पिफ २०१२ - १

Submitted by मी मुक्ता.. on 21 January, 2012 - 09:55

दर वर्षी नवीन वर्षाच्या चाहुलीसोबतच चित्रपटरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) १२ ते १९ जानेवारीत पार पडला. यात पहायला मिळालेल्या काही चांगल्या सिनेमांविषयी थोडसं....

Here without me (inja bedoone mah) - Iran - 2011 - 100 min
एक इरानची लाईफस्टाईल सोडता हा चित्रपट बघताना काहीच अनोळखी वाटलं नाही. प्रत्येक पात्राच्या भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या होत्या की जगातल्या कोणत्याही भागातील माणूस त्या कुठे ना कुठे रीलेट करु शकेल. चित्रपटात तीनच मुख्य पात्र. आई आणि तिची २ मुलं. लग्नाला आलेली अपंग मुलगी जिला अपंगपणामुळे काँम्लेक्स आहे, चित्रपट कथा लिहिण्याची स्वप्न पहाणारा पण परिस्थितीमुळे कारखान्यात काम करणारा तिचा भाऊ आणि या सगळ्यात, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांमध्ये अडकलेली या मुलांची आई. सगळ्याच्या सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या सुंदर व्यक्त होत जातात. त्यांच्या सगळ्या भावना अतिशय पर्सनल असूनही त्यांची तगमग सगळ्यांपर्यंत पोहचवण्यात त्या यशस्वी झाल्यात. मुलीचं लग्न तिच्या आवडत्या मुलाशी व्हावं म्हणून चाललेली तिची धडपड पाहताना 'बातो बातो में' मधल्या रोझी ची आठवण आली मला तरी. अर्थात हा सिनेमा गंभीर पण तरीही अंगावर येणारा नाही. काही कथा हॅपी एंडिंग केल्या की फारच फिल्मी वाटतात पण याचं तसं झालं नाही. शेवटाकडे चित्रपट निघाला तेव्हा मी खरच इच्छा करत होते हॅपी एंडिंग हवम आणि ते तसच होतं. अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि उत्कृष्ट अभिनयाचा हा चित्रपट नक्की पहावा असाच आहे.

Red heart (Dli sur) - Iraq - 2011 - 78 min
एकमेकांच्या प्रेमात पडलेलं एक किशोरवयीन जोडपं. मुलीची आई नुकतीच वारलेली. घर, भावंडांना सांभाळून शाळा करणारी ती. आणि आपलं दुसरं लग्न व्हावं म्हणून तिला एका वेडगळ मुलाशी लग्नाची सक्ती करणारा तिचा बाप. त्याच्या तावडीतून पळून गेल्यावर त्या जोडप्यावर काय काय प्रसंग येतात याची ही कथा. ऐकिव किंवा वाचून कितीही माहिती असली तरी तिथली परिस्थिती पडद्यावर पाहताना कायमच अंगावर येते.. ह्म्म...

Return Ticket (Dao fu yan liu bai li) - Taiwan - 2011 - 88 min
नवीन वर्षासाठी गावी जाणार्‍या बसेस च्या कमतरतेतून फायद्याच्या उद्देशाने एका बसची एक ट्रिप अ‍ॅरेंज करुन काही कमाई करु पहाणारा एक ग्रुप. त्यांची तिकीटं विकणारी एक बाई आणि तीची घरमालकीण. या ना तय निमित्ताने शांघायमध्ये येऊन राहिलेल्या दोघींची ही कथा. अगदी डायरेक्टली काही गोष्टी न सांगता, दाखवताही दोघींची आयुष्य आपपल्या पद्धतीने बदलत जातात हे चांगलच दाखवलय. शेवटी जिला जायचं नसतम ती घरी जाते आणि जी जायचा विचार करत असते ती जाणं रहित करते. यु नेव्हर नो.. असं काहीसं.. छान चित्रपट..!

