मनोगत

Submitted by जिप्सी on 11 January, 2012 - 00:39

नुकत्याच झालेल्या रानवाटा प्रस्तुत गृप फोटोग्राफी प्रदर्शनानिमित्त हे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न. Happy

आज सहजच "माझे सदस्यत्व" मध्ये पाहिले असता "सदस्य झाल्यापासूनचा कालावधी" ४ वर्षे २ दिवस असे दाखवत होता. मायबोलीचे सदस्यत्व कधी घेतले ते आठवतं नाही. पुढे हिच मायबोली दैनंदिन आयुष्याचा एक भाग होणार हे जर आधीच माहित असते तर सदस्यत्व घेतल्याची तारीख, वेळ नक्कीच लिहुन ठेवली असती. असच एकदा आंतरजालावर फिरत असताना, गड किल्ल्यांचे लेख वाचताना मायबोलीकर जीएस यांचे ट्रेकिंगवरचे काहि लेख वाचनात आले आणि ते वाचत असतानाच मी मायबोली कुटुंबात कधी सहभागी झालो ते कळलंच नाही. सदस्यत्व घेतल्यापासुन बराच काळ मी फक्त वाचकच होतो.

खरंतर भटकंतीची आवड असल्याने माझा वावर फक्त "माझे दूर्गभ्रमण, प्रकाशचित्र, प्रवासाचे वर्णन" याच विभागात जास्त होते (फोटोग्राफीची आवड मला "मायबोलीवर" आल्यानंतर लागली :-)). मी माझी पहिली पोस्ट प्रकाशचित्र विभागातच प्रदर्शित केली होती. मायबोलीवर प्रदर्शित केलेला पहिला फोटो होता तो जव्हार येथील "दाभोसा धबधब्याचा" प्रतिसाद "एकच". :-), दुसरा फोटो सरसगड (पाली) प्रतिसाद "शून्य". Happy सुरुवातीला थोडं वाईट वाटत होते कि आपले फोटो आवडत नाही (अर्थात फोटोची क्वालिटीही तशीच होती म्हणा :फिदी:) तरीही अजुन काही फोटो प्रदर्शित करतच राहिलो. ;-). त्याच दरम्यान मायबोलीवर लिहिलेला माझा पहिलाच लेख "पर्यटन, पर्यावरण आणि आपण" हा मुख्यपृष्ठावर झळकला. खुप खुष झालो होतो. Happy

त्यावेळी माझ्या बर्‍याच पोस्टींना १-२ असेच प्रतिसाद मिळत होते. नंतर माझे अजुन एक प्रवासवर्णन गर्द हिरवाईतील श्री केशवराज याला सर्वात जास्त म्हणजे ३३ प्रतिसाद लाभले. तेंव्हा लेखात फोटो पेरून तो सादर करण्याची कल्पना बर्‍याच जणांना आवडली होती. काहि मायबोलीकरांनी त्याबद्दल विपुत येऊन कौतुकही केले होते. Happy नंतर वेगवेगळ्या संकल्पना घेऊन, एखादी थीम घेऊन मी मायबोलीवर येऊ लागलो. त्यात माझ्या पहिल्याच थीम "फरक" ला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. नेहमीचेच फोटो एखाद्या वेगळ्या एखाद्या विषयावर घेऊन मी मायबोलीवर येऊ लागलो. तोपर्यंत हे सगळे फोटो मी माझ्या साध्या डिजीकॅमने काढत होती. मायबोलीकरांच्या याच प्रोत्साहनाने प्रेरीत होऊन मी कॅनन एसएलाअर घेतला. या नविन कॅमेर्‍याने काढलेल्या माझ्या काहि मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत गेला त्यापैकी पहिली "भटकंती जुन्नर-मंचर परिसराची". मग मात्र माझी "फोटो एक्सप्रेस" तूफान धावू लागली. कधी २ तर कधी ५०-६० असे भरघोस फोटो टाकुन मायबोलीकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू लागलो. Proud

मायबोलीवरच्या सर्वच नावाजलेल्या छायाचित्रकारांकडुन मोलाची मदत मिळत गेली. त्यातले पहिले नाव म्हणजे "सावली". यांच्या लेखातुन भरपूर माहिती अगदी सोप्या शब्दात समजली. कधी कौतुक तर कधी कानपिचक्या यातुनच फोटोग्राफीची आवड कधी निर्माण झाली ते माझेही मला कळले नाही. भटकंतीची आवड असल्याने फक्त भटकलो त्या जागेची आठवण म्हणुन फोटो काढायचो आणि स्वतःकडेच साठवून ठेवायचो. पूर्वी भटकायचो म्हणुन फोटो काढायचो आणि आता मात्र फोटो काढायचे म्हणुन भटकायला लागलो आहे. माझ्यातील या बदलाचे श्रेय "मायबोली"कडे जाते. कित्येक मायबोलीकरांचे "तुझ्या फोटोंमुळे आम्हाला जुने दिवस आठवले, Nostalgic झालो, जुने दिवस पुन्हा जगलो" यासारखे प्रतिसाद वाचताना ती पोस्ट टाकल्याचे सार्थक वाटत होते. आपल्या कलाकृतीमुळे कुणालातरी आनंद मिळतोय हे वाचुनच खुप समाधान लाभत होते. मग मात्र मी माझ्या पोस्ट्वर "किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो. Happy

