Las acasias - Spain - 85 min - 2010
खरं सांगायचं तर हा चित्रपट मी स्पॅनिश मनसोक्त ऐकता यावी म्हणून गेलेले. ती भाषा एक मला उगीचच आवडते. पण या पातळीवर साफ अपेक्षाभंग झाला माझा. ५ मि. झाली, १० झाली, १५ झाली.. कोणी काही बोलायलाच तयार नाही. आणि नंतर जे काही संवाद झाले त्यावरुन या चित्रपटात संवाद नाममात्रच असणार आहेत याची जाणिव झाली. पण थिअटर खचाखच भरलं होतं, लोकं बाजूने उभे होते त्यामुळे चित्रपट नक्कीच चांगला असणार हे मी ताडलं आणि बसून राहिले. बसले ते बरंच केलं असं वाटलं सिनेमा पाहिल्यावर. भारी सिनेमा आहे. एक ट्रकड्रायव्हर, त्याच्या ट्रकमधून प्रवास करणारी एक बाई आणि तिची ५ महिन्याची मुलगी. एक मूल सोबत प्रवास करणार म्हटल्यावर काहीश्या त्रासानेच या प्रवासाला सुरुवात होते. अनोळखी माणसांत होईल तेवढंच जुजबी बोलणं. आणि मग अख्ख्या प्रवासात फार काही न बोलताही होत राहिलेला त्यांचा संवाद. तिघांचीही अप्रतिम एक्स्प्रेशनस्.. अगदी त्या ५ महिन्यांच्या बाळाचीसुद्धा..! चित्रपटाची मुख्य गरज, चित्रपटाचा गाभाच त्यांच्या एक्स्प्रेशनस् चा आहे. फार बोलणं होतच नाही दोघांत. अगदी त्यांच्या पूर्वायुष्याची पण जुजबीच माहिती घेटलिये. पण म्हणून कुठे काही कमी वाटत नाही. जी कथा आहे ती अगदी नीट पोहचलिये. छान सिनेमा.!
Voice Over (Zad kadar) - Bulgeria - 2010 - 107 min
विघटनपूर्व सोव्हियतच्या सामाजिक परिस्थितीची कल्पना असेल तर हा चित्रपट मस्ट वॉच आहे. त्या एका कालखंडात माणसांच्या वैयक्तिक आयुष्यात चाललेली सरकारची पराकोटीची ढवळाढवळ, व्यक्तिस्वातंत्र्यावरची बंधनं आणि त्यांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम यांचं दर्शन घडवणारा हा चित्रपट. एक कॅमेरामॅन, ज्याचं त्याच्या प्रोफेशन वर प्रचंड प्रेम आहे. त्याच्या मुलाला तिथल्या हवामानाचा त्रास होतोय म्हणून त्याची बायको मुलाला घेऊन बर्लिन ला जाऊन राहते. आणि त्यांच्या संवादातून चित्रपट पुढे सरकत जातो. त्यांची पत्र ज्यांत तिने त्याला बर्लिनला येण्याविषयी लिहिलेलं असतं, त्यांचे फोनवरचे संवाद या सगळ्यांचं इंटर्प्रिटेशन ते हेर कसे करतात आणि त्यातून त्यांचं नातं कसं अफेक्ट होत जातं हे बघणेबल आहे. भारी सिनेमा..
All that remains - Switzerland - 2010 - 92 min
दोन रस्ते.. महासागरांच्या टोकांकडे जाणारे.. दोन वेगळी शहरं.. भिन्न संस्कृती.. या रस्त्यांवरुन चाललेला ४ माणसांचा प्रवास. एकमेकांच्या दिशेला चाललेला पण एकत्र न येणारा.. मध्ये पसरलेल्या समुद्रामुळे. छान संवाद. दोन्ही जोड्यांचं निर्माण होत जाणारं नातं. नकोसं असलं तरी टाकून देता न येणारं आणि त्यातच कधीतरी मग क्म्फर्टेबल होत जाणारं. मस्त सिनेमा.
या व्यतिरिक्त, Moneyball, Anytime anywhere, Palwan fate हे चित्रपटही पाहिले. Moneyball चं दिग्दर्शन भारी आहे. चित्रपटच भारी. पण विंग्रजी सिनेमाविषयी काही खास वाटू नये असाच मोसम होता. Anytime anywhere हा एक तामिळ चित्रपट पाहिला. नेहमीच्या साऊथ इंडियन सिनेमापेक्षा काहीतरी वेगळा, थोडा फार लाईट पण गंभीर शेवटाचा. Palwan fate चा कॉन्सेप्ट तर भारी होता पण सिनेमा बघताना मला झोप लागलेली.. पहिली २० मि. पाहिला मग २० मि. झोपले मग परत १० मि. पाहिला आणि बाहेर पडले..
नॉन सिनेमॅटीक हायलाईट म्हणजे, बिग बी ला एका फुटावरुन पाहिलं. त्याच्या मागोमाग रानीला कोणी भाव देत नसताना पाहिलं. पहिल्या दिवशीच्या गोंधळात कोणीही कोणाशी आपणहोऊन बोलताना अनुभवलं (जे कोथरुडात नॉर्मली होत नाही.. ) मध्येच कधीतरी महेश भट्ट फिरत होता.
याखेरीज, या वर्षांतल्या ठळक घडामोडी..
१) पुने युनिव्हर्सिटी आणि जर्मन युनि. चा टाय अप. (२०११)
२) मॅक्सम्युलर आणि FTII च्या सोबत जर्मनीच्या सहकार्याने NFAI मध्ये ३ दिवसांचा जर्मन चित्रपट महोत्सव. (गेल्या १-२ महिन्यांत)
३) पिफ च्या कंट्री फोकस मध्ये जर्मन सिनेमा.
४) बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे जर्मन एन्व्हॉय.
५) बेस्ट सिनेमा, इफ नॉट अस, हु? (जर्मन)
असो... तर अशी ही १०व्या पिफची कहाणी सुफळ संपूर्ण..
मस्त..!!! internet वर शोधुन
मस्त..!!! internet वर शोधुन बघायला हवेत हे सिनेमे..!!
धनय्वाद मुक्ता.
धनय्वाद मुक्ता.
रैना, यातले काही सिनेमे
रैना,
यातले काही सिनेमे पाहण्यात आले आणि आवडले तर कळवा..