आयचाघोरसचा सिद्धांत

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2011 - 04:57

मी_आर्या यांच्या या कवितेवरून सुचलेली ही का.का.क.
आयचाघोरस हे अमित. यांनी बहाल केलेलं नाव आहे Proud
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

चौकोनात फिरणार्‍या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ

शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हे एको होतंय असं समजावं)

चौकोनात फिरणार्‍या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ

हे आवडले.

जबरी आहे - इतकी भौमितिक कविता पहिल्यांदाच वाचली Happy

Pages

Back to top