सुरेश कलमाडी यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली व पुण्यातील त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवले. यावर गुन्हेगारांचे फटाके वाजवून स्वागत करणे पुण्याच्या संस्कृतीला शोभत नसल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. त्यावर माणिकराव ठाकरे कसे गप्प बसतील? कलमाडींची बाजू घेत ते म्हणाले, ‘‘पद्मसिंग पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसता हे चालते काय?’’ महाराष्ट्रातील मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व वाभाडे काढीत आहेत. भ्रष्टाचार व गुंडगिरीचे पुरावे देत आहेत. भ्रष्टाचार व गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या हाती सत्ता असणे हाच महाराष्ट्रात ‘गुंडा’राज सुरू असल्याचा पुरावा आहे. नारायण राणे, अजित पवार, आर. आर. पाटील, भास्कर जाधव हे मंत्री ज्या प्रकारची हिंसक व दहशतीची भाषा आज वापरीत आहेत ती अन्य कुणी वापरली असती तर पोलिसांना सांगून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली असती. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उकिरडा करण्याचे काम सुरू आहे. सत्ताधारीच म्हणतात, मंत्री गुंड व बनेल आहेत.
महाराष्ट्रातले हे गुंडाराज लवकर संपेल तेवढे बरे!
कलमाडी सुटला आणि पुण्यात पोचला. पुणेकरांच्या अकलेचे दिवाळे आणि अब्रूचे खोबरे करुन झाले. आता मनपाच्या विलेक्शनमधे पैसे खायाला आला रे आला. चला चला चला सुरेशभाईंच्या पाया पडू आणि तिकिटाची भीक मागू ! चला चला बिगी बिगी. लाजू नगा. मागं र्हावू नगा. जेलमदून भाईर आल्यावर समदे साफच असत्यात.
.
.
विजय, हे वाच. आणि शांत बस.
विजय, हे वाच. आणि शांत बस.
महाराष्ट्रातील मंत्री
महाराष्ट्रातील मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व वाभाडे काढीत आहेत >>>
चला चला बिगी बिगी. लाजू नगा.
चला चला बिगी बिगी. लाजू नगा. मागं र्हावू नगा. जेलमदून भाईर आल्यावर समदे साफच असत्यात.
+ १