भारत सरकार, पंत प्रधानांच्या आदेशा नुसार सर शोभा सिंग यांचे नाव दिल्ली तील
विंडसर विला (केनाऊट प्लेस) या ऊच्चभ्रू वस्तीला देण्याचा घाट घालत आहेत.
कोण आहेत हे सर शोभा सींग . सर शोभा सिंग हे प्रख्यात
लेखक खुशवंत सींग यांचे वडील. त्यांचा जन्म सद्द्या पाकिस्तानात असलेल्या शाहपूर जिल्ह्यन्म१८९०
साली झाला.
ऐन स्वातंत्र संग्रामाच्या धका धकीच्या काळात, स्वातंत्र संग्रामाला मदत करण्या ऐवजी त्यांनी
आपल्या वडीलांच्या बांधकाम व्यवसायात त्यांनी प्रवेश करून वडीलांचा व्यवसाय वाढवला. आर्धी दिल्ली
अवघ्या २ रु प्रती वर्ग यार्ड ने विकत घेऊन ते दिल्लीचे मालक बनले.
एवढ सर शोभा सिंग यांच गुण गान का करतोय ?
कारण ह्याच सर शोभा सिंग नी शहीद भगत सींग विरूद्ध साक्ष दिली होती.
त्या साक्षी मूळेच भगत सींग, सहदेव व राजगुरु यांना मरे प्रयंत फाशी ची शिक्षा झाली. तत्कालीक
ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली.
ह्याच सर शोभा सिंग यांना भारत सरकारने देश सेवे साठी पद्मभुषण ही पदवी १९७४ ला दिली.
आणी आता भारत सरकार सर शोभा सिंग यांचे ना व दिल्लीतील एका विभागाला देणार आहे.
कारण ह्याच सर शोभा सींग नी
कारण ह्याच सर शोभा सींग नी शहीद भगत सींग विरूद्ध साक्ष दिली होती.
त्या साक्षी मूळेच भगत सींग, सहदेव व राजगुरु यांना मरे प्रयंत फाशी ची शिक्षा झाली. तत्कालीक
ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली. >>>
हे जर खरे असेल तर या गोष्टीचा तिव्र निषेध व्हायला हवा..
त्यांच्या साक्षीमुळे कशी काय
त्यांच्या साक्षीमुळे कशी काय फाशी झाली? त्यान्नी साक्ष नस्ती दिली तर फाशी टळणार होती काय?
ही बातमी गेल्या वर्षीची आहे ना? की सरकारने पुन्हा प्रपोजल पुढे आणले?
जमोप्या, प्रश्न भगत सिंग
जमोप्या,
प्रश्न भगत सिंग यांच्या फाशीचा नाहीय कारण पूरावा मिळो न मिळो ब्रिटीशां कडून त्या तीघांना ( भगत सिंग, राजगुरु, व सुखदेव ) यांना फाशी दिलीच गेली असती.
फक्त ब्रिटीश सरकारच्या मर्जीत रहाण्या करीता सर शोभा सिंग यांनी भगत सिंग विरूद्द
साक्ष दिली. ह्या साक्ष दिल्या नंतर ब्रिटीश सरकार ने त्यांना सर ही पदवी बहाल केली.
ब्रिटीश सरकारच्या मेहेरबानी मूळेच सर शोभा सिंग यांच्या कंपनीला वरच्या दर्जाची
कंपनी मध्ये बदलले. त्यांच्या कंपनीने दिल्लीतील बरेच प्रतिष्ठीत बांधकाम केली. आता च साउथ ब्लोक,
इंडीया गेट, राष्ट्रपती भवन, विजय चौक वैगेरे सर्व बांधकामे शोभा सिंग यांनीच केली आहेत.
एका फाशीच्या साक्षीसाठी सर
एका फाशीच्या साक्षीसाठी सर पदवी दिली, म्हणजे ब्रिटिश फारच उदार होते म्हणायचे... या हिशोबानं किमान आठ दहा हजार आणखी लोकान्ना सर मिळायला हवी होती.. ( इतर वेगळ्या वेगळ्या केसेस्मध्ये)
विवेक ते सिंग कराल का कृपया
विवेक ते सिंग कराल का कृपया ?
