मायबोलीवरील काही जुने आणि दुर्मिळ (तटी. १ पहा) संदर्भबाफ अभ्यासत असताना आमच्या भावूक म्हणा, चाणाक्ष म्हणा, संधीसाधू म्हणा, मनात एक किंचित शंका म्हणा, भिती म्हणा, काळजी म्हणा, किंवा पॉझिटिव्हली म्हणायचं तर संधीचं सोनं करण्याची उर्मी म्हणा, एकदम दाटून आली. अभ्यासांती (तटी. २ पहा) आम्हाला असे आढळून आले की २०१२ मध्ये मानवजातीवर काहीएक महासंकट कोसळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातून केवळ गिनेचुनेच लोकंच जिवंत राहणार आहेत.
आता महासंकटातून जिवंत राहणार, तेही अगदी निवडक काही! तर त्यात आमचा नंबर लागण्याची शक्यता ही अत्यल्प असणार याबद्दल आमच्या मनात किंतू नाही. खरंतर अनुभवानुसार महासंकटातून वारंवार जिवंत राहण्याचं कसब केवळ आपल्या मालिकांतल्या पात्रांच्यातच आहे - ते सुध्दा सगळ्यांच्यात नाहीच बरं का! केवळ काही भाग्यवंतांनाच हा मृत्युंजययोग प्राप्त झाला आहे. त्यामुळे ते लोकं जिवंत राहणार्यांच्यात असतील अशी आमची एक अटकळ आहे. राहोत बापडे!
पण आपण आपल्याकडून काही कसर राहू दिली असं होऊ नये असं मात्र आम्हाला मनापासून आणि प्रामाणिकपणे वाटतं म्हणून ही एक धडपड. आमची बकेट लिस्ट तयार करण्याची. तर आमची बादली खालील इच्छांनी भरलेली आहे याची नोंद घ्यावी. त्या जमतील तशा पूर्ण करण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न राहील आणि हाच आमचा नववर्षसंकल्प मानला जावा अशी आमची कळकळीची मागणी आहे.
२०१२ हे वर्ष असल्याने आम्ही आमची बादली ६ इच्छांनी (तटी. ३, ४ व ५ पहा) भरण्याचा प्रयत्न केला आहे.
२ : भटकंती / फोटकंती इच्छा
अनेक थोर थोर लोकं सांगून गेलेत की 'केल्याने देशाटन ....' इ. इ. तर ते तसे आम्हीही करतोच. पण काय होतं की निसर्ग सौंदर्य बघण्यात आणि त्यात हरपून जाण्यात इतर काही अतिमहत्त्वाच्या गोष्टी राहूनच जातात. उदा. फोटो काढणे. म्हणजे फोटो आम्हीही काढतोच हो. पण ते पुढे लेखासकट प्रकाशित करण्याचा आद्य हेतू न बाळगल्याने बाळबोध, घरगुती फोटो काढणे, चांगले फोटो असले तरी अनेकानेक कारणांमुळे ते प्रकाशित करण्याचे टाळणे, केवळ फोटो देता येत नाहीत तर त्यांची साग्रसंगीत माहिती देणे असते त्यामुळे ते लिखाण आणि बरोबरीनं फोटो प्रकाशित करणे टाळणे अशा अनेकविध घोर अडचणी डोक्यात डोकावत राहतात.
पण हा जन्मजात आळशीपणा कमी करून फोटो झळकवण्याची आणि प्रवासवर्णने लिहिण्याची आमची मनिषा आहे.
३ : आळशीपणा नष्ट करण्याची इच्छा
वरील इच्छेवरूनच आम्ही आळशीपणाविरूध्द सुरू केलेली मोहिम लक्षात आली असेलच. तर ही आमची आणखी एक इच्छा. खरंतर दरवर्षी ही इच्छा आमच्या नववर्षसंकल्पांत पहिल्या नंबरवर असतेच असते. यावरून आमचे सातत्य ध्यानात येईल. यावर्षी एक संकल्प सोडायचा आणि मोडायचा, मग दुसर्या वर्षी दुसरा ... असा धरसोडपणा आमच्या व्यक्तीमत्त्वात नाही या जमेच्या बाजूकडे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.
आता आळशीपणा हा अनेक बाबतीत असू शकतो. त्याबाबत जरा विस्ताराने लिहिता येईलही पण आता कंटाळा आलाय .....
