प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद
सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे
खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक
प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या
असणार्या कळ्या संध्याकाळी टपोर्या झालेल्या पाहताना मला खूप मजा
वाटायची.
ह्या टपोर्या कळ्या अंधारातच गुपचुप फुलायच्या आणि सकाळी थेट
अंगणात त्यांचा सडा पडलेला दिसायचा. सकाळी उठून हा सडा पाहण्यासाठी
अंगणात जायचे. ओल्या जमिनीवर मंद सुगंध दरवळणारी ती केशरी-पांढरी फुले
पाहून मन उल्हसित व्हायच. मग परडी भरून ही फुले गोळा करायची.
ही गोळा करता करता अजून एक छंद असायचा म्हणजे झाड हालवून प्राजक्ताच्या फुलांचा
पाऊस अंगावर घ्यायचा. त्या कधी दवाने तर कधी पावसाने भिजलेल्या फुलांचा
मऊ, गार स्पर्श मायेचा पाझर घालायचा. ह्या प्राजक्ताच्या फुलांच्या
पावसातील आनंद म्हणजे टप टप टप टप पडती प्राजक्ताची फुले ह्या
बालगीताच्या ओळी सार्थकी लावायच्या.
प्रत्येक सीझनला प्राजक्ताची फुले यायला लागली की आवर्जून प्राजक्ताचे
हार बनवून ते देवांच्या तसबिरींना घालायचे. बर हार बनवायचे ते पण
वेगवेगळ्या पद्धतीने. एका लाइनमध्ये सगळी फुले, एक पाकळ्याना पाकळ्या व
देठांना देठ चिकटवून म्हणजे कमळासारखा आकार येतो दोन फुलांचा मिळून तर एक
कष्टाचा प्रकार होता तो म्हणजे देठ काढून नुसत्या फुलांचा हार. हा हार
अगदी भरगच्च व गुबगुबीत दिसे. पूजेसाठी हार घालून झाले की उरलेल्या
फुलांची ओटीवर रांगोळी काढायची. हे झाले माझे बालपणाचे दिवस.
लग्न झाले आणि सासरी आले. माझ्या सासर्यांनी नवीनच जागा घेतली होती. त्या जागेत एक छोटं प्राजक्ताच कलम लावल होत. अगदी अंगणातच. २-३ वर्षातच ते मोठ्ठ होऊन त्याचा सडा पडायला लागला. परत माझे बालपणीचे दिवस आठवले.
मग आता ह्या सड्याचा आनंद तर उपभोगायलाच हवा. पण पुर्वी सारखा वेळ आता
मिळत नाही म्हणून सकाळी मी चहा घेऊन अंगणातल्या लादीवर बसून कपातला चहा
संपेपर्यंत गवतात पाय सोडून हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा
सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते. ही अनुभवलेली पाच मिनिटे माझ्यासाठी
दिवसभराचा उत्साह निर्माण करतात.
आता बालपणी एवढा रांगोळी वगैरे काढण्यापर्यंत वेळ नसतो. पण प्राजक्ताची
फुले पाहिली की राहवत नाही. मग सुट्टीच्या दिवशी परडी भरून फुल गोळा करते
आणि सासूबाईंना त्याचे हार बनवून देते वेळ असेल तर स्वतःही घालते. रात्री
शतपावली करताना नवीन उमलणाऱ्या फुलांचा पुन्हा सुगंध भरभरून घेते. त्याने
रात्रही अगदी सुगंधी होऊन जाते.
