Submitted by कांदापोहे on 18 January, 2011 - 21:50
गतवर्षीप्रमाणे यंदाही फ्लेमिंगो (रोहीत, अग्निपंख) बघायला जावे हा विचार होता पण कुणीच सोबत यायला तयार नव्हते. नेहाला फारसा उत्साह नव्हता तरी तिला व मुलांना घेऊन मी भिगवणला गेलोच. यावर्षी रोहीत अजुन आलेच नाहीत व इतर पक्षीही कमी आहेत हे तिथे पोचल्या पोचल्याच कळल्यावर आमचा हिरमोड झाला होता. पाऊस जास्ती झाल्याने पाणीपण जास्ती होते आणी पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय फ्लेमिंगो येत नाहीत ही नविनच माहीती कळली. पातळी कमी झाली तर त्यांना खाद्य शोधायला सोप्पे जाते अशी माहीती एका गावकर्याने सांगीतली.
तरीही प्राप्त परीस्थितीत आम्हाला अनेक पक्षी बघायला मिळालेच त्यांचा नजराणा पेश करतोय. मराठी व इंग्रजी नावे नंतर शोधुन लिहीनच तोवर तुम्ही गाणी शोधा.
Black-Headed Ibis (कुदळ्या, पांढरा शराटी)
गुलमोहर:
शेअर करा
सगळे प्रचि सुन्दर..."Large
सगळे प्रचि सुन्दर..."Large Egret (बगळा)" प्रचि तर उत्तमच...
तो शेवटचा घारीचा फोटो?? मला
तो शेवटचा घारीचा फोटो?? मला घुबडच वाटले.. सगळी नावे दिल्याबद्दल धन्यवाद..मी यातले खुप पक्षी पाहिलेत पण नावे माहित नव्हती.
धन्यवाद लोक्स. परत आल्यावर
धन्यवाद लोक्स.
परत आल्यावर खरच परत एकदा भिगवणला जायचा हुरुप आला आहे. यावेळी योगेश२४ व अभिजीतला काहीतरी करुन न्यायलाच हवे.
हे भिगवण नक्की कुठे आहे ? तिथे जायची / रहायची काय सोय आहे ? कुठल्या दिवसात कुठल्या प्रकारचे पक्षी पहायला मिळतात ही माहिती पण लिहा कृपया.>>>
भिगवण बारामतीजवळ पुणे सोलापुर रोडवर आहे. उजनी डॅमचे बॅकवॉटर असल्याने खुप पाणी आहे. डिकसळ म्हणुन तिथेच एक ठिकाण आहे तिथे हे सर्व पक्षी येतात. पुण्यापासुन १०० किमी. आहे. सकाळी सकाळी जर लवकर निघता आले तर २ तासातही पोचता येते. रहायची सोय फार नसावी. साधारण डिसेंबरपासुन मार्च संपेपर्यंत अनेक पक्षी बघायला मिळतात. रोहीत-अग्निपंख बघायला मात्र बोटीने जावे लागते. तिथले सगळे कोळी त्यांच्या बोटीने ते बघायला आतमधे नेतात (अर्थात थोडासा चार्ज घेतात.)
सॉल्लिड!!!!
सॉल्लिड!!!!
सगळे फोटो खूप आवडले. भारी
सगळे फोटो खूप आवडले. भारी बाबा तुम्हाला फिरायला मिळत पण आम्हाला तुमच्या मायबोली सहली बद्दल काहीच माहिती मिळत नाही.
मस्तच... अप्रतिम..खुप सुंदर
मस्तच... अप्रतिम..खुप सुंदर अहेत फोटो.
सगळे फोटो आवडले.
सगळे फोटो आवडले.
"अप्रतिम"
सर्व प्रकाशचित्र फरच मस्त
सर्व प्रकाशचित्र फरच मस्त आहेत.
मस्त आले आहेत फोटो!
मस्त आले आहेत फोटो!
झक्कास फोटो आहेत!
झक्कास फोटो आहेत!
धन्यवाद लोक्स.
धन्यवाद लोक्स.
Superb shots KP! Mahaan !
Superb shots KP! Mahaan !
KP: अप्रतिम! तुम्ही
KP: अप्रतिम! तुम्ही पक्षीमित्र आहात का? दरवर्षी जाता पक्षीनिरीक्षणासाठी?
