पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जामोप्या, अफूच्या पानाची भाजी करतात. अफिम कि सब्जी म्हणुन फेमस आहे ती. पण मूळात झाड आपल्याला अप्राप्य, त्यात त्या पानांची भाजीसाठी बरीच उस्तवार करावी लागते... मला नेमकी कृति माहीत नाही, पण खायची ईच्छा आहे मात्र !

कच्च्या पपईची भाजी कशी करायची? एक तुप जीरे घालुन फोडणी करुन पपईच्या फोडी घालुन परतायच्या ही माहीती आहे. दुसरी पद्धत कोणाला माहीती आहे का?

अमया तुला उपासा साठि नको असेल तर अजुन एक पधत
तेल चांगल तापवुन त्यात लस्णाची फोड्णी द्यायची, लसुण लालसर झाल्यावर कमी गॅस करुन लाल तिखट, ह्ळ्द, मीठ, थोडा काळा मसाला तेलातच टाकायचा, मग लगेचच आल्,लसुण्,कोथिंबीर जिरं याच्यि पेस्ट घालायचि. थोड परतल्यावर , बारीक चिरलेला टमाटर आणि पपई च्या फोडी घालाय्चा . फोडि चांगल्या शिजु द्याव्या आणि मग गरम पोळि सोबत ............... आवड्ल्यास प्रतिसाद देशील.

दिनेशदा .... मला पानांचि नव्हे तर खसखसी चा झुणका म्हणुन वर्‍हाडात प्रचलित भाजि जाणुन घ्यायचि होति.

वर्‍हाडात उन्हाळ्यात ही भाजी केली जाते ( भाज्या मुबलक प्रमाणात मिळत नाही) खसखस कोमट पाण्यात भिजत घालावी. कांद्याची पीठ पेरून भाजी करतो, इकडे विदर्भात त्याला झुणका म्हणतात त्याप्रमाणेच करावी, बेसनाच्या ऐवजी भिजवलेल्या खसखशीची पेस्ट लावावी.

माझ्याकडे लाल कोबी आहे आणि पिवळी आणि लाल सिमला मिर्ची आहे या तिघांच मिळु न किंवा स्वतंत्रपणे काय करता येईल. प्रत्येकी दोन असे एकुण सहा नग आहेत. हिरवी सिमला मिर्चीही आहे.

सोप्पा आणि छान [पटकन होणारंही....जमलच तर डाएटसाठी चालणारं ] असं काय करता येऊ शकेल्?

[अपे़क्षा फारच जास्त आहेत नै Proud ]

आग्गावुच थॅक्यु हं.

हे प्रकार शिजवल्यावर त्याची चव जाते. त्यामूळे अगदी बारीक लांब कापून त्याचे सलाद करणे चांगले. डायेटसाठी तर छानच. ड्रेसिंगसाठी व्हीनीगर + तेल + मिरपूड +लसूण असे एकत्र करुन घ्यावे. हवेच तर त्यात पनीर किंवा नट्स टाकू शकता.

मनिषा, मिनोतीची एक सुप रेसिपी होती , जुन्या मायबोलीवर रेड बेल पेपर सुप म्हणुन ते छान आहे. डाएट साठी पण. उरलेल्याचे दिनेशदानी सांगितल्यासारखे सलाड कर. किंवा दिनेशदांची अजुन एक रेसिपी होती रताळा रोष्टी म्हणुन ते चालणार असेल तर बघ.

पिठ पेरुन भाजी कशी करायची? माझी चांगली होत नाही. उदा. कोथिंबीर, मेथी, ढब्बी मिरची इ.

राजुल थोड्या जास्त तेलाच्या फोडणीत भाजी परतुन तिखट्-मीठ घालुन त्यावर बेसन पिठ पेरावे ..मिक्स करुन झाकण ठेवुन वाफ आणावी..

राजुल, मी आधी थोड्या तेलात बेसन भा़जुन घेते. ते बाजुला काढुन ठेवते. मग सुलेखाताईंनी सांगितल्यासारखी भाजी करते. भाजी शिजत आली की त्यात भाजलेले बेसन घालते. त्यामुळे भाजी मस्त खमंग होते .

