकातील संबंधित उताराही वाचायला मिळाला.
ओकसाहेब, तुम्हि माझ्या
ओकसाहेब, तुम्हि माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाहि ?
सोने, चांदी, हिरे, माणके किंवा गेलाबाजार, आंबे, संत्रे अशा वस्तु कशा पडत नाहित ? दगडच का पडले ? फुकट मिळणार्या वस्तु कशा पडतात ?
याचे उत्तर द्या आधी! बाकी ते तुझ्यावर पाळी येत नाहि, दुरुन डोंगर साजरे वगैरे बाजुला ठेवा. मुद्द्यांवर चर्चा करा!
common सेन्स वापरा की जरा. तुम्हि विंग कमांडर असुन, शिकलेले असुन, चांगल्या हुद्द्यावर काम केलेले असुन common सेन्स वापरत नसाल, उगाचच कशालाहि पाठिंबा देण्यासाठी काहिहि युक्तिवाद करणार असाल तर रैंकचा, शिक्षणाचा उपयोग काय हा प्रश्न येणारच!
जर शिकलेली, science म्हणजे काय हे समजणारी माणसे भानामतीसारख्या प्रकाराला पाठिंबा देउ लागली तर धन्य आहे!
भरतजी आभार
भरतजी आभार आपले
@चाणक्यजी
त्यांचा विंग कमांडर या पोस्टबाबत असलेला डिफेन्स बरोबर आहे. एखाद्या रँकच्या अधिका-याने खाजगी जीवनात काय विचार ठेवावेत याला आपण आक्षेप घेऊ शकत नाही. मात्र ते सार्वजनिक जीवनात मांडताना त्यांनी या प्रकरणाबाबत खातरजमा केलेली असणार हा सर्वसामान्यांचा विश्वास ( अंधश्रद्धा ) असतो. म्हणूनच या प्रकरणात मत मांडताना ते एका जबाबदार पदाधिका-याने मांडलेले असल्यानेच आणि समाजावर त्याचा काय परिणाम होईल हे ठाऊक असल्यानेच इतका रस घ्यावासा वाटला. नाहीतर अशा प्रकारच्या चर्चा सोडून द्यायच्या असतात याची पूर्ण कल्पना आहे.
ओक सर आणि ज्ञात .. आपण वरील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्यास मी आपली बिनशर्त माफी मागायला तयार आहे.
परामानसशास्त्र आणि गूढ विद्या याबद्दल मायबोलीवर "एक्स्पायरी डेट " ही एक कादंबरी उपलब्ध आहे. ती आपण वाचावी. त्यात या दोन्हीत कसा परस्परसंबंध असावा याबद्दल थोडेफार विचार व्यक्त झालेत. अर्थात ती कादंबरी असल्याने त्यातल्या गूढ गोष्टी काल्पनिक आहेत. परामानस शास्राला मान्यता मिळवून देण्यासाठी ज्या लोकांनी प्रचंड मेहनत घेऊन काही टेस्टस बनवलेल्या आहेत त्यांनीही स्वतःला ज्ञानतपस्वी म्हणवून घेतल्याचे ऐकिवात नाही. त्यांची मेहनत पहाच एकदा. तरीदेखील त्यांना हे विज्ञान आहे हे सिद्ध करता आलेले नाही आणि त्याची कारणे तुम्हाला गुगलल्यावर सहजच मिळतील. त्यांची तक्रार नाही तर खंत आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्या परामानसशास्त्राचा आधार घेऊन कुणी स्वयंघोषित ज्ञानतपस्वी बुद्धीवाद्यांशी भांडण काढतो हे हास्यास्पद ठरतंय हे ध्यानात घ्या सर ! हा पराचा कावळा होतोय कि कसं हे पहायला हवं...
आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत
हे खरोखर गंभीर आहे. एका
हे खरोखर गंभीर आहे.
एका साईटवर आपल्या लिखाणावर आक्षेप आले, प्रश्न केले गेले की त्यांना उत्तरे देण्याऐवजी किंवा त्यावर चिंतन करून आपल्या भूमिकेचा फेरविचार करण्याऐवजी कोणी जर ती साईट सोडून दुसर्या साईटवर तेच लिखाण प्रसृत करत असेल, तर त्यासाठी 'रिक्षा' हा फारच सौम्य शब्द आहे. याला प्रपोगंडा किंवा अफवा पसरवणेच म्हणता येईल.
