सायकल कुठली घ्यावी...???

Submitted by आशुचँप on 9 February, 2012 - 08:57

कॉलेजची वर्षे संपून जवळ जवळ एक तप संपले. कॉलेज जीवनाच्या काही आठवणी धूसर झाल्या तश्याच आपण एकेकाळी सगळीकडे सायकलनी जात होतो याची जाणीवदेखील पुसट झाली. आणि इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा सायकल चालवण्याच्या इच्छेने उसळी घेतली.
सायकल चालवल्याने फिटनेसपण राहील, सुटलेले पोट कमी होईल आणि पेट्रोलचा खर्चही वाचेल असा तिहेरी हेतू मनाशी बाळगत सायकलच्या दुकानात पोहचलो. जरी कॉलेज संपून १०-१२ वर्षे झाली असली अजूनही मन त्याच काळात होते. त्यामुळे मस्तपैकी २-३ हजार घालून एक चांगल्यातली सायकल घ्यावी असे म्हणतोय तोच पहिल्या सायकलने दणका दिला.
किंमत १२,०००.
"साहेब ही पहा लेटेस्ट सायकल, २१ गियर्सवाली, एकदम लाईटवेट, डिस्कब्रेक, दणकट बॉडी. "
दुकानदार मला कसोशीनी पटवून सांगायचा प्रयत्न करत होता. मी आपला धक्क्यातून बाहेर आलोच नव्हतो.
अगदी बेसिक रेंजमध्ये नाहीये का काही.
"बेसिक रेंजमध्ये ही पहा ८,७०० ची. पण ही थोडी जइ आहे आणि सहाच गियर आहेत. "
याही पेक्षा स्वस्तातली काही नाही का. मला अगदी साधी सायकल हवीये म्हणल्यावर त्याचा चेहरा उतरला.
"आजकाल कुणीच साध्या सायकल वापरत नाही साहेब. तुम्हाला सायकल कामासाठी वापरायची आहे का फिटनेससाठी...?"
"अर्थात फिटनेससाठी."
मग म्हणाला थोडे पैसे जास्त टाका आणि चांगल्यातली घ्या. साध्या सायकलीपण आता ४-५ हजारला मिळतात. पण तुम्हाला त्यात आनंद नाही मिळाला तर पडून राहणार. बघा पटतयं का...

त्याच्या बोलण्यावर मी पण विचार केला. नंतर येऊन नेटवर पण बराच सर्च केला आणि गोंधळात पडलो. मला कुणी सांगू शकेल का मला कुठली सायकल चालू शकेल.
माझ्या गरजा पुढीलप्रमाणे -
१. खूप वर्षे झाली आहेत सायकल चालवून आणि आता आळस मुरलाय अंगात. इथल्या इथे जाताना पण गाडी वापरण्याची सवय. त्यामुळे मोटीव्हेट करणारी पाहिजे.
२. जास्त वेग किंवा जास्त दणकटपणा नकोय कारण जास्त करून शहरातच चालवली जाणार. त्यामुळे माऊंटन बाईक्स आऊट ऑफ क्वेश्चन..(पण त्या सायकली दिसतात मस्त..बघूनच घ्यायचा मोह होतो)
३. कॅरीयर पाहिजे. या परदेशी बनावटीच्या सायकलींना कॅरीयर नसतेच. मोटोक्रॉस बाईकसारखे मडगार्ड फक्त.
४. शक्य तितकी वजनाने हलकी आणि कमीत कमी मेंटेनन्स ठेवावा लागेल अशी.
५. बजेट आता थोडे वाढवावेच लागणार आहे पण शक्यतो ८-९ हजारच्या पुढे नको. नाहीतर मग सायकलसकट घराबाहेर पडावे लागेल.

माबोवर कुणी आहेत का अशा सायकली चालवणारे. किंवा सायकल ग्रुप वगैरे??

गुलमोहर: 

हेमू - माझा मोठा प्रश्न सोडवलास बाबा...जर काही कारणाने ती दावणीला बांधून ठेवावी लागलीच तर बायकोच्या शिव्या खाण्यापेक्षा तुला देऊन टाकीन... Happy

आता च्यायला घेऊनच टाकतो

मी पण अधून मधून सायकल चालवायला जाते. मला त्यासाठी सिंहगड रस्ता बरा वाटतो. दुसरे फारसे रस्ते क्रॉस होत नाहीत. रविवारी सकाळी तशी रहदारीपण कमी असते.

