चांदणं - एक कथा

Submitted by स्वाती मोरे on 4 January, 2012 - 02:33

ये... छोटु एक कटींग दे रे.. !!
का? रे.... तुष्या आज ऑफ़िसावरुन लवकर....
आणि इथे कट्ट्यावर आम्हाल कसं काय दर्शन दिलत..
शि-याने कट्ट्यावर बसत विचारलं...
नाही रे हाल्फ़ डे घेतला मुड नव्हता आज....
का रे काय झालं?
कुछ नहीं यार...वही रोज रोज की टॆन्शन्स
मग दुसरा जॉब शोध ना....

अरे काय सल्ला देतोयस?????......
प्रत्येक कंपनी सध्या टेक्नीकल नॉलेज ला महत्व देतेय...आम्ही काय बी. कॉम ग्रज्युएट...अकांउंट्स च्या वर्तुळाबाहेर जग नाही रे आम्हाला...तुझी लाईफ़ खरच सही आहे यार..एकदम हींदी पिक्चरमधल्या हिरोसारखं जगणं आहे...आमच्या नशिबाच्या रेषा आम्ही हाताने कोरतोय तुझ्या तर आधीच कोरलेल्या आहेत त्याही देखण्या नक्षीत...कॉलेजमध्ये आमच्यासोबत फ़क्त एक ऎश म्हणुन होतास आता आराम करतोयस उद्या वडिलांचा बिझनेस सांभाळशील...एखाद्या दिवशी तुझे वडिल तुला ऑफ़ीसला नेउन म्हणतील...."श्रीरंग बेटा आजसे तुम यहा इस खुर्सी पर बैठोगे आजसे ये कंपनी तुम्हारी...!!
गप रे साल्या त्यातही केवढी लफ़डी आहेत तुला नाही कळणार...अरे ज्याला त्याला आपलं ते कार्ट आणी दुस-याच ते सोनुलचं वाटतं ...ज्याची जळते ना त्यालाच कळते...
मागुन दिन्या गाडीचा हॉर्न वाजवत हात दाखवुन पुढे गेला....
साल्याला दोन मिनिटं थांबता येत नाही का? शि-या वैतागला.
अरे कामात असेल यार.. साहेबांच लग्न आलय चार दिवसांवर घाईत असेल...
हा..आणि कामं करणार पक्का कामचोर आहे दिन्या...मागच्याच महिन्यात त्याच्या तातश्रींनी त्याला गाडी रिपेअर करुन आणायला सांगितलेली तर याने त्यांना "नाही करत" म्हणत उलट उत्तर दिलेलं...आठवतं का?
शि-या तु पण ना...यार शिंदेसरांसारखा आहेस...वेळेवर तुला अश्यागोष्टी बरोबर आठवतात त्यांच्या सारखाच हातात लाल कलरचा पेन घेऊन फ़िरतोस दिसली चुक की मारला शेरा...सोड ना तुला काय घेणं देणं ...बिघडला आता तो...चांगल्याच्यात गेला...आपण कायं जैसे थे...उद्या तुझंही लग्न होणारच..
आणी साल्या तुझंही.....शि-याने मध्येच वाक्य तोडलं.....
हं माझं...... माझं कसलं रे??
का रे काय झालं...
काही नाही यार सोडं...
तुष्या सांग का?? ते...
सांगतो...! आधी तु सांग तुझी नात्याची व्याख्या काय?
का रे आज डायरेक्ट हा प्रश्न का?
काही नाही रे सहजच विचारतोय....
शि-या.....नातं म्हणजे काय ? मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं....
हं..नातं... तुष्या नातं म्हणजे चांदण..जसा रात्री पडणा-या चांदण्यात एकटा चंद्र दिसतो ना तस काही आपण असतो इतके जवळ असुनही भरवसाचं कुठलच चांदण नसतं त्याच्यासाठी...आणि हे चांदण म्हणजे तु करत असलेल्या प्रवासात तुला क्षणभराची..काही काळापुरती सोबत..मग ते कुठलही असो आइ-बाप, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, प्रेयसी-बायको, मुलं-बाळं, आणि बरेच काही ..एका ठराविक वेळेपुरते ही आपल्याला या प्रवासात कंपनी देतात, आपल्या सोबत हसतात, रडतात, जगतात, त्यांनाही आपला प्रवास असतो रे..आपण फ़क्त ती सोबत एंजॉय करायची...सुख: दुख: वाटुन घ्यायचे..जशी तुलाही त्यांची गरज असते तशी त्यांनाही तुझ्या सोबतीची गरज असते..
