गाजराचे लोणचे (लसूण घालून)

Submitted by श्यामली on 15 December, 2011 - 08:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ गाजरं,
४-५ कुड्या लसूण,
एका लिंबाचा रस,
तिखट, मीठ,
मोहरी, हळद, हिंग,
फोडणीसाठी तेल.
असेल तर थोडा लोणच्याचा मसाला (नसला तरी हरकत नाही)

क्रमवार पाककृती: 

गाजराचे लांबट काप करुन नीट कोरडे करुन घ्यावेत.
एका भांड्यात हे काप घेऊन त्यात लसूण थोडा ठेचून घालावा (पेस्ट करुन नाहीच)
तिखट, मीठ, लिंबाचा रस घालावा
वरुन हव्या तेवढ्या तेलाची फोडणी घालावी.
लोणचं तयार.

From 2011-12-15 random pic's

वाढणी/प्रमाण: 
लोणचं म्हणून खाणार असाल तर तेवढच, जीभ चटावलीये म्हणून खाणार असाल तर वाट्टेल तेवढं.
अधिक टिपा: 

गावठी गाजर इथे मिळतच नाहीत त्यामुळे लाल गाजरंच घेतली आहेत.
लसणाचा वास ज्यांना आवडत नाही/चालणार नाही, त्यांनी तशी प्रायवसी असेल तेव्हाच खावं Wink
तीखट जास्त असेल तर जास्त छान लागतं.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल केलं, संपवलं. Happy मी ठेचलेल्या लसणाबरोबरच आल्याच्या चकत्या पण घातल्या होत्या. Happy

मानसी, थोडंच करत असल्यामुळे फोडणी गरमच घालते या लोणच्याला.
निवेपर्यंत दम धरवत नाही हे खरं कारण Happy

अनघा, नक्की कर आणि सांग. अल्पना किती केलसं, उरलं का नाही थोडंफार?

खूप छान होतं हे लोणचं. फोटो काढायला उरलंच नाही. माझ्या लेकीनं तर नुसतं वाटीत घेऊनही खाल्लं.
एक टिप- दहीभाताबरोबर एकदम मस्त लागतं.

श्यामली, मस्तच रेसिपी.. किती दिवस टिकेल हे लोणचं तुझ्यामते?
किंचित साखर घातली समज आणि फ्रिजात ठेवलं तर?

दक्षिणा, साखर नकोच ग, चव बिघडेल अगदी. टिकायच्या बाबतीत म्हणशील तर व्हिनेगर घालून टिकवतात म्हणे लोक. मी असं टिकाऊ लोणचं कधी केलं नाहिये, त्यामुळे ठाउक नाही. पण हे असच्या असं केलेलं लोणचं, ८-१० दिवस फ्रिजमधे छान रहात.

मंडळी धन्यवाद, आईकडून शिकलेली ही पारंपारिक कृती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवण्यात आनंद वाटला.

धन्यवाद श्यामली, कालच केलं हे लोणच मस्तच झालं..... फक्त वर सांगितल्या प्रमाणे तिखट चांगल लागत म्हणुन तिखटाचं प्रमाण वाढवल (मी लोणच मसाला देखील टाकला) त्यामुळे जरा जास्तच तिखट झालयं पण तरीही घरातल्यांनी थोड थोड करुन निम्म्यापेक्षा जास्त संपवल Happy

श्यामली, मी असच कारल्याचं लोणच करते.. सगळ मटेरिअल सेम फक्त गाजरा ऐवजी कारले आणि थोडा केप्र / बेडेकर लोणचे मसाला पण घालते.. छान चव येते एकदम Happy