आयचाघोरसचा सिद्धांत

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2011 - 04:57

मी_आर्या यांच्या या कवितेवरून सुचलेली ही का.का.क.
आयचाघोरस हे अमित. यांनी बहाल केलेलं नाव आहे Proud
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

चौकोनात फिरणार्‍या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ

शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हे एको होतंय असं समजावं)

सत्या, देवा देवा देवा... तुच रे तुच तो "पाय्थागोरस".

"आयचा घो" हे वाक्यच मुळी अजुन कुणीही उच्चारलं नव्हंत, विश्वास नसेल तर बघुन घे तुझा प्रतिसाद सोडुन वरुन खाल पर्यंत.

तुच तो Lol

चातक आयचा घो म्हणजे आईचा नवरा रे बाबा!!!>>> कोमुतै तुझे बरोबर आहे Happy पण इथे त्याचा उल्लेखच नाहीय. Lol

अरे असा कोणाचा बाप काढू नये पाप लागतं म्हणे. अरे 'घो' म्हणजे नवरा>> खुळखुळ्या, तुही बरोबर आहेस पण इथे मी "घोरस" चा अर्थ सांगीतला आहे. खुळाच आहेस Lol

ठमे Proud

चातका, यु नीड सम ब्रेन वॉश. नेक्स्ट त्सुनामी येईल तेव्हा तेवढं करून घे. तुझी पोस्ट वाच जरा नीट. काय लिहिलंय ते बघ.

का वागतात हेच कळत नाही >>> कारण त्यान्न का का क कळत नाही म्हणुन Happy चातक ह्यांना पण दिवा दे बघु... सगळे दिवे वाटुन टाक म्हणजे इकडे तिकडे दिवे लावत फिरणार नाहीस Happy एक ठेव तुझ्या कडे माझ्या वाटणीचा Lol

तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

मंदार,
तुझा हा सिद्धांत आवडला, वरील तुफान सुरुवात तर खुप आवडली !
Happy

पोटाचं वर्तुळ झाल्यावर २२/७ मारायचा नसतो
आयचो घो झालास तरी Biggrin
कर्णाचा वर्ग=अर्जुनाचा वर्ग - द्रौपदीचा वर्ग
Rofl
रामकुमार

22 भागिले ७ ही पाय ची संख्या व पायथॅगोरस सिद्धांत वेगळे आहेत असे मला वाटते.

बाकी अवांतर

पण पायथॅगोरस सिद्धांतावरुन सुद्धा पायची संख्या काढता येते.

हाय मंदार,
मी-आर्या यांची मूळ रचना, आणि ही तुझी 'विम्बल्डन' रचना, दोनही रचना वाचल्यावर माझ्या वर्तुळाकार टकुर्‍याचा पार पॅराबोला झाला रे! Biggrin Biggrin Biggrin

Pages