४ : बौध्दिक इच्छा
एकदा तरी कोणत्याही मुद्द्यावर एकच एक बाजू नेटास धरून खच्चुन वाद घालायची इच्छा. आम्हाला नेहमी कोणत्याही मुद्द्यांवरच्या दोन्ही अथवा दोनापेक्षा जास्त असतील तर तितक्या सगळ्या बाजू योग्य वाटत राहतात आणि मग वादात आम्ही नुसतेच इकडून तिकडे बघत बसतो आणि मान डोलवत बसतो. इतर लोकं दुसर्याचा मुद्दा कितीही योग्य वाटत असला, दिसत असला तरी किती आत्मविश्वासानं आपला मुद्दाच पुढे रेटत राहतात याचं आम्हास नेहमीच वैषम्य वाटत आलं आहे. (तटी. ६ पहा) बघुया कितपत जमतंय ते!
५ : ग्लॅमरस इच्छा
एकदा तरी ते साताठ इंची स्टिलेटोज घालून चालून बघायचं. अर्थात या इच्छेत आम्ही धूर्तपणे दोन-तीन सबइच्छा अंतर्भूत केल्या आहेत. एक म्हणजे वजन कमी करायचं. नाहीतर ते मेले साताठ इंचवाले निमूळते बूट तुटतील ना! आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या अनुषंगानं भरपूर शॉपिंग करता येईल. साताठ इंचवाले बुट आणायला गेल्यावर आम्ही बाकी काही विकत घेणार नाही की काय? त्याला साजेसा ड्रेस, अॅक्सेसरीज, जमलंच तर एखादं हिर्याचं पेंडंट. मग पार्लरभेट. आणि हो! परिपूर्ण ग्लॅमरसतेचा उच्चांक असे ते सनग्लासेस.
६ : अध्यात्मिक इच्छा
कुंडलिनी जागृत करायची (तटी. ७ पहा). निदान तसा प्रयत्न तर नक्कीच करायचा. पण त्याकरता कोणा एका बाबा, बुवा, माता, आदीशक्तींचं व्यसन लावून घ्यायला हवं. नेमानं तिथं जायला हवं. आणि सगळ्यांत कठीण म्हणजे न झोपता त्यांचं एखादं तरी प्रवचन समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पण मुळात तिथंच तर प्रॉब्लेम डॉट कॉम आहे ना. पहिलापासून आम्ही स्वतंत्र बाण्याचे असल्यामुळे दुसर्याची फिलॉसॉफी झेपतच नाही. आता इन्स्टंट कुं.जा. देवींनाच साकडं घालावं लागेल की काय अशी परिस्थिती आहे खरं तर. पण आधी बिकट वाट तपासून तरी बघणारच.
*****************************************
तळटीपा :
१ : म्हणजे टाळं लावले गेलेले.
२ : म्हणजे एकाच बाफची सात सुवर्णपत्रं वाचल्यावर
३ : २०१२ मधील १२ आणि २ हे आकडे घ्या. त्यातल्या मोठ्या आकड्याला लहान आकड्याने भागा. यामुळे आपल्यास ६ हा इच्छांक मिळतो.
४ : जग हे शून्यातून निर्माण होऊन शून्यातच विलीन होणार असल्याने ते धरले नाहीये याची कृपया नोंद घ्यावी.
५ : मोठ्या आकड्याला लहान आकड्याने गुणण्याची परवानगी नाही कारण त्यामुळे मायबोलीवरच्या सर्वांत पवित्र आकड्याला कॉम्पिटिशन निर्माण होण्याची शक्यता आहे.
६ : एखाद्या विषयावर ठाम मत नसणे हा मनाचा कमकुवतपणा समजण्याची चूक करू नये. 'आपुलाची वाद आपणासी' असं ते उच्चपातळीवरचं मनोमंथन असतं हे आम्ही इथे नम्रपणे नमुद करू इच्छितो.
७ : ज्याप्रमाणे कुंडलिनी ही मूलाधारचक्रात असते तद्वत ही इच्छा इतर सर्व इच्छांच्या तळाशी आहे. पण बादलीत ठेवल्यावर याच क्रमाने ठेवल्याने ती (तटी. ८ पहा) आपसूक वर येईल.
