पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, कठहल चे लोणचे फार छान होते असे ऐकुन आहे.

सवडीने योग्य जागी टाकेनच पण सध्या घाईघाइत इथे टाकतेय

वाटी भर चवळी ( दाणे ,शेंगा नव्हे ) भिजवून शिजवून घ्यावेत .

फणस उकडून घ्यावा. जुन्या मायबोलीत मला वाटते सविस्तत चर्चा आहे याबाबत.
थोड्या तेलात ४-६ बेडगी मिरच्या , एक टी स्पून धणे परतून घ्यावेत. गॅस बंद करून एक चिमूट हळद टाकावी .

वाटीभर खोबरं अन हे भाजलेले साहित्य अगदी बारीक वाटावे. वाटताना शेवटी एक चिंचेची पाकळी घालावी.

पातेल्यात थोडेसेच पाणी घालून शेवग्याच्या शेंगांचे दीडेक इंचाचे तुकडे घालावेत. उकळी आली की गॅस मध्यम करुन थोडे शिजू द्यावे. मग त्यात फणसाचे तुकडे, चवळी घालून थोडे मीठ घालावे व शिजू द्यावे.
मसाला घालून एक उकळी काढावी. फार वेळ उकळू नये.
शेवटी मोहरी , हिंग , थोडी हळद, सुक्या मिरच्या व भरपूर कढीपत्ता घालून फोडणी घालावी.

याला कडगी , बड्डी , बगडे म्हणतात ( कडगी- फणस, बड्डी - काठी ( शेंगा), बगडे - चवळी )

फ्रेश स्ट्रॉबेरी वापरुन काय करता येइल? क्रुपया मदत करा.

अल्पना, खरडवही बघा.

शेवग्याच्या पानाचे सूप चांगले होते. चिकनचे तुकडे आणि लोणावर परतून घेतलेली हि पाने असे सूप होईल. यात भरीला क्रीम आणि ईतर काहितरी स्वाद घालावा लागेल ( कारण या पानाना जरा उग्र वास असतो )
नेहमीच्या पद्धतीने करताना, लाल मिरची लसणावर खमंग परतून त्यावर शिजलेली तूरिची डाळ घालायची. ( वरण ). अशी भाजी मस्त मिळून येते. नाहीतर हि भाजी जरा चरबट लागते.

त्या फणसातले गरे काढून घ्यावे लागतील. पाव किलो म्हणजे गरे अगदी मोजकेच निघतील. त्याचा तळ चांगला लागतो ( विजया वाड यानी हि कृति कालनिर्णय मधे लिहीली होती )
तुरीची डाळ आणि हे गरे व सोललेल्या आठळ्या शिजवून घ्यायच्या. मग लाल मिरच्याच्या फोडणीवर हे सगळे एकत्र करुन शिजवायचे. मीठ घालायचे, आणि खोबरेल तेलात भिजवून कढिपत्ता घालायचा.
जास्त गरे असतील तर लाल मिरच्या व लसूण यांच्या फोडणीवर परतून कोरडी भाजी करायची. गरे फार जून असतील तर वाफवून घ्यावे लागतात. वरुन ओले खोबरे घालायचे.
अशी गर्‍यांची भाजी, कच्च्या करवंदाची चटणी आणि नाचणीची भाकरी, हा कोकणातला या दिवसातला बेत असतो.

स्पाँज केक असणार जून्या माबो वर.

बरे झाले दिनेश तुम्ही सांगितले. धन्यवाद.चूकून एकदम चार पाच भाज्या आणून खावून कंटाळले. त्यात सणवार आले मग हे चिकन पडून होते, म्हणून एकत्रच करते आता. भाजी खावून कंटाळा आलाय. तुमची ती गोडा मसाल्याची भाजी बटाट्याच्या एवजी चिकन टाकून करायचा विचार होता. पण ही सुद्धा भाजी संपवायची कशी ह्या विचारात होते.

