नुकत्याच झालेल्या रानवाटा प्रस्तुत गृप फोटोग्राफी प्रदर्शनानिमित्त हे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न.
आज सहजच "माझे सदस्यत्व" मध्ये पाहिले असता "सदस्य झाल्यापासूनचा कालावधी" ४ वर्षे २ दिवस असे दाखवत होता. मायबोलीचे सदस्यत्व कधी घेतले ते आठवतं नाही. पुढे हिच मायबोली दैनंदिन आयुष्याचा एक भाग होणार हे जर आधीच माहित असते तर सदस्यत्व घेतल्याची तारीख, वेळ नक्कीच लिहुन ठेवली असती. असच एकदा आंतरजालावर फिरत असताना, गड किल्ल्यांचे लेख वाचताना मायबोलीकर जीएस यांचे ट्रेकिंगवरचे काहि लेख वाचनात आले आणि ते वाचत असतानाच मी मायबोली कुटुंबात कधी सहभागी झालो ते कळलंच नाही. सदस्यत्व घेतल्यापासुन बराच काळ मी फक्त वाचकच होतो.
खरंतर भटकंतीची आवड असल्याने माझा वावर फक्त "माझे दूर्गभ्रमण, प्रकाशचित्र, प्रवासाचे वर्णन" याच विभागात जास्त होते (फोटोग्राफीची आवड मला "मायबोलीवर" आल्यानंतर लागली :-)). मी माझी पहिली पोस्ट प्रकाशचित्र विभागातच प्रदर्शित केली होती. मायबोलीवर प्रदर्शित केलेला पहिला फोटो होता तो जव्हार येथील "दाभोसा धबधब्याचा" प्रतिसाद "एकच". :-), दुसरा फोटो सरसगड (पाली) प्रतिसाद "शून्य". सुरुवातीला थोडं वाईट वाटत होते कि आपले फोटो आवडत नाही (अर्थात फोटोची क्वालिटीही तशीच होती म्हणा :फिदी:) तरीही अजुन काही फोटो प्रदर्शित करतच राहिलो. ;-). त्याच दरम्यान मायबोलीवर लिहिलेला माझा पहिलाच लेख "पर्यटन, पर्यावरण आणि आपण" हा मुख्यपृष्ठावर झळकला. खुप खुष झालो होतो.
त्यावेळी माझ्या बर्याच पोस्टींना १-२ असेच प्रतिसाद मिळत होते. नंतर माझे अजुन एक प्रवासवर्णन गर्द हिरवाईतील श्री केशवराज याला सर्वात जास्त म्हणजे ३३ प्रतिसाद लाभले. तेंव्हा लेखात फोटो पेरून तो सादर करण्याची कल्पना बर्याच जणांना आवडली होती. काहि मायबोलीकरांनी त्याबद्दल विपुत येऊन कौतुकही केले होते. नंतर वेगवेगळ्या संकल्पना घेऊन, एखादी थीम घेऊन मी मायबोलीवर येऊ लागलो. त्यात माझ्या पहिल्याच थीम "फरक" ला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. नेहमीचेच फोटो एखाद्या वेगळ्या एखाद्या विषयावर घेऊन मी मायबोलीवर येऊ लागलो. तोपर्यंत हे सगळे फोटो मी माझ्या साध्या डिजीकॅमने काढत होती. मायबोलीकरांच्या याच प्रोत्साहनाने प्रेरीत होऊन मी कॅनन एसएलाअर घेतला. या नविन कॅमेर्याने काढलेल्या माझ्या काहि मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत गेला त्यापैकी पहिली "भटकंती जुन्नर-मंचर परिसराची". मग मात्र माझी "फोटो एक्सप्रेस" तूफान धावू लागली. कधी २ तर कधी ५०-६० असे भरघोस फोटो टाकुन मायबोलीकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू लागलो.