अजून एक (ऐकीव) माहिती म्हणजे टिळक रस्त्यावरच्या ‘लाईफ सायकल’ वाले दर रविवारी सायकल सहल काढतात. आपला मोबाईल नंबर नोंदवल्यास ते मेसेज पाठवतात. सायकल स्वारीसाठी शुभेच्छा

धन्यवाद अनया, मीही सिंहगड रोडवरच राहतो.
तुझ्याकडे कुठली सायकल आहे. गिअरची सायकल असल्यास त्याचा रिव्हयू देणार का?

हेमा रे.. Lol

चँप.. घेउन टाक रे लवकर.. सायकल तर आपल्याला पण आवडते.. मलाही घ्यायची आहे म्हणजे नॅशनल पार्क ते कान्हेरी फिरता येइल मस्तपैंकी..

सायकल कुठे चालवावी ही काळजी पुणेकरांना का लागावी? मी तर पुण्यात खास सायकलींसाठी मुख्य रस्त्याच्या कडेला एक छोटा एकफुट रुंदीचा रस्ता पाहिलाय.

सायकल कुठे चालवावी ही काळजी पुणेकरांना का लागावी? मी तर पुण्यात खास सायकलींसाठी मुख्य रस्त्याच्या कडेला एक छोटा एकफुट रुंदीचा रस्ता पाहिलाय.

पण त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात यावी असा प्रस्ताव आहे. शक्य झाल्यास फ्लायओव्हर, भुयारी मार्ग पण काढतील

यो, आता सध्या तुझी सायकल म्हणजे
'सोने की सायकल और चांदीची सीट' वालीच असणार बाबा.....

Happy Happy
खरं रे खरं!!

माझ्याकडे ‘हिरो रेंजर स्वींग’ सायकल आहे. गियरचीच आहे.

रिव्युच म्हणाल, सायकलने फार कधी काही त्रास दिला नाही. पण मी अगदी लिंबू-टिंबू आहे ह्या क्षेत्रात. लहानपणी सायकल चालवली नाहीये, अचानक सणक येऊन विकत घेतली. मी सायकल चालवताना शाळेत जाणारी बारकी पोरंही मागे टाकतात! मी आपली माझ्या वेगाने हळूहळू जाते.

साय्कल चालवुन पहाच. फार चान वातते.आस्पास जाय्ला चान्गले वाहन. स्वस्त आनि मस्त. मि ३ वर्शापासुन मुलुन्द पुर्व मधे सगलिकदे साय्कल्नेच जाते.६ महिन्यतुन एकदा १००/- तेल्पानि केले कि अगदि चान चल्ते.

लोक्स..अखेर भरपूर लोकांना पिडून आणि नेट लाऊन शोध घेतल्यानंतर अखेरीस हरक्युलीसची रायडर ऐक्ट ११० ही सायकल घेतली.
एकदम हलकी आणि चालवायला अतिशय आरामदायक...

ही लिंक पहा...
http://www.bsahercules.com/Product-Features.asp?pid=200

आजच १० किमी चालवून ऑफीसला आणली. काहीसुद्धा त्रास जाणवला नाही. सवय नसल्याने भाता फुलला होता पण ताण काहीच नाही.

एवढ्यात नाही...अरे ही माऊंटन बाईक नाहीये...
त्याचे झाले काय मी माऊंटन बाईक म्हणत होतो पण त्या डीलरने माझे ब्रेनवॉशींग केले.
तो म्हणाला, ३६५ पैकी किती दिवस सायकल चालवाल असे वाटते...
मी बोललो - समजा २०० दिवस
मग म्हणे त्यात किती वेळेस हार्डकोर ट्रेकिंग रस्त्यावर नेणार
मी बोललो - आत्ताच सांगता येणार नाही पण समजा ८-१० वेळेस
तर म्हणे - ३६५ पैकी ८ वेळेला तुम्ही जाण्यासाठी जड सायकल घेणार आणी तीच इतर १९२ वेळेस वापरणार साध्या रस्त्यावर यात काय लॉजिक आहे..त्यापेक्षा रस्त्यावर चांगली धावेल, आरामदायक असेल, हलकी असेल अशी सायकल घ्या आणि डोंगरात जाण्यासाठी भाड्याने माऊंटन बाईक घेऊन जा.
तो डीलर स्वता असे आउटिंगचे प्रोग्राम आखतो...

Pages