धन्यवाद!! खरेच ठेपले आणी भेळ करता येइल की... मनुस्विनी, मला पेस्टोची क्रुती (अथवा लिन्क ) द्याल का? तुम्ही दिलेला बनाना ब्रेड त्याना आवडलाय..:)

मी इथे डाळींब फार कमी वेळा विकायला पाहिले आहे. तर ते हमखास कुठे मिळू शकेल? (फ्रोजन पण चालेल).

सुनिधी, ट्रेडर जो मध्ये वगैरे असतं डाळिंब. दाणे काढलेलंही पाहिलंय तिथेच.

सायोनारा, मोठं काम केलस गं.. कधी पासुन बाकी दुकानातच शोधत होते. थँक्स.

सुनिधि,bj's मधे असत डाळिंब .मागे मी एकदा चार चार च्या packs मधली आणली होती

जरा थांबुन खरेदी केली असती तर मिळाली असती छान लालचुटुन डाळींबं Happy

सुनीधी, NJला असतेस का? कुठल्याही फार्मर्स मार्केटात मिळेल तुला.

रुनी, बरोबर ग. हलवल इथून.

आर्च इथेच युक्ती नावाचा बाफ आहे ना पूनमने काढलेला, त्यात बहुदा चालू शकेल हे.

माझ्याकडे गावाहुन आणलेले पिकलेले लाल पेरु आहेत. गोव्याची एक मैत्रिण ख्रिसमसच्या दिवसात पेरुच्या वड्या आणायची. त्या कशा करायच्या?
गोडवा आणि प्रादेशीक मध्ये शोधले पण सापडले नाही Sad

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

सविस्तर मग लिहिन, इथे सराईत लोकांसाठी, हे पेरु उकडून, त्यांचा गर घोटून घोटून गाळून घ्यायचा. बिया अजिबात येऊ द्यायच्या नाहीत. मग त्यात तेवढीच साखर, थोडा लिंबाचा रस आणि थोडे तूप घालून आटवायचे. घट्ट गोळा जमला कि ताटात ओतून वड्या कापायच्या.

कंडेन्सड मिल्क चा एक डबा उरलाय.. कसा संपवू?? कुल्फी वगैरेत वापरता येईल का?

फ्रुट सलाड कर...मी त्यातच सगळी फळ घालते...फक्त साखर बघुन घाल्...कारण कंडेन्सड मिल्क मध्ये साखर असते...

फार दाट नाही होणार का? आणि पुरणार ही नाही बहुदा Happy

कुल्फीत घालता येईल.. तसच इथे मलई बर्फीची रेसेपी आहे सायोनी दिलेली, त्यात कन्डेन्स्ड मिल्क वापरलय.. खुप सोपी आहे रेसेपी, अन होतेही मस्त..

मलई बर्फी... तोंडाला पाणी.... नविन की जुन्या मायबोली वर आहे कॄती?

नव्या माबोवर

दाट होईल. वाटले तर जरा दुध घाल..पण चव एकदम मस्त येते...

ह्म्म, हल्ली डाळींबाचा सिजन नाही म्हणुन नाही मिळाले TJ मधे. दाणे होते पण अती-महाग.. थांबेन जरा. मनुस्विनी, मी AZ मधे आहे..
BJ' पण इथे दिसले नाही.
ह्याच्याशिवाय दाबेली करता येइल का? ती मजा नाही येणार ना?

सुनिधी, द्राक्षे कापुन घाल मस्त लागतात. (मला आवडतात)

अरे मस्त कल्पना.. सध्या द्राक्षांचा मोसम पण चांगलाय.. तसेच करेन.

उडद डाळीचे वडे कसे करायचे? जुन्या हितगुजवर रेसीपी नीट दिसत नाही आहे.

मी पण डाळींबाऐव़जी द्राक्षे उभी कापुन घालते. सही लागतात.
प्राजक्ता

Pages