दुर्दैवाने आपल्या देशात असाच पैशेवाल्या लोकांना मानमरातब मिळतो.
मध्यंतरी फेसबुकवर एक फोटो पाहिला होता त्यात सोनिया गांधी वायुसेनेच्या हेलिकॉप्टर मधुन उतरत आहे आणि लिहिलं होतं की वायुसेनेच हेलिकॉप्टर त्यांनी बर्याचदा वापरलयं.
गेल्या वर्षीची बातमी... आता
गेल्या वर्षीची बातमी... आता का धागा काढला? नुस्त्या एका साक्षीमुळे त्याना सर नसेल मिळाली... त्यान्नी दिल्लीत प्रचंड बांधकामे केली.. ते कसले तरी लोकप्रतिनिधीही होते..
वाल्या कोळी, बातमी कधीची
वाल्या कोळी,
बातमी कधीची असली तरी मनातल्या जखमा अजूनही ताज्याच आहेत.
ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी त्यांच्या प्रचंड कर्तूत्वा मूळे व त्याच्यां ब्रिटीश सरकारच्या प्रती
असलेल्या निष्ठ मूळे दिलीही असेल,
ज्या काळात सर शोभा सिंग यानी ब्रिटीशाप्रती निष्ठा दाखवली, आपला व्यवसाय उभारला पैसे कमवले
त्या काळात लोक घरातल्या उपयोगी विदेशी वस्तू सुद्धा स्वदेशी चळवळीत जाळत होते.
मला वाईट ह्या गो ष्ठीच वाटत की ह्याच भारत सरकारने त्यांना नावाजले. १९७४ मध्येच पद्म भूषण दिल.
फाशी जाणारा शहीद भगत सिंग ही सिखच होता, त्या मूळे त्या काळात सर्व सिख धर्मीय या शोभा सिंग च्या
विरुद्द् झाले. त्यांना जणू वाळीतच घातले होते.
त्या विरूद्ध त्या शहिद भगत सिंगला व त्याच्या परिवाराला काय मिळाले ? अरे त्या शहीद त्रिकुटाला
त्या वेळच्या कांग्रेस ने स्वातंत्र सैनिक म्हणून स्विकारलेही नाही !! कारण भारताच स्वातंत्र फक्त अहिंसेच्या
मार्गाने मिळवायचे होते ना !! आणी ईतक्या वर्षांने सुद्धा ते सर्व शहिद अनामिकच राहीलेत.
शोभा सिंगानी बिल्डिंगा
शोभा सिंगानी बिल्डिंगा बांधल्या.. त्या देशातले दगड विटा वापरुनच ना? यात , लोक परदेशी वस्तु जाळत होते याचा संबंध आलाच कुठे? या वास्तु भले तेंव्हा इंग्रजांचया असतील, तरी त्या देशाच्याच रहाणार होत्या... ( आणि आज याच वास्तुत स्वदेशी लोक सरकार म्हणून बसतात.. असा काय मोठा उजेड पाडतात?
) त्यामुळे त्यांचं श्रेय हे त्याना दिलेच पाहिजे..
भगत्सिंगी लोकांचं काही समजतच नाही.... त्या लोकाना इंग्रजानी ताबडतोब अटक केली होती.. इतर अनेकही साक्षीदार होते.. त्यामुळे त्यांची शिक्षा अटळच होती.. असं असताना शोभा सिंगानी साक्ष दिली म्हणूण फाशी झाली असा गळा काढतात.. एवढ्यावरच नाही, तर गांधीजीनी माफीची मागणी केली नाही, म्हणून फाशी झाली, असं गांधीजीनाही दुषणे देतात.. एकंदर, भगतसिंग काय आणि गांधीजी काय, आज लोकाना ही नावे वापरुन नुस्ता कुणा ना कुणा विरोधात दंगा करायचा असतो. जखमा अजून भरल्या नाहीत म्हणे! ठेवा तशाच ! जखमा भरल्या नसतील तर आता पुढचा धागा भगतसिंग आणि गांधीजी किंवा काँग्रेस असा काढा.. शुभेच्छा!!
