उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग,
सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो ||
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता
कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो ||
दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी
हातातील नाणी, उगीच मोजतो ||
पोटाचेच जिथे, रोजचे सायास
कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||
उडवती नाणी, ओवाळिती नोटा
सारे त्या भगवंता, लाच दाखविती ||
येई कोणी शेट, मागाहून पुढे
देवाहून जास्ती, सलाम ठोकिती ||
हा परी इथे, खातो शिळेपाके,
देवाच्या वाटी, साधा नमस्कार ||
भक्ती मनी दाटे, परी भूक लागे,
पोटापुढे नसतो, मनाचा विचार ||
कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र
कोणी आरोग्य, आयुही मागिती ||
सारी असली जरी, देवाचीच पोरं,
एक दुजियाचा, नाशही मागिती ||
देव येई निघुनी, याच्यापुढे उभा,
"मला लेका तुझा, नमस्कार भारी ||
येती लाखो माझ्या, सामोरी आडवे
भक्तीपरी मात्र, पैशाची मुजोरी ||
बदलती देव, कपड्यासारखा
भावापेक्षा यांची, धनाची सलामी ||
पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद
देवालाही लावी, कराया गुलामी ||
पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
जोडी दोन हात, घेई माझे नाम
तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" ||
देव जाई निघुनी, मंदिरी कल्लोळ
सारेची निष्फळ, प्रयत्न यांचे ||
दोषारोप चालू, पोलीसा सांगिती,
पूरची लोटिती, हरेक उपायांचे ||
अखेरीस कोणी, आणिती पाषाण
शेंदूर फासून, "देव" सारी म्हणे ||
पुनश्च चालू, दगडाचा जयघोष,
देव परी दूर, पाहतो विषण्णे ||
बऱ्याच काळाने लिखाणाचा
बऱ्याच काळाने लिखाणाचा प्रयत्न केला आहे. कविता या जास्त अवघड क्षेत्रातील हा पहिलाच प्रयत्न. मागील लेखनानंतर कित्येक महिने लोटूनही काही सुचतच नव्हते. हे देखील चांगले आहे असे म्हणणे नाही............तुम्हीच ठरवा........
छान आहे मला तरी आवडली
छान आहे मला तरी आवडली
निशदे: फारच सुदर कविता. मन
निशदे: फारच सुदर कविता. मन भक्तीबरोबरच विषण्णतेने भरुन आले.
बदलती देव,
बदलती देव, कपड्यासारखा
भावापेक्षा यांची, धनाची सलामी ||
पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद
देवालाही लावी, कराया गुलामी ||>>
छान
छान्.......
छान्.......
“अखेरीस कोणी, आणिती
“अखेरीस कोणी, आणिती पाषाण
शेंदूर फासून, "देव" सारी म्हणे ||
पुनश्च चालू, दगडाचा जयघोष,
देव परी दूर, पाहतो विषण्णे ||” >>>> विषण्ण व्हायची पाळी देवावर आली आहे हे अगदी खरं.
------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीमंतांच्या बेगडी भक्तीने देव विषण्ण झाला हे कवितेतून नीट मांडलंय.
परंतु, गरीबाने असं काय केलं की देव त्याच्यावर प्रसन्न झाला
याचं स्पष्टीकरण कवितेत मिळत नाही.
केवळ गरीब असणं हा भक्तीचा मापदंड होऊ शकत नाही.
आवडली भाव अगदी पोहोचतोय.
आवडली भाव अगदी पोहोचतोय.
श्रीमंतांच्या बेगडी भक्तीने
श्रीमंतांच्या बेगडी भक्तीने देव विषण्ण झाला हे कवितेतून नीट मांडलंय.
परंतु, गरीबाने असं काय केलं की देव त्याच्यावर प्रसन्न झाला
>>> भिडे, असं काही दिसलं नाही. काही कडव्यांमध्ये दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्याला उपाशी पोटी भक्ती कशी सुचावी असंही सुचवलंय की !
दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी
हातातील नाणी, उगीच मोजतो ||
पोटाचेच जिथे, रोजचे सायास
कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||
असं काही दिसलं नाही.
असं काही दिसलं नाही. >>>>
आश्विनीजी,
"पुंडलिक तूच .... " या कडव्यातून तसं दिसतंय म्हणून तो प्रश्न उद्भवला.
