३ ते ४ मोठे कांदे
बेसन पाव किलो
२-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड
थोडी कोथिंबीर चिरुन
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल)
मिठ
तेल
प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल.
आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे.
पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे.
एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते.
मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या.
धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे.
मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.
तोंपासु
तोंपासु
दक्षे आपण उलटे करुया. तु
दक्षे आपण उलटे करुया. तु माझ्याकडॅ येऊन रहा म्हणजे तुला त्रासही नाही.
जागु, मस्तच ग. खरच एकदम
जागु, मस्तच ग. खरच एकदम तोंपासु.
मी पण अशीच करते. पण ओवा घालत नाही. आता घालुन बघेन...
खेकडा म्हटल्यावर मी वाचायचे
खेकडा म्हटल्यावर मी वाचायचे सोडलेच, फक्त भज्यासाठी आलो
यम्मी, यम्मी,
यम्मी, यम्मी, यम्मी!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जागुले, बर्याच दिवसांनी रेसिपी टाकलिस?
जागुले,, तो पा सु .. ति
जागुले,,
तो पा सु
.. ति शेवटची प्लेट माझि बाकी मला काआआआआआआआअही नको
[त्या प्लेटीत तु फिश थेउन पण फोटू काढलेत ना? मला ति जाम आवडेश
ति शेवटची प्लेट माझि बाकी मला
ति शेवटची प्लेट माझि बाकी मला काआआआआआआआअही नको >> ओक्के, तु प्लेट घे, मी भजी घेते
चिऊ... भारी.. सिंहगडावर
चिऊ... भारी..
सिंहगडावर जायला पाहिजे.. खेकडा कांदाभजी खायला..
नावात का होईना, पण जागू ताई
नावात का होईना, पण जागू ताई जलचरांना काही सोडत नाहीत.
मी पण हा धागा उघडला नाही,
मी पण हा धागा उघडला नाही, काही म्हणजे काही वाचलं नाही आणि फोटो सुद्धा बघितले नाहीत.
(कैच्याकैच!! वैट्ट लोक्स अस्तात आणि भुकेच्या वेळी हे अस्लं इथे द्यायचं म्हंजे फार्फार वैट्ट!!)
जागू तू मात्र माझी कॉमेंट वाच बरंका!
असो, मस्तच गं अगदी तोंपासू...........................
तोपांसु
तोपांसु

मस्त. मी थोडा तरी पाण्याचा
मस्त. मी थोडा तरी पाण्याचा हात लावायचे . मागे एकदा बहुदा 'लालूने' ही टिप दिलेली कि कांद्याला मीठ लावून थोडावेळ ठेवा म्हणुन. तेव्हा पासून खेकडा भजी एकदम पर्फेक्ट जमायला लागल्या.
मला वाटलं खेकड्याची भजी
मला वाटलं खेकड्याची भजी केलीयेत
ही मस्त आहेत पण...:) माझे आजोबा/पप्पा नेहमी करतात अशी भजी. पावसाळ्यात चहासोबत ताव मारायला उत्तम!
आता पुढच्या वेळी खरोखरच्याच
आता पुढच्या वेळी खरोखरच्याच खेकड्याची भजी करून रेसिपी टाकते.
जागू ~ काल सायंकाळी लागलीच ही
जागू ~
काल सायंकाळी लागलीच ही कृती केली. कदाचित बेसन पीठाचे प्रमाण काहीसे चुकल्याने (म्हणजे कांद्यापेक्षा पीठ जास्त झाले) सारे रसायन तुम्ही दिलेल्या क्रमांक ३ फोटोप्रमाणे हलके न होता काहीसे घट्ट झाले. त्यामुळे नाईलाजास्तव नंतर थोडेसे पाणी टाकून पाहिले. अगदी खेकड्याप्रमाणे जरी झाली नसली तरीही अगदीच काही खराब झाली नाहीत. चांगली खरपूस तळल्यावर बाहेर काढली, मात्र खाताना लक्षात आले की भज्यांच्या पोटात अजून घट्टपणा जाणवतो. कदाचित तो जादाच्या पीठाचा परिणाम असेल.