८ : इथे ती म्हणजे इच्छा असा अर्थ घ्यावा, कुंडलिनी नव्हे.
******************************************
बेसमेंट टीप :
तुम्ही म्हणाल की यादी २ आकड्यापासून कशी सुरू झाली? तर हा योग्य प्रश्न! उत्तर असे की सगळ्यात पहिली आणि प्रबळ इच्छा अशी आहे की २०१३ मध्ये पुन्हा एकदा नववर्षसंकल्प करण्याची आणि मोडण्याची संधी आमच्यासह सगळ्या पृथ्वीवासीयांना नक्कीच मिळावी आणि तशी ती पुढेही दरवर्षी मिळत रहावी. मानवजातीच्या प्रगतीचा हा प्रवास असा एका झटक्यात संपायला नको, नाही का?
मामे , लई भारी
मामे , लई भारी
वा! मस्तच. एकूणात काय जगबुडी
वा! मस्तच.
एकूणात काय जगबुडी २०१२ बाफाला ३० डिसेंबर २०११ रोजी अपत्यप्राप्ती झाली! एकेकाची वेळ यावी लागते हो!
मजेदार लिहिलंय ..... .....
मजेदार लिहिलंय .....:P ..... तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही शुभेच्छा .....
चान... २०१२ ला जगबुडी होणार
चान... २०१२ ला जगबुडी होणार आहे ना? २०१२ साठी तो बीबी पुन्हा चालू करा.
मामी खुपच मस्त..
मामी खुपच मस्त..:)
भारी लिवलय मामी. तथास्तु!
भारी लिवलय मामी.
तथास्तु!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2876
(No subject)
पण सार्या इच्छा पूर्ण
पण सार्या इच्छा पूर्ण झाल्याची वेळ ही जगबुडीसाठी बरोब्बर वेळ असते म्हणतात बरं का.
मामी.. तुझ्या बादलीभर
मामी.. तुझ्या बादलीभर इच्छांमधे मी एक मग्गाभर इच्छा अॅड करूका...
कॅरेमल पुडिंग परत ट्राय करायचं आणी पहिल्या इच्छेनुसार त्याचा फोटू डकवायचा ..
एक नंबर लिखाण.
एक नंबर लिखाण.
मस्त. कालच आम्ही एका स्टिलेटो
मस्त. कालच आम्ही एका स्टिलेटो पेअर ची खरेदी केली. मी पण आता विमानातून बाहेर दिसणार्या उनाड ढगांचे फोटो घेउन टाकणार.
झंपुतै> मस्त प्रतिक्रिया. एकदा संयुक्तात याकि बै.
मस्तच
मस्तच
(No subject)
मामे एक बादली मस्तय
मामे एक बादली मस्तय
मामी, मस्तच खुप
मामी, मस्तच खुप आवडलं.
माझ्या पण अनेक बादल्या... )
(No subject)
भाहारीही!
भाहारीही!
त्या 'ऐतिहासिक' बाफची आठव्ण
त्या 'ऐतिहासिक' बाफची आठव्ण ताजी केल्याबद्दल धन्यवाद!
या महान कार्यासाठी तुम्हाला लवकरच 'किरिमीजी' पेय प्राप्त होऊन इलामा देवाचे दर्शन घडो, हरी ओम
आगाऊ, बरेच दिवसांनी उगवलास!
आगाऊ,
बरेच दिवसांनी उगवलास!
सगळ्या इच्छा पूर्ण होवोत!
सगळ्या इच्छा पूर्ण होवोत!
मामी.......
मामी.......
मामी भन्नाट
मामी भन्नाट
मामी, २०१२ संपत आलेय, किती
मामी, २०१२ संपत आलेय, किती इच्छा झाल्या पूर्ण?
जगबुडीची तारीख काये म्हणे?
जगबुडीची तारीख काये म्हणे?
२१/२३/२५ डिसेंबर २०१२ म्हणे,
२१/२३/२५ डिसेंबर २०१२ म्हणे, अधीक माहितीसाठी http://www.maayboli.com/node/2876 इथे जा
हाय्ला, लागोपाठ ३ जगबुड्या
हाय्ला, लागोपाठ ३ जगबुड्या का?
लईईच भारी..... सगळे पंचेस
लईईच भारी..... सगळे पंचेस जोरदारेत...
Pages