वरील हे सर्व लिहिण्याचे कारण कि नुकत्याच झालेल्या रानवाटाच्या प्रदर्शनात माझे काहि फोटो प्रदर्शित झाले होते. मी काढलेले फोटो फोटो कुठल्या प्रदर्शनात प्रदर्शित होतील हे कधी स्वप्नातही वाटलेले नव्हते ते सत्यात उतरले आणि याचे सारे श्रेय मी "रानवाटा","मायबोली आणि मायबोलीकरांना" देऊ इच्छितो. इथे जर मला प्रोत्साहन मिळाले नसते तर कदाचित माझे फोटो माझ्या संगणकावरील कुठल्याशा ड्राईव्हवरच राहिले असते.

मायबोलीकरांनी दिलेले प्रोत्साहन आणि रानवाटाच्या स्वप्निल पवार सरांनी दिलेल्या शिकवणीमुळेच हे साध्य होऊ शकले. मायबोली आणि मायबोलीकरांचे मी आभार मानणार नाही कारण आभार परक्यांचे मानले जाते. Happy

रानवाटा प्रदर्शनाची एक झलक

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
प्रदर्शनाला उपस्थित मायबोलीकर
प्रचि १२

(प्रकाशचित्रे — योगेश जगताप आणि रूपेश बांदकर)

मायबोलीकरांनी उदंड प्रतिसाद देत प्रदर्शनाला भेट देऊन माझा हुरूप वाढवल्याबद्दल मी चिक्कार खुश आहे. Happy
आत्ताशी मी कुठे पहिली यत्ता पास झालोय अजुन भरपूर शिकायचो आहे. Happy तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत तर आहेतच. तुमचे आशिर्वादही असु द्या. Happy

तळटिप : "प्रकाशचित्र" या विभागानेच मायबोलीवर "जिप्सीची" एक वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे सदर लिखाण याच विभागात प्रदर्शित करत आहे. Happy

गुलमोहर: 

वा जिप्स्या, तुझ्या मायबोलीवरच्या वाटचालीचा छान आढावा घेतलायस. इतक्या कौतुकानंतरही तुझे पाय जमिनीवरच आहेत हे विशेष. गणेशोत्सवाच्या वेळी प्रचि स्पर्धेकरता तुला परिक्षक होशील का? असं मी विचारलं असता तु किती सहजपणे म्हणालास की "अजून परिक्षक होण्याची क्षमता माझ्यात आली आहे असं मला वाटत नाही" आणि त्याच सहजतेने तू इतरांची नावं सजेस्ट केली होतीस. ही सतत शिकत राहण्याची वृत्ती तुला खूप यश देईल यात शंका नाही.

माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! Happy

जिप्सि, तुमच्या फोटोग्राफि मी जेव्हा मा बोवर आले तेव्हापासुनच आवडलि, तुमच्याबद्द्ल अजुन वाचायला आवडेल.......... All the Best

"किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो >>> There you are... Happy
मस्त लिहिलंयस.

मस्त... पुढील प्रवासासाठी शुभेच्छा... Happy आता पुढच्या वेळी तुझ्या छायाचित्रांचे संपूर्ण प्रदर्शन बघायचे भाग्य लाभू दे... Happy
मनावर घेच... Happy

अरे, यातला तो मोठा ग्रूप फोटो 'गटगच्या आठवणींचे जतन'ला पाठवता येईल की...

बाकी, त्या फोटोत सेनापती आणि मावळा गंभीर आहेत... बाकी सगळे हसतमुख दिसतायत. त्यांची कुठली मोहिम फसली होती की काय Proud

धन्स लोक्स Happy

यातला तो मोठा ग्रूप फोटो 'गटगच्या आठवणींचे जतन'ला पाठवता येईल की... >>>>ललिता, त्याच फोटोंनी या विभागाची सुरूवात झालीय. Happy

शुभेच्छा ! शुभेच्छा !! शुभेच्छा !!! Happy
मित्रा शुभेच्छांचा पाऊस असाच तुझ्यावर बरसत राहो . आम्हाला झक्कास प्र.ची. ची सफर घडत राहो.

लले... माणसे नीट अरेंज करायला हवीत अश्या अश्या मतावर आपण येणार तोपर्यंत तो छायाचित्रकार छायाचित्र काढून मोकळा झाला पण. (जीप्स्या किंवा स्वप्नीलने पटकन फोटो काढण्याचा इशारा दिला असेल... :D)

रच्याकने... तो सोडून माझे इतर २ फोटो बघ. प्रसन्न आणि हास्यमुद्रा आलेली आहे... ही अशी... Lol

Pages