Submitted by मंदार-जोशी on 25 January, 2012 - 06:24
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
येत असावा महान कंटाळा,
किंवा असावी सर्दी तिला!
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'कॉफी' उडून जाता
असेल टाकला चहा
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
किरणांनी भाजले का
सूर्याच्या तिला?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दीर्घाचा र्हस्व होता...
का राग राग करते?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
खावी बिस्कीटे कशी?
- प्रश्न पडला तिला
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दुष्ट 'तो' असावा
त्या भ्रमरापरी
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
असेल का वृत्ती,
'सनातन' फार त्याची?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'वृत्तात' राम नाही
का वाटले तिला?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
कढईत जळाले तिच्या,
मासे कोळशापरी
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'काणे' करुन डोळे
का बघते गझलेकडे?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दिली असावी कदाचित
'आत' वर्दी कुणी!!
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
(No subject)
ह्म्म्म्म! एका दगडात किती
ह्म्म्म्म!
एका दगडात किती पाखरं भुईवर आपटवता येतात याचा विक्रमच केलात
टाटा कविता.
टाटा कविता.
खरंच काहीच्या
खरंच काहीच्या काही............. आवडली...........
विभाग्रज
विभाग्रज
कविता मस्त आहे. काही ठिकाणी
कविता मस्त आहे.
काही ठिकाणी यमक गंडलं मात्र.. तरी एकंदर चांगली जमली आहे.
धन्स सर्वांना
धन्स सर्वांना

विशिष्ट व्यक्तीला/व्यक्तींना
विशिष्ट व्यक्तीला/व्यक्तींना उद्देशून ही कविता असावी असं अवतरण चिन्हातल्या शब्दांवरून वाटलं.
कविता एक तर पर्फेक्ट वृत्तात किंवा मुक्तछंदात असती तर अधिक प्रभावी झाली असती,
आशय अधिक सहजतेने स्पष्ट झाला असता असं माझं वैयक्तिक मत.
मंदार ही कविता कुणालाच
मंदार
ही कविता कुणालाच उद्देशून नाही असं समजून विलासराव देशमुख मोड मधे शिरून वाचायचा प्रयत्न केला पण अवतरण चिन्हं कडमडली मधे !
खिडकीत येत नाही .. ही ओळ रिपीट करून त्यावर पुढच्या दोन ओळीत पेरणी करायचा हा फॉर्म ( कवितेचा आकृतिबंध ?) मला फार आवडला. कुठे तरी वापरीन नक्की. त्याबद्दल मनःपूर्वक आभार. ही कविता एक खेळकर, प्रसन्न कविता होऊ शकते.
टीप : विलासराव देशमुख मोड = डावीकडे पहायचे, उजवीकडे पहायचे... आणि सरकार चालवायचे.
उल्हास जी +१
उल्हास जी +१
(No subject)
मजेशीर... पण उकाकांना
एका दगडात किती पाखरं भुईवर
एका दगडात किती पाखरं भुईवर आपटवता येतात याचा विक्रमच केलात
बेफींनी अचूक ओळखले...मी हेच लिहायला आलो होतो....

(No subject)
विदिपा, इतके का हासताय?
विदिपा, इतके का हासताय?
<<'काणे' करुन डोळे
का बघते गझलेकडे?>>
म्हणून (डोमा)
(No subject)
मंदार, महान वात्रट आहेस.
मंदार, महान वात्रट आहेस.
या व्यक्तीला कविता रचण्याची
या व्यक्तीला कविता रचण्याची बंदी करण्यासाठी भारतात हुकूमशाही स्थापन करावी लागेल व ते अशक्यप्राय आहे याची जणीव असल्याने आम्ही गप्प राहत आहोत
(No subject)
या व्यक्तीला कविता रचण्याची
या व्यक्तीला कविता रचण्याची बंदी करण्यासाठी भारतात हुकूमशाही स्थापन करावी लागेल व ते अशक्यप्राय आहे याची जाणीव असल्याने आम्ही गप्प राहत आहोत>>>>>>सरळ बकवास आहे म्हणुन सांगुन टाका ना.
ही रचना काहीच्या काही कविता
ही रचना काहीच्या काही कविता या विभागात आहे याची जाणीव ठेवा लोक्स
सरळसोट वैयक्तिक आकस मांडलेला
सरळसोट वैयक्तिक आकस मांडलेला आहे.

ही रचना गंमत म्हणूनच लिहीलेली
ही रचना गंमत म्हणूनच लिहीलेली आहे. आता त्यात काहींना वात्रट विनोद दिसेल, काहींना टीपी, तर काहींना वैयत्तिक आकस.
अपनी अपनी सोच
एका दगडात किती पाखरं भुईवर
एका दगडात किती पाखरं भुईवर आपटवता येतात याचा विक्रमच केलात
>>>>>>>>>>>>>>>
पाखरं आपटली की सगळे दगड फुकट गेलेत...
किंवा मग सगळीच पाखरं मुर्दाड आहेत... आमच्यासारखी

अर्धी अधिक पाखरं तर खदाखदा हसतायत, म्हणजे दगड लागलेलाच नाही.... नेम चुकला रे मंद्या.......
अर्ध्या पाखरांच्या डोक्यावरुन
अर्ध्या पाखरांच्या डोक्यावरुन दगड गेलाय
बाकीच्यांनी हलके घेतलंय 
अर्ध्या पाखरांच्या डोक्यावरुन
अर्ध्या पाखरांच्या डोक्यावरुन दगड गेलाय डोळा मारा बाकीच्यांनी हलके घेतलंय फिदीफिदी
>>>>>>>>>>>>>>
बघ मंद्या, म्हणजे हल्ली तुला कुणीच सिरियसली घेत नाही......
सिरिअसली घेतलंय म्हणूनच
सिरिअसली घेतलंय म्हणूनच प्रतिसाद दिलाय भुंग्या
सिरिअसली घेतलंय म्हणूनच
सिरिअसली घेतलंय म्हणूनच प्रतिसाद दिलाय भुंग्या
>>>>>>>>>>>>
अपनी अपनी सोच

आपला खराखुरा "काहीच्याकाही टीपी" चाललाय.
जौदे..............ती नाही येत
जौदे..............ती नाही येत तर तु बघु नकोस वर खिडकी कडे,,,,,
Pages