त्यात गुंतण, न गुंतण हे सर्वस्वी तुझ्या हातात असतं, तुझ्या म्हणण्यापेक्षा तुझ्या मनाच्या हातात...!! मी बघ तसच करतो...अरे आज आहे उद्या नाही, कशाचाही भरवसा नसतो हे शापित सत्य आहे मित्रा..आपलं इथ काही नसतं ना कुठली वस्तु, ना पैसा, ना कूठली माणसं...मग कशाला उगाच या गोष्टींच ओझं घेउण फ़िरायचा हे माझं ते माझं, हा माझा तो माझा, हे काहीच नसतं तुष्या..इथं फ़क्त आपण असतो आपण..आपणच आपल्यासाठी जगायचं असतं...
मी तर म्हणतो अश्या गोष्टीत गुंतण्यापेक्षा समोरचा प्रत्येक क्षण, दिवस मजेत घालवायचा....आणि हसत शेवटापर्यंतचा प्रवास करायचा...सोबतच्या असलेल्या चांदण्याबरोबर.... याच प्रवासाला जगणं आणि त्या चांदण्याला नातं म्हणतात...म्हणजे कमीत कमी मी तरी म्हणतो ऑर मानतो....
एका दमात हे सगळं सांगुन शि-याने खिशातले सिगारेचं पाकीट काढलं...माझ्या समोर केलं मी हातानेच नको केलं...
आज खरंच मुड नाही रे...
"अच्छा.. !! आता तु सांग काय प्रॉब्लेम झाला...?
काही नाही यार...श्रेयाचा फ़ोन आलेला मघाशी...!!
मग...?
काही नाही लग्न ठरलं तिचं...
कधी..? कुणाशी..?
आजच तिने लगेच मला कॉल केला...आणि सांगितलं
पुण्यातला मुलगा आहे सॉफ़्टवेयर इंजिनियर...एम.एन.सी मध्ये जॉबला आहे...चांगलं पॅकेज मिळतं घरच्यांनी आज पहायचा पोग्राम ठेवलेला...पुढच्या महीन्याची तारीख काढलीये...लग्नानंतर लगेच ऍब्राड्ला जाणार आहेत...
अरे पण तुझ्यासाठी थांबणार होती ना ती?
शि-याने वैतागत विचारले..त्याचा आवाज जरा मोठा झालेला..टपरीवरच्या भैयाने हातातले पान खाली ठेवता ठेवता आमच्या दोघांकडे पाहीलं...
समोरुन शि-याच्या घरची गाडी येत होती आत त्याचे वडील होते...
"शि-या तुझे डॉन....!!
मी शि-याला सावध केलं..शि-याने हातातली सिगारेट पटकन फ़ेकली....
"श्रीरंग....चल रे.....!! शि-याच्या वडीलांनी त्याला हाक मारली....
चल तुझ्या....रात्री येतो कट्ट्यावर मिस कॉल टाक नंतर..
शि-याने पाठीवर थाप मारली आणि उडी टाकुन गेला....
...
"चांदण्यांनी भरलेल्या आभाळाला नजर लागावी आणि त्याला हवा असलेला त्याच्या जवळचा एक-एक तारा त्याच्या नकळत असा निखळून खाली पडावा....आणि त्यांनी फ़क्त ओल्या डोळ्यांनी ते पहात रहावं...निखळलेला तो प्रत्येक तारा कुठल्याश्या सरोवरात पडल्यानंतर शात होऊन आपल्या नव्या अस्तित्वात स्वछ्चंदी जगणं जगत राहीलेला चंद्रानं पाहयचं अन, त्यातच आपलं सुख मानायचं असतं." हा नियतीचा नियम आहे...नियतीचा नियम..त्याच्यापुढे माझ्यासारख्यांच काय ???