मायबोलीवरच्या सर्वच नावाजलेल्या छायाचित्रकारांकडुन मोलाची मदत मिळत गेली. त्यातले पहिले नाव म्हणजे "सावली". यांच्या लेखातुन भरपूर माहिती अगदी सोप्या शब्दात समजली. कधी कौतुक तर कधी कानपिचक्या यातुनच फोटोग्राफीची आवड कधी निर्माण झाली ते माझेही मला कळले नाही. भटकंतीची आवड असल्याने फक्त भटकलो त्या जागेची आठवण म्हणुन फोटो काढायचो आणि स्वतःकडेच साठवून ठेवायचो. पूर्वी भटकायचो म्हणुन फोटो काढायचो आणि आता मात्र फोटो काढायचे म्हणुन भटकायला लागलो आहे. माझ्यातील या बदलाचे श्रेय "मायबोली"कडे जाते. कित्येक मायबोलीकरांचे "तुझ्या फोटोंमुळे आम्हाला जुने दिवस आठवले, Nostalgic झालो, जुने दिवस पुन्हा जगलो" यासारखे प्रतिसाद वाचताना ती पोस्ट टाकल्याचे सार्थक वाटत होते. आपल्या कलाकृतीमुळे कुणालातरी आनंद मिळतोय हे वाचुनच खुप समाधान लाभत होते. मग मात्र मी माझ्या पोस्ट्वर "किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो.
वरील हे सर्व लिहिण्याचे कारण कि नुकत्याच झालेल्या रानवाटाच्या प्रदर्शनात माझे काहि फोटो प्रदर्शित झाले होते. मी काढलेले फोटो फोटो कुठल्या प्रदर्शनात प्रदर्शित होतील हे कधी स्वप्नातही वाटलेले नव्हते ते सत्यात उतरले आणि याचे सारे श्रेय मी "रानवाटा","मायबोली आणि मायबोलीकरांना" देऊ इच्छितो. इथे जर मला प्रोत्साहन मिळाले नसते तर कदाचित माझे फोटो माझ्या संगणकावरील कुठल्याशा ड्राईव्हवरच राहिले असते.
मायबोलीकरांनी दिलेले प्रोत्साहन आणि रानवाटाच्या स्वप्निल पवार सरांनी दिलेल्या शिकवणीमुळेच हे साध्य होऊ शकले. मायबोली आणि मायबोलीकरांचे मी आभार मानणार नाही कारण आभार परक्यांचे मानले जाते.
रानवाटा प्रदर्शनाची एक झलक
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रदर्शनाला उपस्थित मायबोलीकर
प्रचि १२
(प्रकाशचित्रे — योगेश जगताप आणि रूपेश बांदकर)
मायबोलीकरांनी उदंड प्रतिसाद देत प्रदर्शनाला भेट देऊन माझा हुरूप वाढवल्याबद्दल मी चिक्कार खुश आहे.
आत्ताशी मी कुठे पहिली यत्ता पास झालोय अजुन भरपूर शिकायचो आहे. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत तर आहेतच. तुमचे आशिर्वादही असु द्या.
तळटिप : "प्रकाशचित्र" या विभागानेच मायबोलीवर "जिप्सीची" एक वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे सदर लिखाण याच विभागात प्रदर्शित करत आहे.
वा जिप्स्या, तुझ्या
वा जिप्स्या, तुझ्या मायबोलीवरच्या वाटचालीचा छान आढावा घेतलायस. इतक्या कौतुकानंतरही तुझे पाय जमिनीवरच आहेत हे विशेष. गणेशोत्सवाच्या वेळी प्रचि स्पर्धेकरता तुला परिक्षक होशील का? असं मी विचारलं असता तु किती सहजपणे म्हणालास की "अजून परिक्षक होण्याची क्षमता माझ्यात आली आहे असं मला वाटत नाही" आणि त्याच सहजतेने तू इतरांची नावं सजेस्ट केली होतीस. ही सतत शिकत राहण्याची वृत्ती तुला खूप यश देईल यात शंका नाही.
माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
जिप्सि, तुमच्या फोटोग्राफि मी
जिप्सि, तुमच्या फोटोग्राफि मी जेव्हा मा बोवर आले तेव्हापासुनच आवडलि, तुमच्याबद्द्ल अजुन वाचायला आवडेल.......... All the Best
जिप्सी.. तुझ्या उत्तरोत्तर
जिप्सी.. तुझ्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी तुला नेहमीच खूप खूप शुभेच्छा...
we are sooo proud of You!!!
जिप्सी, अभिनंदन. प्रकाशचित्रे
जिप्सी, अभिनंदन. प्रकाशचित्रे आणि मनोगत दोन्ही छान.
जिप्सी, तूझी फोटोग्राफी कला
जिप्सी, तूझी फोटोग्राफी कला नॅचरल आहे. मस्त असतात तूझे फोटो.
अभिनंदन जिप्सी आणि पुढील
अभिनंदन जिप्सी आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
वा मस्त आणि अभिनंदन! असेच
वा मस्त आणि अभिनंदन! असेच तुझ्या चिंत्राचे प्रदर्शन भरत राहोत ही शुभेच्छा!
जिप्सि रे... मस्तच ...
जिप्सि रे... मस्तच ...
(No subject)
छान झाले मनोगत.. तुला पुढील
छान झाले मनोगत..
तुला पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा...
मनोगत आवडले आणि फोटो तर
मनोगत आवडले आणि फोटो तर आवडतातच. मनःपूर्वक शुभेच्छा
सगळ्यांचे मनापासुन
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!
"किती" प्रतिसाद येतात ते
"किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो >>> There you are...
मस्त लिहिलंयस.
अभिनंदन योगेश.
अभिनंदन योगेश.
योगेश मनोगत छानच आहे. आता एक
योगेश मनोगत छानच आहे. आता एक प्रदर्शन पुण्यात पण भरव ना आमच्यासाठी.
तुला खूप खूप शुभेच्छा!
सर्वच छान - तु़झे मनोगत,
सर्वच छान - तु़झे मनोगत, मांडण्याची पध्दत, मनमोकळा स्वभाव, फोटोग्राफीचा हुरुप
मस्त... पुढील प्रवासासाठी
मस्त... पुढील प्रवासासाठी शुभेच्छा... आता पुढच्या वेळी तुझ्या छायाचित्रांचे संपूर्ण प्रदर्शन बघायचे भाग्य लाभू दे...
मनावर घेच...
अरे, यातला तो मोठा ग्रूप फोटो
अरे, यातला तो मोठा ग्रूप फोटो 'गटगच्या आठवणींचे जतन'ला पाठवता येईल की...
बाकी, त्या फोटोत सेनापती आणि मावळा गंभीर आहेत... बाकी सगळे हसतमुख दिसतायत. त्यांची कुठली मोहिम फसली होती की काय
धन्स लोक्स यातला तो मोठा
धन्स लोक्स
यातला तो मोठा ग्रूप फोटो 'गटगच्या आठवणींचे जतन'ला पाठवता येईल की... >>>>ललिता, त्याच फोटोंनी या विभागाची सुरूवात झालीय.
शुभेच्छा ! शुभेच्छा !!
शुभेच्छा ! शुभेच्छा !! शुभेच्छा !!!
मित्रा शुभेच्छांचा पाऊस असाच तुझ्यावर बरसत राहो . आम्हाला झक्कास प्र.ची. ची सफर घडत राहो.
लले... माणसे नीट अरेंज करायला
लले... माणसे नीट अरेंज करायला हवीत अश्या अश्या मतावर आपण येणार तोपर्यंत तो छायाचित्रकार छायाचित्र काढून मोकळा झाला पण. (जीप्स्या किंवा स्वप्नीलने पटकन फोटो काढण्याचा इशारा दिला असेल... :D)
रच्याकने... तो सोडून माझे इतर २ फोटो बघ. प्रसन्न आणि हास्यमुद्रा आलेली आहे... ही अशी...
Pages