कबुतर जा जा...

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 January, 2012 - 02:11

माझ्या एका चुलत भावाकडे ही मंडळी रोज दाणे खायला जमलेली असते अगदी थव्याने. आपण जवळ गेलो तरी जराही घाबरत नाहीत.

१)
dove.JPG

२)
dove1.JPG

३)
dove 2.JPG

४)
dove 3.JPG

५)
dove 4.JPG

६)
dove 5.JPG

७)
dove 6.JPG

८)
dove 7.JPG

९)
dove 8.JPG

१०)
dove 9.JPG

११)
dove 10.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान

मस्त ! काय सही आहेत सगळेच प्रचि ! पण तेवढंच. हा पक्षी मला अगदी आवडत नाही. भयंकर घाणेरडा, तापदायक आणि भांडखोर असतो. शांततेचं प्रतिक म्हणुन कबुतर का उडवतात कोण जाणे. Happy लांबुन बघायला मात्र छान असतो. त्याचं ते चालणं, माना वेळावणं, मानेवरच्या रंगछटा सगळंच गोड.

जागु, काहींनी तुला अगदी पोज दिल्यात फोटोसाठी Happy

फोटो मस्त,
जसे कोंबड्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चिकन आणि त्याच्या मागे वा पुढे एक शब्द ठेवून, अगणित खाद्यप्रकार केले जातात तसे पिजन चे पण झाले तर...
लोकसंख्या नियंत्रित होईल.

कसले अभद्र फोटो आहेत >> म्हणजे मला म्हणायचे होते की अशा अभद्र पक्षाचे फोटो का काढले आहेत. रागावर नियंत्रण न ठेवता आल्याने पटकन तसे लिहिले Happy दिनेशची सुचना खरच अमलात आणली जावी Happy

दिनेशदा, माधव काही भागात कबुतरे खाल्ली जातात, औषधी म्हणुन आणि हौस म्हणूनही. कबुतराचे मांस म्हणे खुप गरम असते. दम्याच्या विकारांवर वगैरे ते खाल्ले जाते असे ऐकून आहे.

ए असे नाही हा.. ती पांढरी कबुतरे खुप गोड दिसताहेत. पण मुंबईत ती फारशी दिसत नाही. ५०-६० कबुतरांच्या थव्यात एखादे पांढरे असते. पण ते इतर कबुतरांसारखेच असते. (फोटो नं. ६ मध्ये दिसणा-या कबुतरांसारखे.) वरची पांढरी कबुतरे जराशी वेगळी आहेत. त्यांच्या शेपट्या लांब आहेत (फो. ५,११) आणि उडताना त्या शेपटीचा पिसारा खुप छान दिसतो. मी अलिबागला ही पांढरी कबुतरे पाहिली होती.

बाकी फोटो नं ६ मधली कबुतरे बेक्कार असतात. कबुतरांना अहिंसेचे प्रतिक म्हणुन निवडणा-या लोकांनी माझ्या घरी यावे. अहिंसेची प्रतिके कशी हिंसक बनुन इतर पक्ष्यांना हुसकावुन लावतात आणि सगळ्यांसाठी म्हणुन घातलेले धान्य कशी एकटीच मटकावतात याचा आंखो देखा हाल त्यांना दिसेल. Proud खाण्यासाठी कबुतरे एकमेकांशीही भांडतात. अशक्त कबुतरांना सगळ्यात शेवटी खायला मिळते आणि त्यांच्यानंतर चिमणी-कावळे.

कबुतर हा प्रचंड आळशी पक्षी. यांना पकडणे अतिशय सोप्पे असते. पण त्याचे मांस तितकेसे चांगले नसावे चवीला. नाहीतर एवढी मुबलक मिळणारी आणि सहज हाती लागणारी कबुतरे इतक्या संख्येने दिसली नसती.

गुवाहाटीला कामाख्या मंदिरात बळी म्हणुन यांचा उपयोग करतात. तरीही तिथे प्रचंड संख्येने हजर असतात.

घरटी बांधण्याच्या बाबतीत आळशी, अंडी कशीही, कुठेही टाकतात, तरी प्रजा वाढतेयच. आणि नामशेष होत असलेल्या पक्ष्यांची खुप काळजी घेऊनही बिचा-यांची प्रजा वाढत नाही. एकुण बेफिकीर वृत्तीने जगले तर आयुष्य सुखात जाते हा धडा कबुतरांकडुन घ्यायला हरकत नाही.