त्या विरूद्ध त्या शहिद भगत सिंगला व त्याच्या परिवाराला काय मिळाले ?
परदेशात राहून डॉलर मिळवता ना? तुमचा निम्मा पगार भगतसिंगांच्या आणि स्वातंत्रसैनिकांच्या वारसाना शोधून त्यना स्कॉलरशिप म्हणून द्या! तुमच्यासारख्यानीच सुरुवात करायला हवी. नै का? म्हणजे जखमा नक्कीच भरतील.. नुस्त्या पोकळ धागे काढून आणि स्वतः परदेशात राहून काँग्रेसला शिव्या देऊन जखमा कशा भरतील?
ज्या काळात सर शोभा सिंग यानी ब्रिटीशाप्रती निष्ठा दाखवली, आपला व्यवसाय उभारला पैसे कमवले
तुम्ही तरी आज दुसरं काय करताय?
त्यन्नी भारतात राहून इंग्रजांचे पैसे वापरुन भारतातल्या वस्तु वापरुन , भारतीय लोकान्ना रोजगार देऊन इथे वास्तु उभारल्या.. तुमच्या आमच्यापेक्षा त्यांचं देशासाठी असलेलं योगदान जास्तच आहे नै का?
जखमा अजून भरल्या नाहीत म्हणे!
जखमा अजून भरल्या नाहीत म्हणे! ठेवा तशाच ! शुभेच्छा!!
तेच ना! अहो तुम्ही भरु द्याल तर ना. तुम्ही जाता येता काढा खपल्या. मग कशा भरणार जखमा?
हे इतके माहित नव्हते, इथे
हे इतके माहित नव्हते, इथे दिल्याबद्दल धन्यवाद
दिल्लीतील त्या अमुक रस्त्याला
दिल्लीतील त्या अमुक रस्त्याला सर शोभा सिंग यांचे नाव द्यावे की ना द्यावे यावर चर्चाचर्वितण होत राहाण्यास हरकत नाही, पण त्या निमित्ताने 'भगत सिंग, राजगुरु, सुखदेव' यांची फाशी व सर शोभा सिंग यांची साक्ष यांची सांगड घालणे म्हणजे त्या केसविषयीचे अज्ञान प्रकट करणे ठरेल.
भगतसिंग (आणि अन्य दोघांना) फाशी झाली ती जॉन सॉन्डर्स या लाहोरच्या असि.पोलिस सुपरिंटेन्डेट आणि त्याचा सहाय्यक हेड कॉन्स्टेबल चरण सिंग यांच्या हत्येच्या संदर्भात. [खरे तर त्याना मारायचे होते जेम्स स्कॉट या ब्रिटिश अधिकार्याला - एका निदर्शनात ज्याच्या हल्ल्यामुळे लाल लजपतराय यांचे इस्पितळात प्राणोत्क्रमण झाले होते व भगत सिंग प्रभृतीनी त्या मृत्युचा बदला म्हणून स्कॉटवधाची आखणी केली होती. प्लॅननुसार क्रांतिकारी गटातील जय गोपाल याने स्कॉटला हेरून भगत सिंग याना इशारा करायचा होता, पण त्याच्याकडून चुकीने जॉन सॉन्डर्स यालाच 'स्कॉट' समजले गेले आणि त्याच्या इशार्यावरून भगत सिंग आणि राजगुरू यानी सॉन्डर्स आणि त्याला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या चरण सिंग यांच्यावर फैरी झाडल्या, त्यात ते दोघेही मृत्यू पावले.]
ही गोष्ट १७ डिसेम्बर १९२७ ची.