Nader and simin: A seperation (Jodaeiye Nadar az simin) - Iran - 2011 - 123 min
Brilliant direction.. हा एकच शब्द सुचतोय मला तरी. अतिशय देखणा अभिनय आणि उत्कृष्ट कथा. चित्रपट बघताना इतकं गुंतायला होतं की डोक्यात इतर काही विचारांना जागाच राहत नाही. चित्रपटाच्या बर्‍याच गोष्टींचे निर्णय प्रेक्षकांवरच सोपवलेत त्यामुळे आपली जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागते. एक घटना, २ कुटुंब. प्रत्येक माणूस आपल्या फायद्यासाठी त्या घटनेचे कसं इंटरप्रीटेशन आणि मॅनिप्युलेशन करतो ते बघताना डायरेक्टर्ला सलाम करावा वाटतो. या घटनेच्या निमित्ताने उच्च आणि कनिष्ट वर्गातली परिस्थिती आणि मानसिकता यांचंही यथार्थ दर्शन होतं. घटना संपून जाते पण आयुष्य चालूच राहतं. आणि हे उर्वरीत सगळं घेऊनच आपण बाहेर पडतो. हॅट्स ऑफ...

Pina - German - 2011 - 100 min
Pina Bousch.. ७०, ८० ची प्रसिद्ध जर्मन नृत्यांगणा. तिच्याच कोरीओग्राफिज वापरुन तिच्या सहकलाकारांनी तिला केलेला हा सलाम. तिच्या सहकलाकारांची तिच्याविषयीची मतं, तिच्या सांगितलेल्या आठवणी आणि डान्सेस यांचं कोलाज म्हणजे हा चित्रपट. डान्सची विशेष आवड असेल तर नक्की पहावा असा..

क्रमशः------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप,
ह्म्म.. Happy पिना तसा नेटवर मिळून जाईल पण मोठया पडद्यावर वेगळाच इफेक्ट येतो... पिन ड्रॉप सायलेंस होता शेवटपर्यंत थेटरात.. भारी होतं ते..

शाम,
फेस्टीव्हलविषयी शेवटच्या भागात लिहिन.. Happy

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बरेच चांगले चित्रपट पहायला मिळाले. पण वर उल्लेख केलेला एकही पाहता आला नाही.
आवडलेल्यांमध्ये स्पॅरो, साऊंड ऑफ लव्ह, जियाना (यात त्या लहान पोरीने काय सुरेख काम केलेय) आणि प्रिसीडंट (उच्चार चुकला आहे बहुतेक). सुरुवातीला फारच कंटाळवाणा वाटला पण जशी जशी ग्रिप घ्यायला लागला तेव्हा जबरदस्त मजा आली.
अजून भाग येऊ द्यात

मी यंदाच्या पिफ मध्ये पाहिलेले चित्रपट वर्ल्ड कॉम्पिटीशनमधलेच होते.
एम्नेस्टी, दिआगो, इफ नॉट अस हू आणि व्हॉईस ओव्हर. प्रिसिंक्ट, स्पॅरो, साऊंड ऑफ लव्ह आणि जोआनाचा उल्लेख आधी केलाच आहे.
बाकी ग्लोबल सिनेमामध्ये लास अकासियस फारच सुंदर होता. त्यात आठ महिन्याच्या बाळाकडून दिग्दर्शकाने काय अप्रतिम एक्प्रेशन्स मिळवले आहेत. रिटर्न ऑफ निअँथंडर मॅन चांगला असेल असे वाटले होते. पण तो फार्सिकल निघाला. अर्थात दिग्दर्शकाला काय सांगायाचे आहे ते पोचले पण असे वाटले की त्याची हाताळणी जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकली असती. (अर्थात हेमावैम)
भारतीय चित्रपटांमध्ये पर्कारत्नम उल्लेखनीय.

ह्म्म.. वर्ल्ड काँप. मधले सगळेच छान वाटले नाहीत त्यामुळे ग्लोबल सिनेमा जास्त शोधला रेटींग पाहुन पाहुन.. Happy

बाकी व्हॉईस ओव्हर भारीच होता. लिहिणार आहेच आणि लास अकासियाज पण.. Happy

मीही बहुतेक सगळे जागतिक स्पर्धाविभागातलेच पाहिले. या विभागातला 'सेपरेशन' तेवढा बघता आला नाही. Sad
'जन गण मन' हा एकमेव भारतीय सिनेमा पाहिला. शेवटच्या दिवशी पाहिलेले 'माय मार्लन अ‍ॅण्ड ब्राण्डो' आणि लव्ह इन अनदर लँग्वेज' हे दोन तुर्की सिनेमे मस्त होते. 'मॅन विदाउट अ सेलफोन'ही छान होता. एकंदर २९ चित्रपट पाहिले.