सायकल कुठली घ्यावी...???

Submitted by आशुचँप on 9 February, 2012 - 08:57

कॉलेजची वर्षे संपून जवळ जवळ एक तप संपले. कॉलेज जीवनाच्या काही आठवणी धूसर झाल्या तश्याच आपण एकेकाळी सगळीकडे सायकलनी जात होतो याची जाणीवदेखील पुसट झाली. आणि इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा सायकल चालवण्याच्या इच्छेने उसळी घेतली.
सायकल चालवल्याने फिटनेसपण राहील, सुटलेले पोट कमी होईल आणि पेट्रोलचा खर्चही वाचेल असा तिहेरी हेतू मनाशी बाळगत सायकलच्या दुकानात पोहचलो. जरी कॉलेज संपून १०-१२ वर्षे झाली असली अजूनही मन त्याच काळात होते. त्यामुळे मस्तपैकी २-३ हजार घालून एक चांगल्यातली सायकल घ्यावी असे म्हणतोय तोच पहिल्या सायकलने दणका दिला.
किंमत १२,०००.
"साहेब ही पहा लेटेस्ट सायकल, २१ गियर्सवाली, एकदम लाईटवेट, डिस्कब्रेक, दणकट बॉडी. "
दुकानदार मला कसोशीनी पटवून सांगायचा प्रयत्न करत होता. मी आपला धक्क्यातून बाहेर आलोच नव्हतो.
अगदी बेसिक रेंजमध्ये नाहीये का काही.
"बेसिक रेंजमध्ये ही पहा ८,७०० ची. पण ही थोडी जइ आहे आणि सहाच गियर आहेत. "
याही पेक्षा स्वस्तातली काही नाही का. मला अगदी साधी सायकल हवीये म्हणल्यावर त्याचा चेहरा उतरला.
"आजकाल कुणीच साध्या सायकल वापरत नाही साहेब. तुम्हाला सायकल कामासाठी वापरायची आहे का फिटनेससाठी...?"
"अर्थात फिटनेससाठी."
मग म्हणाला थोडे पैसे जास्त टाका आणि चांगल्यातली घ्या. साध्या सायकलीपण आता ४-५ हजारला मिळतात. पण तुम्हाला त्यात आनंद नाही मिळाला तर पडून राहणार. बघा पटतयं का...

त्याच्या बोलण्यावर मी पण विचार केला. नंतर येऊन नेटवर पण बराच सर्च केला आणि गोंधळात पडलो. मला कुणी सांगू शकेल का मला कुठली सायकल चालू शकेल.
माझ्या गरजा पुढीलप्रमाणे -
१. खूप वर्षे झाली आहेत सायकल चालवून आणि आता आळस मुरलाय अंगात. इथल्या इथे जाताना पण गाडी वापरण्याची सवय. त्यामुळे मोटीव्हेट करणारी पाहिजे.
२. जास्त वेग किंवा जास्त दणकटपणा नकोय कारण जास्त करून शहरातच चालवली जाणार. त्यामुळे माऊंटन बाईक्स आऊट ऑफ क्वेश्चन..(पण त्या सायकली दिसतात मस्त..बघूनच घ्यायचा मोह होतो)
३. कॅरीयर पाहिजे. या परदेशी बनावटीच्या सायकलींना कॅरीयर नसतेच. मोटोक्रॉस बाईकसारखे मडगार्ड फक्त.
४. शक्य तितकी वजनाने हलकी आणि कमीत कमी मेंटेनन्स ठेवावा लागेल अशी.
५. बजेट आता थोडे वाढवावेच लागणार आहे पण शक्यतो ८-९ हजारच्या पुढे नको. नाहीतर मग सायकलसकट घराबाहेर पडावे लागेल.

माबोवर कुणी आहेत का अशा सायकली चालवणारे. किंवा सायकल ग्रुप वगैरे??

गुलमोहर: 

चांगल्या दर्जाची साधी पण गियरवाली सायकल ८ हजाराच्या खाली मिळणे कठीण. बाकी काही माहिती मिळाल्यास सांगेनच.

आशु
सायकल महाग झाली आहे हे खरं पण जर खरच इच्छा असेल तर घेच. घेताना खालील गोष्टी पाळाव्यात.
१. किती इंची - २६ की २८ कारण हाईट / अंतर हे सर्व इथे लागू होते.
२. माउंटेन बाईक अजिबात घेऊ नको. (जाड टायर्स असलेली) कारण चालवताना पाय दुखतात व इंट्रेस्ट कमी होतो, तसेच ती जड असते.
३. घेताना हायब्रिड बाईक घे. आजकाल मिळते. तिचे वजन कमी व टायर साधारण रोड बाईक पेक्षा जास्त जाड पण माउंटेन पेक्षा खूप कमी जाड असल्या कारणाने व बॉडी हायब्रिड असल्याने वजनाला हलकी असते व पळवताना मजा येते. तसेच गरज पडली तर सायकल बराच वेळ उचलता येते.
४. जास्त लांब जायचे असले तर २१ गिअर असणारीच हवी कारण मग हवे तेंव्हा प्रेशर कमी जास्त करता येते.