शि-या बोलत होता त्यात तथ्य होतं माणुस किती वेळ कुणासाठी थांबु शकतो कुणाबरोबर राहु शकतो...? पाच मिनिटं, पाच दिवस, पाच महीने, पाच वर्ष.....त्यानाही त्याची दुखणी असतातच की त्यानाही त्यांच जग असतच...आपनही त्यांच्यासारखेच...व्यवहार हा जगण्यातलाच एक भाग मग भले त्यात स्वार्थ असु दे....
खिशात मोबाईल वाजला...कूणीतरी मिस कॉल दिला...
उगाच हसलो...कुणाचा असेल....मिस कॉल देणारी तर गेली...आता कोण...????????
लॉक खोलले..घरचा होता....
बॅग घेउन......गाडीला कीक मारली....
अन, घराची वाट धरली.....
(कुठे तरी वाचलेलं )

गुलमोहर: 

स्वाति...

नाते कुठलेहि असो आइ-बाप, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, प्रेयसी-बायको, मुलं-बाळं, आणि बरेच काही ..एका ठराविक वेळेपुरते ही आपल्याला या प्रवासात कंपनी देतात, आपल्या सोबत हसतात, रडतात, जगतात, त्यांनाही आपला प्रवास असतो रे..आपण फ़क्त ती सोबत एंजॉय करायची...सुख: दुख: वाटुन घ्यायचे..जशी तुलाही त्यांची गरज असते तशी त्यांनाही तुझ्या सोबतीची गरज असते..

खरच छान लिहिलय ....

वेद.

नातं म्हणजे चांदण..जसा रात्री पडणा-या चांदण्यात एकटा चंद्र दिसतो ना तस काही आपण असतो इतके जवळ असुनही भरवसाचं कुठलच चांदण नसतं त्याच्यासाठी.... .

मस्त...

मला अस का वाटतय की ही कथा मी मा.बो. वरच आधी वाचलिये.>>>> उप्स ! चिऊ गं, मी वाचताना मला अगदी हेच्च वाटत होतं.

ithe mahtav changlya goshty karnyat ahe ka copy pest madhe, mala avdalele lekh mi ithe takale ahet maa vatal tumhala hi avdel pan tumhala tyat kami interest disat ahe ani chuka kadhnyat jast

इथे म्हणजे गुलमोहरमधे स्वतः लिहिलेलेच लिखाण असावे असा नियम आहे. तो वाचायचे कष्ट घ्याल का?
तसेच दुसर्‍याने लिहिलेले टाकायचे असेल तर ज्याने लिहिलेय त्याची परवानगी घेतलीये का?
त्या लिहिणार्‍याचे नाव कुठेच दिसत नाही.
जोवर लोक शोधून काढत नाहीत हे दुसर्‍याचे आहे तोवर तुम्ही काहीच बोलत नाही. स्वतःचेच असल्यासारखे दाखवता. काय समजायचं?

स्वती.. तुमचा विचार खुप चांगला आहे पण जागा चुकतेय...इथे मायबोलीवर; लेखक/कवी ई. च्या स्वतःच्या रचना असाव्यात, त्यायोगे नविन नविन वाचायला मिळावे हा 'क्षुद्र' हेतू इथे येणार्‍या वाचकांचा असतो. रचना स्वःताची नसल्यास स्पष्ट ऊल्लेख करावा. इथे असे अनेकजण आहेत ज्यांना ८-१० वर्षे झालीत, फक्त वाचक म्हणून भेट देतात पण इतरांच्या गोष्टी चोरत नाही... कॄपया वाईट वाटून घेऊ नका. आधी चांगले वाचक बना..बाकी भविष्यात तर तूमचे नाव सुवर्णक्षरात आहेच!

माफ करा मला माहित नसल्या मुले हा घोळ झालेला आहे
मी नवीन असल्यामुळे तुमचे नियम मला माहित नाही
माझ्या चुकीच्या बोलण्या मुले कोणाला त्रास झाल्यास माफी असावी

सॉरी, पण मला कंट्रोलच होत नाहीए हसु. Lol
चंबु - :डोळे मोठे करुन रागवणारी बाहुली: Proud

स्वाती, नावाचं स्पेलिंग बरोबर कर ना. हे बघ असं swaatee = स्वाती.