२०-२५ वर्षापुर्वीच्या अंधश्रद्धेला समर्थन देणारे लिखाण मायबोलीच्या व्यासपीठावर राहू नये, असे मनापासून वाटते.
भारतीय सेनेत इतके वरिष्ठ अधिकारी असणारे विंगकमांडर एवढे अडाणी असावेत, याचा खेद वाटतो. (अर्थातच ही 'केस' अपवादात्मक असावी, याची खात्री आहे. आम्हाला आमच्या सेनादलांबद्दल प्रचंड आदर आहे.)
त्यांचा विंग कमांडर या
त्यांचा विंग कमांडर या पोस्टबाबत असलेला डिफेन्स बरोबर आहे. एखाद्या रँकच्या अधिका-याने खाजगी जीवनात काय विचार ठेवावेत याला आपण आक्षेप घेऊ शकत नाही >>>>
अहो पण उद्या एखादा देशाचा पंतप्रधान, सैन्याचा जनरल भानामती खरी आहे (किंवा अशा प्रकारचेच विचार ) खाजगी जीवनात जरी ठेवु लागला तर ते देशाला कोठे घेउन जाइल ? उद्या युद्ध चालु असले आणी जर जनरल म्हणाला कि आज अमावस्या आहे, सैन्याने बाहेरच पडु नये, तर चालेल का ? किंवा उद्या कोठे दगडफेक, स्फोट झाला तर काय झाले आहे हे तपास करण्याएवजी हा भानामतीचा प्रकार असु शकेल अशी जरा जरी मनात शंका ठेवणारा अधिकारी असेल तर या देशाची आणी सामान्य माणसाची सुरक्षा आता भानामतीदेवीच्याच हातात!
एका अंनिसच्या कार्यकर्त्याला
एका अंनिसच्या कार्यकर्त्याला तो त्रास झाल्याची कथा वाचताना अंनिसत काम करणारे त्याला वाळीत टाकून दूर गेले. आदी प्रकरणे रंजक आहेत.
> >>> अंनिसचा कार्यकर्त्यालाच जर त्याला भानामती व्हायला लागली तर बाकीचे कार्यकर्ते त्याला वाळीत टाकतील नाही तर काय! योग्यच आहे ते.
वरती जी मिपाची लिंक दिली आहे
वरती जी मिपाची लिंक दिली आहे त्यामधे एका व्यक्तीने दाभोळकराच्या पुस्तकातील प्रकरण सारांश रूपाने टाकले आहे. या मुलीनीच डोळ्यात स्वतःहून खडे घालून घेतले हे कबूल केलय की.
मग कसली डोंबलाची भानामतीफिनामती.
Kiranayake, अरे काय पोष्टी
Kiranayake, अरे काय पोष्टी टाकल्यात... लै भारी...
मी कुठलीही लिंक क्लिक न
मी कुठलीही लिंक क्लिक न केल्याने काही एक कळल नाही. हे ही कळल नाही की इतक्या मोठ्या मोठ्या पोस्टी या धाग्यावर टाकून वरील सर्व मातब्बर मंडळींनी आपला इतका अमुल्य वेळ का वाया घालवला ?
हेही समजत नाही की मी तरी ही पोस्ट लिहुन माझा वेळ का फुकट घालवतोय ? थोडक्यात, मलात्बैकैकळ्त्चनै.
कौतुक गप्पां मारताना आपण फार
कौतुक

गप्पां मारताना आपण फार काही मिळवतो असं नाही
इथं गैरसमज पसरविणा-या व्यक्ती मातब्बर आहेत, त्यांना प्रतिवाद करणा-या नव्हेत. त्यांच्या या मोहिमेमुळे जे लोक चांगले काम करताहेत, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणा-यांना बळ मिळतंय. दुसरं कुणी टाईमपास करणारे असते तर मी नसतो फिरकलो हे आधीच म्हटलंय. तुला जर असं म्हणायचं असेल कि होतंय ते होऊ द्या.. तर आपलं काही म्हणणं नाही.
