सह्याद्री पर्वतरांग ही एक अत्यंत मोहमयी चीज आहे. सह्याद्रीच्या दर्याखोर्यांत भटकायचं व्यसन लागलं की ते इतर तमाम व्यसनांप्रमाणेच सुटता सुटत नाही. गेली काही वर्षे अशी भटकंती केल्यानंतर या भटकंतीमधल्या अनुभवाचा कसा उपयोग करून घेता येईल यावर 'ई-साहित्य प्रतिष्ठान'च्या सुनिल सामंत यांच्याशी गप्पा मारता मारता 'दुर्ग दुर्गट भारी'ची कल्पना सुचली.
सध्याच्या काळात, "डोंगर थोडे, ट्रेकर फार" अशी अवस्था आहे. पण तरीही, उपयुक्त माहिती नवख्या उत्साही ट्रेकर्सना बर्याचदा मिळतेच असं नाही. मग अशा प्रकारची माहिती एकाच जागी मिळाली तर किती फायदा होईल? आणि अशी वाचनीय माहिती घरबसल्या ईमेलवर मिळाली तर? आणि तीही विनामूल्य मिळाली तर? ह्या सर्व गोष्टी 'दुर्ग दुर्गट भारी' मधून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत.
'दुर्ग दुर्गट भारी' ही 'ई-साहित्य प्रतिष्ठान'ची किल्ल्यांवर आधारित अशी एक ई-पुस्तक मालिका आहे. एक किल्ला, त्याचा इतिहास-भूगोल, पायथ्यापर्यंत पोचायचे मार्ग, किल्ल्यावर जाणार्या वाटांची माहिती, राहण्याची-पाण्याची सोय, त्या किल्ल्याच्या भटकंतीबद्दल ब्लॉग/वेबसाईटवर उपलब्ध असलेले दर्जेदार लेख(अर्थात लेखकाच्या पूर्वपरवानगीने) , ट्रेकींगला जाताना करायची पूर्वतयारी अशी भरगच्च माहिती असलेला 'दुर्ग दुर्गट भारी'चा अंक सध्या पीडीएफ स्वरूपात पोहोचवला जातो. जून २०११ मध्ये शिवराज्याभिषेकदिनाच्या सुमुहुर्तावर किल्ले रायगडावर उद्घाटन झालेल्या या उपक्रमाचे आतापर्यंत रायगड, पेब, पन्हाळगड ते विशाळगड (जंगली मार्ग), सिंहगड आणि रायरेश्वर-केंजळगड असे पाच अंक वितरित झाले आहेत. पहिला अंक साधारण ८०००० वाचकांपर्यंत पोहोचला. सध्या हा आकडा एक लाखापेक्षा अधिक आहे.
देश-विदेशातून सर्व वयोगटातील वाचकांचे भरभरून तसेच भावनिक, व्यावहारिक, मार्गदर्शक प्रतिसाद या उपक्रमाला लाभत आहेत. मायबोलीवरच्या नेहमीच्या भटक्यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी ताबडतोब 'लागेल ती' मदत द्यायला होकार दिला आहेच. माबोकर हेम पुढच्या अंकाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष सहभागीही झाला आहे. सध्या साधारण महिन्याला एक अंक अशी योजना आहे. सह्याद्रीतल्या किल्ल्यांची संख्या पाहता हा एक दीर्घकाळ चालणारा प्रवास आहे, हे सांगायला नकोच!
हा अंक जर कोणाला विनामूल्य हवा असेल, तर durgabhari@gmail.com इथे तसा इमेल करावा. फेसबुकवर http://www.facebook.com/durgabhari इथे हे अंक मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत.
तसेच, या अंकांच्या निर्मितीमध्ये आपापले उद्योग सांभाळून जर कुणाला सहभागी व्हायचे असेल तर मला संपर्कातून लगेच कळवा. त्यासाठी 'मनापासून, उत्साहाने, चिकाटीने केवळ छंद म्हणून काम करणारा/री' एवढीच पात्रता आहे. किल्ल्यांची माहिती नसली तरी चालेल. मराठी टायपिंग, page setup इ बाकीच्या कामांतही तुमची मदत होऊ शकेल. योग्य माणसाची निवड करण्यास आम्हीही उत्सुक आहोत.