[मी शेंगदाणा तेल वापरतो. प्रश्न असा की, वरीलप्रमाणे सारी कृती करून अन्य खाद्य तेलात तळल्यावर चवीत वा खुसखुशीतपणात काही फरक पडेल ?]
तेलाने मला वाटत फरक नाही
तेलाने मला वाटत फरक नाही पडणार पण बेसनच कमी हवे होते.
खेकडे आणि खेकडा कांदा भजी
खेकडे आणि खेकडा कांदा भजी दोन्ही फेवरीट.
एक्दम लाळगाळु फोटो. यम्मीईईईईईईई
मस्तच .......तोंडाला पाणी.!!!
मस्तच .......तोंडाला पाणी.!!!
जागू, फार म्हणजे फार म्हणजे
जागू, फार म्हणजे फार म्हणजे फारच सुंदर रेसिपी आणि फोटो!
जागू, मस्त. यात बेसन घालतांना
जागू, मस्त. यात बेसन घालतांना चिमूटभर खायचा सोडा घातला तर आणखी मस्त कुरकुरीत होतात.
तसंच बेसनाबरोबर थोडी तांदुळाची पिठी घातल्यानेही.
~आता पुढच्या वेळी खरोखरच्याच
~आता पुढच्या वेळी खरोखरच्याच खेकड्याची भजी करून रेसिपी टाकते.~
जागुदी म्हणजे आत्ता पुढची पाककृती Crab Cake ची ना? मी वाट पाहीन.....
कांद्याची भाजी खाऊन खूप वर्ष झाली. मला आत्ता पर्यंत असा विश्वास होता की चांगली भाजी फक्त भारतात टपरीवर मिळते. तुमच्या पाककृतीचे फोटो पाहून हा समज खोटा ठरवला आहे. मला सुद्धा बनवता येईल असा विश्वास वाटतो आहे. बनवली तर नक्की कळवीन....
एक आईडिया ची कल्पना: तिथे राजदा ने अमृततुल्य चहा बनवला आहे तर कांदा भजी आणि अमृततुल्य चहा मस्त एकत्र धागा काढायला हवा आहे.
जागू, मस्तच गं. गरमागरम भजी
जागू, मस्तच गं. गरमागरम भजी थंड किंवा पावसाळी हवेत खायची मजाच वेगळी. मला भजी साध्या पावाच्या स्लाईसमध्ये गुंडाळून खायलाही आवडतात
>>खेकडे आणि खेकडा कांदा भजी
>>खेकडे आणि खेकडा कांदा भजी दोन्ही फेवरीट.>>+१
मस्त फोटो. एकदम आवडता प्रकार
मस्त फोटो. एकदम आवडता प्रकार आहे.
यात थोडे अनारदाणे पण भरडून घातले तर मस्त चव येते.
सगळ्यांच्या टिप्स आणि
सगळ्यांच्या टिप्स आणि प्रतिसाद आवडले धन्यवाद.
Its Awsome and really a Mouth
Its Awsome and really a Mouth Watering dish
झब्बू: आज आमच्याकडे पाऊस
झब्बू:
आज आमच्याकडे पाऊस झाला...





ताबडतोब कांदे चिरून खेकडा भजी करण्यात आली
जागु तु माझ्याकडे ६ महिने
जागु तु माझ्याकडे ६ महिने येऊन रहा आणि मला ही पाककला शिकव जराशी.
पाककला होय ?.... मी पकवायला शिकव (लोकाना) असे वाचले !!!!
पावसाळा आला असल्याने या
पावसाळा आला असल्याने या भजींची गरज लागेलच
डॉ तुमचे खेक्डे बारीक हैत की.
डॉ तुमचे खेक्डे बारीक हैत की.
पण ह्ये ब्येस.
काल घरात दोन ल्हान पोरं हुती, पाउस पडायला लागल्यावर भुक भुक करत होते.
मी एकटाच घरी.
मग काय मॅगी वर भागवलं.
Pages