परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - ४

Submitted by माध्यम_प्रायोजक on 22 January, 2012 - 23:43

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही चौथी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

quiz_4b.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो,

चित्रं, आकडे जरा नीट बघा. उलटसुलट करून काही सापडतं आहे का, ते बघा. Happy
याच बाफवर सुरुवातीला जो रॅण्डचा आणि 'फाउंटनहेड'चा संबंध सांगितला आहे, तो मार्ग योग्य आहे.
हे कोडं वाटतं तितकं अवघड मुळीच नाही.

पहिल्या चित्राच्या खाली जो आकडा आहे तो त्या चित्रपटाशी संबंधीत पुस्तकातील शब्दांची संख्या आहे.. दुसरा आकडा ही तसाच आहे.. तसे असेल तर तिसर्‍या चित्रा खाली फाऊंटनहेड मध्ये असलेल्या शब्दांची संख्या - 311,596

तसे असेल तर तिसर्‍या चित्रा खाली फाऊंटनहेड मध्ये असलेल्या शब्दांची संख्या - 311,596
>>> हिम्या, आगाऊपणा करु नकोस Lol उद्या म्हणशील लास्कींच्या हातातही एखादं शस्त्र दाखवा.

बावीस जून १८९७ रँडचा वध पहिला आकडा. आणि त्या तारखेचा चित्रपट व चित्रपट वधाशी संबंधीत.

बाळकृष्ण चाफेकर यांनी आयरेस्टचा वध केला. त्यानंतर दामोदर चाफेकर यांनी रँडचा वध केला. त्याचा दुसर्‍या कृष्णाच्या नरकासूर वध या चित्राशी संबंध.

रँड याचा खून झाला म्हणून तिसर्‍या चित्राशी संबंध.

>>तरीही त्याच्यावर फिदा असलेल्या स्त्रियांची काय गणती? अगदी आपल्या कृष्णासारखा

हे जरा जास्त होतंय.

विक्रम३११,
तुम्ही योग्य मार्गावर आहात. पहिल्या चित्रातून तुम्ही काढलेला अर्थ योग्य आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या चित्रांचा संबंध जरा नीट बघा Happy

२२ जून १८९७ च्या दिवशी words होते "गोंद्या आला रे!". तो गोंद्या (=गोविंद) दुसर्‍या चित्रात दिसतो.

२२ जून १८९७ - रँड वध. (धन्यवाद विक्रम)
रँड आणि तिसर्‍या चित्रातील हॅरॉल्ड लास्कीचा संबंध - आईन रँड या 'द फाऊंटनहेड' या कादंबरीच्या लेखिकेनं सांगितल्याप्रमाणं तिला हॅरॉल्ड लास्कीमध्ये तिच्या कादंबरीचा खलनायक एल्सवर्थ टूही दिसला होता!
आणि वर गामा पैलवान म्हणतात त्याप्रमाणं रँडवधादिवशीचे वर्ड्स होते 'गोंद्या आला रे' - जे गोविंदाकडे पॉईंट करतात. हा पहिल्या दोन चित्रांतला संबंध.
आता कृष्णाला 'द फाऊंटनहेड ऑफ अवतार्स' असं टायटल दिलेलं आहे नवपरिणीत विचारसरणींनी. तेव्हा हा दुसर्‍या आणि तिसर्‍या चित्रांतला संबंध!
दुसर्‍या चित्रात आहे ते एक पुस्तक दिसतंय तेव्हा त्याखालचे आकडे कदाचित त्या पुस्तकाचा आयएसबीएन असावा.

लोकहो,

या कोड्याचं उत्तर आहे - रँडचा वध

१. टर्मिनेटरचा प्रसिद्ध संवाद (words) म्हणजे 'आय विल बी बॅक' (I'll be back). म्हणजे 'आय विल बी बॅक' असे 'वर्ड्स'..... I'll be back-words..... I'll be backwards म्हणून पुढे दिलेला क्रमांक उलटा वाचला तर - २२०६१८९७. टर्मिनेटर भविष्यकाळातून भूतकाळात येतो. तेव्हा आकड्याच्या संदर्भाने भूतकाळातील चित्रपटाकडे जायचे, म्हणजे २२/०६/१८९७, अर्थात, '२२ जून १८९७'. रँडच्या वधाची तारीख व त्याच नावाचा रँडवधावरचा प्रसिद्ध मराठी चित्रपट.

