कैवल्य

Submitted by संजयb on 1 January, 2012 - 08:56

अरे थांब जरा.
कानोसा घे.
तो घंटांचा मंद नाद ऐक
धुपाचे उठणारे वलय पहा.
 तिरक्या किरणात उजळलेला विठोबा बघा.
हात जोड अन विश्वरूप आठव.
 मनातील विचार विकार
अशा निराशा
शंका लोभ ख्शोभ
विरतात का बघ .
विरले ? जिंकलास!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ही कविकल्पना म्हणून नवीन आहे ,इथे सूर्यकिरण अपेक्षित आहेत का ? पण वास्तवात असं होत नाही ; निदान आमच्या पंढरपुरात तरी ! कृपया खुलासा कराल का ?
बाकी कविता छान आहे

होय श्रीकृष्णचे विश्वरूप! कारण पंडूरंग म्हणजे श्रीकृष्णच नाही का?
नाही पंढरपूरात तर नाहीच पडत विठ्ठला वर सूर्यिकरण मूर्तिवर. ही कल्पनाच. प्रासाद करीता आभार