लाहोर इथून हा क्रांतिकारी गट निसटला आणि पुढे दरमजल वेषांतरे करून कलकत्ता येथे आला होता व तिथूनच आपल्या कार्याची (H.S.R.A) करू लागला. दिल्ली असेम्ब्ली बॉम्ब स्फोट ही पुढील पायरी होती, जी घडली ८ एप्रिल १९२९ रोजी. या स्फोटा नंतरच्या गोंधळात भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त त्या वेळी पळून न जाता जाग्यावरच "इन्किलाब झिंदाबाद" च्या घोषणा देत प्रेक्षागच्चीत उभे राहिले. पोलिसांनी या दोन युवकांना तिथे पकडून तुरुंगात नेले व पुढे त्यांच्यावर 'बॉम्बस्फोटा' ची केस दाखल करण्यात आली. भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी त्या कृत्याचा इन्कार केलाच नाही. उलट पळून न जाता स्वतःहून ते पोलिसाच्या हवाली झाले होते. [या बॉम्बस्फोट प्रसंगी दिल्लीत राजगुरू व सुखदेव नव्हते हे लक्षात घ्यावे.]
आता आपण जाणतो की कायद्याच्या भाषेत कथीत आरोपीने एखादा गुन्हा जरी विनाशर्त कबूल केला असला तरी तो गुन्हा त्याच्यावर 'सिद्ध' करणे कोर्टाचे काम असते व त्यानुसार साक्षीपुरावे गोळा केली जातात. भगत सिंग व बटुकेश्वर दत्त यानीच ते बॉम्ब (ज्यात कुणाचाही मृत्यु झाला नव्हता, फक्त फरशीचे तुकडे उडाले आणि दोनचार लोकांना किरकोळ जखमा झाल्या होत्या) फेकले यासाठी सरकारतर्फे जे 'प्रत्यक्षदर्शी साक्षीदार' सादर करण्यात आले त्यातील एक सर शोभा सिंग; जे स्वतःच या दोघांसारखेच असेम्ब्ली गॅलरीत प्रेक्षक म्हणून त्या दिवशी उपस्थित होते. त्यांच्या साक्षीत केवळ हाच भाग होता की, 'ज्या दोन युवकांनी तो हातबॉम्ब फेकला, तेच हे दोघे." बस्स, संपली साक्ष. [हे एवढ्यासाठी करणे गरजेचे असते की, कोर्टाला खात्री पटणे आवश्यक असते की पोलिसांनी जे दोन आरोपी गुन्हेगार म्हणून कोर्टात आणले आहेत त्याना कुणीतरी ते कृत्य करताना प्रत्यक्ष पाहिले आहे. केवळ 'आम्हीच तो बॉम्ब फेकला' असे म्हणणे पुरेसे नसते. कदाचित अन्य कुणालातरी वाचविण्यासाठीही हे दोघे तो आरोप स्वतःवर घेत असतील असेही कोर्टाचे मत असू शकते, म्हणून साक्षीचे महत्व.]
या गुन्ह्याची सुनावणी झाली आणि 'असेम्ब्लीत बॉम्ब फेकला' हा आरोप सिद्ध होऊन भगत सिंग व बटुकेश्वर दत्त याना १४ वर्षाचा सश्रम तुरुंगवास झाला. इथे ती केस संपली.
पण पुढे लाहोर कोर्टात 'सॉण्डर्स मर्डर केस' उभी राहिली त्यावेळी त्या क्रांतिकारी दलाच्या सुमारे २२ कार्यकर्त्यांना तेथील पोलिसांनी विविध ठिकाणाहून शोधून काढले होते. त्यांच्या कबुलीजबाबातून आणि साक्षीपुराव्यातून त्या मर्डरमध्ये राजगुरु व सुखदेव यांच्यासोबत भगत सिंग नावाचा आणखीन् एक युवक नेता असल्याचे स्पष्ट झाल्याने लाहोर पोलिसांनी दिल्ली कोर्टातून १४ वर्षाची कैद सुरु झालेल्या व आता तुरुंगात असलेल्या भगत सिंगला आपल्या ताब्यात घेतले व लाहोर इथे आणले (बटुकेश्वर दत्तना नाही).
