कबुतर जा जा...

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 January, 2012 - 02:11

माझ्या एका चुलत भावाकडे ही मंडळी रोज दाणे खायला जमलेली असते अगदी थव्याने. आपण जवळ गेलो तरी जराही घाबरत नाहीत.

१)
dove.JPG

२)
dove1.JPG

३)
dove 2.JPG

४)
dove 3.JPG

५)
dove 4.JPG

६)
dove 5.JPG

७)
dove 6.JPG

८)
dove 7.JPG

९)
dove 8.JPG

१०)
dove 9.JPG

११)
dove 10.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मांजर कबूतर सहज पकडते व खाते असे वाटते.

हो.. अगदी सहज पकडते. मांजरजमातीने पाय न वाजवता चालण्यात डॉक्टरेट केलीय आणि कबुतरांच्या जीन्समध्ये अगदीच जीवावर बेतल्याशिवाय उडायचे नाही असे प्रोग्रॅमींग केलेय बहुतेक Proud

माझ्या घरातही ही पकडापकडी झालेली आहे. आमचे (घरात आगंतुकपणे घुसून घराचा ताबा घेतलेले) मांजर आणि माझी लेक दोघीही हॉलमध्ये आरामात लोळत टिवी बघत असताना अचानक एक कबुतर गच्चीमधुन घरात आले आणि थेट काँप्युटररूममध्ये घुसले. त्या खोलीची खिडकी उघडी असल्याने लेकीने कबुतर खिडकीतुन बाहेर जाईल असे वाटून दुर्लक्ष केले. मांजर मात्र उठली आणि चोरपावलांनी काँप्युटररूममध्ये गेली. काही मिनिटांतच फडफडीचा आवाज आला म्हणुन लेक धावत रुममध्ये जाऊन बघते तर काय मांजरीच्या तोंडात कबुतराची मान... Sad

ह्याच मांजरीने पुढे गच्चीत ४ पिल्ले घातली. गच्चीत आधीच कबुतरांची मायंदाळी नी त्यात मांजरांची भर. Sad महिन्या- दोन महिन्यात त्या पिल्लांनी कबुतरांची शिकार करायला सुरवात केली. रोज सकाळी कबुतरांच्या पिसांचा हा एवढा ढिग साफ करावा लागल्यावर मी शेवटी पिलांसकट आईची गच्छंती केली. कबुतरे मात्र अजुनही सुखाने नांदताहेत. गच्चीत काही वाळत घातले विशेषतः गहू वगैरे की सतत पहारा द्यावा लागतो.

साधना Lol

Pages