अजून काही असतील तर विचार.

भारतात आल्यापासून बाईकिंग संपलेच. अन्यथा रोज १० ते १५ मैल रपेट मारायचो मी.
- हार्डकोअर बाईक फॅन.

आशु, मी foldman ची cycle घेतलीये. ८००० रु. ६ गीयर्स. सायकल पुर्ण फोल्ड होऊन गाडीच्या डीक्कीत अथवा बस मधे सुद्धा नेता येते (वजन ५-६ किलो). हल्ली रोज सकाळी व्यायाम करतोय. माझी बघुन सोसायटीत दोघांनी घेतलीये.
मोटीवेशन म्हन्शील तर ह्या पद्धतीची सायकल भारतात नवीन असल्यामुळे काही नजरा नक्कीच मागे वळुन बघतील Wink

http://us2kolkata.com/p/Cycles_&_Bikes/BSA_Foldman_Alloy.html अथवा http://www.thehindubusinessline.in/catalyst/2006/03/02/stories/200603020...
येथे माहीती मिळेल

केदार - धन्स रे..हो आता हायब्रीडचाच विचार करतोय. माऊंटन बाईक तर नक्कीच नाही. फार लांब जाण्याचा आत्ता तरी विचार नाही. आधी कितपत रुळतोय त्यावर सगळे अवलंबून आहे.
सचिन - पिवळ्या रंगाची आहे तीच का. कन्सेप्ट भारीये पण ती अगदीच लहान मुलांची वाटतीये रे....

पिवळ्या रंगाची आहे तीच का. कन्सेप्ट भारीये पण ती अगदीच लहान मुलांची वाटतीये रे>> हो तीच. लहान मुलांची नाही वाटत रे. मध्यंतरी लंडन ला गेलो होतो तर तेथे तर ह्या सायकलच खुपच क्रेझ वाढलय. आमच्या ऑफीस मधे बरेच जण असल्या सायकल्स आणायचे

काही दिवस तासावर भाड्याने सायकल घ्यावी.
>>> लहानपणी १-२ रुपये तास अशी भाड्याने सायकल घ्यायचो त्याची आठवण झाली.. Happy

अगदी नेमका धागा काढलास बघ! मीही सध्या याच चिंतनात आहे.. आता या वर्गात येऊन बसतो म्हणजे मलाही माहिती मिळेल. Happy

Coming soooon... आगामी आकर्षणे-
-मायबोली बायकर्स ग्रुपचे माऊंटन बाईकिंग ट्रेक रिपोर्टस्..!
-सायकलींच्या उड्यांचे फोटो!!
-टी शर्ट- टोपीबरोबर आता सायकलसाठी मायबोली मड्फ्लॅप्स..
-सूर्यास्तावेळी तांबूस पाण्याच्या बॅकग्राऊंडवर सायकलींबरोबर काढलेले फोटो.. Happy

सायकल वरून भारतभ्रमण, जगाला प्रदक्षिणा किंवा शोर या सिनेमात मनोजकुमार गोल गोल अखंड सायकल चालवतो तसे उपक्रम... हे राहीलं.

आशु टिळक रोडला कांगो आहे, तिथे जाऊन तुला हवी तशी सायकल बनवून मिळेल का असे विचार... आजकाल मॉडिफाईड व्हेईकलची बरीच चलती आहे. मिळाली तर उत्तमच. बजेट थोडे वर-खाली होऊ शकते, पण निदान मनपसंत सायकल मिळाल्याचं समाधान.

तुला सान्गूका? माझ्या पोराकडे हौसेने घेतलेली गिअरचि सायकल होती, दुर्दैवाने ति चोरीला गेली.
पण नविन घेताना मात्र पोराने सिम्पल विदाऊट गिअर घेतली Happy
नुस्तेच भटकायला हव असेल, तर हलक्यात हलकी, (४ गिअर पर्यन्तचीच) हॅण्डल अ‍ॅडजेस्टेबल असलेली घ्यावी.
सामान वगैरे वहायचे असेल, तर जुन्या पद्धतीच्याच जास्त सुट होतात Happy

अश्या सायकल ची खरच गरज आहे. पोट सुटत चाललय. :ड
बिग बझार (चिंचवड) मधे रु.६५०० ची बघितली होती ६ गियरची. तिथ थोडि स्वस्त मिळु शकते.

सायकल ला गियर असते हेच आज समजल.. Sad
बारावीत पासुन सायकल चालवयच सोडुन दिले... पण माझी सायकल काळ्या रंगाची हर्क्युलस होती...

टिळक रोड वर दोन दुकानं आहेत सायकलची... एक कानगो जे काका हलवाईच्या शेजारी आहे.. आणि दुसरं Cycle Mall जे जयश्री गार्डनच्या शेजारी आहे..