राजुल मी, मावे मधे भाजी वाफवुन घेते. मग कमी तेलात फोडणीस टाकुन, पाण्याचा हबका मारते. पाणी आटले की पिठ घालते. स्पेशली भाजणी पेरणार असाल तर कच्चे रहाण्याचा प्रश्ण नाहि. बेसनासाठी चांगली वाफ आणावी लागेल. मी जास्तीत जास्त वेळा भाजणी वापरते.

मोना, आज ईटीव्ही वर गव्हाच्या चिकाचे अनारसे दाखविले. चीक व पिठी साखर भिजवून खसखस लावून तुपात तळले अग्दी नाजूकपणे. नाहीतर ते मोडतात. तुझ्या रेसीपी बँक मध्ये भर. Happy

पिठ पेरुन भाजी - जी भाजी असेल ती तिखट मिठ घालून तेलावर परतून घ्या. २-३ चमचे पाणि घालून झाकण ठेवून वाफ काढा. आता बेसन नीट पसरा, परत २-३ चमचे पाणि शिम्पडून झाकण ठेवून वाफ काढा. आणखी एकदा २-३ चमचे पाणि शिम्पडून झाकण ठेवून वाफ काढा. हे सगळे मन्द गॅसवर करा, एकदम झकास होते भाजी. करा आणि सान्गा

दिपाक७३.माझे थालीपिठ भाजणीचे प्रमाणः १किलो ज्वारी,१ किलो बाजरी,१/२ किलो बार्ली [मिळाली तर]प्रत्येकी १-१ वाटी सबंध मुग्,उडिद्,देशी चणा,१ -१ मुठ प्रत्येकी धणे व जिरे. यातील प्रत्येक जिन्नस कढईत वा मावेत भाजुन घ्यायचा.धान्य भाजले गेले कि हलके होते म्हणजे परतताना तसे जाणवते व वास दरवळतो.आपण रोज गव्हाची पोळी खातो म्हणुन यात मी गहु घालत नाही..

monalip, पिठ पेरून वाल्या भाजीत बेसना एवजी भाजणी वापरता येते का? असे असेल तर उत्तमच कारण आयती भाजणी असल्याने तिची थालीपीठं जरा कोरडिखट्ट होतात, मग ते पिठ असं संपवता येईल. Happy
अजून कशात घालता येईल भाजणी?

@ हसरी , मी असा करते केक

१ hide n seek चा पुडा (18 rs वाला)
१ parle चा पुडा ( 5 rs वाला)
1 कप दुध
५ चमचे साखर
१ eno

आधी बिस्कीटचे दोन्ही पुडे मिक्सर मधुन बारीक करुन घ्या. मग दुधात साखर घालुन ते बिस्कीट पावडर मध्ये हळूहळू मिक्स करा. एकदम पातळ मिश्रण करु नका. सर्वात शेवटी त्यात eno मिक्स करा. मग केक च्या भांड्याला तुप लावुन त्यावर थोडेसे गव्हचे पिठ किंवा मैदा टाकुन त्यात हे मिश्रण टाकुन बेक करा.

माझ्याकडे ओव्हन नाहिये त्यामुळे ति setting महित नाहि, मि कुकर मध्ये करते

मी चॉकलेट केक केलेला त्याचे बरेच बारीकबारीक तुकडे उरले आहेत. त्याचे काय करता येईल?

तसा केक काही वाया जात नाहीय, उद्यापर्यंत लेकीने त्याचा पुर्ण फन्ना उडवलेला असेल पण मला ते उरलेले तुकडे वापरुन काहीतरी वेगळे करायची इच्छा होतेय. भांड्यातुन केक काढताना तिने नीट काढला नाही त्यामुळे त्याचा थोडा कुस्करा झालाय.

साधना, तो केक पूर्ण कुस्करून एका भांड्याच्या तळाशी पसर. थोडा असेल तर वाटी पुरेल. त्यावर घरात जी काही फळं असतील ती कापून छान पसरव.
मग त्यावर;
१. जेली करून गरम/ लिक्विड असताना ओत आणि सेट करायला ठेवून दे. खाताना त्यावर फ्रेश क्रिम घालून खा.
२. कस्टर्ड करून ओत आणि सेट करायला ठेव. खाताना त्यावर आईसक्रिम घालून खा.

मग पुढच्या वेळी तुझी लेक मुद्दाम केकचा चुरा करून ठेवेल Wink

Pages