पुंडलिक तूच, दामाजीही
पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
जोडी दोन हात, घेई माझे नाम
तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" ||
यात श्रीमंत गरीब अशी विभागणी नाही. यात भगवंताला पैशाने तृप्त करता येत नाही, तर भक्तीभावानेच तृप्त करता येते असं म्हटलंय. एखाद्या गरीबाने जर त्याला शक्य असेल तेवढा एखादा रुपया किंवा एखाद्या श्रीमंताने एक कोटी रुपये देवाला अर्पण केले आणि त्या दोघांच्याही मनामध्ये भक्तीभावच नसेल तर त्या त्यांच्या त्या पैशांचं भगवंताला काय अप्रूप असणार आहे? (अर्थात त्यांच्या यथाशक्ती दानाचं महत्व आहेच पण ते दान मोठेपणासाठी असू शकतं किंवा देवाजवळ केलेला एक व्यवहार असू शकतं) त्यांच्यापेक्षा एक पैसाही न देता मनामध्ये कायम भगवंताला स्थिर करणार्यालाच भगवंत भुलणार ना?
अर्थात एखाद्या कवितेचा अर्थ वाचकाने घ्यावा तसा असतो
छान
छान
निशदे, निशब्दच केलेत.
निशदे, निशब्दच केलेत. आशयसंपन्न , अतिशय सुरे़ख काव्य. सर्वांगसुंदर.
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद......
pradyumnasantu ,बेगड्या भक्तीमुळे देव देखील खिन्न होत असेल असेच दाखवायचे होते......
उल्हास जी, गरीबाची अथवा श्रीमंताची भक्ती असा इथे विचार मी केलेला नव्हता. भक्तीचे झालेले व्यापारीकरण, त्यात आलेला स्वार्थ इतका दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. साध्या नमस्काराने देखील देव आनंदी होऊ शकतो हे दाखवायचे आहे....... आपण सध्या कोणत्याही देवस्थानाकडे पाहिले तरी हेच चित्र दिसते......
आश्विनी, धन्यवाद उमेश,
आश्विनी, धन्यवाद
उमेश, मनापासून आभार.......
एक त्रिवार सत्य मांडलय
एक त्रिवार सत्य मांडलय आपण.खुप सुंदर!
धन्यवाद विभाग्रज......
धन्यवाद विभाग्रज......
भावपूर्ण. पण 'कविता' म्हणून
भावपूर्ण. पण 'कविता' म्हणून अजून सफाई यायला हवी आहे.
छान आहे .
छान आहे .
कर्णिक, निश्चितच प्रयत्न
कर्णिक,
निश्चितच प्रयत्न करेन.....
धन्यवाद फालकोर.
मस्त...!
मस्त...!
कोणी मागी देवा, धनधान्य
कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र
कोणी आरोग्य, आयुही मागिती ||
सारी असली जरी, देवाचीच पोरं,
एक दुजियाचा, नाशही मागिती ||
आणि
पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
....
ही दोन कडवी खासच...बाकी कविताही उत्तम !!
अप्रतिम कविता. विशेषतः शेवटचं
अप्रतिम कविता. विशेषतः शेवटचं कडवं ..!
शाम, चार्ली धन्यवाद मैत्रेयी,
शाम, चार्ली धन्यवाद
मैत्रेयी, खूप खूप धन्यवाद........... एक्स्पायरी डेट आवडली
निशदे दंडवत मित्रा तुला. अफाट
निशदे
दंडवत मित्रा तुला. अफाट आहेस
(No subject)
सुंदर.........
सुंदर.........
फारच सुदर कविता
फारच सुदर कविता
फार छान आशय विषय अभिव्यक्तीही
फार छान आशय विषय अभिव्यक्तीही उत्तम !
माण्डणी जरा सरस हवी होती वृत्ताच्या अन्गाने ...........(वैयक्तिक मत !!)
ही रचना अभन्गाच्या रूपरेषेत रचणे हा उद्देश असेल तर काही गोष्टी जपायला हव्यात.मला असलेली माहिती खालील प्रमाणे ............
अभन्गात पहिले तीनही चरण बहुधा षडाक्षरी असतात चौथ्यात अक्षर सन्ख्या बदलू शकते
पहिल्या तीन चरणात यमक शक्यतो साधले जाते.
अशा स्वरूपात ही रचना बसवल्यास नक्कीच खूप अधिक परिणाम साधता येईल.(हेही वैयक्तिक मतच !!)
खासच रचना!
खासच रचना!
अरेच्चा....... ही परत वर कधी
अरेच्चा....... ही परत वर कधी आली.....
किरण, धन्यवाद...... दंडवत स्वीकारला आहे....
आयडू, जादुगर, मिडासटच ......... मनापासून धन्यवाद.....
वैभव..... वैयक्तिक मते पूर्णपणे मान्य. आता लिहिली तर कदाचित अधिक चांगली लिहू शकेन. पण ही अक्षरशः १५ मिनिटात लिहून पोस्ट केली.
क्रांति..... धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया फार मोलाची आहे....
Pages