चांगली सायकल योग्य किमतीत हवी असल्यास फडके हौद गाठणे.. सगळ्या प्रकारच्या सायकली मिळतील अशी किमान १५ दुकाने आहेत तिथे..

धन्यवाद लोक्स - दक्षिणा, यात्री ते कानगो सायकल मार्ट आहे. मी जाऊन आलो तिथे. पण केदारचे पटले - हायब्रीड सायकलच घ्यावी असे आता वाटायला लागले आहे.
टिळक रोडच्या लाईफ सायकल मार्टमध्ये सगळ्या परदेशी बनावटीच्या सायकल आहेत. कमीत कमी ९,५०० पासून १.२५ लाखापर्यंत....त्या किंमती पाहूनच जीव दडपला.

मी पण खूप वर्षे बिनगियरची सायकल चालवली. माझी बीएसए -एसएलआर एकदम भारी होती. पण नंतर तिचा जाम खुळखुळा झाला. आता मला नुसती नावापुरती सायकल घ्यायची नसून थोडी आरामदायक, चालवताना प्लेजर मिळेल अशीच सायकल हवी आहे. म्हणून गियरवाल्या सायकलला पसंती.
पोराला अधून मधून शाळेला ने आण करता येईल म्हणून कॅरीअर असलेले उत्तम

फडके हौद म्हणजे कसब्यातला ना. वरचा सगळा किस्सा तिकडचाच आहे. अरे तिथले दुकानदार जाम गोंधळवून टाकतात. एकापाठोपाठ एकेक सायकलच समोर आणत हीच कशी चांगली हे मनावर बिंबवतात. त्यामुळे नक्की आपल्याला काय हवे आहे आणि काय घेऊ हेच कळत नाही.

पहिल्यांदा स्वस्तातली कुठलीही सायकल घ्या .तुमचा फिटनेस सायकलच्या मॉडेल वर अवलंबून नसतो तर ती तुम्ही किती वेळ चालवता त्यावर अवलंबून असतो . सायकल घेताना त्याचे सर्व पार्टस जवळ मिळतात का ते विचारून बघा नाहीतर काही इम्पोर्टेड सायकलींचे पार्टस दोन दोन आठवड्याशिवाय मिळत नाहीत . शक्यतो इम्पोर्टेड च्या नादाला लागू नका .

नेटवर बराच शोध घेतल्यानंतर मला हर्क्युलीसच्या काही सायकली सापडल्या. किंमतही फार जास्त नाहीये. ५-६ हजारांपासून आहेत. पण त्यांच्या लॉँग-रन बद्दल कुठे काही कळत नाहीये. माऊथशट वर काही सायकलचे रिव्ह्यू आहेत पण ते २००९ चे आहेत. आत्ता माबोवर असल्या सायकली चालवणारे कुणी आहे का

Coming soooon... आगामी आकर्षणे-
-मायबोली बायकर्स ग्रुपचे माऊंटन बाईकिंग ट्रेक रिपोर्टस्..!
-सायकलींच्या उड्यांचे फोटो!!
-टी शर्ट- टोपीबरोबर आता सायकलसाठी मायबोली मड्फ्लॅप्स..
-सूर्यास्तावेळी तांबूस पाण्याच्या बॅकग्राऊंडवर सायकलींबरोबर काढलेले फोटो..

Lol Lol Lol

-टी शर्ट- टोपीबरोबर आता सायकलसाठी मायबोली मड्फ्लॅप्स.. >> Lol हे फार भारी. पण ते बाकी तिन्हीही मस्तच.
मी आपलं उगाच आशु सायकलवर उड्या मारतोय अन कोणीतरी फोटो काढतोय असे इमॅजिन केले. आणि होत माझे सायकलचे प्रयोग / किस्से असा बाफ आहे बहुदा. परत तो वर काढावा. Happy

तुमचा फिटनेस सायकलच्या मॉडेल वर अवलंबून नसतो तर ती तुम्ही किती वेळ चालवता त्यावर अवलंबून असतो . >> मुंबईकर हे खरे असले तरी "सायकल नेहमी चालवणे" हे मात्र कुठली सायकल आहे त्यावरच ठरते. जाडजुड वजनदार वगैरे असेल तर पाय दुखायला लागल्यामुळे पुढे चालविली जात नाही. त्यामुळे घेताना सर्व विचार करूनच घ्यावी. आणि जर १०००० टाकलेच तर मात्र, अरे बापरे १०,००० गेले, आता चालवली नाही म्हणून बायको नक्कीच मारेल ह्या धाकापायी नक्कीच चालविली जाईल. Happy

पण पुण्यात सायकल चालवणार कुठे? हा प्रश्न मात्र गहन आहे.

आशू, सायकल घेतल्यावर पुण्यात कुठे चालवणार असा प्रश्न आल्यामुळे सायकल दावणीला बांधून मग विकायची ठरली तर मी आत्ताच नंबर लावून ठेवतोय! नाशकात अजून तरी सायकल चालवायला जागा आहे. 8-)

Pages