आपला,
- नचिकेत जोशी (आनंदयात्री)
मुख्य संपादक,
'दुर्ग दुर्गट भारी'
तळटीपः 'दुर्ग दुर्गट भारी' हा एक संपूर्ण 'छांदिष्ट' प्रकल्प आहे. या अंकाच्या विक्री तसेच जाहिरातीतून कुठलीही आर्थिक कमाई केली जात नाही.
स्तुत्य उपक्रम!!! शुभेच्छा!!!
स्तुत्य उपक्रम!!! शुभेच्छा!!!
चांगला उपक्रम आहे. अनेक
चांगला उपक्रम आहे. अनेक शुभेच्छा
छान उपक्रम !! आम्हीही गड
छान उपक्रम !!
आम्हीही गड किल्ल्ये भटकत असल्यामुळे किल्ल्यांविषयी काही माहीती हवी असल्यास कळावे.
काही मदत करु शकलो तर आमचे अहोभाग्य.
चांगला उपक्रम शुभेच्छा !!!
चांगला उपक्रम
शुभेच्छा !!!
हे तू आता डकवतोयस इथे...
हे तू आता डकवतोयस इथे... विसरला होतास का... ?
अत्यंत स्तुत्य आणी गरज असलेला
अत्यंत स्तुत्य आणी गरज असलेला प्रकल्प...
काही माहीती हवी असल्यास जरूर कळवावे... खारीचा वाटा उचलण्याची धन्यता मानू...
हे तू आता डकवतोयस इथे...
हे तू आता डकवतोयस इथे... विसरला होतास का... ?>>> +१
वा! अगदी स्तुत्य उपक्रम!
वा! अगदी स्तुत्य उपक्रम! शुभेच्छा!
छान उपक्रम, अंक नक्कीच वाचेन.
छान उपक्रम, अंक नक्कीच वाचेन.
छान उपक्रम आहे तुमचा ...
छान उपक्रम आहे तुमचा ... अभिनंदन
नचिकेत! ऑलद बेस्ट !!
नचिकेत! ऑलद बेस्ट !!
इतक्या उशिराने इथे लिहितो
इतक्या उशिराने इथे लिहितो आहेस...
शुभेच्छा...
दगड, रोहन - विसरलो नव्हतो...
दगड, रोहन - विसरलो नव्हतो... थोडी वाट बघत होतो...
मनोज, मंगेश - नक्कीच!
सर्वांचे आभार!
अतिशय उत्तम उपक्रम आहे हा.
अतिशय उत्तम उपक्रम आहे हा. अशा माहितीतुनच नवेनवे भटके आणि ट्रेकर निर्माण होतात, त्यांचा द्रुष्टीकोन तयार होतो.
हा उपक्रम राबवण्यासाठी खुप सार्या शुभेच्छा.
आताच मेल केली आहे.
अतिशय उत्तम उपक्रम आहे हा.
अतिशय उत्तम उपक्रम आहे हा. अशा माहितीतुनच नवेनवे भटके आणि ट्रेकर निर्माण होतात, त्यांचा द्रुष्टीकोन तयार होतो.>> +१
झक्कास उपक्रम, नचिकेत.
भरमसाठ शुभेच्छा
आ.या., उत्तम उपक्रम. पण ते
आ.या., उत्तम उपक्रम. पण ते दुर्घट हवं होतं ना...?
आ.न.,
-गा.पै.
खूपच स्तुत्य उपक्रम..!! मी
खूपच स्तुत्य उपक्रम..!!
मी नाही पण माझा नवरा ट्रेक्स वर जातो..तो BNHS चा देखील member आहे..पण सध्या आम्ही बाहेर असल्यामुळे तो हे सर्व खूप miss करतो. FB वर सभासदत्व घेतले आहे..तुम्हाला अनेक शुभेच्छा..
अत्यंत उपयोगी उपक्रम.
अत्यंत उपयोगी उपक्रम. मनापासुन शुभेच्छा!!