त्यानंतर लाहोर इथे 'सॉण्डर्स मर्डर केस' सुरू झाली आणि तिचा निकाल लागून त्या तीन क्रांतिकारकांना मरेपर्यंत फाशी झाली व त्यांच्या अन्य १२ साथीदारांना ५ ते ८ वर्षापर्यंतच्या शिक्षा झाल्या. [लाहोर कोर्टाच्या निर्णयाविरूद्ध लंडनच्या प्रिव्ही कौन्सिल इथेही अपील केले गेले होते पण ते फेटाळले गेले]. तिघांच्या फाशीची अंमलबजावणी २३ मार्च १९३१ रोजी झाली.
असा हा इतिहास असताना भगत सिंग यांच्या फाशीचा आणि त्याबद्दल सर शोभा सिंग यांच्या असेम्ब्लीकांड साक्षीचा संबंध आणून भावनात्मक वातावरण तयार करणे योग्य नाही. त्या रस्त्याला शोभा सिंग यांचे नाव देऊ नये यासाठी प्रयत्न करणारे करोत, पण त्याकरीता जे प्रत्यक्षात घडलेलेच नाही त्याचे कारण पुढे आणू नये इतकेच.
अशोक पाटील
अशोक, हेही इतके माहित नव्हते,
अशोक, हेही इतके माहित नव्हते, इथे दिल्याबद्दल धन्यवाद
अशोक उत्तम पोस्ट. विवेक,
अशोक उत्तम पोस्ट.
विवेक, भावना समजू शकतात, पण आता पुढे बरेच करण्यासारखे आहे. तेव्हा हे सगळे मागेच ठेवलेले बरे. नाही का ?
जमोप्या.... आमचे धागे
जमोप्या....
आमचे धागे पोकळ आणी तुम्ही काढलेले सर्वच धागे खुप भरीव होते ?
माझ्या एका धाग्या ने तुमची अशी अवस्था तर तुमच्या ठाई ठाई काढलेल्या " त्या " धाग्या मूळे
लोकांची काय आवस्था होत असेल ?
सुरुवात आमच्या पासून करू हो पण तुम्ही का य टाळ्या वाजवणार ?
तुम्ही सुद्धा भारतात राहून, खोर्याने पैसे ओढता आहात मग तुम्ही किती ठिकाणी अशी मदत केली ? किती
अंधश्रद्धा निवारणाच काम केल ? का फक्त दुसर्यानाच उपदेश ?
अशोक पाटील, जर ब्रिटीश
अशोक पाटील,
जर ब्रिटीश राजवटीत न्याय व्यवस्था ईतकी पारदर्शक व चोख होती तर,
त्यांनी जालियनवाला बाग प्रकरणात १००० पेक्षा जास्त बळी घेतलेल्या जनरल डायर याला काय शिक्षा दिली
होती या वर जरा प्रकाश टाकाल ?
जनक्षोभ शोभा सिंगच्या विरूद्धात होता हेच त्या वेळी दिसून आले आणी ह्याच मूळे गेल्या वर्षी प्रस्तावित
नामकरण अजुनही गुलदस्त्यात आहे, सरकार त्यावर निर्णय घ्यायला कचरत आहे.