ह्या फुलांच आणि माझं नातही अस आहे की माझं लग्न झाल आणि माझ्या
मिस्टरांनी त्यांच्या पराग ह्या नावाला मिळत जुळत म्हणून माझ नावही
प्राजक्ताच ठेवल. आमच एकत्र कुटुंब आहे. माझ्या जाऊबाई रोज ही फुले
देवपूजेसाठी गोळा करतात. माझी मुलगी श्रावणी २ वर्षांची असताना एक दिवस
लवकर उठली होती आणि तिने पाहील की तिची काकी फुल गोळा करतेय. तेंव्हा ती
जोरात ओरडली ए काकी ती माझ्या आईची फुले आहेत तू गोळा नको करुस. एक क्षण
मला काही कळले नाही. नंतर मला आणि सगळ्यांना समजल की आम्ही रोज
प्राजक्ताची फुल म्हणून उल्लेख करतो त्याचा अर्थ माझ्या मुलीने माझीच
फुले असा घेतला होता. दुसर्या अर्थाने तिच प्राजक्ताच फुल आहे.
असा हा माझ्या अंगणात बहरणारा प्राजक्त. ह्याचे नि माझे मला काही
ऋणानुबंध आहेत अस वाटत. हे माझे प्राजक्ताच्या फुलांवरचे प्रेम म्हणून का
कोण जाणे पण जरी फुलांचा बहर ओसरला, त्यांचा हंगाम गेला तरी अगदी
उन्हाळ्यातही ७-८ तरी फुलांचा सडा आमची मैत्री निभावण्यासाठी, माझे मन
प्रसन्न करण्यासाठी अंगणात पडतो.
जागू, मस्त फोटो, माझ्या घरी
जागू,
मस्त फोटो, माझ्या घरी पण लहान पणी दोन मोठी झाडं होती प्राजक्ताची.
असाच सडा पडायचा.
अनन्या काय बोलू तुझ्या
अनन्या काय बोलू तुझ्या प्रतिसादावर ? मी सुन्न झाले.
पद्मजा, मोनाली, दिनेशदा, सत्यजीत, मंजूडी, चिमुरी, वत्सला, विवन, साधना, निशदे, सायली, स्वाती, प्रज्ञा, सेनापती, विद्याक, हिरकणी, शांकली, अगो, प्रिती, रोहित, जिप्सि, जो एस धन्यवाद. तुमच्या आठवणीही भावल्या.
सोनचाफा माझ्याकडे बरीच मोठी झाडे आहेत त्यामुळे पक्षी दुसर्या झाडांवर घरटी बांधतात. पण ह्या प्राजक्तावर सकाळी काही पक्षी येतात.
शोभा छान प्रची.
नितीनचंद्र पुर्वीचे प्राजक्त फक्त पावसाळ्यात फुलायचे पण आता कलमे होऊ लागली आहेत त्याची फुले वर्षभर येतात.
वा वा वा सुरेख वर्णन, सुर्रेख
वा वा वा सुरेख वर्णन, सुर्रेख फोटो.
मस्त !
मस्त !
मस्त !
मस्त !
मस्त !
मस्त !
मस्त !
मस्त !
मस्त !
मस्त !
जागू, इथे प्रत्येकाच्याच
जागू, इथे प्रत्येकाच्याच पारीजातकाविषयी काही ना काही गोड आठवणी आहेत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख फोटो, सुंदर वर्णन..!!
जागुतै तु खरच नशीबवान आहेस.