कापशी बघायचा योग अजुन तरी आला नाहीये. पण तुम्ही काढलेला फोटो मस्तच. तुमचा camera पण मस्त असला पाहीजे! नुक्तीच केरळ trip केली तेव्हा rufous treepie, white cheeked barbet, golden oriole आणि woodpecker बघायला मिळाले. पण माझा camera अगदीच गरीब असल्यामुळे फोटो नाही घेता आले.
तुम्ही पक्षीमित्र आहात
तुम्ही पक्षीमित्र आहात का?>>
धन्यवाद.
पक्षीमित्र म्हणता येणार नाही पण आवडतात पक्षी बघायला.
पक्षीमित्र म्हणता येणार नाही
पक्षीमित्र म्हणता येणार नाही पण आवडतात पक्षी बघायला.>>>>>हो पण, पक्ष्यांची अचूक माहिती असल्याने आमच्यासाठी पक्षीतज्ञच.
अरेच्चा!! मी कसकाय मिसलं
अरेच्चा!! मी कसकाय मिसलं हे?
मस्त आहे सगळे फोटो. १४ तर भन्नाटच
19 January, 2011 चे फोटो आहेत
19 January, 2011 चे फोटो आहेत होय? मग बरोबर. मी माबोकर नव्हतो तेंव्हा
सही....
सही....
धन्यवाद लोक्स. शागं.
धन्यवाद लोक्स.
शागं.
जिप्स्या कसली अचूक माहीती बाबा. अनेक पक्षी कळत नाहीत अजून. तिकडे पक्षी ओळखावर दिसतो का मी तूला?
सुरेख पक्ष्यांचे सुरेख
सुरेख पक्ष्यांचे सुरेख प्रकाशचित्रण! मनापासुन आवडले.
सर्वच प्रचि.. १ नंबर , नेत्र
सर्वच प्रचि.. १ नंबर , नेत्र सुखावले राव
अचानक ४ वर्षाने हे वरती आले.
अचानक ४ वर्षाने हे वरती आले.
असो. तर धन्यवाद . याच सिरीजमधे आणखी भर पडली आहे. http://www.maayboli.com/node/58710 हे पण बघा. यात बाकीही अनेक लिंक आहेत.
बेहद खुब..
बेहद खुब..
वाह झालं बघताना... शेकाट्याचे सुरुवातीचे फोटो..खासकरुन त्याचा आणि पाण्यातील त्याच्या प्रतिबिंबाचा फोटो ऑस्समच...
मधला त्याचा एक, तसेच कांडेसर आणि कापशी घारेचा इतका नाही भावला..
पण ५व्या Large Egret (बगळा) बगळ्याच्या मागे असलेली ती अर्धगोलाकृती आभा बघायला खुप छान वाटतेय...
फारच मस्त फोटो. आम्ही पण गेलो
फारच मस्त फोटो. आम्ही पण गेलो होतो भिगवणला. आम्हाला ऑस्प्रे दिसला. मला पक्षांची फार माहिती नाही पण आमच्या गाईडला फार आनंद झाला तो बघून. फ्लॅमिंगो उडताना बघून फारच भारी वाटले पण. हे इतर सगळे पक्षीसुद्धा दिसले पण तुमच्या फोटोत ते विशेष चांगले दिसताहेत.
धन्यवाद. ही संपुर्ण सिरीज जर
धन्यवाद. ही संपुर्ण सिरीज जर बघत असाल तर लक्षात येईल की कॅमेरा किंवा लेन्सनेही खूप फरक पडतो फोटोमधे. फोटोग्राफरची कमाल असतेच, त्या करता इतर अनेक निकष आहेत पक्षीनिरीक्षण करुन त्यांचे फोटो काढताना कॅमेरा, लेन्स, पोस्ट प्रोसेसींग हे पण अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. इथले अनेक भाग हे माझ्या जुन्या कॅमेराचे आहेत व प्रोसेसींग पिकसामधे. पिकासा व जेपेग फोटोची क्वालीटी खुप खराब करते.
एकुणच पहिले काही भाग व नंतरचे भाग यात तुम्हाला बराच फरक दिसेल.
मस्तच.
मस्तच.
Pages