साधना Happy

जागू Lol

आमच्याकडेही असायची.. पण सध्या आम्ही त्यांना थारा देणं बंद केलय.. त्यांची ३ बाळांतपणं सोसल्यानंतर...

कबुतरांचं पिल्लांना उडायला शिकवणं बघितलं.. अक्षरशः त्या पिल्लाला टोचा मारुन मारुन उडायला शिकवतात.. एखादं शिकतं पटकन, पण एखादं इतकं आळशी असतं ना, प्रचंड टोचा खातात मग ते.. आणि त्याच्या समोर ते हुशार पिल्लु सतरा वेळा उडुन नाचत असतं

कबुतराच्या रक्ताचा गाउट या रोगावर इलाज होतो असे ऐकले आहे.
जागु फोटो चांगले.
@ साधना हो ना कुठेहि अंडी घालतात. बहुतेक त्यांच्यापेक्षा आपणच काळजी घेणार हे त्यांना ठाउक असावे. काहिहि झाले तरी अंडे नाहि फेकवत ना.

मी सुद्धा साधनासारखी कबुतरपिडीत होते एके काळी. मला टेरेसला ग्रील किंवा मेश लावलेले अजिबात आवडत नाही. जेलमधे असल्याचा फिल येतो, पण या अतिदुष्ट आणि घाणेरड्या पक्षामुळे लावायलाच लागलं. माझं मोकळं आकाश हिरावुन त्यांनी पक्षी जमातीचा माणसावरचा सुड पुर्ण केला.

नविन घरी शिफ्ट झाल्यावर सगळ्यात मोठा आनंद कि इथे कबुतरं नाहीत. देवाचे आभार. मी आधीच्या घरी त्यांना बेडरुममधे कोंडुन. (स्पे. कबुतरासाठी रिझर्वड) टॉवेल आणि कधी कधी छोटी काठी यांनी फटके द्यायचे, इतके डोक्यात जायचे ते माझ्या. त्यांची दया येणारच नाही, इतका उच्छाद आणला होता त्यांनी. लांबुन ते जितके गोड दिसतात तेवढे घाणेरडे ते जवळुन असतात. Angry

साधना, शिर्षक किती समर्पक आहे ना Wink

मी सुद्धा साधनासारखी कबुतरपिडीत होते एके काळी. मला टेरेसला ग्रील किंवा मेश लावलेले अजिबात आवडत नाही. जेलमधे असल्याचा फिल येतो, >>>>>>> अगदी अगदी.....मी ही कबुतरपिडीत गटात सामील आहे पण अजुन गॅलरीला ग्रील लावलेलं नाही....... कबुतर व्हर्सेस मी आणि माझी लेक असा सामना चालू असतो नेहमी आमच्याकडे.....

आता शिर्षक कबुतर पिडीत टाकायला हवे.
>>> 'कबुतर जा जा' ह्या शीर्षकातून त्याच भावना किती काव्यात्मक रितीने व्यक्त होत आहेत Proud

हा बीबी कोणीतरी कबुतरांना वाचायला द्या >> मग हा बाफपण माबोवरच्या इतर काही बाफांप्रमाणे पेटेल - कबुतर वाइट का माणूस वाइट यावरून Happy

श्री ह्यांना पाळण्याची गरजच नसते. कुठेही येऊन पाळल्याप्रमाणे ठिय्या मारतात ते.

साधना ह्या कबुतरांनी जर हा बिबी वाचला तरी त्यांना काही फरक पडणार नाही. उलट अजुन माजतील.

एकुण बेफिकीर वृत्तीने जगले तर आयुष्य सुखात जाते हा धडा कबुतरांकडुन घ्यायला हरकत नाही.>>>>>

Rofl

कबुतरांवर किरण पुरंदरेंचा उत्तम लेख आला होता. ही सर्व कबूतरे उगाचच निर्माण झालेली आहेत. (बहुधा त्यांना पारवे म्हणायचे असावे किंवा मलाच आठवत नसावे). माणूस दाणे टाकत असल्यामुळे ती अन्नाच्या शोधार्थ काहीही न करता आरामात जगत राहतात आणि संख्येने वाढत राहतात.

त्यांचे मांस कसे लागते हे माहीत नाही, पण काही ठिकाणी प्रॉपर कबूतर भाजून वगैरे खातात. मांजर कबूतर सहज पकडते व खाते असे वाटते.

जागू, फोटो मात्र मस्तच! Happy

Pages