जागुतै तु खरच नशीबवान आहेस.:)
जागू, तुझ्या प्राजक्ताला माझा
जागू, तुझ्या प्राजक्ताला माझा झब्बू..... एक जुनी कविता... थँक्स... त्या आठवणींसाठी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुज ते कुणी, हलके कानी,
सांगून जावे जसे
मिटले नयन, निमिष उघडून,
पाही कळी ती तसे
रवीकिरणे, समीप जेणे,
उघडझाप जाहली
आच्छादण्या, सुमना तान्ह्या,
मेघढाल धावली
स्पर्श छाया, उमजे काया,
नजर थेट ती नभा
नील निळाई, उरात न्हाई,
खुलली कळीची प्रभा
उषा रंगे, पुर्वेसंगे,
क्षितिजी सारे सडे
तीच पंखी, रंगपालखी,
फ़ूलपाखरू बागडे
अस्तित्वाची, उंचावरची,
खूण मनी हरखली
समाधाने, आनंदाने,
नजर धरेला झुकली
दर्पणाच्या, कुपी जळाच्या,
प्रतिबिंबाची माया
रूप अपुले, त्यास दिसले,
रम्य मनोहर छाया
अरुण लाली, देठा ल्याली,
चंद्र वरी तोलला
तन अलवार, असे गुलजार,
आसमंत गंधला
शेंदूरल्या, आसावरल्या,
गंधी धुंद पाकळी
गौर गाली, सहज उमटली,
प्राजक्ताच्या खळी
मीच उपमा, मीच संभ्रमा,
काव्यकल्पित भाषा
अलंकारी, मी शॄंगारी,
अत्युत्तमाचा घोषा
लावण्याच्या, कैफ़ी साच्या,
गेले बुडून फ़ूल
त्या गुर्मीत, फ़िरे ऐटीत,
पाहतसे घरकुल
खोड बोजड, ओबडधोबड,
घाली फ़ांदी गुंता
नच देखणे, गोजिरवाणे,
नसे जयाला चिंता
हिरवा ठसा, तुकतुकीतसा,
ठाऊक नाही पर्णा
ना साजरे, स्पर्श खरखरे,
असे मलूल जे वर्णा
भ्रमनिरासा, विझे अपेक्षा,
कुसूम पोळले मनी
झुरू लागे, दु:खावेगे,
दुज्या दिशेस फ़िरूनी
कुरूप लेणे, नको पाहणे,
जेथे जन्म जाहला,
जीवघेणे, वाटे जगणे,
श्वास कंठी दाटला
दूर जावे, तिथे पळावे,
सुरेख जेथे सारे
मोहरावे, अन विसरावे,
या क्षणाचे हे खरे
घाली साद, पुसे प्रतिसाद,
कोण जो ऐके व्यथा ?
प्राजक्तास, एक ही आस,
बदलीन जीवन कथा
पवन अवखळ, वाहे जवळ,
संधी साधते फ़ूल
उरी वारे, शाख थरथरे,
सावरू पाहे मूल
निमिष उशीर, गेले अधीर,
काय करावे आता ?
मुक बापुडे, झाड अवघडे,
पाहे फ़ूल ते जाता
वार्यासवे, फ़ुला जाणवे,
उडण्यातील आनंद
मौज समजे, परि ना उमजे,
हा क्षणभराचा छंद
जरा दुरून, पाहे वळून,
आहे कोणी का संगे ?
अनुकरणात, आवेगात,
कैक धावले मागे
अन थबकले, धुळीस भिडले,
काळवंडले पुरते
काही जळी, कुणी भूदळी,
सडेच पायतळी ते
खोड.. शाखा, कंप सारखा,
पर्ण पर्ण हळहळले
जोजविण्यास, पुन्हा बाळांस,
झाड जरासे लवले
ओशाळले, जसे उमगले,
कॄत्य काय जे केले ?
रागे अंध, अंतरी गंध,
चहूवरी उधळीले
चहूदिशेस, मंद सुवास,
धुंदावलेली हवा
सुखे मिटून, अपुले लोचन,
प्राजक्त निजे तेव्हा
क्षणभंगूर, जीवनी सूर,
राहो असे बोलके
आसमंती, उरलो गंधी,
हेही नसे थोडके
काय आहे ना हे फूल म्हणजे.
काय आहे ना हे फूल म्हणजे. अगदि साधसुधं..... दिसण्यात, असण्यात, फुलण्यात कुठेही उन्मत्तपणा, उत्तानपणा, उद्दामपणा नाही. पण तरीही अगदी मनाला आत स्पर्श करणारं. कायम झाडाच्या पायाशी राहाण्यात धन्यता मानणारं आणि म्हणूनच नम्रता शिकवणारं..... माहीत नाही का ते, पण मला कायम हे फूल पाहीलं की अगदी आतून गलबलून येतं.....