श्री.नाईक ~ फक्त ब्रिटीश
श्री.नाईक ~
फक्त ब्रिटीश राजवटी दरम्यानचीच न्यायव्यवस्था नव्हे तर अगदी जगातील कोणत्याही देशाच्या राजकीय वा सामाजिक विषयांबाबत तुम्हाला आवश्यक वाटणार्या प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरे देऊ शकतो. गेली चाळीस वर्षे मी याच विषयांच्या अभ्यासात आहे. अत्यंत निर्लेपपणे इतिहासाचा मागोवा घेतला तरच निखळ सत्याचे किरण नजरेसमोर येत जातील. मात्र कोणत्याही घटनेत "भावना" रंग मिसळला की इतिहासाची पाने नीटपणे उलगडली जात नाही. आपल्या भारतदेशात [त्यातही सांप्रत महाराष्ट्रात] इतिहासाकडे रोखठोकपणे पाहण्याची दृष्टी दुर्दैवाने इतकी रुजलेली नसल्याने कोणत्याही गोष्टीचा अन्वयार्थ लावताना आपल्या 'रेडिमेड' पूर्वमताचेच भिंग घेऊन त्याकडे पाहिले जाते.
मी वरील प्रतिसादात स्पष्टच म्हटले आहे की, असेम्ब्लीकांड आणि भगत सिंग यांच्या फाशीचा कसलाही संबंध नाही, त्यामुळे शोभा सिंग यांची साक्ष आणि लाहोर खटला याचा दूरान्वयेही संबंध नाही. दिल्लीच्या नॅशनल आर्काईव्हजला वा जेएनयूला कधी भेट देण्याची तुम्हाला संधी लाभली तर तेथील 'सी' सेक्शन लायब्ररीमध्ये 'लाहोर डुरिंग ब्रिटिश' कॅटलॉग मिळेल. तिथे "सॉन्डर्स केस' संदर्भात तब्बल अडीच हजारापेक्षाही जास्त पानांच्या फाईल्स मिळतील. यापैकी एकाही पानात ती मर्डर केस घटनाक्रम आणि असेम्ब्ली बॉम्बब्लास्ट यांच्या एकमेकासंबंधी विषयीची न्यायाधिशांचीच नव्हे तर पॅनेलवर काम करणार्याचीही टिपणी नाही.
असो.
खरे तर या धाग्यावर 'जनरल डायर' या व्यक्तीसंदर्भात लिहिणे योग्य नाही. त्यासाठी वेगळा धागा तुम्ही सुरू केला असता तर सविस्तर उत्तर दिले असते. तरीही आता तुम्ही विषय छेडला आहेच म्हणून सांगतो की, जन.डायरवर त्या नृशंस हत्याकांडाबद्दल ब्रिटिश सरकारने ठपका ठेवून त्याला नोकरीतून तात्काळ मुक्त केले व मायदेशी परत पाठविले. केवळ भारतीयांनीच नव्हे तर इंग्लंडमधीलही विचारवंतांनी जनरल डायर याच्या त्या कृत्याचा तीव्र निषेध केला होती. मी नावे देत बसत नाही, पण तरीही ज्या एका व्यक्तीने जनरल डायरचे ते कृत्य "अत्यंत निंदनीय असून त्याबद्दल केवळ डायर आणि ओड्वायर यानाच शिक्षा न देता ब्रिटिश व्हाईसरॉयवरही स्वतंत्र खटला चालवून या तिघांना या अमानवी हत्याकांडाबद्दल शिक्षा होणे गरजेचे आहे" असे म्हटले होते. ती व्यक्ती म्हणजे विन्स्टन चर्चिल.
बाकी शोभा सिंग यांचे त्या रस्त्याला नाव द्यावे की न द्यावे याबद्दल सरकार जनमत विचारात घेईलच. पण इथे त्यासंदर्भात इतिहासाची मोडतोड करू नये इतकेच म्हणेन.
अशोक पाटील
अशोक पाटील>>> पोष्ट खुप
अशोक पाटील>>> पोष्ट खुप आवडली, सविस्तर दिल्याबद्दल धन्यवाद..
छान माहिती
छान माहिती
संदर्भ :
संदर्भ : http://www.maayboli.com/node/32571
सर शोभा सिंग हे लेखक खुशवंत सिंगांचे वडील.
लेखक खुशवंतसिंग हे अभिनेत्री अमृता सिंगचे आजोबा. अमृता सिंगने बॉबी देवलवाल्या भगतसिंगच्या पिक्चरमध्ये त्याच्या आईची भूमिका केली. योगायोग.