किरण, मी एरवी अशा बीबींकडे
किरण, मी एरवी अशा बीबींकडे ढूंकून बघत नाही, पण तूमच्या सर्व पोस्ट्सना माझा पाठींबा आहे.
हादेखील मला एक बुवाबाजीचाच प्रकार आहे, असे वाटते.
(चाणक्य, ज्ञानेश.. सर्वांनाच माझा पाठिंबा आहे.) सार्वजनिक क्षेत्रातील, मोठ्या पदावरील लोकांच्या मतांना, सामान्य माणसे महत्व देतात. पण अशा व्यक्ती जर असले घृणास्पद प्रचार करत असतील, तर त्याचा जाहिर निषेधच केला पाहिजे.
अश्या व्यक्तीने कुणाला, मित्रांनो असे संबोधन केले तरी मला त्यात कमालीचा दांभिकपणा दिसतो.
दिनेशदा... थँक्स सर
दिनेशदा... थँक्स सर
ओकसाहेब, जरा विचार करा.
ओकसाहेब,
जरा विचार करा. डोळ्यातून खडे बाहेर येण्यासाठी ते खडे आधी डोळ्यात असले पाहिजेत. त्याशिवाय ते तिथून बाहेर येणार नाहीत.
डोळ्यात खडे असण्याची केवळ दोनच कारणे असू शकतात.
(१) ते खडे नेत्रपटलाच्या आत आपोआप तयार झाले व नंतर तेथून बाहेर आले.
(२) ते खडे बाहेरून कोणीतरी आत ढकलले व नंतर बाहेर काढले.
याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाने डोळ्यांच्या आत खडा निर्माण होऊ शकत नाही.
मानवी नेत्ररचनेमध्ये मातीचे/दगडाचे खडे नेत्रपटलाच्या आत तयार होत नाहीत. मानवी इतिहासात आजवर असे कधीही घडलेले नाही. बाह्य नेत्रात जी धूळ जाते ती झोपेत डोळ्यांच्या कोपर्यात जमा होऊन झोपेतून उठल्यावर चिपाडांच्या स्वरूपात दिसून येते. ती धूळ इतकी अल्प असते की त्यातून मोठ्या आकाराचा किंवा लहान आकाराचा खडा निर्माण होणे अशक्य आहे.
त्यामुळे जर डोळ्यातून खडे निघत असतील, तर, ते प्रथम कोणीतरी बाहेरून आत ढकलले असणार. यात अमानवीय किंवा भानामती किंवा जादूटोणा किंवा चमत्कार असे काहीही नाही.
आयला सगळं अजबच! कुठल्या तरी
आयला सगळं अजबच! कुठल्या तरी बीबीवर सनातनच्या लोकान्ना ईश्वरी ध्वनी ऐकू येतात, असा विषय होता.. तेंव्हासुद्धा ध्वनी व्हायला कंपनाचा स्त्रोत हवा वगैरे डिस्कशन सुरु होते.. पण तेंव्हा कंपनाशिवाय दैवी स्वर ऐकु येतात, हे हिंदुत्ववाद्यान्नी हिरीरीने सांगितले आणि मान्य केले ! आणि आता इथे भानामतीला मात्र तेच भौतिकशास्त्रीय मुद्दे घेऊन विरोध?
असे डबल स्टँडर्ड का बरे?
कंपनाशिवाय आवाज ऐकू येतो, मग अणुरेणु नसताना खडा, दगड तयार होणे, याला मात्र विरोध का बरे ?
ओकसाहेब, तुमचे बरोबर आहे हो...
हा धागा जामोप्यांना दिसू नये
हा धागा जामोप्यांना दिसू नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करत होतो पण ती त्याने ऐकली नाही.
@ किरण, ज्ञानेश, मास्तुरे, आणी इतर सर्व ,
त्या स्वयंघोषित ज्ञानतपस्वींच्या सर्वच मुद्द्यांचे खंडन झाले आहे. आता प्रतिसाद देऊन उगाच टी आर पी वाढवू नये अशी नम्र विनंती.
Pages