वाह कौतुक सुंदर कविता. शशांक,
वाह कौतुक सुंदर कविता.
शशांक, गोल्डी, सारीका, इनमिनतिन धन्यवाद.
कौतुक, मस्त आहे ही कविता.
कौतुक, मस्त आहे ही कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम फोटो आणि लेखही. मी या
अप्रतिम फोटो आणि लेखही. मी या फुलांना मोती-पोवळ्याची फुले म्हणते!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या आजोळी असंच प्राजक्ताचं झाड होतं. झाड हलवून पहाटे फुलं पाडायचो. आणि परड्या भरून फुलं मिळायची. त्याच्या चपट्या बिया असतात ना? त्यानी पैसे पैसे खेळायचो.
आठवणी जाग्या झाल्या!
सुरेख फोटोज जागू!!
सुरेख फोटोज जागू!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधं आणि सच्चं लिहीलं आहेस.
साधं आणि सच्चं लिहीलं आहेस. आवडलं! फोटो सुरेख आलेत सगळेच.
शोभा, अनिताताई,
शोभा, अनिताताई, अरुंधती,पौर्णिमा धन्यवाद.
जागु , मस्त. निसर्गाच्या इतक
जागु , मस्त. निसर्गाच्या इतक जवळ रहायला भाग्य लागत ! तुमच्या घरी मी नक्की येणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव, किती मस्त लिहिलयस जागू.
वॉव, किती मस्त लिहिलयस जागू. खरंच नशिबवान आहेस गं.
प्राजक्ताच्या फुलांनी भरलेल्या परडीचा तो फोटो कसला सह्ही आहे.
पौर्णिमा+१. मस्तं.
पौर्णिमा+१. मस्तं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान लिहिलंयस. अगदि मनाला
खुप छान लिहिलंयस. अगदि मनाला भिडल !
जागूताई, हा माझा
जागूताई, हा माझा झब्बू............ प्राजक्ताचा (म्हात्रेंची नव्हे बरं का :खोखो) मातीप्रती असलेला अनन्यभाव
(थोडक्यात रिक्षा
)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मलाही राहावलं नाही फोटू पाहून.
http://www.maayboli.com/node/15806
सुन्दर. - बहरला प्राजक्त
सुन्दर. - बहरला प्राजक्त दारी...
सुंदर!! ए जागु... मी पण
सुंदर!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ए जागु... मी पण प्राजक्ताच!!!
इन्ना तुमचे स्वागत आहे. मामी,
इन्ना तुमचे स्वागत आहे.
मामी, रैना, अपर्णा, भुंगा, सुसुकु धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राजू
>>अंगणातल्या लादीवर बसून
>>अंगणातल्या लादीवर बसून कपातला चहा
मनापासून आत्म्यापासून धन्यवाद! शिवाय सोबत फोटोज! प्रत्यक्ष प्राजक्त! क्या बात है. माझ्या पिल्लूचे नाव श्रावणी आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपेपर्यंत गवतात पाय सोडून हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा
सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते. ही अनुभवलेली पाच मिनिटे माझ्यासाठी
दिवसभराचा उत्साह निर्माण करतात.>>
अरे मी प्राजक्तच जगले कि आज
जागू (प्राजक्ता), सुंदर लेख
जागू (प्राजक्ता), सुंदर लेख आणि फोटोही.
पल्ली तुझ्या पिल्लुचे नाव आणि
पल्ली तुझ्या पिल्लुचे नाव आणि माझ्या पिल्लूचे नाव सारखेच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दाद तुमची दाद मिळाली ह्यातच धन्यता आहे. धन्स.
प्रा ज क ता च्या बि या पा सु
प्रा ज क ता च्या बि या पा सु न रो प क से त या र क र ता त या ब द्द ल मा र्ग द र्श न क रा ल का प्लि ज
Pages