३ ते ४ मोठे कांदे
बेसन पाव किलो
२-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड
थोडी कोथिंबीर चिरुन
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल)
मिठ
तेल
प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल.
आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे.
पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे.
एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते.
मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या.
धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे.
मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.
मला आत्ताच्या आत्ता पाहीजे..
मला आत्ताच्या आत्ता पाहीजे..
आता जर अल्लाद्दिनचा जीनी
आता जर अल्लाद्दिनचा जीनी मिळाला तर त्याला ते गरमागरम भजीचे ताट माझ्यासमोर आणून ठेवायला सांगेन
म्म्म्म्म्म्म्म्म्म्म......तो
म्म्म्म्म्म्म्म्म्म्म......तोंडाला पाण्याची धार.........
जागु मस्त रेसिपी..झणझणीत आणि
जागु मस्त रेसिपी..झणझणीत आणि मस्त कुरकुरीत ही..ऑल सिझन फेवरीट रेसिपी.
जागुटले, अन्याय आहे हा
जागुटले, अन्याय आहे हा डोळ्यांवर आणि तोंडावर पण णिषेढ तुझा. आता घरी येवुन खाल्ल्याशिवाय काही खर नाही.
हा धागा मी उघडलाच नाहीये.. मी
हा धागा मी उघडलाच नाहीये.. मी काही पाहिलेलेच नाहीये...
शेवटच्या फोटोने कट्यार काळजात घुसली...
हे खाण्यासाठी अजून १४ दिवस थांबणे क्रमप्राप्त आहे...
आता जर अल्लाद्दिनचा जीनी
आता जर अल्लाद्दिनचा जीनी मिळाला तर त्याला ते गरमागरम भजीचे ताट माझ्यासमोर आणून ठेवायला सांगेन >> नंदिनी सोबत चहा मस्ट
जागुतै - या भज्यांना तरी सोडायचे होते, त्यांना पण खेकडा नाव
एकदम तोंपासु
एकदम तोंपासु
व्वॉव.......... तोंपासु
व्वॉव.......... तोंपासु
ईनमीन तीन .. ह्या भज्यांना
ईनमीन तीन ..
ह्या भज्यांना खेकडा असेच नाव आहे.. मग जागू कशाला बदलेल ते नाव?
जागू, मस्त. सुदैवाने आमच्या
जागू, मस्त.
सुदैवाने आमच्या ऑफिसात अशी भजी दर शनिवारी मिळतात !
(आम्ही वांद्राला हि भजी, "बिनपाण्याची भजी" या नावाने खाल्ली.)
बिनपाण्याची भजी सेनापती मला
बिनपाण्याची भजी
सेनापती मला तर भजी लिहवतच नव्हत, खेकडाच लिहावा अस वाटत होत.
सगळ्या खवय्यांचे धन्यवाद.
मस्तच !!! तोंपासु , खुप
मस्तच !!! तोंपासु , खुप दिवसांनी तुझी नविन रेसिपी दिसली.
अरे हो सेनापती खेकडाभजीच ती
अरे हो सेनापती खेकडाभजीच ती पण जागुने खेकडा लिहील्यावर त्या भज्यांना वजन प्राप्त होते व अर्थ बदलतो.
बायदवे दिनेशदा तुमच ऑफिस कुठेय, या शनिवारी मी फ्रीच आहे, विचार करत होतो तुमची भेट पण होईल आणि ....
जागू मी कधी कधी यात बडिशेप
जागू मी कधी कधी यात बडिशेप टाकते, कधी लसून उभा चिरून टाकते, कधी मिरच्या उभ्या चिरून टाकते पण हे असे फोटो टाकून जळवत नाही कोणाला
ईनमिन तीन > पण जागुने खेकडा लिहील्यावर त्या भज्यांना वजन प्राप्त होते व अर्थ बदलतो. < अगदी , अगदी
लै आठवण येऊन राहिली आहे....
लै आठवण येऊन राहिली आहे.... खेकड्यांची..
अन्याय... राजरोस अन्याय आहे
अन्याय... राजरोस अन्याय आहे हा! जागू.... मस्त गं.... स्लर्रप!!
इनमिनतिन वजन वाढवल्याबद्दल
इनमिनतिन वजन वाढवल्याबद्दल धन्स (भजीच)
अवल
सेनापती तुमच्या जहाजावर खेकडे मिळतात ना.
अरुंधती आजच घरी भजी करून झालेला अन्याय दुर कर.
जागुतै - या भज्यांना तरी
जागुतै - या भज्यांना तरी सोडायचे होते, त्यांना पण खेकडा ना>> हेच लिहायला आलेले. जागूला प्राणीसंग्रहालयातच सोडली पाहिजे .
वर ती खेकडा भजी कशी झाली हे फोटो दाखवायची गरज होती काय? :रागः
नशिब "कांदा भजी" पण लिहलय..
नशिब "कांदा भजी" पण लिहलय.. नाहीतर लोकांना खेकडे पीठात बुडवुन तळले असे वाटले असते
पण ही भजी मात्र झक्कास.. तुला १००/१०० मार्क
गाडी काढून कुडकुडत्या थंडीत
गाडी काढून कुडकुडत्या थंडीत सिंहगडावर जाऊन गरमागरम खेकडा भजी खायला पाहिजेत...
'जागु' हे नाव आणि 'खेकडा भजी'
'जागु' हे नाव आणि 'खेकडा भजी' हा पदार्थ म्हटल्यावर मला वेगळेच वाटले..
मस्त, सही एक्दम.
आईशप्पथ .... कसली खतरा भजी
आईशप्पथ .... कसली खतरा भजी दिसताहेत. जागु, क्या बात है???
हिमस्कुल तुमच्या नावातच एवढा
हिमस्कुल तुमच्या नावातच एवढा थंडावा आहे की गडावर जायची गरजच नाही
चिउ अपेक्षा भंग झाला म्हणजे तुझा.
मामी
चिउ अपेक्षा भंग झाला म्हणजे
चिउ अपेक्षा भंग झाला म्हणजे तुझा. >> हो तर काय.
मी विचार केला मासे संपवुन जागुतै आता खेकड्यांवर मेहेर्बान झाल्यात.
अग खेकड्यावर मी आधिच
अग खेकड्यावर मी आधिच मेहेरबानि केली आहे.
तोंडाला पाणी.!!!
तोंडाला पाणी.!!!
जागू.. खेकडे मिळतात गं पण
जागू.. खेकडे मिळतात गं पण त्यांना भजीत रुपांतरीत नाही करता येणार...
वक्के मग जमिनीवर आल्यावर खा.
वक्के मग जमिनीवर आल्यावर खा.
जागु तु माझ्याकडे ६ महिने
जागु तु माझ्याकडे ६ महिने येऊन रहा आणि मला ही पाककला शिकव जराशी.
Pages