२. आधीच्या क्रमांकासारखाच इथला क्रमांकसुद्धा उलटा करायचा, कारण त्या दोघांच्या मध्ये स्वल्पविराम आहे. पण हा एका पुस्तकाखाली आहे. तेव्हा 'आय विल बी बॅक' याचा इथे अर्थ हा क्रमांक पुस्तकाच्या मागच्या बाजूला आहे. पुस्तकाच्या मागील बाजूला आयएसबीएन क्र. (ISBN) असतो (हा बारकोडाशी संलग्न असतो). आयएसबीएन क्र. ०३९४४१५७६० हा 'आयन रँड' (Ayn Rand) या लेखिकेच्या 'अ‍ॅटलस श्रग्ड' या पुस्तकाचा होय.
शिवाय, दुसर्‍या चित्रात एका विशिष्ट पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. हेच निवडण्याचे कारण यात श्रीकृष्ण नरकासुराचा वध करताना दाखवला आहे. म्हणजे रँड आणि वध सुचवले जातात. तसेच, वध/हत्या करणारा श्रीकृष्ण = 'खुन्या मुरलीधर', या नावाचे पुण्यातील सदाशिव पेठेत देऊळ. रँडवधप्रकरणात द्रवीड नावाचा माणूस इंग्रजांना फितूर झाला व चाफेकर बंधू पकडले गेले. या फितुराचे घर 'खुन्या मुरलीधरा'च्या मंदिराजवळ होते. ही फितुरी समजल्यावर वासुदेव चाफेकर व काही मित्रांनी त्याची देवळापाशी हत्या केली. खुन्या मुरलीधराचा रँडवधाशी असा संबंध.

३. हॅरॉल्ड लास्की. ब्रिटनचा मार्क्सवादी नेता. परत एकदा 'आयन रँड'. तिच्या 'द फाउंटनहेड' या कादंबरीतील 'एल्सवर्थ टूही' ही व्यक्तिरेखा लास्कीवर बेतली होती.

हे तिन्ही संबंध एकत्रित कोणीच ओळखले नाहीत.

मात्र ललिता-प्रीति, विक्रम३११ आणि देवचार यांनी वेगवेगळ्या चित्रांचे संबंध शोधले. त्यामुळे या तिघांनाही विजेते म्हणून घोषित करत आहोत.

तुम्हां तिघांचंही मनःपूर्वक अभिनंदन. Happy बक्षिसासंदर्भात लवकरच संपर्क साधला जाईल.

या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार Happy

देवचार,
तुमचा इमेल पत्ता संपर्कातून कृपया कळवणार का? तसंच तुम्ही कुठल्या शहरात , देशात आहात, तेही. Happy

हॅरॉल्ड लास्कीच्या दिलेल्या फोटोत नि 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमाच्या पोस्टरवरील नंदू माधव यांनी साकारलेल्या दादासाहेब फाळक्यांच्या चेहर्‍यात बरंच साम्य असल्यासारखं वाटलं मला. तेव्हा मी काही वेळ या चित्रपटाचा काही संबंध आहे का हेही पाहत होतो! Rofl Biggrin

220px-Harishchandrachi_Factory,_2009_film_poster.jpglaski.JPG

हा हा हा!

मस्त होतं कोडं. धन्यवाद माप्रा.

विक्रम३११, ललिता प्रीती आणि देवचार यांचं अभिनंदन.

विक्रम३११ नी तारीख शोधून काढली ते जबरीच.

मला पण हरोल्ड लास्की चा फोटो पहिल्यांदी बघितल्यावर दादा साहेब फाळके यांच्या सारखाच वाटला होता . आणि मी सिनेमाच नाव "जन गण मन" आहे म्हणून त्याच्याशी काहीतरी संबंध जुळवायला बघत होते.
विजेत्यांचे अभिनंदन Happy

हॅरल्ड लास्की आणि अरनॉल्ड श्वार्झनेगर दोघेही यहुदी (श्रीकृष्णाचे वंशज) आहेत. अस्मादिकांचे विमान कल्पनेच्या आकाशात भरार्‍या मारू लागले होते. मात्र त्या आकड्यांचा पर्वत आडवा आला आणि त्यावर आदळून जमीनदोस्त झाले! Sad Proud

धन्यवाद मा प्रा.

२२ जून १८९७ जबरीच होतं Happy

गूगल आणि विकीचे आभार मानायला हवेत... ते नसते तर आपण काय केलं असतं!!

काल टर्मिनेटरचं पोस्टर पाहिल्या पाहिल्या मी स्वत:शीच I'll be back म्हटलं होतं, पण त्याचा पुढे असा काही संबंध असेल हे डोक्यातच नाही आलं.

Pages