Submitted by पाषाणभेद on 2 January, 2012 - 18:11
पांडूरंग माझा गरीब राहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या
गरीब राहू द्या
गरीबांना पाहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या ||धृ||
नका अर्पू त्याला सोने अन नाणे
त्याला नसे त्याचे देणे घेणे
आपलीच श्रीमंती
आपलीच श्रीमंती
उगा जगाला का दावता ||१||
नका लावू त्याला सुखाचे डोहाळे
नका करू त्याचे उत्सवी सोहळे
तोच दाता असता
तोच दाता असता
कशाला त्याला देणगी तुम्ही देता? ||२||
भक्तासाठी देव पहा थांबला विटेवरी
भक्तीसाठी कर दोन्ही ठेवीले कटेवरी
नको दुजे काही देणे
नको दुजे काही देणे
काही न घेण्यासाठी बध्द करी हाता ||३||
- पाभे
गुलमोहर:
शेअर करा
जय जय पांडुरंग हारी भक्तिवरि
जय जय पांडुरंग हारी
भक्तिवरि श्रिमंती भारी!
भक्तीसाठी कर दोन्ही ठेवीले
भक्तीसाठी कर दोन्ही ठेवीले कटेवरी
नको काही घेणे
काही न घेण्यासाठी बध्द करी हाता
अतिशय प्रत्ययकारी विचार व समर्थ कल्पना.
खूप छान...
खूप छान...
आपले विचार पटले
आपले विचार पटले नाहीत..........पांडुरंग गरीबाचा देव आहेत्यात वाद नाहीच पण त्याला गरिबीचा देव केला गेला आहे. यावर आमचा आक्षेप आहे .त्याच्यासोबत त्याच्या सर्व भक्तांनी श्रीमंत व्हावे हीच आमची अपेक्षा.
जय जय विठोबा रखुमाई! जय जय
जय जय विठोबा रखुमाई! जय जय विठोबा रखुमाई!
छान...
पाषाण आणि त्या पासून बनवलेली
पाषाण आणि त्या पासून बनवलेली मूर्ती यात हाच तर भेद आहे, पाषाणभेद......