श्री पाटील, तुम्ही ४०
श्री पाटील,
तुम्ही ४० वर्ष ईतिहास अभ्यासता आहात म्हणजे तुमचे मत ग्राह्य आहे व मला ते मान्य करण्यात
कमी पणा नाही. मी स्वता: ईतिहासाचा अभ्यासक किंवा जाणता नाही त्यामूळे माझ मत ईतर वाचनामूळे तयार
झालय.
आपल्याला ज्ञात असलेला व शिकवला गेलेला भारत स्वातंत्राचा सर्व ईतिहास तुमच्या मते खरा आहे का ?
ब्रिटीशाच्या मते स्वतंत्र सेनानी हे अतिरेकीच ! त्यामूळे त्यांनी लिहीलेला ईतिहास आपल्या विरूद्ध
असणारच.
गेल्या काही महीन्यापूर्वी ब्रिटीश पंत प्रधानाना भारतीय वार्ताहारा ने विचारल होत की भारताचा कोहिनूर हीरा
व बाकी काही रत्न जडीत शस्त्रे राणीच्या खजिन्यात आहेत ते सर्व परत करणार का?
त्यांनी निर्लज्यपणे सांगितल की ते सर्व ब्रिटीश मालकीच आहे,
ईतिहास हा जेते लिहीतात व बहूदा तो त्यांच्या वतीनेच लिहीतात.
अवांतरः जनरल डायर ह्याला १७ जुन १९२० रोजी कर्नल ह्या पदावर सेनेतून निव्रूत्ती दिली. त्याला १००० लोकांना मारण्यासाठी जरा ही शिक्षा झाली नाही पण तो ब्रिटीश ईंडिंयात व ब्रिटन मध्ये हिरो ठरला.
युद्धात त्यान्नी जिंकलं
युद्धात त्यान्नी जिंकलं म्हणजे आता त्यांचं झालं की ते !
शोभा सिंग, जालियनवाला, डायर, कोहिनुर हिरा... चालु द्या . इंग्रजी सत्तेचा इतिहास असं एखादं गप्पांचं पानच कुणीतरी सुरु करा.
कृपया अर्धवट माहीती घेउन
कृपया अर्धवट माहीती घेउन अर्धवट पध्दती ने लिहु नये.... कारण अशी अर्धवट माहीती घेउनच लोक अर्धवट भावना घेउन रस्त्यावर उतरतात......
अशोक यांची हवी तर मदत घेउन परत लिहा........ जे खर आहे ते समोर यायलाच हवे....यात दुमत कोणाचे ही होणार नाही.... परंतु काही थोड्याश्या माहीती ने सत्य सुध्दा असत्य बनु शकते......
मी तर भगत सिंग यांचे ही नाव असावे या मताचा आहे ......
एवढ सर शोभा सिंग यांच गुण गान
एवढ सर शोभा सिंग यांच गुण गान का करतोय ?
कारण ह्याच सर शोभा सिंग नी शहीद भगत सींग विरूद्ध साक्ष दिली होती.
त्या साक्षी मूळेच भगत सींग, सहदेव व राजगुरु यांना मरे प्रयंत फाशी ची शिक्षा झाली. तत्कालीक
ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली.>>>>>>>>>>>>>>>
कृपया हे बद्लावे.............अशोक यांनी यावर खर काय घडले हे सांगितलेले आहे...... उगाच सत्याला नाकारु नका..
तुम्ही सुद्धा भारतात राहून,
तुम्ही सुद्धा भारतात राहून, खोर्याने पैसे ओढता आहात मग तुम्ही किती ठिकाणी अशी मदत केली ? किती
अंधश्रद्धा निवारणाच काम केल ? का फक्त दुसर्यानाच उपदेश ?
असे कसे म्हणता? अहो त्यांना ते पैसे स्विस बँकेत ठेवायला लागतात. क्रिकेटवर, बॉलीवूडवर उधळायला लागतात!
खरी जळजळ खालील वाक्यावरून दिसून येते!
परदेशात राहून डॉलर मिळवता ना?
बास. असे नाही, की गेले परदेशात तर गेले उडत, आम्ही आमचा देश चांगला करू शकतो! छे: छे:, आपण काही करायचे नाही, दुसर्या कुणितरी करावे!
बाकी कुठलाहि विषय नावाला. काहीतरी करून डॉलर मिळवणारे, ब्राह्मण, हिंदू यांना शिव्या देणे हेच मायबोलीवर चालू असते!
असे अनेSक, अनेSक भारतीय तुम्हाला या मायबोलीवर सापडतील. त्यांची नुसती गंमतच बघा!!
मायबोलीवरील चर्चेत भारतीय उतरले की एकदम रंगत येते चर्चेला, नुसती धम्माल!!
अशोक पाटील, पोस्ट आवडली. बरीच
अशोक पाटील, पोस्ट आवडली. बरीच नवीन माहिती मिळाली.
आपल्याकडून असे इतर माहितीवाले लेख वाचायला आवडतील. वेळ मिळाल्यास जरूर लिहा. खरे म्हणजे १९४७ च्या आसपासच्या घटनांबद्दल (किंवा नंतरच्याही) आमच्यासारख्या बहुसंख्य लोकांना पेपर्समधे, एखाद दोन पुस्तकांमधे वाचलेले किंवा कधी वेब वर सर्च करताना जे पहिल्या एक दोन पानांवर मिळते ते बघितलेले - एवढेच माहीत असते. तुमच्या वरच्या पोस्ट्स मधे त्या स्वतंत्र घटनांचे विश्लेषण चांगले झाले आहे. तुमच्याकडून त्यावेळच्या विषयांवर लिहीलेले वाचण्याची उत्सुकता आहे.
छान माहिती
छान माहिती
१९७४ साली पद्मभूषण मिळाले ते
१९७४ साली पद्मभूषण मिळाले ते सर शोभा सिंग याना की खुश्वंत्सिंग याना?
http://en.wikipedia.org/wiki/Padma_Bhushan_Awards_(1970%E2%80%931979)
http://en.wikipedia.org/wiki/Khushwant_Singh
खुशवंत्सिंगना लिटरेचरसाठी पद्मभूषण दिले, पण ते त्यान्नी सरकारला परत केले. वर उल्लेख केलेला सर शोभा सिंगना पद्मभूषण नेमका कधी दिला होता.. की हीदेखील लेखकाची कविकल्पना?
१९५४ ते १९८० पर्यंतच्या
१९५४ ते १९८० पर्यंतच्या पद्मभूषणच्या यादीत सर शोभा सिंगांचे नाव नाही. खुशवंत सिंगाना १९७४ साली मिळाले ते त्यानी सुवर्ण मंदिराच्या घटनेच्या निषेधार्थ १९८४ साली परत केले... त्यानंतर पुन्हा त्याना पद्मविभूषण दिले २००७ साली . लिटरेचर आणि एज्युकेशन यासाठी.
http://en.wikipedia.org/wiki/Padma_Bhushan
http://en.wikipedia.org/wiki/Padma_Vibhushan
ह्याच सर शोभा सिंग यांना भारत सरकारने देश सेवे साठी पद्मभुषण ही पदवी १९७४ ला दिली.
???
अशोक पाटील हे एक अभ्यासू आणि
अशोक पाटील हे एक अभ्यासू आणि संतुलित विचारसरणीचे दिसतात. त्यानी माबोवर स्व्तंत्रपणे इतरत्र त्यांच्या आवडीच्या व अभ्यासाच्या विषयावर लिहिले तर माबो ला खूप चांगले कॉन्ट्रिब्युशन होइल. सध्या माबोला फारच साचलेपण आले आहे.:(
http://www.indianexpress.com/
http://www.indianexpress.com/news/home-ministry-rejects-proposal-to-rena...
प्रकरण कधीच संपले आहे.
Pages